बिर्याणी - व्हेज ????

गणपा's picture
गणपा in पाककृती
11 Apr 2010 - 8:05 pm

बिर्याणी म्हटली आणि मग त्यात चिकन मटण नसेल तर मग मी तीच्या वाटेला जात नाही. किंबहुनां चिकन मटण गेला बाजार फिश नसेल तर ती बिर्याणीच काय हे माझ ठाम मत. म्हाणुन काल पर्यंत मी व्हेज बिर्याणी कधी चाखलीही नव्हती करायची तर बातच सोडा.
पण शुक्रवारी पुपेंची खरड आली आणि त्यांनी सरळ फर्मान सोडल की एक झणझणीत व्हेज बिर्याणीची पाकृ येउदे. आता त्यांना का नेटावर मिळणार न्हवती व्हेज बिर्याणिची पाककृती, पण त्यांनी हक्काने सांगीतल ते मला खुप आवडल. दोन दिवस व्यस्त असल्याने त्यांच्या कडुन रवीवारपर्यंतची सवड मागीतली. कारण बिर्याणि हा प्रकार निगुतीने करायचा आहे. कारण जर काही घाइ गडबड झाली तर त्या बिर्याणीची खिचडी व्हायला वेळ लागणार नाही हे मी जाणुन होतो. अहो नॉनव्हेजला आपली अशी स्वतःची एक चव असते. पण काहीही व्हेज बनवताना त्यात जीव ओतावा लागतो अस माझ मत आहे. नॉनव्हेज बिर्याणीचा अनुभव पाठीशी असला तरी उगाच गोंधळ नको म्हणुन नेटावरुन जरा एक दोन रेशिप्या पाहिल्या पण त्यात मजा नाही आली. मग म्हटल आपणच थोड व्हेरीएशन करुन पाहु.
तर मायबाप रसिकहो जो काय प्रकार केला आहे तो आपल्या पुढे सादर करतोय.
(पाहुन करावीशी वाटलीच तर सुट्टीच्या दिवशीच ट्राय करा.)

साहित्य :


बासमती तांदुळ १ तास आधी भिजत ठेवलेला.


गाजर, बटाटा, फरसबी, फ्लॉवर हिरवी मिरची मोठे तुकडे करुन.
(शक्यतो तुकडे मोठेच ठेवा. नाहीतर पुलावात आणि बिर्याणीत फरक तो काय ;) )


२ मोठे कांदे उभे चिरुन.


४-५ लाल सुक्या मिरच्या.
२-३ तमाल पत्र.
१ इंच दालचीनी.
८-९ लवंग.
१ चमचा काळीमीरी.
१ चमचा शाहीजीरे.
१ चमचा जीरे.
१ चमचा बडीशेप.
१ चमचा खसखस.

काजु.
१/२ चमचा हळद.
१ लहान चमचा बिर्याणी मसाला (असल्यास)
२ चमचे दही
२ चमचे साजुक तुप.
मीठ चवीनुसार.
केशर ४-५ चमचे दुधात भिजवलेला.

कृती:

एका भांड्यात पाणी उकळत ठेवाव.


दुसर्‍या भांड्यात एक चमचा तुपावर थोड जीर ५-६ लवंगा, काळीमीर्‍या, तमाल पत्र परतुन घ्याव.


त्यात भिजवलेला बासमती तांदुळ टाकुन हलक्या हाताने परतुन घ्यावा. जास्त परतु नये. तांदुळ भिजवलेला असल्याने लगेच मोडतो.


मग त्यात उकळते पाणी आणि मीठ घालावे. मध्यम आचेवर एक कणी भात शिजवुन घ्यावा. साधारण ८-१० मिनीटात भात तयार होतो. चाळणीने गाळुन भात वेगळा ठेवुन द्या.


एका फ्राइंग पॅन मध्ये खडा मसाला कोरडा भाजुन घ्यावा.
१/२ चमचा तेलावर थोडा कांदा (१ वाटी) गुलाबी होइस्तो परतुन घ्यावा.


गार झाल्यावर खडा मसाला, कांदा, १ चमचा घट्ट ताज दही मिक्सरमधुन वाटुन एकसम बारीक पेस्ट करुन घ्यावी.


बाकीचा उरलेला कांदा तेलात कुरकुरीत तळुन घ्यावा. काजुपण तळून वेगळे ठेवावे.
(स्वानुभव : कांदा तळण्या आधी त्यात थोड तांदळाच पीठ भुरभुराव आणि मग कांदा तेलात सोडावा. मस्त कुरकुरीत होतो.)


