१६०००

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in काथ्याकूट
19 Sep 2007 - 10:04 am
गाभा: 

मुंबई शेअर बाजारातील संवेदी निर्देशांकाने सक्काळी सक्काळी १६००० पार केल्याचे पाहिले.

इथे बाजारगप्पा मारूया.

प्रतिक्रिया

सहज's picture

19 Sep 2007 - 10:13 am | सहज

आता ते परवा उपक्रमावर तात्याने दिलेल्या ५ समभागाचे भाव दाखव ना.

आजानुकर्ण's picture

19 Sep 2007 - 10:21 am | आजानुकर्ण

Seshasayee Paper & Boards Ltd 174.00
Siyaram Silk Mills Ltd. - (BSE) 119.००
SRF Ltd. - (NSE) 146.00
Cheviot 242.10

सर्किट's picture

19 Sep 2007 - 10:24 am | सर्किट (not verified)

पण % इन्क्रीज/डिक्रीज ???

याहू ! गूगल,इबे, मायक्रोसॉफ्ट विषयी संत तात्याबांचे काय म्हणणे आहे ?

सर्किट

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 11:20 am | विसोबा खेचर

सर्कीटराव,

या समभागांविषयी आमचा अभ्यास नाही..

विसोबा खेचर's picture

21 Sep 2007 - 10:55 am | विसोबा खेचर

Seshasayee Paper & Boards Ltd 174.00
Siyaram Silk Mills Ltd. - (BSE) 119.००
SRF Ltd. - (NSE) 146.00
Cheviot 242.10

वरीलपैकी सियाराम सिल्क हा समभाग आम्ही दि ११ सप्टेंबर रोजी उपक्रमावर ११५ च्या आसपास सुचवला होता. या क्षणी त्याचा भाव १३८ आहे. १० दिवसात २०% मिळकत तशी बरीच म्हणायची! :))

अन्य समभागही चांगले आहेत. आम्ही उपक्रमावर सुचवलेल्या भावांना जर ते कुणी खरेदी केले असतील तर चांगलंच हे. माल लेके बैठ जाओ! :)

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई -२३.

जुना अभिजित's picture

19 Sep 2007 - 10:34 am | जुना अभिजित

आता मी पुढच्या क्रॅशची वाट पाह्तोय्..चांगले चांगले समभाग गल्ल्यात जमा करायचे. आणि झोपी जायचे.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

टिकाकार's picture

19 Sep 2007 - 10:37 am | टिकाकार

keep waiting..
immediate target for sensex is 16160.
may be today itself...

वाट बघा.
सेन्सेक्स चे पुढील लक्ष्य १६१६० आहे.
बहुतेक आजच.

टिकाकार
टीपः मराठीत प्रतिसाद लिहा. यापुढील इंग्रजीतील प्रतिसाद उडवले जातील.

-मिसळपाव संपादक मंडळ

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 11:22 am | विसोबा खेचर

बाजाराशी निगडीत हे चांगले सदर सुरू केले आहेस. सवड मिळाल्यास आम्हीही येथे काही लेखन करू. तुझेही वाचायला मला आवडेल..

प्रमोद देव's picture

19 Sep 2007 - 2:56 pm | प्रमोद देव

आज बाजार अक्षरशः पेटलाय.जवळ जवळ ६००अंकांनी वर चढलाय.
पण हे कशामुळे झालेय काही कळत नाही.

टीकाकार-१'s picture

19 Sep 2007 - 3:09 pm | टीकाकार-१

फेद्रेट खाली येनार अशी न्युज आहे.

प्रमोद देव's picture

19 Sep 2007 - 3:13 pm | प्रमोद देव

ते वाचले आत्ताच. तरीही ही प्रतिक्रिया जरा जास्तच वाटतेय. उद्या ह्याच्या उलट झाले नाही म्हणजे मिळवले. चढवायला आणि उतरवायला काही तरी निमित्त लागते इतकेच. असो. लोकांनी सावध राहावे ही सदिच्छा!

टीकाकार-१'s picture

19 Sep 2007 - 3:31 pm | टीकाकार-१

बरोबर आहे. तेल भडकले आहे.

जुना अभिजित's picture

21 Sep 2007 - 11:03 am | जुना अभिजित

केंद्र सरकार किती सुरक्षित आहे?

यावर काही टिप्पणी जाणकार करतील का?

कारण आता सेन्सेक्स पडायचा असेल तर दुसरे काही कारण नाही. आयटी कंपन्यांवर सेन्सेक्स अवलंबून नाहीये फारसा.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रमोद देव's picture

24 Sep 2007 - 3:09 pm | प्रमोद देव

बाजाराला काय झालंय? इतका का पेटलाय? ५ दिवसात १७०००च्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. आता पुढे काय? अजून वर की खाली कोसळणार? प्रश्न! नुसते प्रश्न! लोकहो सावधान!

विसोबा खेचर's picture

24 Sep 2007 - 4:04 pm | विसोबा खेचर

प्रमोदकाका,

आम्ही सध्या बाजारापासून दूरच आहोत. आम्हाला सध्या पैसे नको आहेत असं म्हटलंत तरी चालेल! याचं कारण असं की सध्या बाजार अतिशय घातक रितीने वाढतो आहे. फंडामेन्टल्स ला काहीही अर्थ उरलेला नाही. ज्या कंपन्या या क्षणी खरोखरंच व्हॅल्यू बाईंग कराव्या अश्या आहेत त्या जराही वाढत नाहीयेत. आणि ज्यांच्या बाजारी किंमतीचं कुठलंही फंडामेन्टल समर्थन होऊ शकत नाही अश्या कंपन्यांचे भाव भरमसाठ वाढलेले आहेत.

अजूनही अमूक घ्या, उद्या वाढेल, तमूक घ्या परवापर्यंत अमूक अमूक किंमत होईल, अश्या खबरा रोजच्या रोज येताहेत आणि खर्‍यासुद्धा होत आहेत. परंतु माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी अश्या कुठल्याही खबरेवर पैसे लावत नाहीये. माझा अनुभवानुसार हा बाजार, जो आवाच्या सवा वाढलेला आहे/वाढत आहे, यातील बराचश्या भागाला केवळ 'सूज' असंच म्हणावं लागेल! आणि अश्या पद्धतीने जो बाजार वाढतो तो अतिशय घातक रितीने कोसळतो, कुणाच्या ध्यानीमनी नसताना कोसळतो!

लोकांना रोज पैसे मिळायची सवय लागते आणि तीच घातक ठरते. एकच कुठलातरी दिवस असा उगवतो की तेव्हा सामान्यातला सामान्य माणूस या बाजारत जास्तीत जास्त पैसा लावून बसतो, त्याकरता गरज वाटल्यास कर्जही काढतो आणि नेमका तोच तेजीचा शेवटचा दिवस ठरतो आणि बाजार प्रचंड कोसळतो!

सबब, मी या बाजारापासून सध्या दूरच आहे आणि गंमत बघत आहे. लोकांना पैसे कमावताना बघतो आहे आणि त्यातच आनंद मानतो आहे. मला सध्या पैसे नकोत, माझे पुरेसे कमवून झालेले आहेत. हाच बाजार जेव्हा घातक रितीने कोसळेल तेव्हा आम्ही पुन्हा नव्याने अगदी भरपूर पैशे टाकून खरेदी करू. परंतु सध्या एक तर स्वस्थ बसून रहायचं किंवा हातातल्या फायद्यात असलेल्या कंपन्यांचे शेअर विकायचे एवढेच पथ्य मी पाळतो आहे!

असो! प्रमोदकाका, हे सगळे अनुभवाचे बोल आहेत ते आपल्यासमोर मांडले आहेत! :)

आपला,
(बाजारात टिकून असलेला!)
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

सर्किट's picture

24 Sep 2007 - 10:05 pm | सर्किट (not verified)

सूज हे खरेच. पण फंडामेंटल्स काही अजीबातच वाईट नाहीत. अद्यापही ज्यांचा पी/ई रेशो १५ च्या आसपास आहे, अशा खूप कंपन्या आहेत, असे दिसते.
पण तिकडे दुर्लक्ष होऊन, इर्रॅशनल एक्झुबरन्स दिसतो आहे.

- सर्किट ग्रीनस्पॅन

आजानुकर्ण's picture

24 Sep 2007 - 10:06 pm | आजानुकर्ण

उदा. आयएफसीआयची वाढ अनियंत्रित आहे.

(आम्ही ७ रु ला घेऊन तो १० रु ला काढून टाकला... आता तो ९८ रू आहे. त्यामुळे जास्तच वाईट वाटत आहे.)

राजे's picture

24 Sep 2007 - 10:10 pm | राजे (not verified)

बरोबर आहे तात्या सध्या ह्या बाजाराचे काही खरे नाही... माझे zeenews मध्ये २७५००.०० रुपये फसले काही खरे नाही आहे. विश्वास नका ठेऊ सध्याच्या घडामोडीवर काय होईल हे सांगता येणार नाही सध्या.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

टिकाकार's picture

24 Sep 2007 - 4:14 pm | टिकाकार

चाईकिन ओसिलेटर वर माझा विश्वास आहे..

टिकाकार

प्रमोद देव's picture

24 Sep 2007 - 10:14 pm | प्रमोद देव

हे आमच्यासारख्या ह्या क्षेत्रात(शेअर बाजार) विशेष माहिती नसणार्‍या लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत इथे लिहिलेत तर खूप बरे वाटेल.

आजानुकर्ण's picture

26 Sep 2007 - 10:27 am | आजानुकर्ण

टेक्निकल ऍनलिसीस वर माझा अजिबात विश्वास नाही आणि तो ठेवणे कोणाच्या हिताचे आहे यावरही नाही. मात्र तुम्हाला याचा अभ्यास करण्याची इच्छा असेल तर त्या ऑसिलेटरची माहिती येथे पहा.

विसोबा खेचर's picture

26 Sep 2007 - 10:52 am | विसोबा खेचर

टेक्निकल ऍनलिसीस वर माझा अजिबात विश्वास नाही आणि तो ठेवणे कोणाच्या हिताचे आहे यावरही नाही.

माझ्या पाहण्यात तरी मी टेक्निकल ऍनालिसिस चा ट्रेडिंग करता उपयोग करणार्‍या लोकांना जाम मार खाताना पाहिले आहे. अर्थात, दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता जर एखादा समभाग घ्यायचा असेल तर मूलभूत गोष्टींसोबतच त्या समाभागाचा तक्ता पाहण्यास हरकत नाही असं मला वाटतं!

तात्या.

टिकाकार's picture

26 Sep 2007 - 11:00 am | टिकाकार

"माझ्या पाहण्यात तरी मी टेक्निकल ऍनालिसिस चा ट्रेडिंग करता उपयोग करणार्‍या लोकांना जाम मार खाताना पाहिले आहे. अर्थात, दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता जर एखादा समभाग घ्यायचा असेल तर मूलभूत गोष्टींसोबतच त्या समाभागाचा तक्ता पाहण्यास हरकत नाही असं मला वाटतं!"

माझा सल्ला ह्याच्या बरोबर उलट आहे.

टिकाकार

प्रमोद देव's picture

26 Sep 2007 - 11:14 am | प्रमोद देव

त्यापेक्षा आमचीच साधी सोपी पद्धत बरी म्हणतो.

प्रमोद देव's picture

26 Sep 2007 - 9:59 am | प्रमोद देव

आज सुरुवातीलाच सेन्सेक्स १७००० पार गेला.

विसोबा खेचर's picture

26 Sep 2007 - 10:10 am | विसोबा खेचर

आनंदाची गोष्ट आहे..:)

तात्या.

विसोबा खेचर's picture

26 Sep 2007 - 11:14 am | विसोबा खेचर

मुंबई शेअर बाजारातील संवेदी निर्देशांकाने सक्काळी सक्काळी १६००० पार केल्याचे पाहिले.

आजानुकर्णाचे हे वाक्य दि १९ सप्टेंबरचे. आज २६ सप्टेंबर. आज निर्देशांकाने १७००० चा आकडा पार केला. अवघ्या ७ दिवसात निर्देशांक १००० अंकांनी वाढतो हे माझ्या अनुभवानुसार अत्यंत धोकादायक आहे. लोकांनी अत्यंत सावधपणे पैसे गुंतवावेत असे वाटते!

कधी ते मलाही माहीत नाही, परंतु ज्या दिवशी हा बाजार कोसळेल त्या दिवशी बरीच मंडळी अक्षरशः आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील असे माझा अनुभव सांगतो!

आपला,
(sitting idle on sidelines!) तात्या.

आजानुकर्ण's picture

26 Sep 2007 - 11:20 am | आजानुकर्ण

२-३ दिवसात साधारण २५ टक्के काढून घ्यावेत म्हणतो. रिझर्व्ह बँकेची मीटींग कधी आहे?

(कुंपणावरचा) आजानुकर्ण

सर्किट's picture

26 Sep 2007 - 11:36 am | सर्किट (not verified)

२५% नाही, सगळे आत्ताच काढून घे.. सोमवारपर्यंत एक करेक्शन होईल. आणि पुन्हा १६०००....

- (सावध) सर्किट

जुना अभिजित's picture

26 Sep 2007 - 3:52 pm | जुना अभिजित

मार्केटची १७००० आकड्याबरोबर कुस्ती चालू आहे. एकदा मार्केट वर तर एकदा १७०००.

आज तर १७ ००० थोडक्यात जिंकेल असं दिसतय.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

राजे's picture

26 Sep 2007 - 9:15 pm | राजे (not verified)

आज आम्ही सगळेच विकले ३ वर्षापासून ठेवलेले काही शेयर्स देखील आज आम्ही आमची पोटली मोकळी केली व खिसे भरुन घेतले ;} धन्यवाद मंडळी.
खास करुन सर्किट राव जीं आपले खास आभार... वाचलो तर पण जर हा भाव असाच वाढला तर मात्र तुमचे काही खरे नाही.... हे पहिल्यांदाच सांगतो ठीक आहे ना [ आपला ज्योक हो.... वाईट नका वाटून घेऊ ..... पण वाटून घेतल्या शिवाय मसाल्याची व्यवस्थीत चवच येत नाही त्याला तुम्हीतरी काय करणार म्हणा.]

राजे
(*हेच राज जैन आहेत)

आजानुकर्ण's picture

26 Sep 2007 - 9:22 pm | आजानुकर्ण

कोणत्याही परिस्थितीत एकाच दिवशी संपूर्ण गुंतवणुकीच्या २५ टक्क्यापेक्षा जास्त रकमेची खरेदी किंवा विक्री करु नये असे शहाणपणाचे सूत्र आहे.

राजे's picture

26 Sep 2007 - 9:40 pm | राजे (not verified)

आजानुकर्ण ,
समोरच्या गाढवाकडुन शिकावे असे आपल्या येथे लहानपणा पासून शिकवले जाते ना ? मग.

* मी एकतर गाढव आहे ज्याच्या चुकीतून कोणातरी शिकता येईल अथवा मी एक शहाणा आहे जो माझ्या पुढील गाढवाकडुन काहीतरी शिकलो आहे;}

राजे
(*हेच राज जैन आहेत)

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:51 pm | सर्किट (not verified)

मीही हेच केले...
त्यामुळे मला तुम्हाला हा सल्ला दिल्याबद्दल काहीही वाईट वाटत नाही.
आजानुकर्णः मी थियरेटिकल सल्ले देत नसतो. स्वतः जे केले तेच सांगतो. (म्हणजेच स्वतःचेच सल्ले पाळतो, म्हणा ना!)

= (सध्या श्रीमंत) सर्किट

कोलबेर's picture

28 Sep 2007 - 8:54 am | कोलबेर

म्युचुअल फंड
एक्सचेंज ट्रेडेड फंड (इ.टी.एफ.)
इंडेक्स फंड
लोन फंड
हेज फंड

हे सगळे फंड म्हणजे काय भानगड असते बॉ? ह्याची नेमकी माहिती देणारा लेख कोणी देऊ शकेल का?

-कोलबेर

सहज's picture

28 Sep 2007 - 8:58 am | सहज

बहूदा मराठीत पाहीजे असेल.
आजानूर्कणांनी एव्हाना अर्धा टाइप केला असेलच म्हणा, येईलच बघा.

कोलबेर's picture

28 Sep 2007 - 9:03 am | कोलबेर

..नको आहे.. आपली माणसं गुंतवणुक करताना हे फंड कसे वापरतात ते पहायचे आहे.. गुंतवणुक करण्या इतपत अजुन मिळकतच नसल्याने आम्हाला अजुनतरी हा अनुभव नाही .. पण पुढे कधी आलाच हाती पैसा तर? तयारीत रहावे म्हणून हा खटाटोप :-)

सहज's picture

28 Sep 2007 - 9:08 am | सहज

>>गुंतवणुक करण्या इतपत अजुन मिळकतच नसल्याने आम्हाला अजुनतरी हा अनुभव नाही .. पण पुढे कधी आलाच हाती पैसा तर?

भारतात नोकरी बघा. सध्या चांदी आहे हो भौ! :-)

कोलबेर's picture

28 Sep 2007 - 9:23 am | कोलबेर

..आम्ही आलोच :-)

>>भारतात नोकरी बघा. सध्या चांदी आहे हो भौ! :-)

सहज's picture

28 Sep 2007 - 9:37 am | सहज

>>गुंतवणुक करण्या इतपत अजुन मिळकतच नसल्याने

असे आम्ही रडत नाही. :-)

कोलबेर's picture

28 Sep 2007 - 10:31 pm | कोलबेर

रडगाणे नाही आहे.. अजुन विद्यार्थी दशेतच असल्याने सत्य परीस्थीती आहे!! :-)

सहज's picture

28 Sep 2007 - 10:57 pm | सहज

ओह आय सी. ध्यानात नाय आले. ऊऊप्स :-)

माझा एक मित्र कॉलेजला शिकत असल्यापासून पॉकेटमनी, इतर कामे करून जे पैसे मिळायचे ते इन्व्हेस्ट करायचा. M S करत होता तेव्हापण.

आजानुकर्ण's picture

28 Sep 2007 - 9:47 am | आजानुकर्ण

म्युच्युअल फंडांच्या योजनांची माहिती देणारा लेख माहितीपूर्ण संकेतस्थळावर टाकत आहे.

काळा पहाड's picture

18 Sep 2014 - 10:56 am | काळा पहाड

याची लिंक मिळेल का?

सहज's picture

28 Sep 2007 - 9:08 am | सहज

प्रकाटाआ

तिमा's picture

18 Sep 2014 - 1:07 pm | तिमा

शीर्षकावरुन वाटलं, काहीतरी कृष्णाबद्दल असणार, १६००० बायकांचं!!