गोमातेला धुवावं की दोहावं?

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
16 Apr 2010 - 9:07 am
गाभा: 

एक वेळ गोमातेला धुणं परवडलं पण दोहणं नको, असा सूर ग्रामीण भागात आढळतो.... परंतु आपण शहरी नेटकरी आहोत ना, तेव्हा गोमातेची शुचिता महत्त्वाचीच.
आपली मराठी आपल्याला कामधेनू समान आहे.आजकाल जो तो येतो आणि नुसतं दोहत बसतो... मराठीची शुद्धता अजिबात पाळत नाही.नुसतं लिहीत जायचं.. खरडत रहायचं..उकार,वेलांटी, र्‍हस्व,दीर्घ म्हणून जे सोपे वाटेल ते ठोकून द्यायची सवय वाढलीय.यावर मिपाच्या सदस्यांनी नक्कीच मंथन करावं अशी अपेक्षा...

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2010 - 9:35 am | बिपिन कार्यकर्ते

आयला सुदलेकन? चालुंद्या... पण आधी धुवुन मग दोहावं... नुसतंच शूत बसलं तर काय उपयोग?

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

16 Apr 2010 - 9:38 am | नितिन थत्ते

दोहणेचा अर्थ काय?

मला वाटले होते की 'धुवावे' आणि 'दोहावे' ही एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. एक दुसर्‍याचे अज्ञानामुळे बनलेले अपभ्रष्ट रूप आहे.

संदर्भः यासर अराफत = श्री हरिपाद. ;)

नितिन थत्ते

महेश हतोळकर's picture

16 Apr 2010 - 9:40 am | महेश हतोळकर

धुणे - तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ.
दोहणे - धार काढणे. दूध काढणे.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2010 - 9:41 am | बिपिन कार्यकर्ते

तेजोमहालय आठवला. ;)

बिपिन कार्यकर्ते

विशाल कुलकर्णी's picture

16 Apr 2010 - 12:34 pm | विशाल कुलकर्णी

=)) =)) =))

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2010 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे

मिपाची नीर्मिती याच मंथनातुन झाली आहे. एखादी साहित्य नीर्मिती होताना लेखक त्याचा इतिहास तपासतो मग लिहितो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

आवशीचो घोव्'s picture

16 Apr 2010 - 12:23 pm | आवशीचो घोव्

निर्मितीचा "नि" ऱ्हस्व आहे. आपण दीर्घ लिहिला आहे. ;)

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2010 - 1:08 pm | इनोबा म्हणे

'नी' आहे हे जास्त महत्वाचे! ;)

लिमिटेड माज!

शुचि's picture

16 Apr 2010 - 11:51 am | शुचि

नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे पण इथे अम्ही मिपा वर आलोय तेच मुळी मराठीशी परत नाळ जुळण्यासाठी. आमच्याकडे संदर्भाकरता मराठी पुस्त़कं पण नाहीत. १० वर्षं झाली मराठी पुस्तक वाचून. अशवेळी शुद्धलेखन कुठे तपासायचं?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

शेखर's picture

16 Apr 2010 - 10:46 pm | शेखर

>> अशावेळी शुद्धलेखन कुठे तपासायचं?

उपक्रमचे / मनोगताचे सभासदत्व घ्या... :)

प्रियाली's picture

17 Apr 2010 - 12:08 am | प्रियाली

मराठीची कळकळ बाळगणारे अनेकजण येथेही असतील त्यांच्याकडून शुद्धलेखन तपासून घ्या. :)

सन्जोप राव's picture

17 Apr 2010 - 6:23 am | सन्जोप राव

किंवा विकीपिडीयावर बघा. बर्‍याच लेखनाचा कच्चा आणि पक्का माल तेथेच सापडतो म्हणे.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Apr 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

चुचु उर्फ पर्नल मराठे, माधुरी दिक्षित, सतिश असे अनेक मराठीचे गाढे व्यासंगी आपल्याला नक्की मदत करतील.

बाहेरुन टंकुन आणुन इकडे युनिकोदात परावर्तीत करणे हा देखील एक उपाय आहे. ह्या विषयावर 'माननीय कोदा' हे आपल्याला मार्गदर्शन करु शकतील.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नेत्रेश's picture

16 Apr 2010 - 12:05 pm | नेत्रेश

*** काय ते वीचारु नये..

तसाही धुणे आणी दोहण्याचा संबंध काय?

चित्रगुप्त's picture

16 Apr 2010 - 1:54 pm | चित्रगुप्त

......तसाही धुणे आणी दोहण्याचा संबंध काय?....

अवं, दासबोध वाचा, म्हंजी कळंल समदं नीट.........
...." कन्या जाली न्हातीधुती " .....वगैरे समर्थांनी समदं लई ब्येस सांगिटल्येलं हाय दासबोधामंदी......आमी लय वर्सं वाचला हाए...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2010 - 1:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मज्याशि मयत रि कर्न्र्र्र क?

