टाटा नैनो

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in काथ्याकूट
11 Apr 2010 - 1:22 pm
गाभा: 

टाटा नैनो या टाटांच्या बहुचर्चित कारचा कोणाला व्यक्तिगत अनुभव आहे का? सध्या असलेल्या मारुती झेन च्या अतिरिक्त एक आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी खरेदी करावी असा विचार आहे. या कारची रस्ता धरून चालण्याची क्षमता, वेग, चढ-उतार पार करण्याची क्षमता, यांत्रिक भागांची उपलब्धता, ही कार साधारण १,००० किमी अंतर दोन दिवसात न थकता पार पाडु शकते का, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे किंमत व मूल्य गुणोत्तर (cost benifit ratio) या बाबतीत आपली बहुमुल्य मते मांडण्याची विनंती सर्व माननीय मिपाकरांना करतो.

- (वाहनवेडा) इंटरनेटप्रेमी.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Apr 2010 - 1:28 pm | मदनबाण

जास्त माहित नाय पण काही दुवे :---
http://techwebtoday.com/review/tata-nano.html
http://www.tatanano.in/tata-nano-vs-maruti-800.html
http://www.surfindia.com/automobile/tata-nano.html

आणि हे देखील जरुर वाचा :---
http://news.oneindia.in/2010/03/25/nano-car-fire-tata-motors-apology-sal...

http://gadgetsworld.co.in/2010/03/another-tata-nano-fire-accident/

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

तिमा's picture

11 Apr 2010 - 1:58 pm | तिमा

नुकतेच वाचनात आले की इंजिन गरम होऊन नव्या कोर्‍या दोन कार रस्त्यातच पेटल्या. त्यातल्या एसी मॉडेल चे इंजिन फार गरम होते व ते मागे असल्यामुळे मागे बसलेल्यांना थंड वाटतच नाही असे गुजरातच्या दौर्‍यावर असताना ऐकले.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चिन्मना's picture

11 Apr 2010 - 6:24 pm | चिन्मना

इंजिनने पेट घेतला असं कुठं वाचलंत? मी नेटवर शोध घेतला पण अशी बातमी आढळली नाही.

इंटरनेटप्रेमी, तुमच्या "१००० किमी जाऊ शकते का" या प्रश्नाबद्दल असे म्हणावेसे वाटते की ही कार त्यासाठी डिझाईन केलेली नाही. ती मुख्यत्वेकरून शहरातल्या शहरात (किंवा जवळपास) चालवण्यासाठी आहे. याचा अर्थ ती जाणार नाही असा नाही. भारतात दुचाकी वाहनांवरही लांबचा प्रवास करणारे बहाद्दर आहेतच! पण ज्याप्रमाणे तो प्रवास सुखकर नसतो तसाच नॅनोचाही दूर अंतराचा अनुभव इतर मोठ्या गाड्यांपेक्षा कमी दर्जाचाच असणर.

किंमत-मूल्य गुणोत्तराबद्दल - किंमतीबद्दल तर प्रश्नच नाही. दुसर्‍या कुठल्याच कारची किंमत नॅनोला बीट करू शकत नाही. ६२३ सी.सी. इंजिनक्षमतेमुळे मायलेजही चांगलेच असणार. टाटा मोटर्स किती मायलेज क्लेम करतात याची मला कल्पना नाही. पूर्णपणे भारतीय बनावटीची गाडी असल्यामुळे सुटे भागही स्वस्तात उपलब्ध व्हावेत. हे झाले खर्चाबद्दल. आता बेनेफिटबद्दल म्हणाल तर तुम्ही ही गाडी कोणत्या कारणासाठी घेतली आहे या वर ते ठरेल. माझा एक भारतातील मित्र ही गाडी त्याच्या मुलीसाठी घ्यायचा विचार करतोय. त्याची मुलगी इंजिनिअरिंगला आहे आणि तिचे कॉलेज घरापासून २५-३० किमी दूर आहे. कॉलेजला जायला आणि यायला त्या संस्थेचीच बस आहे. मात्र ती बस सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशी ठराविक वेळेलाच असते. ती चुकली की बसा बोंबलत! मुलीला इतक्या लांब आणि एव्ह्ढ्या गर्दीत दुचाकीवर पाठवणे त्याला आवडत नाही. त्याच्या दृष्टीने नॅनो हा एकदम सोयीस्कर आणि सुरक्षित उपाय आहे. यावर शिकण्यार्‍या मुलांना गाडी कशाला ही चर्चा नको. हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. इथे गाडीच्या perceived benefits बद्दल बोलतोय आपण.

