संपूर्ण जगात आपल्या देशाचे अनेक बाबातीत चांगलेच नाव झाले आहे, आणि सध्याच्या संगणक क्षेत्रातील घडामोडीमुळे तर युरोप , अमेरिकेत भारतीय युवक/युवतींना "Brand Ambassador" चा दर्जा प्राप्त झाला आहे या मुद्द्यावर तर अगदी चीन आणि पाकिस्तान यांचेही दुमत नाही. तीच गोष्ट कला, संगीत, व्यापार आणि शैक्षणिक (वैद्यकीय आणि तंत्रज्ञान) क्षेत्रातही जे नेत्रदिपक यश भारतीयांनी मिळविले आहे त्याचा हेवा आणि नवल कित्येक विकसनशील देशांना वाटत आहे.
ही झाली बुद्धिमत्ता संदर्भातील जगभर पसरलेली भारताची ओळख. पण त्याच बरोबर आपल्या उज्ज्वल ऐतिहासिक परंपरे मुळेदेखील "भारत दॅट इज इंडिया" असे नाव आहे ते येथील वास्तुकला, शिल्पकला आणि त्यांच्या हजारो वर्षे टिकून राहिलेल्या सौंदर्यामुळे. खरंय ! सा-या दुनियेतून जे पर्यटक या देशाला भेट देण्यास येतात ते काहीं दिल्ली, मुंबई, कोलकाता अशी गजबजलेली महानगरे पाहायला नक्कीच येत नसावी, तर त्यांना उत्सुकता असते ते येथील शिल्पकलेतील भारताने त्या त्या काळात दाखविलेल्या कौशल्याची आणि सौंदर्यपूजकतेची ! या परंपरेतील एक तेजस्वी माणिक म्हणजे "ताज महाल".
या संस्थळावरील ब-याच सदस्यांनी या स्वप्नवत वाटणा-या शिल्पास भेट दिली असेल, त्याच्या अतुलनिय सौन्दर्याने मोहून गेले असणारच ! ज्यांनी अध्यापि ताज महाल पाहिलेला नसेल तो पाहण्यासाठी आवर्जून जावे इतकी सुंदरता या "प्रीती स्मारकात" आहे. रात्रीच्या वेळी (विशेषत: पौर्णिमेचे वेळी...) तर येथे पर्यटकांचा पूरच असतो (मी दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळा ताज महाल पाहिला आहे, परंतु पौर्णीमेतील याची जादू अजून तरी अनुभवता आलेली नाही.....पाहू या कधी योग येतो ते !)
या ठिकाणी ~ आपल्या संस्थळावर ` ताज महाल कुणी बांधला, कारण काय होते ,कसा आराखडा केला असेल, किती काळ लागला, खर्च किती आला असेल ~~ आदी बाबींचा विचार करण्याची गरज नाही, कारण या तांत्रिक बाबी जवळपास सर्वाना माहित आहेच, नसेल तर गुगलिंग केल्यास झटकन अशा प्रकारची माहिती धो धो आपल्यासमोर येईल. या लेखात जो मुद्दा माझ्यासमोर आहे, तो आहे या स्मारकाच्या बांधकामाच्या सत्यतेविषयी. ही बाब मला ताज भेटीच्या चौथ्या फेरीच्या वेळी (सप्टेंबर २००९ मध्ये) फार तीव्रतेने जाणवली. कारण ताजच्या नेमक्या याच फेरी दिवशी आग्र्यात उसळलेल्या शिया-सुन्नी वाद दंगलीमुळे दोन दिवस संचारबंदी लागू झाली होती, व ताजला भेट देऊन झाल्यानंतर लखनौ रस्त्याला आता संध्याकाळच्या वेळेस गाडी घालू एका असा स्थानिक सल्ला मिळाल्यामुळे आग्रा उपनगरात मुक्काम करणे सक्तीचे झाले. चार मित्रापैकी एकाचे वडील सैन्यात कर्नल पदावर काम करीत असल्यामुळे तानी दिल्ली आग्रा व लखनौ येतील त्यांच्या परिचयाचा (मिलिटरी मध्येच) काम करणा-या अधिकारी मित्रांचे पत्ते व फोन नंबर दिले होते. यापैकी एक मेजर राजिंदर अरोरा याना "संचारबंदी" ची कल्पना असल्याने, तत्काळ आम्ही थांबलो असलेल्या यात्री निवासाकडे आपल्या ड्रायव्हर व एका सैनिकास पाठवून उपनगरात असलेल्या आपल्या घरी आम्हास मुक्कामास येण्याचे निमंत्रण दिले. संध्याकाळ होत आली असल्याने व आग्रा शहरात आता रात्रीच्या जमावबंदी आदेशामुळे जायचा प्रश्नच नसल्याने मेजर अरोरा यांच्या बंगल्यामागे असलेल्या छोट्या बागेत आम्ही पाच मित्र अरोरा कुटुंबीय समवेत तसेच त्या निमित्ताने महाराष्ट्रातील "खडकी कॅन्टोनमेंटमध्ये काही काळ नोकरी केलेले त्यांचे वडील, त्यांचे दोन समवयस्क senior scholars (त्यापैकी एकाचे चिरंजीव पुण्याच्या Symbiosis मध्ये शिक्षण घेत होते) यांच्या समवेत गप्पांची मैफल चांगलीच रंगली.