अदिती
(मिपाच्या मुख्य पानावर बिन्डोक बिंबो न दिसल्यामुळे मिपाचे पहिले पान अधिक चांगले आणि सुखावह दिसत आहे.)

मेघवेडा's picture

16 Apr 2010 - 1:44 pm | मेघवेडा

अच्रत! ;)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अविनाशकुलकर्णी's picture

16 Apr 2010 - 2:23 pm | अविनाशकुलकर्णी

धु धु धुवाह

दो दो दोहावं

धुहावं कि दोवाह

हाव हाव..वाह वाह

धु
दो
न्हातीधुती ????दुधो न्हाओ फलो फुलो

गणपा's picture

16 Apr 2010 - 2:47 pm | गणपा

घ्या अजुन एक टि आर पी वाढवणारा धागा..

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2010 - 3:45 pm | प्रकाश घाटपांडे

आता ही गोमाता जर भरल्या पिका अणीर्बंध घुसली तर शेतकरी दंडुका घेउन त्या गोमातेला फटका मारतो त्यावेळी त्या गोमातेच्या पोटात असलेल्या तेहतीसी कोटी देवांना लागत कस नाही?
जि़ज्ञासुंणी सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध वाचावे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रगुप्त's picture

16 Apr 2010 - 3:53 pm | चित्रगुप्त

सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध....
जालावर आहेत का उपलब्ध?
लायब्ररीत आहे समग्र सावरकर साहित्य, पण कोण दगदग करणार तीस किलोमीटर जाण्याची?

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2010 - 3:58 pm | प्रकाश घाटपांडे

हायेत ना हित पघा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रगुप्त's picture

16 Apr 2010 - 4:36 pm | चित्रगुप्त

छान... आजच वाचू...
..."हायेत ना हित पघा"......मधील "हित" वर टिचकी मारली की जालपान उघडण्याची काय क्लुप्ती आहे बुवा? आंहाला हे जमले नाही अजून....

डॉ.श्रीराम दिवटे's picture

16 Apr 2010 - 5:34 pm | डॉ.श्रीराम दिवटे

बहुतेकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय.
आभार!

तिमा's picture

16 Apr 2010 - 8:31 pm | तिमा

आवो, भैये म्हशीलाही सोडत नाहीत ते गायीला काय सोडणार ? तुमी बसा धुवावं की दोहावं याचा काथ्याकूट करत!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2010 - 9:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुद्धलेखन आणि संस्कृत हे संकेतस्थळावरील अमर विषय आहेत. :)

'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे शुभानन गांगल यांचे छोटेसे पुस्तक जरुर वाचा आणि वाचल्यानंतर आपले मत लिहा. मग मी नेहमीप्रमाणे शब्दांमधे शुद्ध आणि अशुद्ध काही नसते यावर पहिल्या चेंडुपासून खेळण्यास सुरुवात करीन. :)

-दिलीप बिरुटे
[शुद्ध शब्द,प्रमाणभाषा आणि संस्कृत यावर मारामार्‍या करुन थकलेला]

पिवळा डांबिस's picture

16 Apr 2010 - 10:30 pm | पिवळा डांबिस

मराठीची शुद्धता अजिबात पाळत नाही.नुसतं लिहीत जायचं.. खरडत रहायचं..उकार,वेलांटी, र्‍हस्व,दीर्घ म्हणून जे सोपे वाटेल ते ठोकून द्यायची सवय वाढलीय.

हम्म! असं म्हणता?
अरे, यांची आणि चुचुची जरा भेट घडवून आणा रे कोणीतरी!!!!
:)

पिवळा डांबिस
(शुद्धिचिकित्सक ऑलरेडी फोडून मोकळा झालेला!!)

टारझन's picture

17 Apr 2010 - 1:12 am | टारझन

ते समदं जाऊनद्या .. . दोन खरडी पडल्यात एकीचंबी उत्तर नाय ... काय चुकलं का काय मालक :)

- हळवा डांबिस

डॉ.श्रीराम दिवटे's picture

17 Apr 2010 - 8:32 am | डॉ.श्रीराम दिवटे

डांबीसराव,
ही चुचुची नावाची फटाकडी कोण म्हणायची???
कळू ध्या जरा...

पिवळा डांबिस's picture

17 Apr 2010 - 9:46 am | पिवळा डांबिस

अहो, अहो, असं लगेच फटाकडी वगैरे म्हणू नका हो!
आम्हाला धाकट्या बहिणीसारखी आहे ती!!!
पण भाषा मात्र जबरदस्त आहे...
तुम्ही असं करा....
इथे मिपावरच सर्च करून बघा ना....
थोडं शोधल्याशिवाय काय मजा?
:)

पर्नल नेने मराठे's picture

17 Apr 2010 - 1:11 pm | पर्नल नेने मराठे

=))

चुचु

विजुभाऊ's picture

17 Apr 2010 - 5:17 pm | विजुभाऊ

सावरकर म्हणतात गाय हा एक उपयूक्त पशू आहे