कविता (देवद्वार छंद)

आरसा's picture
आरसा in विशेष
29 Apr 2010 - 10:36 pm
छंदशास्त्र

पुढील दोन वर्षासाठी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समिती मधे सहभागी होण्याचे ठरवले आहे. नव्या जोमाने, काही बदल घडवून आणण्याच्या उमेदीने वार्तापत्र मराठी मधे काढण्याचा हट्ट नवीन समितीने धरला आहे, अन त्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. घरी माझी आई, बाबा, मुलगी , नवरा, सगळेच मराठी कविता करतात, पण मी कधी त्या वाटेला गेले नाही, हा माझा प्रांत नव्हे ... परवा अचानक मनातले विचार या रचनेत प्रकटले...

कार्याचे आरंभी
गणेशाचा मान
पहिले कवन
त्यास वाहू ।
संपर्क, संवाद,
सहवास घडो
मराठीचा जडो
छंद मना ।
रमवाया तुम्हां
नवे उपक्रम
असा नित्यक्रम
चालू द्यावा ।
काय सांगता हो
भाषा येत नाही
शिकू लवलाही
येता गोडी ।
“ब्रोशर" नव्हे हे
म्हणू वार्तापत्र
बोलवा सर्वत्र
होवो त्याचा ।
गुणिजन तुम्ही
असता पाठीशी
होईल सरशी
मराठीची ।
वाट पाहतो, या
या सहकुटंब
आनंदे तुडुंब
मन होवो ।
घेतला हो वसा
कार्यरत सदा
भाग्याची शुभदा
परांजपे ।

धोंडोपंतांचे आणि मि.पा. चे आभार !

प्रतिक्रिया

प्राजु's picture

29 Apr 2010 - 10:45 pm | प्राजु

गुणिजन तुम्ही
असता पाठीशी
होईल सरशी
मराठीची ।

नक्कीच!!

आवडली रचना. मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

प्रशांत उदय मनोहर's picture

1 Aug 2010 - 11:42 am | प्रशांत उदय मनोहर

देवद्वार छंदात मस्त जमलीये कविता.

पुढील लेखनास शुभेच्छा!

आपला,
(रसिक) प्रशांत

डावखुरा's picture

29 Apr 2010 - 11:05 pm | डावखुरा

विचार उत्तम...
थोडी उमजली....थोडी नाही...!!

कार्याचे आरंभी
गणेशाचा मान
पहिले कवन
त्यास वाहू ।

{ओव्यां च्या वळणावर गेलिये थोडीशी...}

गुणिजन तुम्ही
असता पाठीशी
होईल सरशी
मराठीची ।

याबद्दल वादच नाही.....
------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

बेसनलाडू's picture

30 Apr 2010 - 12:22 am | बेसनलाडू

कवितेच्या प्रांतातले तुमचे पदार्पण चांगले झाले आहे. लिहीत रहा, कवितांचा आनंद देत-घेत रहा. शुभेच्छा!
(अनुभवी)बेसनलाडू
गझलेतील मक्त्यातील तखल्लुसासारखे या छंदबद्ध कवितेतही तुमचे नाव तुम्ही कल्पकतेने गुंफले आहे, ही आश्चर्यमिश्रित आनंददायी गोष्ट आहे. मी गझलेतर कवितेत आधी असे पाहिले नव्हते.
(टोपणनावी)बेसनलाडू

आरसा's picture

1 May 2010 - 1:54 pm | आरसा

अभिप्राया बद्दल आभारी आहे. प्रयत्न करत राहीन म्हणते ...
- आरसा

rjbendre's picture

3 May 2010 - 5:50 pm | rjbendre

अभिनन्दन

रणजित चितळे's picture

16 Nov 2010 - 2:21 pm | रणजित चितळे

वाट बघतोय

छान लिहीले आहे