आमच्या गप्पा या सहाजिकच उत्तर भारत सहलीशी निगडी असल्याने, ताज महालाचा विषय तिथे निघणे स्वाभाविकच होते. ताज विषयी बोलायला सुरुवात कारोतो ना करतो तोच त्या ज्येष्ठ पैकी एक जाट ताडकन उद्गारला. "बेटा उसे ताज महाल मत कहो, वो तेजो महाल ही है, और ऐसे सिर्फ शहजहान ने नही बल्की हमारे राजा मान सिग जी ने बनवाया था, शिव पूजा के लिये. वो तो शहजहान ने आग्रा को जीतने के बाद इसका अपनी बिवी मुमताज का मकबरा बना दिया और यहा वहान इस्लाम कि quotations carve कर दिये अपने कारीगारोन्के बल्बुतेपर ..." आता ही बाब मला तरी नवखी नव्हती कारण खुद्द इथे आपल्या महाराष्ट्रात "ताज" की" तेजो " या आव रावर वेगवेगळया दैनिकांच्या रविवारच्या पुरवण्यामधून, तसेच साप्तहीकामधून चर्चा झडत असतातच. पण त्या ब-याचशा ऐकीव स्वरूपाच्या असल्यामुळे त्याला कोणताही ऐतिहासिक ठोस पुरावा नसतो. मात्र आग्रा येथीलच एका अभ्यासकाला वाटणे... एक वृद्ध जाट गृहस्थ ही बाब ठासून सांगू लागले तेंव्हा मनात म्हटले, चला, या निमित्ताने संचारबंदीची रात्र अशी माहिती मिळविण्यासाठी उपयोगात आणता येईल.
त्यांचाबरोबर तसेच मेजर अरोरा यांच्या वडिलासमवेत झालेल्या चर्चेचा मतितार्थ असा कि.... ताज महालाचे प्रत्यक्षातील नाव "तेज-ओ-महालय" असून ते शिव मंदिर म्हणून राजा मान सिंघ ने बांधले होते. शंकराची आजही आग्र्यात "अग्रेषर" या नावाने देवालये आहेत. ब्रिटीश असो वा स्वातंत्रनंतरचे आपले मायबाप सरकार असो कुणीही मुस्लिमांच्या भावनेला ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करीत होते, करीत असतात, त्यामुळे शिव मंदिराचा या दाव्यातील सत्यता वा फोलपणा याचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. इतकेच नव्हे तर इसवी सन २००० मध्ये सुप्रिम कोर्टाने देखील या संदर्भात हिंदू संघटनांनी दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरविली व "ताज महाल" हे नाव बदलण्यास ठाम नकार दिला..... फाईल बंद झाली. पण तेजो महालाचा विश्वास आग्रा परिसरातील हिंदू, शीख, जात समाज मोठ्या श्रद्धेने जपतो. माझ्या इतिहास अभ्यासानुसार ताज चे संपूर्ण नाव होते "रौझः-इ-मुमताज महाल" कि ज्याचा उल्लेख मोघलकालीन कागदपत्रात आढळतो. ब्रिटीश शासनकर्त्यांनी त्याचे सुटसुटीत "ताज महाल" असे नामकरण केले. हा बदल सर्वत्र मान्यही झाला. पण नाही, त्या बुजुर्ग जाटाला आमच्या "इतिहास के पन्ने" वा "भारत एक खोज" कथानकात अजिबात दिलचस्पी नव्हती. त्यांनी तर शहाजहानाचे काय पण त्याच्या अगोदरचे हुमायून, अकबर, सफदरजंग यांच्या नावाने सध्या दिल्ली, आग्रा, लखनौ परिसरात असणारी स्मारके ही प्रत्यक्षातील हिंदूंची देवळे होती असाच दावा केला. त्याच्या पुष्ठ्यर्थ "उपयुक्त" माहिती दिली, ती अशी कि, या मोघलांच्या (जाता जाता हे देखील सांगितले पाहिजे की, या जाट महाशयांनी दोन तीन तासांच्या त्या संभाषणामध्ये चुकून देखील "मुस्लीम" असा उल्लेख केला नाही, केवळ "मोघल". असे का? तर तो देखील एका वेगळ्या धाग्याचा विषय होऊ शकेल, पण ती बाब पुन्हा केंव्हा तरी. असो.) समाध्या प्रत्यक्षात राजपूत आणि