पसरट भांड्यात १ चमचा तेलावर जीर्‍याची पोडणी करावी. मग त्यात सगळ्या भाज्या टाकुन टॉस कराव्या.


मग त्यात १/२ हळद, चवी नुसार मीठ ,१ लहान चमचा बिर्याणी मसाला (असल्यास नसेल तरी चालेल.) टाकुन चांगल मिक्स करुन घ्याव.


नंतर त्यात १ मोठा चमचा दही घालुन भाज्या नीट परतुन घ्याव्या.


१ मिनिटा नंतर त्यात वाटण टाकुन परत सगळ्या भाज्या टॉस करुन घ्याव्या. वाटल्यास एक पाण्याचा हबका मारुन
वर झाकण लावुन १/२ वाफ काढावी.

भाज्या संपुर्ण शिजवुन नाही घ्यायच्या. साधारण ८०% झाल्या की आच बंद करावी.


एका जाड बुडाच्या भांड्याला तुपाच हात लावावा.
सगळ्यात खाली तळलेल्या कांद्याचा एक थर लावावा.


मग वर भाताचा एक थर लावावा.


त्यावर भाज्यांचा थर लावावा.


आणि परत वरुन भाताचा थर लावुन हलक्या हाताने दाबुन सारखा करुन घ्यावा.
लहान काठीने (चॉपस्टीकने) ठारावीक आंतरावर भोक पाडावीत.


त्या भोकातुन केशर भिजवलेल दुध सोडाव. वरुन परत थोडासा तळलेला कांदा भुरभुरावा.
अ‍ॅल्युमिनियमच्या फॉईलने भांडे सिलबंद करुन घ्यावे.
(गव्हाच पीठ भिजवुनही केल तरी चालेल.)


एका पसरट भांड्यात थोड पाणी ठेवुन गॅस वर ठेवाव.


सिलबंद केलल बिर्याणीच भांड या पसरट भांड्यात ठेवाव. वरुन दाब येईल अस झाकण ठेवाव.
मध्यम ते मंद आचेवर १५-२० मिनिटे दम द्यावा.

आता इतकी मेहेनत घेतली आहे तर थोड साधस पण प्रेझेंटेशन हवच नाही का.
अहो पहिल्या नजरेत डिश जर का खवय्याच्या पसंती पडली की १/२ किल्ला तिथेच सर झाला म्हणुन समजा ;)

असो आता माझही मत बदलय.
येस्स.... बिर्याणी व्हेजही असु शकते. तुमच मत काय :?

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

11 Apr 2010 - 8:32 pm | शानबा५१२

-आता त्यांना का नेटावर मिळणार न्हवती व्हेज बिर्याणिची पाककृती, पण त्यांनी हक्काने सांगीतल ते मला खुप आवडल.
हा attitude फार आवडला.

अरे हां...........काल ते केळफुलाचे वडे केले(मी नाही).....फोटो टाकणार होतो पण सर्व वडे पोटात गेल्यावर ते लक्षात आल ;)

धन्यवाद तुमच्या सर्वच पाकक्रुतींबद्दल.

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

रेवती's picture

11 Apr 2010 - 8:37 pm | रेवती

आता या पाकृवर काय मत द्यायचं?
अजून केळफुलाच्या वड्यांनी झालेली मनाची चलबिचल थांबली नाही आणि आला हा व्हेज बिर्याणी घेउन!
फोटो छानच आलेत्.......त्यात कॅमेर्‍याचा काय दोष?
पण बिर्याणी.........मस्त दिसतीये!
एक शंका: यात पुदिन्याचा उपयोग केला नाही तरी चवीत फरक जाणवला नाही का? चवीबद्दल तूच सांगू शकशील म्हणून विचारतीये. ;)

रेवती

गणपा's picture

11 Apr 2010 - 9:11 pm | गणपा

हो कापा-कापीला सुरवात केली आणि मग लक्षात आल की पुदिच्याची पान संपली आहेत. त्यामुळे टाकली नाहीत.
चवीत फार खास फरक नाही पडला पण, पुदिन्याचा एक मस्त गंध येतो बिर्याणीला हे मात्र खरच. :)

वेताळ's picture

11 Apr 2010 - 8:39 pm | वेताळ

इकडे आजकाल जत्र्यांचा सिझन चालु आहे. मटन खावुन वैताग आलेला आहे. शाकाहारी पाकृ व ती पण आवडती दिल्याबद्दल धन्यवाद.
वेताळ