टाटांच्या गाड्यांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असे म्हणावेसे वाटते की त्या गाड्यांचे व्हर्जन - २ घेणे उत्तम! साधारण १ वर्षाच्या actual user trials नंतर बरेच दोष लक्षात येतात आणि काढून टाकले जातात. सुमो आणि इंडिका या दोन्ही गाड्यांच्या बाबतीत असेच घडले होते.

बाय द वे, नॅनो हा मराठी (आणि इंग्लीश) उच्चार - नैनो हा हिंदी उच्चार. त्यामुळे मराठीत लिहिताना नॅनो असे लिहिलेले बरे. (फक्त सुचवणी - फार मनावर घेऊ नये.)

_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

सुचेल तसं's picture

11 Apr 2010 - 6:27 pm | सुचेल तसं

उत्तम प्रतिसाद!!!!!!

देवदत्त's picture

11 Apr 2010 - 7:57 pm | देवदत्त

इंजिन पेटले होते का माहित नाही पण गाडीने पेट घेतला हे मी वाचले आहे. त्याचे फोटो ही आले होते छापील वृत्तपत्रात.
एक संबंधित बातमी येथे वाचा.

चिन्मना's picture

11 Apr 2010 - 8:17 pm | चिन्मना

म. टा. च्या दुव्याबद्दल धन्यवाद. टाटा मोटर्स याचा लवकरच छडा लावून काय तो खुलासा करेल अशी अपेक्षा आहे.
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

..असं या वृत्तावरून दिसतं. दुसर्‍या गाडीलाही आग लागल्याचं टाटा मोटर्स ने मान्य केलं आहे. मागे काही गाड्यांमधील आगींमध्ये दोष इग्निशन स्विचचा होता म्हणून त्याच्या पुरवठादाराला बदलण्यात आलं होतं हे त्यांनी सांगितलं.

मला नॅनोचा व्यक्तिगत अनुभव नाही, पण भूतकाळातील इतर टाटा उत्पादनांचा अनुभव चांगलाच आहे, आणि टाटा च्या एकंदरीत business ethics विषयी आदर असल्याने 'नॅनो घ्यावी की नाही' असा विचार करण्याची वेळ येईल तेंव्हा ती नक्कीच घेईन.

आजच्या इकॉनॉमिक टाईम्स् मध्ये ही बातमी आहे. बघू या, महिना अखेरी पर्यंत टाटांना हा प्रश्न सोडवता येतो का....
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

शैलेन्द्र's picture

12 Apr 2010 - 10:01 am | शैलेन्द्र

आज नॅनो साधारन १.७ लाखाला जाते, अजुन थोडे(२५-३० हजार) टाकुन १-२ वर्ष वापरलेली अल्टो घ्या... नॅनोला फार लिमीटेशन आहेत.

उमराणी सरकार's picture

12 Apr 2010 - 2:20 pm | उमराणी सरकार

नॅनो १ लाख ७० हजार ला जात असेल तर मारूती घेणे उत्तम.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

सुधीर काळे's picture

12 Apr 2010 - 4:19 pm | सुधीर काळे

'लखटकिया' गाडी इतकी महाग?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?comple... (India Today)

माझे एक चांगले मित्र 'टाटा मोटर्स'मध्ये काम करतात. त्यांना हा धागा मी पाठविला आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण आल्यावर मी इथे ते लिहीन.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?comple... (India Today)

अन्या दातार's picture

12 Apr 2010 - 3:50 pm | अन्या दातार

मागे एकदा गुहागरास जाताना कराडकडे जाणारी नॅनो बघितली. काय भन्नाट पळते हो! ८०-९० वेग असेल. घाटातही चांगली चालत असावी; कारण आंबा घाटातही १-२ नॅनो पाहिल्या. बाकी, वर्जन २ घेणे कधीही चांगले.

शैलेन्द्र's picture

12 Apr 2010 - 5:51 pm | शैलेन्द्र

८०-९० ने जाणारी नॅनो बघायला चांगली वाटेल, चालवायला नाही. अत्यंत हलकी बॉडी आणी मागे असलेले इंजीन यामुळे गाडी रस्ता धरुन चालेल असे वाटत नाही. घाट चढुन जात असावी(कारण रीअर व्हील पुश) पण एखाद सीट वा सामान जास्त झाल की दम काढणार हे नक्कि. नॅनो ही शहरात वापरायची गाडी आहे, हायवेवर नाही

(एम ८० वरुन गोवा गाठलेला)
शैलेंद्र.

इंटरनेटस्नेही's picture

15 Apr 2010 - 3:53 pm | इंटरनेटस्नेही

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.