जात लोकांनी बांधलेली देवळे असल्याचा पुरावा म्हणजे या ठिकाणी कोरलेल्या कमळाच्या आकृत्या, आणि कमळदलांचा केलेला खूप वापर, ज्या भांड्या मध्ये ही कमले दाखविली आहेत त्या भांड्यांची कलाकुसर ही खास राजपुतांनी धाटणीची आहे. गणेश आकृत्यांचे तर जागोजागी दर्शन होते, पण मुघलधार्जिणे सध्याचे गाईड ही बाब चुकून देखील पर्यटकांना दाखवीत नाहीत. वेलबुत्त्यांची नक्षी तर "ओम" आकाराचे प्रतिक आहे. राजपूत लोक सूर्याची आराधना करत असत, तर मुघल चंद्राची, हे तर सर्वश्रुत बाब आहे, मग अशावेळी मुख्य प्रवेशद्वार आणि "ताज"च्या आतील बाजूस "सूर्य" आकृती कशाचे द्योतक आहे? काय आहे यावर उत्तर?" जाट बाबांनी विजयी मुद्रेने सर्वांकडे पाहिले. आम्ही महाराष्ट्रातून आल्याचे त्यांना माहित होतेच, मग या राज्याचा दाखला देताना ते म्हणाले मी, "तुमच्या महाराष्ट्रात तुम्ही देवळाच्या परिसरातील दीपस्तंभ पाहिले असतीलच, त्याच प्रमाणे राजपुतांनी तेजो महाला भोवती आता जे "मिनार" म्हणून ओळखले जातात, ते प्रत्यक्ष्यात हिंदू धर्मातील दीपस्तंभच आहेत. मुघलांच्या अन्य कोणत्याही स्मारक बांधकामात (मशिदिमध्ये विशेषत:) अशा मिनारांची संगती नसताना तसेच जागा नसताना फक्त ताज महालाभोवातीच मुघल सम्राट मिनार बांधण्याचा विचार करेल का? याचाच अर्थ हे राजपुतांचे शंकराचे तेजो महाल मंदिर आहे." रेडिओ कार्बन टेस्ट ची देखील ते गृहस्थ दाखला देत होते जो माझ्या (आमच्या) आकलना पलीकडील होता. (या शास्त्रीय टेस्ट बाबत येथील कोण सदस्याला काही माहिती असल्यास कृपया विस्ताराने खुलासा करावा ही विनंती .)
मी माझ्या परीने त्या जाट अभ्यासकाचा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, पण स्वारी ढिम्म होती. चर्चा गरम होत चालली असतानाच, मेजर आरोरांच्या पत्नीने वेळीच वादविवादात प्रवेश करून आम्हाला जेवणाची आठवण करून दिली व 'ताज महाल' कि 'तेजो महाल हा विषय त्यावेळी तरी तूर्तास मिटला. शीख, राजपूत, जाट, हिंदू समाजातील काही घटक यांचा ताज महालाच्या बाबतीत जो विश्वास आहे तो सत्यतेच्या पातळीला उतरतो का? याचा अभ्यास गंभीरपणे इतिहास संशोधकांना करता आला असता का? सुप्रीम कोर्टाने याचिका रद्दबातल ठरविताना कोणते निकष लावले असतील ? हे आणि अशा प्रकारच्या प्रश्नाची मालिका ताज महालाचे सौन्दर्य पाहताना किती लोकांच्या मनात उभे राहत असतील ?
सहज म्हणून विचारतो >> वाद असो व असहमती असो, या संस्थळावरील ज्या सभासदांनी ताज महाल प्रत्यक्षात पाहिला आहे, त्यांनी त्या शिल्पाच्या सौंदर्याला दाद देऊन हे अजरामर गीत बांधणा-या कारागिरांना व त्यांचा कल्पकतेला सलाम केला असेल, त्यांना या प्रेमाचे अमर प्रतिक ठरलेल्या स्मारकाला पाहून त्याच्या बांधकाम स्वामित्व विषयाच्या सत्यतेविषयी कोणत्याही प्रकारची शंका आली होती कां? येईल का? दुसरी एक बाब.... येथील बरेचसे सदस्य नोकरी, व्यवसाय, शिक्षण, सेमिनार, कॉन्फेरेन्सिस आदी कारणास्तव परदेश वास्तव्यास आहेत, तेथे त्यांना त्या त्या देशात/प्रांतात/इलाख्यात तेथील परंपरेच्या स्मारकावरून अशा प्रकारचे दुमत वा वाद आढळले आहेत का? धन्यवाद !
प्रतिक्रिया
27 Apr 2010 - 6:29 pm | मस्त कलंदर
खूप वर्षांपूर्वी एका ढकलपत्रातून ही माहिती पुराव्या सह वाचली होती... त्यात विधानांच्या पुष्टयर्थ फोटो ही दिले होते.. म्हणे तिथे १३ किंवा २२ खोल्या अशा आहेत, की त्या उघडण्याची परवानगी नाही नि राज्यकर्ते/नेतेमंडळी हातची वोटबँक जाईल म्हणून मूग गिळून गप्प आहे...
जाऊ द्या हो... तसेही आपण इथे त्यावर चर्चा केल्याने ताजमहालाचा तेजो-महाल होणार नाहीए!!! :|
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
27 Apr 2010 - 11:03 pm | गोगोल
ताज महाल चा इतिहास मोठा रोचक आहे. मुघलांनी तो हिंदू राजा खुर्द सिंघ याच्याकडून सोळाव्या शतकात हिसकावून घेतला. त्यावरील हिंदू संस्कृतीच्या खुणा पुसून इस्लामिक आयाते कोरली. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री पु ना ओक यांचे याबाबतीत ले कार्य वादातीत आहे.
परंतु एक गोष्ट जी हे कुठलेच लब्बाड हिंदू इतिहास संशोधक मान्या करत नाही ती म्हणजे हिंदू राजा चिल्लर सिंघ याने बाराव्या शतकात हा तेजोमहाल ख्रिश्चन समाजाकडून हिसकावून घेतला होता. त्यावेळी त्याचे नाव T. J. Mall असे होते. ही गोष्ट ब्लाइंड डेटिंग टेस्ट ने केव्हाच सिद्ध झाली आहे. (समस्त ख्रिश्चन पोर पोरी तिथे ब्लाइंड डेटिंग ला भेटायचे).
28 Apr 2010 - 6:56 am | मुक्तसुनीत
परंतु एक गोष्ट जी हे कुठलेच लब्बाड हिंदू इतिहास संशोधक मान्या करत नाही ती म्हणजे हिंदू राजा चिल्लर सिंघ याने बाराव्या शतकात हा तेजोमहाल ख्रिश्चन समाजाकडून हिसकावून घेतला होता. त्यावेळी त्याचे नाव T. J. Mall असे होते. ही गोष्ट ब्लाइंड डेटिंग टेस्ट ने केव्हाच सिद्ध झाली आहे. (समस्त ख्रिश्चन पोर पोरी तिथे ब्लाइंड डेटिंग ला भेटायचे).
गोगोलराव(किंवा ताई!) उच्च !
28 Apr 2010 - 9:27 am | भारद्वाज
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
30 Sep 2013 - 4:09 pm | कपिलमुनी
लै भारी सिक्सर !
30 Sep 2013 - 4:47 pm | बॅटमॅन
=)) =)) =)) =)) =))
ब्लाइंड डेटिंग टेस्ट सगळ्यात भन्नाट!!! वारल्या गेलो आहे _/\_
2 Oct 2013 - 12:27 am | आशु जोग
>> सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री पु ना ओक यांचे याबाबतीत ले कार्य वादातीत आहे.
आम्हीही त्यांची पुस्तके वाचण्याचा प्रयत्न केला - अकबर थोर नव्हताच इ. पण ते डियरेक्ट कन्क्लुजनला येतात असे वाटते
28 Apr 2010 - 12:00 am | अविनाशकुलकर्णी
आमच्या गप्पा या सहाजिकच उत्तर भारत सहलीशी निगडी असल्याने, ताज महालाचा विषय तिथे निघणे स्वाभाविकच होते. ताज विषयी बोलायला सुरुवात कारोतो ना करतो तोच .................
आपण विषय छेडल्याने हे सारे झाले असे वाटते...
28 Apr 2010 - 12:30 am | प्रियाली
अशा वादांची गरज तुम्हाला आम्हाला नसली तरी त्या जाटकाकांना असावी. ओककाकांनाही होती असे आठवते. जाउ द्या ना! त्यांचे दिवस अशा वादांवर उत्तम जात असतील.
फक्त पुन्हा कधी काकांची भेट झाली तर त्यांना सांगा की आग्रा शहाजहानने कधी जिंकले नव्हते. ते त्याच्या आजोबांपासून मुघलांकडेच होते. उलट, शहाजहाने राजधानी आग्र्यावरून दिल्लीला नेली. तसेच, अकबराच्या थडग्यापासून ते मुघल बांधणीच्या मशिदींवर सर्वत्र मिनार आहेत. ताजमहालावरचे मिनार थोडे अधिक मोठे आणि उठावदार असले तरी दीपस्तंभाशी त्यांचे देणेघेणे नाही. असो. काकांना पटायचे नाही. बरेचसे काका असेच असतात. ;)
असावेत. जेथे भिन्न वंशाची माणसे एकत्र नांदण्याचा प्रयत्न करतात तेथे नक्कीच असावेत. स्मारकांचे सोडा - इस्राईल हा आख्खा देश आणि वेस्ट बँक, गाझा पट्टी वगैरे सारखे प्रदेश नेमके कोणाचे यावर वाद आहेत.
