आबा, बाबा, दाजिबा जमले की ढाब्याला जोर चढतो. तंदूर रोट्या कमी पडतात, गिलासावर गिलास वाढतात, कोंबडीच्या तंगड्या त्यांच्या पोटात उडतात! आमचा बाप, बायलीचा बाप, दाजीचा बाप अशी थोर बापमाणसं ढाब्यावर गेली की ती परत येईपर्यँत आमच्या घराला निस्ता घोर लागतो. बोलून चालून ही एकमेकांची ईवायी मंडळी! घोटानंतर घोट वाढला की आवाजसुद्धा चढू लागतो. जोतो दुसऱ्यावर ओरडू लागतो. एक तोळा कमीच दिला, पावण्यारावळ्यांची चांगली सोय झाली नाही, खायला बक्कळ होतं पण प्यायची ठेप जमली नाही असे आरोप प्रत्यारोप होऊन गिलासावर राग निघू लागला की ढाब्यावाल्याचं धाबं दणाणतं! आणखी नुकसान होऊ नये म्हणून दोन चार वेटर ह्या त्रिकुटाच्या दिमतीला उभे राहतात. ज्या बानं जरा कमी घेतलीय त्याच्या लक्षात हा चक्रव्यूह येतोच.
'जावूनद्या ईवायी, निघायचं बगा. रात लै चढलीय. उठा आता.' असं म्हणत तो बिल मागवतो. ते कधीच तयार करून ठेवलेलं असतं, कधी एकदा ही तीनतिगडी निघत्यात असं वेटरांसकट मालकालाही वाटत असतं. एकमेकांचे खिसे उलथे पालथे करून शेवटी एकदाचा बिलातला आकडा जुळवला जातो आणि बडीशेपीचा बकणा भरून त्रिकूट गावाकडे भेलकांडत निघतं...
घरी आल्यावरही गुमान झोपतील ती मंडळी कसली? पावण्याच्या घरीही चारदोन शिव्या हासडल्याशिवाय अन् काहीतरी फोडल्याशिवाय त्यांच्या व्यसनी जिवाची शांती होत नाही. सकाळच्यापारी राती जे बोल्लो ते पदरात घ्या अशी दिलगिरी व्यक्त करून पाव्हणं निघतात. जाता जाता 'आमच्याबी गावाभायिर एक चांगला ढाबा झालाय तवा म्होरच्या इतवारी यावा बरं का.' अशी प्रेमळ गळ घालायला विसरत नाहीत. आमचा बा पुढच्या रविवारची वाट बघत कामाला जुंपून घेतो...
तर अशी ही आमच्या बापजाद्यांची ढाबा संस्कृती!
आ.बा.चा ढाबा...
गाभा:
प्रतिक्रिया
30 Apr 2010 - 11:27 am | पक्या
एखाद्या कथेची सुरवात असल्यासारखी वाटतीये. लिहिलयं चांगलं पण जरा अजून विस्तार हवा होता.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
30 Apr 2010 - 7:21 pm | II विकास II
+१
---
आपला समाज इतिहास पचवण्याइतका अजून प्रगल्भ झालेला नाही हेच खरे आहे. कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात. - श्री जयंत कुलकर्णी.
30 Apr 2010 - 11:49 am | टारझन
एवढ्ढंस्स्सं ? :(
- प्रो.प्रा.टारझन
मालक, हॉटेल ताज ढाबा, हुबळीफाटा
30 Apr 2010 - 12:47 pm | Pain
टारझनशी सहमत. हे तर appetizer पेक्शाही कमी आहे. अजून लिहा.
आणि हे या सदरात कस काय :?
30 Apr 2010 - 7:01 pm | प्रदीप
आवडले.