अरुंधती's picture

11 Apr 2010 - 8:45 pm | अरुंधती

मस्त मस्त मस्त पा.कृ.!!!
प्रेझेन्टेशन तर धमाल आहे.... खूप सुरेख दिसतंय आणि चव पण तितकीच सुंदर असणार!
आमच्याकडे व्हेज बिर्याणी बनवताना, बिर्याणी झाली की कोळसा गॅसवर लालबुंद गरम करून मग तो वाटीत ठेवला जातो, ती वाटी बिर्याणीच्या पातेल्यात, पातेले तव्यावर, तवा गॅसवर.... आणि त्या कोळशावर दोन - तीन थेंब तूप्/तेल सोडून बिर्याणीचे पातेले लगेच झाकायचे व तो धूर बिर्याणीला लागू द्यायचा.... जो चुर्र आवाज आणि कोळसा व तेल्/तूपाच्या धुराचा मस्त वास लागतो बिर्याणीला, जी धुरकट चव येते त्याचे काय वर्णन करावे!!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विष्णुसूत's picture

11 Apr 2010 - 11:29 pm | विष्णुसूत

वरील प्रतिसादाशी सहमत.
गणपा यांनी बरीच मेहनत घेतलेली जाणवत आहे. त्यांचे अभिनंदन.
मला वाटते कि रायथा /रायता ( दहि+कांदा +मीठ +मसाले) हे जोडिला असल्या शिवाय बिर्याणी ला काहि मजा येत नाहि.. शिवाय बिर्याणी मसाला हा अतिशय महत्वाचा आहे... नाहितर ते पुलावा सारखे वाटते...
( हे माझे वैयक्तिक मत.. चु भु द्दा घ्या)

विष्णुसूत's picture

12 Apr 2010 - 2:18 am | विष्णुसूत

बिर्याणि म्हणजे केवळ मांस असल्या शिवाय बनत नाहि अशी लेखकाची कल्पना होती हे जाणुन आश्वर्य वाटलं !
व्हेज बिर्याणित सर्व जिन्नसांचे जे aromas असतात ते दाखवणे हेच तर शेफ चे स्किल आहे. असो.
गणपा साहेब तुमची रेसीपी हि पुलावा च्या जास्त जवळ वाटते.

गणपा's picture

12 Apr 2010 - 3:02 am | गणपा

गर्भीतार्थ ध्यानात न घेता शब्दशहा: अर्थ घेतलात आपण.
व्हेज बिर्याणी असते हे माहीत होत हो पण पक्का सामिशहारी असल्याने व्हेज बिर्याणीच्या वाट्याला कधी गेलोच नाही.

असो. तुम्हाला पुलाव वाटत असेल तर तुम्ही पुलाव समजुन गोड मानुन घ्या :).

(स्वगतः आयला गण्या लोक तुला शेफ समझायला कागले की काय :? पुढच्यावेळी डिस्क्लेमर टाकायला पाहीजे. )

विष्णुसूत's picture

12 Apr 2010 - 4:37 am | विष्णुसूत

गणपा साहेब,
मी प्रामाणिक पणे एका व्हेज खवैया चे मत मांडले. राग मानु नये हि विनंती. कृपया क्षमा करावी.
आज दुपार भर आमच्या लाडक्या टायगर भाऊंना पहात पहात मि.पा वरील लेख वाचत होतो ,तेव्हा तुमच्या लेखावरचे फोटो पाहुन लेख वाचला. नाहितर त्या पंथातले आम्हि नाहि.
चांगले खाणे आणि चांगले गाणे मात्र अचुकपणे ओळखण्याची शक्ती अन्नदात्याच्या कृपेने आहे.

पाषाणभेद's picture

11 Apr 2010 - 9:54 pm | पाषाणभेद

आमच्यासारख्या 'बुळ्या' लोकांसाठी ही पाकृ तर भन्नाट आहे.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

पिंगू's picture

11 Apr 2010 - 10:47 pm | पिंगू

तसा मी शाकाहारी असल्याने गणपागुरुंची ही पाककृती माझ्यासाठी खासच!!!!!! <:P <:P <:P <:P <:P

आशिष सुर्वे's picture

11 Apr 2010 - 11:04 pm | आशिष सुर्वे

गणपा ओगा, तुझे नाव इथे झळकते तेव्हाच तू पूर्ण किल्ला सर केलेला असतोस!

बाकी पाककृती बद्दल आम्ही पामर काय बोलणार.. नेहमीप्रमाणे नेत्रसुख घेतलेच!!