28 Apr 2010 - 1:59 pm | इन्द्र्राज पवार
"...... बरेचसे काका असेच असतात."
हे बाकी एकदम पटले. म्हणून असेल कदाचित माझे मामा बरोबर पटते (दोस्तीच आहे, म्हणा हवे तर...) पण काकोबांच्या बरोबर कधीच पटलेले नाही....आणि कधी पटेल ही शक्यतादेखील नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
28 Apr 2010 - 4:57 pm | प्रियाली
ओक्के! अँड वेलकम टू मराठी संकेतस्थळ. वरील वाक्यावरून मराठी संकेतस्थळावर प्रस्थापित होण्याचा पहिला नियम तुम्ही पार पाडला आहे.
29 Apr 2010 - 1:42 pm | इन्द्र्राज पवार
थॅन्क्स... थॅन्क्स.... तरीही "संकेतस्थळावर प्रस्थापित होण्याचा पहिला नियम" हे गौडबंगाल काही कळले नाही !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
29 Apr 2010 - 1:51 pm | II विकास II
>>थॅन्क्स... थॅन्क्स.... तरीही "संकेतस्थळावर प्रस्थापित होण्याचा पहिला नियम" हे गौडबंगाल काही कळले नाही !
तुम्हला तुमचे जालिय काका मिळाले का?
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
28 Apr 2010 - 5:08 am | Manoj Katwe
पुणे येथील, सुभानशाह दर्गा (मंडई च्या जवळ ) मस्स्जिद देखिल शंकराचे मदिर होते असे माझी आजी म्हणते.
28 Apr 2010 - 6:21 am | सन्जोप राव
'अयोध्या तो सिर्फ झांकी है, काशी मथुरा बाकी है' या विषयावरही कुणीतरी लिहावे असे वाटते. उन्हाळ्यामुळे नाहीतरी घराबाहेर पडणे अवघडच झाले आहे.
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
28 Apr 2010 - 6:56 pm | भोचक
सहमत. धारच्या भोजशाळेचाही मुद्दा घ्यायलाही हरकत नाही. :)
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
28 Apr 2010 - 7:19 am | सातबारा
हा अस्मितेचा प्रश्न असल्याने अशा वादांची गरज आहेच.
मी पत्नीसह एक महिना दिल्लीस राहिलो होतो. बरेच हिंडलो पण तथाकथीत प्रेमाच्या स्मारकास भेट द्यावी असे मला वाटले नाही. (बायको फार चिडली होती ). ताजमहालचे 'तेजोमहालय' झाल्यावर नक्कीच जाईन शिवपूजन करायला.
हे शेतक-यांचे राज्य व्हावे.
28 Apr 2010 - 7:21 am | llपुण्याचे पेशवेll
खरतंर कोणत्याच वादाची कधीच गरज नसते नव्हती. २ वेळचं खाणं आणि १ वेळा *गण्यासाठी संडास याच काय त्या माणसाच्या आदिम गरजा होत. असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
28 Apr 2010 - 7:57 am | सुरेखा पुणेकर
पेशवे संडासात जायचे काय रे *गायला?
अदीम गरजा म्हनं..
-- सुरेखा
कारभारी दमानं.....
28 Apr 2010 - 8:01 am | llपुण्याचे पेशवेll
अहो पेशवेच काय शिवाजी महाराज पण जायचे. जंजिर्याचा सिद्दी पण जायचा. थोडक्यात संडास हा देखील सर्वधर्मसमभावी आहे. :)
दमानं म्हनं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
28 Apr 2010 - 8:02 am | स्पंदना
आदिम गरजान मध्ये आता सन्डास च बान्ध्काम पण आल?
नाहि आदिमानवाला माळ चालायचा म्हणुन म्हन्टल.
माझ्या गावी आमचा मारुती तोडुन फोडुन गावात मुस्लिमान्ची खाइ तयार केली होती. हनुमानाच्या मुर्तिचे तुकडे एका ठिकाणी पुरले होते . पुर्वजानी फक्त पाणी घालायचा परीपाठ सोडु नका एव्हढाच सन्देश पिढ्यन पिढ्या वाहिला. शेवटी १०० वर्षापुर्वी सतत पाणी घातल्याने जमिन खागलुन मुर्तीचा हात दिसु लागला. मग परत शोडषोपचारे स्थापणा केली गेली.
पन्ढरीचा विठोबा विहिरीच्या रहाट ओढताना पाय ठेवुन जोर लावतात त्या ठिकाणी लावला होता. एका रात्री ज्या बडव्याला( पुजारी) ते माहित होत त्याने तसलाच दगड तिथे ठेवुन मुर्ती दडवली होती.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
28 Apr 2010 - 8:22 am | सातबारा
.... यांच्या संडासावर झेंडा की हो हिरवा ! :D
@ सुरेखा & अपर्णा अक्षय - ग्रेट.
