पुरुषप्रधान संस्कृतीत होणारे स्त्रीचे परंपरागत चित्रण आणि आधुनिक समाजात त्याविषयी घेतले जाणारे आक्षेप यांवरून सध्या या संस्थळावर जी विविध मतमतांतरे प्रदर्शित होत आहेत, त्यावरून 'गेरिला गर्ल्स' या लढाऊ स्त्रीवादी गटाने चालवलेल्या चळवळीची आठवण झाली. संग्रहालयात लावलेल्या तथाकथित अभिजात कलेच्या प्रदर्शनामधूनही पुरुषप्रधान संस्कृतीचे कळत-नकळत कसे लांगूलचालन होत असते, हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेले एक भित्तिचित्र (पोस्टर) फार गाजले होते. न्यू यॉर्कच्या जगप्रसिध्द मेट्रोपॉलिटन म्युझियममधली ८५% नग्न चित्रे ही स्त्रियांची आहेत, पण संग्रहालयात स्त्री चित्रकारांची चित्रे मात्र ५% ही नाहीत, असे त्यांचे निरीक्षण होते:
त्यासाठी त्यांनी अँग्र या सुप्रसिध्द फ्रेंच चित्रकाराचे हे चित्र संदर्भ म्हणून वापरले होते:
पाश्चिमात्य मिथ्यकथांपैकी काही 'नीती शिकवणार्या' कथांचा त्यांच्या बोधाहून विपर्यस्त असा (पुरुषी वासना शमवण्यासाठी) शतकानुशतके वापर केला गेला. 'सुसाना अँड द एल्डर्स' ही त्यातलीच एक. जेंटिलेशी या इटालिअन चित्रकाराने त्या कथेवरून सतराव्या शतकात काढलेले हे चित्र पाहा:
'गेरिला गर्ल्स'ने त्याचे असे रूपांतर केले:
स्त्रीवरील बलात्काराच्या बातम्याही पोलीस टाईम्स वगैरे मधून वाचकांच्या रंजनासाठी ज्या चवीचवीने दिल्या जातात, त्यातही असाच प्रकार असतो.
'गेरिला गर्ल्स'ची इतर भित्तिचित्रे इथे पाहाता येतील.
यातून उपदेश वा टीका करण्याचा हेतू नाही. फक्त पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा या विषयाकडे एका कमालीच्या बंडखोर प्रवृत्तीतून कसे पाहिले गेले आहे, याची जाणीव करून देणे गरजेचे वाटले.
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय उत्तम माहिती... जंतु नेहमीच एक वेगळाच दृष्टिकोन मांडत असतात. धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
23 Apr 2010 - 1:56 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
नितिन थत्ते
23 Apr 2010 - 2:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'गुरीला गर्ल्स'बद्दल अजिबातच माहिती नव्हती, त्याबद्दलही आभार.
अदिती
24 Apr 2010 - 12:42 am | प्राजु
नविन माहिती..
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
23 Apr 2010 - 2:34 pm | प्रकाश घाटपांडे
जंतुंनी उत्तम माहिती दिली आहे तसेच समयोचित देखील!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
23 Apr 2010 - 2:39 pm | llपुण्याचे पेशवेll
छान माहीती. नवीन धागा काढून ही माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. इतर धाग्यांवर प्रतिसाद दिला असतात तर अनावश्यक विषयांतर झाले असते .
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
23 Apr 2010 - 4:52 pm | टारझन
हाहाहा ... हापिसातनं गुपचुप उघडुन पाहिला धागा :)
आम्ही फक्त फोटूंचा लुत्फ घेतला ... ते चांगलं की वाईट ह्यावर विषयांतर णको
-- (गोरिया गर्ल्स प्रेमी) टारोबा ट्रॅक्टर
23 Apr 2010 - 5:41 pm | प्रमोद देव
अशी चित्रं इथे देण्याची युक्ती चांगली आहे. ;)
एकीकडे मुखपृष्ठावरील चित्रावरून वाद आणि इथे मात्र नग्न चित्रांवरून संवाद.
ह्याला साध्या भाषेत म्हणतात ....आतून कीर्तन वरून तमाशा.
जय हो...छान चाललंय.
23 Apr 2010 - 5:55 pm | टारझन
जबरा भिमटोला =)) =))
त्यापेक्षा आम्ही बरे मग ... आतुनही तमाशा .. बाहेरुनही तमाशा .. .उजवी डावीकडून सगळीकडुन तमाशा ... बाजार उठवला भेंडी !!!!
- (परमानंद भोगविलासी चंगळवादी मंगळनिवासी तमाशाप्रेमी स्वामी ) श्री श्री भोगेश फुगेफुगवी
23 Apr 2010 - 5:55 pm | Dhananjay Borgaonkar
जबरदस्त प्रतिसाद...
आता ही असली चित्र टाकली म्हणजे आम्हाला कला खुप कळते..किंवा किती प्रतिकात्मक चित्र आहे वगैरे बोलु नका.
साध्या सरळ भाषेत सुद्धा सांगता आल असत..
चित्र टाकण्याबद्दल दुमत नाहीये..पण काल पासुन जो काही तमाशा लावला आहे त्याची चिड आहे..
हे असलं दुटपी पणाच वागण नाही पटत.
स्त्रीवादी विषयाला नग्न चित्र चालतात्..पण खादाडीला पुर्ण कपड्यातील स्त्री नको...वा रे वा...जय हो....
24 Apr 2010 - 12:04 am | चिंतातुर जंतू
'वरून कीर्तन आतून तमाशा' असे आपणांस म्हणावयाचे होते असे वाटते, कारण त्यामागे तमाशा असभ्य आहे आणि कीर्तन सभ्य आहे, असे गृहीतक असावे. असे चित्र विशिष्ट संदर्भात उद्धृत करणे गैर वा असभ्य आहे, असे आम्हांस अजिबातच वाटत नाही. त्यामुळे टारझन यांचेच तर्कशास्त्र थोडे पुढे नेत आम्ही असे म्हणू की आम्हांस कीर्तन आणि तमाशा दोन्ही प्रियच आहेत. जेवणात गोडही हवे, नि तिखटही, नाही का?
असो. वर दिलेले अँग्रचे चित्र पाश्चिमात्य चित्रकलेत इतके नावाजलेले आहे, की स्त्री देहाचा असा आकार हा एक प्रकारचा साचा झालेला आहे. तो ज्यांस माहीत असतो, त्यांच्या चेहेर्यावर वरील भित्तिचित्र पाहून हास्यरेषा उमटते. तो आकार भित्तिचित्रात वापरण्यामागे 'अतिपरिचित गोष्टीस वेगळ्या संदर्भात मांडून निर्माण झालेले वैचित्र्य आपला मुद्दा सिध्द करण्यासाठी वापरणे' असे प्रयोजन होते. भित्तिचित्र देताना आमच्या ध्यानी आले, की ज्या पाश्चिमात्य संस्कृतीसाठी ते भित्तिचित्र बनवले गेले होते, त्या संस्कृतीपासून दूर (या संस्थळावर) अँग्रचे मूळ चित्र परिचित असल्याचे गृहित धरता येत नाही, त्यामुळे लोक त्यामागील अभिप्रेत थट्टेस मुकतील. त्याने मूळच्या लढाऊ बाण्याचे टोक बोथट होईल. तसे होऊ नये म्हणून मूळ चित्र त्यासोबत दिले.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
23 Apr 2010 - 5:55 pm | सन्जोप राव
यातला कोणता उच्चार बरोबर? माझ्या मते गोरिला. उदा.गोरिला मार्केटिंग
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
23 Apr 2010 - 6:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे दिल्याप्रमाणे गोरिला आणि गरिलाच्या मधलाच उच्चार आहे. माझ्या इंग्लिशच्या उच्चारांमधे बर्यापैकी उकार असतो (अगदी मुनी, उंडर वगैरे नाही म्हटलं तरी), मी साधारण गुऽरिला असं म्हणते.
अदिती
24 Apr 2010 - 12:16 am | चिंतातुर जंतू
आपले म्हणणे बरोबर आहे. आम्ही घाईगडबडीत गूगलून फ्रेंच शब्द उपसला होता. तेथे 'guérilla' मधील é मुळे गेरिला असा उच्चार होतो, पण इंग्रजीत तसे होत नाही. धन्यवाद!
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
24 Apr 2010 - 12:33 am | टारझन
चर्चा पाहुन क्षणभर वाटले चुकून उपक्रमावर आलो की काय :)
पण निळी थिम नाही दिसल्यावर थोडं हायसं वाटलं :)
- पराक्रमी
23 Apr 2010 - 6:36 pm | वेताळ
एक निंदनिय प्रकार आहे. खरतर ह्याचा निषेध व्हायला हवा.
वेताळ
25 Apr 2010 - 4:56 am | सोम्यागोम्या
=)) =)) =))
जबरी प्रतिक्रिया !
24 Apr 2010 - 12:47 am | चतुरंग
चित्रांचा अशाप्रकारे उपयोग करुन संदेश पोचवायची कल्पनाच नामी आहे!
(गनिमी 'काव्या'तला)चतुरंग
24 Apr 2010 - 12:56 am | Pain
हे असलं दुटपी पणाच वागण नाही पटत.
स्त्रीवादी विषयाला नग्न चित्र चालतात्..पण खादाडीला पुर्ण कपड्यातील स्त्री नको...वा रे वा...जय हो....
seconded !
यानी केल तर उच्च अभिरुचि अन बाकीचे आम्बट्शौकीन काय ?
तुम्ही केला तो चमत्कार आणि आम्ही केला तर ...... ?
24 Apr 2010 - 8:31 am | प्रकाश घाटपांडे
कृष्णानी केल्या तर त्या लीला आम्ही केले तर ते चाळे! आपण केली तर ती स्ट्रॅटीजी व इतरांनी केली तर ती लबाडी!
हॅहॅहॅ चालायचच!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.