30 Apr 2010 - 7:10 pm | शुचि
मला पुरेसं वाटलं. लै आवडलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
30 Apr 2010 - 7:19 pm | प्रदीप
मलाही वाटलं. पण बर्याच वाचकांना बहुधा भरमसाट काहीतरी लिहीलेलं असलं तेव्हाच त्यात काही 'दम' आहे असे वाटते. तेव्हा अशा आटोपशीर आणि बिनचूक लिखाणावर 'अजून हवे होते' असे शेरे येतात. तेही परवडले, पण 'पुढील भागाच्या अपेक्षेत' असे प्रतिसादही काही अशाच थोडक्यात पण चोख आटोपलेल्या लिखाणावर वाचलेत- जे निदान मला तरी अपमानास्पद वाटतात!
1 May 2010 - 10:39 am | Pain
भरमसाट काहीतरी नाही. आशयगर्भ आणि किमान एका ठराविक लाम्बीचे लेख / गोष्टी / अनुभव आवडतात.
जेवणात नुसता १ शेन्गदाणा दिला तर अपमानस्पद नाही का वाटणार ? Quantity is also important as quality.
1 May 2010 - 10:35 am | टारझन
जर भरमसाठ लिहीलं तर कमेंट द्यायची , "काय बदाबद लिहुन ठेवलंय , जरा दमानं घ्या !!" असो , बाकी फक्त लेखावर कमेंट देण्या ऐवजी "आमच्या" कमेंट वर कमेंट केली =)) मजेशीर आहे बॉ !
1 May 2010 - 2:31 pm | प्रदीप
कॉमेंटवरच मी हे म्हटले असे नाही. तसे मला कुणाही एका कॉमेंटबद्दल हे म्हणायचे नव्हते. पण असे छोटेखानी तरीही परिपूर्ण लिखाण असले तरीही असल्या कॉमेंट्स येतात त्याकडे माझा रोख होता. काही महिन्यांपूर्वी बिपीन ह्यांनी अगदी छान 'ती' हा लेख लिहीला होता तेव्हाही अशाच कॉमेंट्स आल्या होता, तेव्ही आता येथे आठवले.
आणि तुमच्या लेखनावर 'बदाबद लिहून ठेवलंय' असा शेरा मीतरी कधीही मारलेला नाही. उलट तुमच्या बर्याच लेखनाला मी दाद दिलेली आहे. ('अजून पोपट येऊद्या!' असे तेव्हा कुणी म्हटले असते तर?)) बदाबद लेख लिहीणारे, तसेच बदाबद प्रतिसाद लिहीणारे काही इथे व अन्यत्र आहेत, ते सर्व वेगळे . त्यात तुम्हाला कुणी ढकलत असतील तर ते तुमचे दुश्मन असावेत!! ('मरे तुम्हारे दुश्मन!')
30 Apr 2010 - 7:24 pm | टुकुल
>>तर अशी ही आमच्या बापजाद्यांची ढाबा संस्कृती! <<
आमच्या पण, जेंव्हा यांचा असा कार्यक्रम असला कि मी मग वेटरच काम करतो, यांच झाल कि उरलेल मामेभावा बरोबर आमच्या पोटात ;-)
--टुकुल
1 May 2010 - 2:36 pm | ईन्टरफेल
आता आमच्या काहि बापजाध्यां सांगता नाय याच ते बिचार दिसभर शेतात राबायच तवा त्येला काय राच्याला ढोसायचि आठवन व्हाचि नाय! ते राच्याला ... ..८ वाजल्याच घोराया लागायच! आता आमच काय ईचारु नगासा! आमि गल्लास नाय! बाटल्या नाय! खंबे बि नाय! आख्ख टिपाडाच्या टिपाड पाल्थे घातलिया ........तवा महाराट्र दिनाच्या दिवशि आमच्याक सगळे धाबे म्होरुन बंद आसतात नायतर तुमा सर्व्याना बोलिवल आस्त तसे आमि राच्याला बसनारच हाय कोनि दिसल मिपा वाल तर...घिन बोलुन ....... एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप