माझ्या अहो॑चा विसरणे हा ३६ गुणा॑पैकी एक गुण. ते कधी आणि काय आणि कसे विसरतील याचा नेम नाही.
नविनच लग्न झाल्यावर मी खिचडी केली होती, त्या॑ना डिशमध्ये घालुन दिली , मग मी इतर कामाला लागले, हे मला विचारत आले अग! तु माझी खिचडी खाल्ली का ? मग आम्ही दोघे ही ती खिचडी शोधु लागलो, एकदाची ती पु़स्तका॑च्या कपाट मिळाली.
दुसरी गंमत. आम्ही तिसर्या मजल्यावर राहत होतो, तर हे, त॑द्रीत ४ मजल्यावर गेले आणि बेल कशी दिसत नाही म्हणून मग हसत खाली आले. क॑बरेला मोबाईलचे कव्हर आणि मोबाईल घरी हे तर वरचेवर असायचे. घराला कुलुप लावुन खाली या सा॑गितले तर कुलुप हातात घेऊनच खाली, कधी कधी आतला दरवाजा उघडाच आणि ग्रीलला कुलुप. गावाहुन दोन बॅग घेऊन माझ्या माहेरी आले चमला भेटुन पुण्याला जाणार होते, जाताना एकच बॅग घेऊन जीना उतरताना, दसरी राहिली म्हणुन परत वर आणि पहिली घरी, एकदा सकाळी तर गडबडीत दाढीच्या ब्रशवर टुथ पेस्ट, आमच्या छोट्याला घेऊन मित्रा॑ बरोबर बाहेर गेले, त्याला तेथेच विसरुन बाहेर. तसे किस्से खुप आहेत, पण मला त्याच्या बरोबर रहाचे आहे ना !
पण हे म्हणजे डोक्यानी अगदी सुपीक, मेरिट वाले हो, आमच्या डोक्यात आपले खुरटे गवतच उगवणार.
विसरणे - हसु आणि आसु
गाभा:
प्रतिक्रिया
13 Apr 2008 - 2:06 am | इनोबा म्हणे
एखादे दिवस तुम्हालाच विसरायचे. लक्ष ठेवा.
माझी आईही मला माझ्या विसरण्याच्या सवयीमुळे 'विसराळू विनू' म्हणते. मात्र तुमच्या 'हे' एवढा विसराळू नाही हा मी.
लवकर आवरता घेतला आहे असे वाटते,आणखी बरेच काही लिहीता आले असते. असो.
पुढील लेखनाकरिता शुभेच्छा!
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
13 Apr 2008 - 1:00 pm | आनंदयात्री
म्हणतो .. बाकी प्रयत्न चांगला, थोडा वेळ काढुन लिहा, अजुन खुलवता आला असता !
13 Apr 2008 - 3:42 am | व्यंकट
व्यक्तीचित्रण करायला तुमच्या अगदी जवळच एक चांगली वल्ली आहे म्हणजे, लेखनाकरीता शुभेच्छा!!
व्यंकट
13 Apr 2008 - 9:17 am | विसोबा खेचर
तसे किस्से खुप आहेत,
येऊ द्या अजूनही! ;)
पण मला त्याच्या बरोबर रहाचे आहे ना !
राहा राहा, त्यांच्या बरोबरच राहा बरं! विसराळू माणसं तशी स्वभावाने खूप भली असतात. तेव्हा अश्या भल्या माणसाला सोडून न जाता त्याच्यासोबतच राहा आणि त्याची काळजी घ्या! ;)
आपला,
(कुणाही सोबत न राहणारा) तात्या.
13 Apr 2008 - 7:50 pm | विजुभाऊ
माझा मित्र त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो आणि त्याची बायको मला रस्त्यात फिरताना भेटले. दोघांशी गप्पा मारत असताना मित्राला कोणीतरी त्याच्या ऑफिसातला भेटला. तो रस्त्याच्या पलिकदे त्याच्याशी बोलायला गेला. थोड्या वेळाने तो त्या माणसाबरोबर गेला. मित्राची बायको माझ्याशी बोलत होती . आमचे जरा लक्ष नव्हते तेवढ्यात तो मित्र कोठेतरी गायब झाला. थोड्या वेळाने मित्राच्या बायकोला मी स्कूटर वरुन मित्राच्या घरी सोडायला गेलो. पहातो तर काय हे महाशय घराच्या दारातुनच पत्नीला " मी घरात वाट पहातोय. कोठे गेली होतीस तू?" म्हणुन विचारु लागले.
आपण बायकोबरोबर फिरायला गेलो होतो/ कोणीतरी भेटली आणि बायकोला विसरुन आपण तसेच घरी आलो हे या मित्राच्या गावीही नव्हते. त्याच्या बायकोचा चेहेरा मात्र या वेळी फोटो काढण्यासारखा खचितच नव्हता
14 Apr 2008 - 1:23 am | इनोबा म्हणे
आम्हाला असे मित्र कधी मिळणार देव जाणे...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
14 Apr 2008 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त आहेत किस्से :)))अजून येऊ द्या !!!
एकदा सकाळी तर गडबडीत दाढीच्या ब्रशवर टुथ पेस्ट,
असा अनुभव आमच्याही पाठीशी आहे. :)
आपला,
प्रा.डॉ. विसरभोळे
15 Apr 2008 - 12:01 am | चतुरंग
असा अनुभव आमच्याही 'गालांशी' आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला;)) ह.घ्या.
असा अनुभव आम्हाला दातांशी आहे - कारण एकदा चुकून मी टूथब्रशवर शेविंग क्रीम घेतले होते आणि पेस्टची चव कशी बदलली म्हणून शिव्या घातल्या होत्या.
नंतर लक्षात आले आणि दिवसभर 'पामोलिव दा जवाब नहीं' म्हणणार्या कपिलपाजीं ('जी' वर अनुस्वार दिलेला आहे!;)सारखा दात सारखे बाहेर काढून आरशासमोर जात होतो!;))
चतुरंग
15 Apr 2008 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असा अनुभव आमच्याही 'गालांशी' आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला;)) ह.घ्या.
असेच म्हणायचे आहे, म्हणायला हवे होते !!!:)
14 Apr 2008 - 7:11 pm | शितल
मला विसरले तर काही नाही, पण विसरुन दुसरीलाच घेऊन आले तर मग मात्र.....
15 Apr 2008 - 1:21 am | भडकमकर मास्तर
छान होता लेख....
पटकन आवरता घेतलात....!!!!!
अजून ही काही गोष्टी आठवल्या....एका मोठ्या प्रोफेसर कथालेखकाच्या विसरण्याबद्दलच्या गोष्टी आहेत , अर्थात त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या.... ( मला खात्री नाही त्यांच्या नावाबद्दल, म्हणून लिहित नाही..)
१. एकदा आंघोळीनन्तर, कमरेला गुंडाळलेल्या टॉवेलवरून पँट चढवून दिवसभर कॉलेजात शिकवून आले.....परत आल्यावर समजले, आज एवढा वेळ असे विचित्र का वाटत होते?
२. एकदा बायकोसहित दुचाकीवरून जाताना बाजारात काही कामानिमित्त उतरलेल्या बायकोला विसरून घरी परत आले......
15 Apr 2008 - 9:53 am | विदेश
सत्यनारायणाला नमस्कार केला, भटजीबुवाकडून तीर्थ घेऊन प्राशन करून, नेहमीप्रमाणे तळहात डोळ्यांवर फिरवला! क्षणभर सर्व धूसर दिसू लागले-कारण नुकताच लावलेला चष्मा काढायचा विसरलो होतो!स्वत:शीच का हसलो ते कुणाला सांगणार!
15 Apr 2008 - 5:07 pm | धमाल मुलगा
पुस्तकांच्या कपाटात खिचडीची डिश? खल्लास!
जबराच दिसताहेत तुमचे 'अहो' !
वर्णन थोडं-थोडं अस्मादिकांसही लागू पडतं आहे. आनंद वाटला...कोणितरी आपल्यासारखाच आहे हे कळून :-)
परवाच्या रविवारी आम्ही घराच्या किल्लीची चेन (की-चेन हो) खेळता खेळता कानाला अडकवली(स्वत:च्या!) आणि बाहेर जाताना आख्खं घर पालथं घातलं...तीच किल्ली शोधत.
बाकी तात्या आणि व्यंकटशी सहमत.
अशी माणसं मनाने चांगली असतात. (कोण आहे रे तो...माझ्या वरच्या वाक्याचा संदर्भ ह्या वाक्याला जोडू पाहतो आहे? )
राग-बिग आला तरी विसरण्याच्या सवयीमुळे पटकन शांत होत असतील नाही?
मस्त व्यक्तिचित्र लिहिता येइल ह्यावर..बघा, सवडीने टाका लिहून!
आपला,
- ..........
एsss अरे माझं नाव काय रे?