.. हे शेतक-यांचे राज्य व्हावे.
28 Apr 2010 - 8:27 am | निरन्जन वहालेकर
पु. ना. ओक ह्यांनी ५०० संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलेले आहे.मुख्य संदर्भ " अकबरनामा " ह्या त्या काळच्या उर्दू बखर मधूनच घेतला आहे संदर्भ ग्रंथाची नावे पुस्तकांत अभ्यासकांसाठी दिलेली आहेत त्यामुळे पुरेसा अभ्यास न करता चर्चा करण्यांत काही अर्थ नाही.
" अस्मितेचा प्रश्न आहेच " त्यामुळे सगळं मुद्देसुद्च हवं
28 Apr 2010 - 11:08 am | इन्द्र्राज पवार
"....त्यामुळे सगळं मुद्देसुद्च हवं !"
मान्य. मी श्री. ओंक यांच्या संशोधनाचा व त्यासाठी त्यांनी घेतलेल्या श्रमाचा आम्ही आदरच करतो (नव्हे....केलाच पाहिजे....) भले कित्येकांना त्यातील मुद्दे किंवा संशोधन पटले असेल/नसेल. प्रश्न स्वामित्वाचा नसून, अभ्यासाचा. आज आपण जर श्री. ओंक यांचा दावा स्वीकारला तर त्यांच्याच दर्जाच्या एका महाराष्ट्रातील अभ्यासकाने ते दावे खोडून काढले तर त्याचा देखील आपण अभ्यास करणे गरजेचे आहे. शेवटी आग्रा येथे ती वास्तू अस्तित्वात आहे हे तरी अमान्य करता येत नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
29 Apr 2010 - 12:54 pm | विशाल कुलकर्णी
शेवटी आग्रा येथे ती वास्तू अस्तित्वात आहे हे तरी अमान्य करता येत नाही.>>>>
पण ती वास्तू तिथे कधीपासुन आहे हे तपासुन पाहणेही तेवढेच आवश्यक नाही का? पु.ना.ओक यांच्या पुस्तकात औरंगझेबाने शहाजहांला लिहीलेल्या एका पत्राची प्रत आहे, त्यात ताजमहालच्या रिपेअर्सबद्दल माहिती दिलेली आहे. त्यात ताजच्या घुमटाला तडा गेल्याचाही उल्लेख आहे. हे पत्र त्याने लिहीलेले आहे १६५२ मध्ये, आणि उपलब्ध माहितीप्रमाणे ताजमहालाचे बांधकाम १६५३ साली पुर्ण झाले. हे काय गौडबंगाल?
संदर्भ : http://www.stephen-knapp.com/letter_of_aurangzeb.htm
आणखी काही माहिती : http://www.stephen-knapp.com/was_the_taj_mahal_a_vedic_temple.htm
खरे खोटे देवच जाणे ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
29 Apr 2010 - 3:43 pm | इन्द्र्राज पवार
संदर्भ लिंकबद्दल मन:पूर्वक आभार..... कारण असल्या वाचनाची भूख असतेच असते. जरूर वाचेन !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
29 Apr 2010 - 5:15 pm | नितिन थत्ते
आमच्या माहितीप्रमाणे औरंगजेब हा १६५२ मध्ये दख्खनचा सुभेदार होता आणि त्यापूर्वी अफगाणिस्तानात सुभेदार होता. त्यामुळे ताजमहालाच्या मेंटेनन्स पाहण्याचे त्याला काही कारण नसावे.
असो. त्या काळात पोर्तुगीज, डच, फ्रेंच वगैरे लोक भारतात बरेच सुस्थिर झालेले होते. त्यांच्या रेकॉर्डमध्ये असे काही बांधले जात असल्याचे उल्लेख आहेत का?
राजपुतांच्याकडील रेकॉर्डमध्ये त्याविषयी काय आहे?
>>असल्या वाचनाची भूख असतेच असते....
असल्या वाचनाची हे महत्त्वाचे. असू द्या. :)
नितिन थत्ते
29 Apr 2010 - 5:35 pm | प्रियाली
जो औरंगझेब कलागुणांबाबत उदासीन आणि बापाचा शत्रू गणला जातो (शहाजहानने औरंगझेब आपल्या तख्तापासून सतत दूर राहील याची काळजी घेतली होती.) तो औरंगझेब चक्क ताजमहालच्या बांधकामात इतका इंटरेष्ट घेतो की बापाला न विचारता स्वतःच रिपेअरिंगच्या ऑर्डर्स देतो. :) धन्य आहे तो पुत्र! ;)
ज्या वास्तुचे बांधकाम १६३२ मध्ये सुरु झाले तिला तब्बल वीस वर्षांनी जुनी वास्तु म्हटले किंवा तिथे लीकेज असेल तर काय मोठी बात आहे. मुंबईत घरे बांधली की पहिल्याच वर्षी पाणी टपकू लागते.
