चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
15 Apr 2010 - 7:39 am
गाभा: 

नाडीवर बरेच दिवसात काही वाचायला मिळालेले नाही...

ओक साहेबांस विनंती की त्यांनी लवकरात लवकर किमान पाच-सात नाडीवाचनाचे वेळी पट्टी हुडकताना होणार्‍या संभाषणाचे पूर्ण रेकॉर्डिंग करून मिपा वर टाकावे.

(मागे अरुंधती ताईंनी लिहिलेच होते की....... मला वाटते की ओकांनी onus to prove the authenticity of Nadi Bhavishya दुसर्‍यावर ढकलून देऊ नये. जर त्यांना जबाबदारीने, सुजाणतेने, जागरुकतेने नाडीभविष्याविषयी काही सांगायचे असेल तर त्याविषयी अधिक खोलवर जाऊन त्या विषयाची पाळेमुळे खोदणे हे त्यांना नाडीग्रंथवाचकांशी निकट परिचय असल्यामुळे जास्त शक्य आहे......)

तसेच श्री बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिले होते, की.....हे ही नमूद करावेसे वाटते की या आधी श्री. ओक यांच्याकडूनतरी फारशी गंभीरपणे चर्चा केली गेली नाही असे वाटते. ज्याबद्दल आपण हिरीरीने आणि अथकपणे प्रसार / प्रचार करतो त्याबद्दल काही प्रश्न विचारले की 'तुम्हीच अनुभव घ्या / तुम्हाला पाहिजे तिथे जा / मी काहीच सुचवणार नाही' अशी उत्तरे आली........

आम्ही परवा दिल्लीतील एका नाडीकेंद्रास फोन करून माहिती घेतली, जनरल कांडम वाचण्याची फी सातशे रुपये, शिवाय पेट्रोल खर्च व वेळ, हा विचार करता आधी ओक साहेबांकडून केले जाणारे रेकॉर्डिंग ऐकून मगच काय ते ठरवू, असा विचार केला.....

आम्हास खात्री वाटते, की अश्या रेकॉर्डिंग मधून नाडी प्रकरण खरे आहे, बनवाबनवीचा मामला नाही, असे सिद्ध झाल्यास अनेक लोक याविषयी काम करण्यास पुढे येतील.....
नवीनः नुक्त्याच केलेल्या भ्रमंतीत आम्हाला चक्क मिपाच्याच नाड्या मिळाल्या आहेत, त्याचे पूर्ण वर्णन व त्या हस्तलिखितांचे प्रत्यक्ष फोटो लवकरच मिपावर प्रकाशित करणार आहोत.....

प्रतिक्रिया

Nile's picture

15 Apr 2010 - 8:50 am | Nile

(एकमेकांच्या) नाड्या सोडा नाही तर बारा वाजवा पण आमच्या नाडीवर 'बुरी नजर' ठेवु नका नाहीतर सुटायची (आमची सबुर म्हणतोय).

II विकास II's picture

15 Apr 2010 - 9:14 am | II विकास II

एक प्रश्न खुप दिवसांपासुन विचारचा म्हणतो आहे, मराठी संकेतस्थळाची नाडी असते का? संकेतस्थळ कधी बंद पडेल हे समजु शकते का?

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Apr 2010 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्रर्र, काड्यावाल्या विकासना एवढं सगळं करून रस कशात तर संकेतस्थळ बंद पाडण्यात!
नाडी वाचून हे पण कळेल का कुत्र्याचं शेपूट सरळ होणार का नाही ते?

अदिती

II विकास II's picture

15 Apr 2010 - 11:13 am | II विकास II

अर्रर्र, काड्यावाल्या विकासना एवढं सगळं करून रस कशात तर संकेतस्थळ बंद पाडण्यात!
== आमच्या रसाची तुम्हाला चिंता पाहुन अंमळ मौज वाटली.
आमचा रोख मिपाविरोधकांवर होता. तुम्हीही आमच्याशी मिपाविरोधकांना विरोध करण्यात सामिल असलाच. ;)

नाडी वाचून हे पण कळेल का कुत्र्याचं शेपूट सरळ होणार का नाही ते?
==कोण बोलते आहे पहा.

