गाभा:
माझ्या एका अमेरीकन दोस्ताला प्रोस्टेट कॅन्सर अगदी सुरूवातीच्या अवस्थेत असल्याचे दोन महिन्यापुर्वी निष्पन्न झाले होते. अमेरीकेतला खर्च काहीच्याकाहीच असून त्याच्याकडे इन्शुरन्स नसल्याने चौकशी करण्यातच इतका वेळ गेला आहे. त्याचा कॅन्सर आता दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचला आहे. भारतात उपचार करून घेणे श्रेयस्कर ठरेल का यावर आता आमच्यात विचार चाललेला आहे. या कॅन्सरच्या प्रकारावर भारतात उपचार उपलब्ध आहेत का? असल्यास त्यांची जितकी जमेल तितकी माहिती आणि साधारण खर्च कितीसा येईल वगैरे कोणास सांगता आले तर अनंत उपकार होतील. या साध्यासरळ दोस्ताला गमावण्याचा विचारही सहन होण्यापलिकडचा आहे.
प्रतिक्रिया
28 Apr 2010 - 2:29 pm | चिरोटा
भारतात http://apollobangalore.com/sch_urology.aspx ह्या इस्पितळात उपचार केले जातात असे ऐकले आहे.व्यनीतून जास्त माहिती दिलीत तर मी त्यांना विचारुन पाहतो.
भेंडी
P = NP
28 Apr 2010 - 3:54 pm | प्राजक्ता सुनील
औरंगाबाद येथे कमलनयन बजाज हॉस्पिटल मधे उत्तम उपचार मिलतिल. तरीही फ़ोन नंबर देते. बोलून चौकशी करा व मग निर्णय घ्या .
०२४०-२३७७९९९
28 Apr 2010 - 4:01 pm | बिपिन कार्यकर्ते
या आजारातून बरे व्हायला तुमच्या मित्राला मनःपुर्वक शुभेच्छा!!! सध्या तरी एवढेच. काही कळले तर नक्की कळवेन.
बिपिन कार्यकर्ते
28 Apr 2010 - 4:12 pm | प्राजक्ता सुनील
http://chowgulemediconsult.com/secondopinion/
हे स्थल पहा नक्कि.
28 Apr 2010 - 4:35 pm | शैलेन्द्र
भारतात सहज्पणे चांगले उपचार मिळु शकतात व खर्च अमेरिकेशी तुलना करता नगण्य आहे.
तुमच्या मित्राला अनेकानेक शुभेच्छा!
28 Apr 2010 - 5:42 pm | डॉ.प्रसाद दाढे
पुष्कळ पर्याय आहेत भारतात. मुंबईत बेस्ट 'टाटा मेमोरियल' आहे, पुण्यातही सुसज्ज रूग्णालये आहेत. बंगळुरात किडवाई आहे इ इ. मी मुखकर्करोगावर इलाज करित असल्याने माझे अनेक कर्करोगतज्ञांशी चांगले संबध आहेत; मला व्यनि केलात तर त्यांचे नंबरही देऊ शकेन.
28 Apr 2010 - 7:17 pm | बहुगुणी
व्य नि पाठवला आहे
28 Apr 2010 - 7:44 pm | वेदश्री
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. सांगितले गेलेले सर्व पर्याय चाचपून बघते आहे.
भेंडी, डॉ.प्रसाद आणि बहुगुणी,
सविस्तर बोलणे होईलच व्यनि-इमेलमधून.
28 Apr 2010 - 8:31 pm | टारझन
तुमचा मित्र सुखरुप १००% ठणठणीत बरा व्हावा एवढीच प्रार्थणा !!