29 Apr 2010 - 11:14 pm | इन्द्र्राज पवार
प्रियाली ~~ काय बिनतोड मुद्दा आहे ! व्वा व्वा ! त्या दुव्याचा थोडा अभ्यास करतोच आता....!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
30 Apr 2010 - 7:09 am | नितिन थत्ते
पूर्वी आम्ही 'मेकॉलेचे पत्र' म्हणून असेच एक पत्र वाचले होते. त्याची आठवण झाली.
असो. हे अरबी लिपीतले पत्र 'दाखवून' काय होणार? त्याचे इंग्रजी/मराठी भाषांतर दाखवले तर आम्हाला उपयोग !!!
नितिन थत्ते
28 Apr 2010 - 8:35 am | सूर्यपुत्र
नक्की कुणाची अस्मिता?? :?
कळाले तर फार बरे होईल.
ताजमहालचे 'तेजोमहालय' झाल्यावर ..... आणि हे शेतक-यांचे राज्य व्हावे या सारख्याच (अ)शक्य कोटीतील घटना.
-ध्येयहीन
28 Apr 2010 - 9:27 am | ईन्टरफेल
तो ताज का तेजो आपल्या काहि बाचा नाहि बुवा असो कुनाचाहि आपल्याला काय करायचे? ........................................................................... आभ्यास करुन पास व्हा!जास्त विचार करुन विचारहिन होऊ नका
28 Apr 2010 - 12:25 pm | Dipankar
ताजमहालचे 'तेजोमहालय' होणे अशक्य आहे (ते खरे असो वा नसो) जिकडे असंख्य हिंदूच्या भावना आहेत ते राममंदिर होत नाही,
तेजोमहालयाचे समर्थक कितीसे असतील?
28 Apr 2010 - 1:38 pm | इन्द्र्राज पवार
बरोबर.... हा देखील एक बिनतोड मुद्दा आहे. आणि ताज असो वा तेजो, जगभरचे पर्यटक त्याला पाहायला येणार ते "प्रेमाचे प्रतिक" म्हणूनच, यात संदेह नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
28 Apr 2010 - 1:53 pm | अप्पा जोगळेकर
ताजमहालचे 'तेजोमहालय' होणे अशक्य आहे (ते खरे असो वा नसो) जिकडे असंख्य हिंदूच्या भावना आहेत ते राममंदिर होत नाही,
तेजोमहालयाचे समर्थक कितीसे असतील?
जे हिंदुत्ववादी आहेत, ज्यांनी बाबरी मशिद पाडली त्यांनी हिंदू समाज एकजीव व्हावा, जातीपाती नष्ट व्हाव्यात, अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात,समान नागरी कायदा यावा याकरता कधी प्रयत्न केले का ? <कृपया भाषा जपून वापरा. कोणत्याही प्रकारे सामान्यीकरण करून अपशब्द वापरू नका. - संपादक> आणि मशीद पाडण्यासारखं नादान कृत्य करण्याची गरज भासली नसती. मूठभर सवर्णांच्या पाठिंब्यावर किती फुदकणार ?
28 Apr 2010 - 2:18 pm | जयंत कुलकर्णी
वरील प्रतिसाद संपादित केल्यामुळे हा प्रतिसादही संपादित करत आहे. तुम्ही दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. - संपादक.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
28 Apr 2010 - 2:54 pm | Dipankar
ताजमहाल/तेजोमहालय वर लेख कितीही येवोत व ते पटोत, पण प्रत्यक्ष कोणी (म्हणजे मी नव्हे, आन्दोलन हे नेहमी दुसरर्याने करायचे असते :) :) ) आन्दोलन केले तर आन्दोलन करणारा मुर्ख ठरेल
28 Apr 2010 - 1:28 pm | विशाल कुलकर्णी
हे राम..... (सॉरी हे ताज.....!) ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
28 Apr 2010 - 3:18 pm | Dipankar
रेडिओ कार्बन टेस्ट विषयी.......
सजीवाच्या शरीरातील radio active carbon चे प्रमाण तो जिवंत असताना स्थिर असते. ने प्रमाण तो मृत झाल्यावर कमी होते, कुठलेही बांधकाम करताना लाकूड वापरतात त्याची कार्बन टेस्ट केल्यास त्याचा अंदाजे काळ ठरवता येतो
http://en.wikipedia.org/wiki/Radiocarbon_dating
http://en.wikipedia.org/wiki/Radiocarbon_dating
28 Apr 2010 - 6:02 pm | कवितानागेश
नवीन बान्धकाम करताना, जुन्याच बान्धकामातले लाकूड वापरले,
किन्वा जुना भाग झाकून थोडा भाग नव्याने वाढवला असेल
तर कार्बन टेस्टीन्गला अर्थ रहाणार नाही.