--

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Apr 2010 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आमच्या रसाची तुम्हाला चिंता पाहुन अंमळ मौज वाटली. <<
छे छे, कशाचीही काय चिंता करायची? मला रस आहे तो संकेतस्थळांमधे; आयडी, काड्या वगैरे कस्पटासमान!

>> आमचा रोख मिपाविरोधकांवर होता. तुम्हीही आमच्याशी मिपाविरोधकांना विरोध करण्यात सामिल असलाच. <<
कोण बरे हे मिपाविरोधक, अंमळ मलाही दोनचार ज्ञानकण मिळू देत! माहित झाले तरी मी नाही बा या विरोधकांना विरोध करण्याच्या फंदात पडणार... काही गोष्टी दुर्लक्षानेच मारलेल्या बर्‍या!

>> कोण बोलते आहे पहा. <<
अरेच्चा, मला प्रश्न पडला तर तुम्हालाही प्रश्न पडला!!
अर्र, मला वाटलं तुम्हाला कळलं असेल कोण बोलते आहे ते! नसेल कळलं तर नाड्या पहा ना ... आणि तरीही कळलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते ... जाऊ दे हो, सोडा ... एकदा सांगून नाही कळलं तर कशाला पुन्हापुन्हा, तेच तेच?

अदिती

स्वगतः आता फार अवांतर झालं नाही का? गपा आता!

II विकास II's picture

15 Apr 2010 - 1:54 pm | II विकास II

>>स्वगतः आता फार अवांतर झालं नाही का? गपा आता!
+१

----

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

ऋषिकेश's picture

15 Apr 2010 - 9:47 pm | ऋषिकेश

आमची वर्जिनल स्वाक्षरी ढापल्याबद्द्ल णिषेध

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

इनोबा म्हणे's picture

15 Apr 2010 - 10:08 am | इनोबा म्हणे

चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा.....
पुढची कडवी पण लिहा रे कुणीतरी...

नविन म्हण
"कितीही नाड्या वाचल्या तरी कुत्र्याचं शेपूट वाकडंच."

मेघवेडा's picture

15 Apr 2010 - 1:59 pm | मेघवेडा

काही खास कडवी हवी असल्यास श्री. घासकडवी साहेबांना पाचारण करण्यात यावे! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

राजेश घासकडवी's picture

15 Apr 2010 - 4:02 pm | राजेश घासकडवी

पोरांनो, गृहपाठ करा... सगळंच मास्तरांनी काय करायचं?

मेघवेडा's picture

16 Apr 2010 - 12:31 am | मेघवेडा

हॅहॅहॅ!! गुर्जी तुमी अस्ताना ही आव्हानं आमी पेलाय्ची व्हंय?? ;)
आणि ते फक्त तुमच्या नावात 'कडवी' असल्याकारणानं म्हणालो होतो मी.. :D

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2010 - 12:52 am | इनोबा म्हणे

मेघवेड्या, ह्या निमीत्ताने येखादा शेर-पावशेर होऊन जाऊ दे!

लिमिटेड माज!

टारझन's picture

16 Apr 2010 - 2:01 am | टारझन

आणि ते फक्त तुमच्या नावात 'कडवी' असल्याकारणानं म्हणालो होतो मी..

=)) =)) मेघवेड्या ... (???) गुर्जींनी फार शिरेसली घेतलं की =)) =)) =)) =))

-(महागुरुजी) काव्येश बाराकडवी

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2010 - 10:30 am | राजेश घासकडवी

जालीय पर्यावरणाची परिस्थिती फारच बिकट दिसतेय.. खुद्द टारझनांनासुद्धा त्यांची सही विडंबणं रिसायकल करायला लागताहेत...

असो, तुमच्यासाठी पुढच्या दहा बारा प्रतिसादांसाठीची सही विडंबणं इथेच लिहून ठेवतो....

(खांदे द्यायला) बार जण
किंवा
(खांदे द्यायला) फार जड
किंवा
(खांदे द्यायला) चार टन
किंवा
(खांद्यावरती) ??????
किंवा
(येड्यासारखे) मार घण
किंवा
(पारंबीला) फार जड
किंवा
(जेनच्याबरोबर) गार ढोण
किंवा
(खांद्याखालती व कंबरेवरती) फार छान
किंवा
(लेंड्यांमध्ये) फार मन
किंवा
(चिखलामध्ये) पार तन
किंवा
(सुद्दलेखणात) फार घाण
किंवा
(डोक्या झेपेना) फार ताण

आणखीन हवी असल्यास सांगा....

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 10:34 am | इनोबा म्हणे

काय ह्ये गुर्जी...? =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2010 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगाई गं!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

(गुर्जीचा प्रतिसाद समजून घ्यायला) चारजण*

अदिती

(* हा शब्द नंदनकडून उधार)

मेघवेडा's picture

19 Apr 2010 - 1:17 pm | मेघवेडा

(गुर्जीचा प्रतिसाद समजून घ्यायला) चारजण

हे लै भारी!!

=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

Nile's picture

19 Apr 2010 - 11:28 am | Nile

अगागागागागागागागागा!
=)) =)) =))

-पार डन!

नंदन's picture

19 Apr 2010 - 11:26 am | नंदन

एकदम घाऊक पंगत उठवली की :).
>>> (पारंबीला) फार जड
=))

या ताजमहालाला आमच्या काही विटा -

(प्रतिसाद देताना) दाण्ण कन् ,
(*ड्यांवरती) घाल घण [* इथे आपापल्या मगदुराप्रमाणे व्यंजने भरावीत. उगाच का का मा असा प्रश्न विचारू नये ;).]
इ. इ.

@ अदिती -- चार जण, नव्हे चार टन ह्या शब्दाची उसनवारी करता येईल :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2010 - 11:34 am | राजेश घासकडवी

काही चांगले जुळलेले स्वरही चालतील :)

Nile's picture

19 Apr 2010 - 11:36 am | Nile

तो स्वर ठवेना की हो! ;)

मेघवेडा's picture

19 Apr 2010 - 1:11 pm | मेघवेडा

गुर्जी .. __/\__, लोक तुम्हाला उगाचच गुर्जी म्हणत न्हाईत!!

-- मारेश उभीआडवी!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 4:23 pm | धमाल मुलगा

गुर्जींचा प्रतिसाद ढिंच्याक तर हैच्च!
मेघ्याची सही तर आणखी खत्रा =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2010 - 5:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(खांद्याखाली) चार मण

(खांद्यावर) काढ तण

अदिती

मेघवेडा's picture

20 Apr 2010 - 3:45 am | मेघवेडा

प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया होती राव!! आता टारेश म्हणतात की हे त्यांनी एकेकाळी केलेलं विडंबन होतं म्हणून.. पन मियां ढापलाय नाय हां..

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Apr 2010 - 3:02 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

19 Apr 2010 - 9:18 pm | टारझन

जालीय पर्यावरणाची परिस्थिती फारच बिकट दिसतेय.. खुद्द टारझनांनासुद्धा त्यांची सही विडंबणं रिसायकल करायला लागताहेत...

हाहाहा .. खरं आहे .. हल्ली आमच्याच लोकांनी आमची तोंड बंद केल्यामुळे बर्‍याचदा हात आवरता घ्यावा लागतो खरा :)

-( आज्ञाधारक) आज्ञेश पालनकरवी

असो, तुमच्यासाठी पुढच्या दहा बारा प्रतिसादांसाठीची सही विडंबणं इथेच लिहून ठेवतो....

आमच्या साठी अजुन काही आहे करण्यासारखे :) करताय का ?

आपल्या "स्तुत्य" सहि विडंबणात सापडलेल्या चुका
१. सगळीच्या सगळी वृत्तात हुकली आहेत.
२. बर्‍याच ठिकाणी "बळेच" ओढुन ताणुन आणल्यासारखे वाटले.
३. मिर्‍या झोंबणारी एकही सहि नाही.
४. टारझन ह्या शब्दात स्पेस नाही :) एकच शब्द ठेऊन काही कलाकृती करता आल्या असत्या तर "दाद" घेऊन गेला असता :)

(परिक्षक) बाळेश चौथीपाचवी

- टारेश पुरुणुरवी

नावातकायआहे's picture

15 Apr 2010 - 10:26 am | नावातकायआहे

>>पुढची कडवी पण लिहा रे कुणीतरी...

चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा
घ्या त्या पट्टया आणि *** (चुलित) सर्व सारा

Nile's picture

15 Apr 2010 - 11:21 am | Nile

ती हसतीए तेव्हढं सुधारुन रडतीए करा ब्वॉ,कपाळावर हात आहेच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Apr 2010 - 11:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बाबा, ती जाहीरात आहे. जाहिरातीत ती रडताना दाखवून कसं चालणार?

अदिती

II विकास II's picture

15 Apr 2010 - 1:55 pm | II विकास II

>>अरे बाबा, ती जाहीरात आहे. जाहिरातीत ती रडताना दाखवून कसं चालणार?
+१

नाड्या वाचुन स्वतःचे हसे करुन घ्या असा अर्थ असेल का? ;)

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Apr 2010 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

तसेच श्री बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिले होते, की.....हे ही नमूद करावेसे वाटते की या आधी श्री. ओक यांच्याकडूनतरी फारशी गंभीरपणे चर्चा केली गेली नाही असे वाटते. ज्याबद्दल आपण हिरीरीने आणि अथकपणे प्रसार / प्रचार करतो त्याबद्दल काही प्रश्न विचारले की 'तुम्हीच अनुभव घ्या / तुम्हाला पाहिजे तिथे जा / मी काहीच सुचवणार नाही' अशी उत्तरे आली........

बहुधा, (किंबहुना खात्रीने) असे असावे की ओकसाहेबांना माझ्या हेतूंबद्दल खात्री नसावी... :(

बिपिन कार्यकर्ते

अरे आता नाडी सोडल्यावर , पुढचे पण सगळे समजावून सांगायचे की काय ?????................................. ;)

इंटरनेटस्नेही's picture

15 Apr 2010 - 4:04 pm | इंटरनेटस्नेही

हसून हसून पुरेवाट झाली

शशिकांत ओक's picture

15 Apr 2010 - 5:29 pm | शशिकांत ओक

सातशे रुपये, शिवाय पेट्रोल खर्च व वेळ, हा विचार करता...

नाडीच्या फडावर जाऊन गुप्तपणे चित्र काढता .... ...
मग,
नाडीला घालाया हात राया का अडखळता ।
असेल जर ज्वानीचा भर, तर हात का आखडता ।।
अडका नसता कनवठीला राया चैन का करता ।
नसेल पेलत खेळ तर बसण्याचा विचार का करता ।।
भरीस घालुन शशिला, नाडीची कास का धरता ।
साहसी आपण खास तुमची आहे मी, का घाबरता ।।

नाडी फडावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

इनोबा म्हणे's picture

15 Apr 2010 - 6:49 pm | इनोबा म्हणे

शाब्बास रे गुणा...

टारझन's picture

16 Apr 2010 - 12:49 pm | टारझन

नाडीला घालाया हात राया का अडखळता ।
असेल जर ज्वानीचा भर, तर हात का आखडता ।।

व्वा वा व्वा व्वा व्वा !!

बाकी है सब्बास रे इन्या. .. घे तुणतुणं हाती .. ए कोणीतरी घ्या ढोलकं हातात :)
आम्ही आलो तोवर बडवुन .. सॉरी बडवायला :)

- ताडीकांत लोक

मितभाषी's picture

15 Apr 2010 - 5:38 pm | मितभाषी

नाडी वाचनासारख्या तद्दन भिकार, गल्लेभरु आणि टुकार प्रकाराची प्रसिध्धी भारतीय संरक्षण खात्यातील एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने करावी याच्यासारखी शोकांतीका नाही.
२१ व्या शतकात विज्ञाननिष्ठ जग प्रगतीची उत्तुंग भरारी घेत असताना एका सुशिक्षीत(?) महाभागाने अंधश्रध्दा पसरवण्याचे कुटिल कारस्थान चालवल्याचे पाहुन आमच्या अंतकरणास प्रचंड यातना होत आहेत, हे वेगळे सांगावयास नको.

कौंटुबिक, मानसिक समस्येने व्यथित झालेले सर्वसामान्य जन हे यांचे हक्काचे गिर्‍हाइक आहेत. त्यांना अलौकिक, थक्क करुन सोडनार्‍या कपोलकल्पित कथा/कहाण्या सांगुन जाळ्यात ओढ्ण्याचा हा जाणिवपुर्वक केलेला कट आहे. नव्हे तर गोर्-गरिब जनतेला फसवण्याचे घोर पातक हि मंडळी करत आहेत.

प्रचारकी थाटात लिखान करणार्‍या महाभांगांना आमचे जाहीर आव्हान आहे कि त्यांनी हे थोतांड सप्रमाण सिध्द करावे. आणि आम्हाला खात्री आहे कि ते करु शकत नाहीत. म्हणुनच संदिग्ध उत्तरे देण्याकडे त्यांचा कल आहे.

अशी संदिग्ध उत्तरे देऊन सर्वांच्या मनात कुतुहल निर्माण करावयाचे, त्यांना परस्पर नाडीकेन्द्रात पाठवायचे. आणि त्यानंतर बरोबर जाळ्यात पकडायचा यांचा हेतु स्पष्ट दिसत आहे.

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\

ईन्टरफेल's picture

17 Apr 2010 - 1:07 pm | ईन्टरफेल

आहो आम्हि पन सहमत काय परखड प्रतिक्रिया आहे ........................................{जगाला-ताप नव्हे}जगताप

चित्रगुप्त's picture

15 Apr 2010 - 10:23 pm | चित्रगुप्त

विंगकमांडर म्हणतातः
नाडीला घालाया हात राया का अडखळता ।
असेल जर ज्वानीचा भर, तर हात का आखडता ।।
अडका नसता कनवठीला राया चैन का करता ।
नसेल पेलत खेळ तर बसण्याचा विचार का करता ।।
भरीस घालुन शशिला, नाडीची कास का धरता ।
साहसी आपण खास तुमची आहे मी, का घाबरता ।।

चित्रगुप्त म्हणतो:
असेल जर रेकॉर्डिंग राया का अडखळता
असेल नाडिची खात्री तर हात का आखडता
पुरावा नसता गाठीला राया लेख का लिहिता
नसेल जमत रेकॉर्डिंग तर फुका कष्ट का घेता
भरिस घालुन मिपाला नाडीची कास का धरता
साहसी आपण खास तुमची आहे ओळख, रेकॉर्डिंगास का घाबरता ।।

चित्रगुप्त
आमचे काही धागे:
मोनालिसाच्या बहिणी ?????
http://www.misalpav.com/node/11860
आपल्या मोना(लिसा) वहिनी:
http://www.misalpav.com/node/11663
आमचे काही पूर्वजन्मः
http://www.misalpav.com/node/11667

इनोबा म्हणे's picture

15 Apr 2010 - 10:44 pm | इनोबा म्हणे

लय भारी!!!

चित्रगुप्ता, यमलोकातील आवक-जावक चा हिशोब सोडून हे तमाशातल्या सवाल-जवाबाचे पालथे धंदे का करुन र्‍हायलास बे? असो.
आता शाहिर गुणा नाडिगावकर काय म्हंत्यात ते बी बघू दे!

टुकुल's picture

16 Apr 2010 - 12:20 pm | टुकुल

जबरा रे चित्रगुप्त...
एकंदरीत नाडीच्या धाग्यांची आणी ओक साहेबांची किव येते,

--टुकुल

....नुक्त्याच केलेल्या भ्रमंतीत आम्हाला चक्क मिपाच्याच नाड्या मिळाल्या आहेत, त्याचे पूर्ण वर्णन व त्या हस्तलिखितांचे प्रत्यक्ष फोटो लवकरच मिपावर प्रकाशित करणार आहोत.....