'सत्य' कायमचे बोम्बलेल.
============
(शन्केखोर) माउ
29 Apr 2010 - 10:22 am | इन्द्र्राज पवार
".....कुठलेही बांधकाम करताना लाकूड वापरतात त्याची कार्बन टेस्ट केल्यास..."
ठीक आहे.... पण आता प्रश्न असा आहे की, ताज महालच्या बांधकामात लाकडाचा वापर होता/असेल? आणि तसे असल्यास तेथील लाकुड अशाप्रकारच्या कार्बन टेस्ट्साठी उपलब्ध होणे शक्य आहे का ? ~~~ म्हणजे त्या जाट काकांच्या दाव्याची सत्यता पडताळणीसाठी...!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
28 Apr 2010 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार
मिपाची रेडिओ कार्बन टेस्ट करता येईल का हो ? त्यातुनही बरीच काही सत्ये बाहेर येतील असे वाटते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
28 Apr 2010 - 5:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसाद न उडण्यासाठी शुभेच्छा!
आणि असं काही असेल तर मलाही कळव रे परा!
अदिती
(अवांतरः उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक)
28 Apr 2010 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार
भाषा जपून वापरली आहे. कोणत्याही प्रकारे सामान्यीकरण करून अपशब्द वापरलेले नाही -सदस्य
ह्यामुळे प्रतिसाद उडेल असे वाटत नाही.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
29 Apr 2010 - 6:20 am | llपुण्याचे पेशवेll
अत्यंत जहाल विषयावर इतका संयत प्रतिसाद लिहील्याबद्दल परा यांचे आभार.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
28 Apr 2010 - 6:08 pm | सूर्यपुत्र
तो ताज का तेजो..... कुणाचा... यावरुन बाचा (बाची) करण्यात अर्थ नाही... त्यामुळे जगाला ताप होईल.... :D
-ध्येयहीन
1 Oct 2013 - 8:31 am | रमेश आठवले
वल्ली यांनी वेरुळच्या लेण्यांवरचा एक अभ्यासपूर्ण लेख मिपावर टाकला होता. त्यात त्यांनी जाता जाता खुलदाबाद येथे औरंगजेब ची कबर मूळ शिव मन्दिर तोडून त्याच वास्तूवर बांधली असल्याचा उल्लेख केला आहे. हे खाली उद्धृत केले आहे.
http://www.misalpav.com/node/24199
प्रेषक, वल्ली, Mon, 11/03/2013 - 08:40
वेरूळः भाग १ (जैन लेणी)
"वाटेत खुल्ताबादला औरंगजेबाची कबर पाहायला थांबलो. मूळच्या शिवमंदिराची तोडफोड करून यावर ही कबर उभारली गेली असावी असे एकंदर त्या वास्तूच्या रचनेवरून दिसते. यादवाचे राजचिन्ह सहस्त्रदलकमल, व्यालमुखी कोरीव स्तंभाचे अवशेष त्या वास्तूच्या बांधकामात दिसतात."
2 Oct 2013 - 9:10 pm | श्रीनिवास टिळक
श्री. पु. ना. ओक यांच्या कार्याचा आढावा घेणारा एक लेख (P. N. Oak (1917-2007): The lone fighter, etymologist, and historian) मी ते २००७ साली वारल्यावर लिहिला होता. त्याचा दुवा सोबत देत आहे. माझे वडील दिल्लीला नोकरीला असताना श्री. ओक यांचे वास्तव्य दिल्लीलाच होते. तेव्हा ते घरी येत असत. पुढे परदेशात Indology या विषयामध्ये माझे अध्ययन आणि अध्यापन झाल्यामुळे त्यांच्याशी मधून मधून चर्चा होत असे. फेब्रुवारी २००७ मध्ये त्यांना भेटलो होतो. ती भेट शेवटची ठरली. तेव्हा घेतलेल्या फोटोचा दुवाही दिला आहे.
https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB!129
https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB!129
24 Oct 2013 - 9:32 pm | शशिकांत ओक
श्रीनिवासजी,
माझ्या काकांचे फोटो - विशेषतः सूर्यनमस्कारचा व्यायाम करताना व आपल्यासोबतचा, पाहून स्व. काकांची आठवण प्रकर्षाने झाली.
सध्या त्यांच्या विचारांची पुनः तपासणी करण्याचे काम अमेरिकेतील स्थाईक एक मित्र करत आहेत. विशेष माहितीसाठी ९८८१९०१०४९ किंवा व्य. नि. वरून संपर्क केलात तर आवडेल.
25 Oct 2013 - 11:23 am | खटासि खट
पु. ना. ओक स्कूल ऑफ हिस्टेरिकल हिस्टरी नावाच्या संस्थेत आडनावाला जागणा-या सदस्यांना प्रवेश दिला जातो.