एशे..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

कवितानागेश's picture

11 Apr 2010 - 11:31 pm | कवितानागेश

एक छोटीशी टीपः
कान्दा परतताना त्यात थोडी साखर/मीठ घालावे.
चट्कन क्रिस्प- ब्राऊन होतो.
============
माउ

प्राजु's picture

11 Apr 2010 - 11:32 pm | प्राजु

गणपा... अशक्य आहेस बाबा तू!
इतक्या नुगुतीने आणि व्यवस्थित, फोटो सकट पा़कृ दिली आहेस ना.. भटलास कधी तर आधी साष्टांग घालेन तुला.
म्या पामराने या पाकृ बद्दल काय बोलावे?
क-ह-र आहे पाकृ.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शुचि's picture

12 Apr 2010 - 3:14 am | शुचि

मस्त. कांदा काय नाजूक उभा पातळ चुर्चुरीत दिसतोय :)
सुरेख!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

अक्षय पुर्णपात्रे's picture

12 Apr 2010 - 3:24 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री गणपा, उत्तम पाकृ आणि फोटो. अशी डिट्टेलवार पाकृ असल्याने नक्की करून बघणार आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

12 Apr 2010 - 6:21 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त......

रेवती's picture

12 Apr 2010 - 6:27 pm | रेवती

तू दिलेली कृती आणि माझी नेहमीची कृती यामध्ये फरक जवळ जवळ नाहीच, त्यामुळे कालच रात्री बिर्याणी केली (आणि संपवली). ;)

रेवती

मदनबाण's picture

12 Apr 2010 - 6:30 pm | मदनबाण

लय भारी... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

प्रभो's picture

12 Apr 2010 - 7:45 pm | प्रभो

वा!! (आता एवढीच प्रतिक्रिया)

मीनल's picture

13 Apr 2010 - 1:36 am | मीनल

मला ते टोमॅटोचे लाल फूल, कोंथिंबीरीचे हिरवे देठ आणि लिंबाच्या फोडीचे पिवळे पान फार आवडले.
रेसिपी बद्दल लिहावे तेवढे थोडेच!
पदार्थच्या चवीच्या आधी त्याचे दृश्य स्वरूप आकर्षित करते म्हणून तिथेही लक्ष द्यावे असे कॅटरिंग क्लासच्या डिप्लोमात शिकले होते.
मी नुसते शिकले. पुढे?... रामा शिवा गिविंदा!

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

स्वाती२'s picture

12 Apr 2010 - 8:12 pm | स्वाती२

खल्लास!
मी व्हेज बिर्याणी कधी केली नाहीये पण आता या कृतीने नक्की करुन बघणार.

चतुरंग's picture

12 Apr 2010 - 8:13 pm | चतुरंग

सगळे नेहेमीप्रमाणे खासच. पुदीना मात्र हवाच हवा. त्याचा कॅरॅक्टेरिस्टिक अरोमा आल्याशिवाय ती बिर्यानी आहे असे वाटत नाही हे माझे मत.
शीर्षकात व्हेज ह्या शब्दापुढे '????' टाकून तू माझ्यासारख्या शाकाहारी व्यक्तीच्या भावना दुखावल्याबद्दल तुझा निषेध! (चला, कोणत्या का कारणाने निषेध करता आला शेवटी!);)
(खुद के साथ बातां : रंगा, कालच्या बिर्यानीची चव अजूनही जिभेवर रेंगळते आहे नै! B) )

चतुरंग

गणपा's picture

12 Apr 2010 - 8:29 pm | गणपा

(खुद के साथ बातां : रंगा, कालच्या बिर्यानीची चव अजूनही जिभेवर रेंगळते आहे नै! )

हे सगळयात महत्वाच.. (घरीजायचय ना आज. विसरुन सांगतो कुणाला ;) )

सुधीर१३७'s picture

12 Apr 2010 - 10:45 pm | सुधीर१३७

लई भारी........................ :O)

खादाड_बोका's picture

12 Apr 2010 - 11:45 pm | खादाड_बोका

माझ्या सारख्या शाकाहारी साठी "वरदान". ह्या रवीवारचे बुकींग झाले. :P :P :P :P

मला तर स्वप्नातही भुक लागते....

रामची आई's picture

13 Apr 2010 - 2:28 am | रामची आई

मस्त पाककृती!!

अमोल केळकर's picture

13 Apr 2010 - 1:46 pm | अमोल केळकर

मस्त रेसिपी
बिर्याणीची खिचडी व्हायला वेळ लागणार नाही - हे वाक्य ही आवड्लं

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अनिल हटेला's picture

13 Apr 2010 - 5:12 pm | अनिल हटेला

गणपास दंडवत.....:)

(चिकन बिर्याणी आणी व्हेज पूलाव प्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

पुढेमागे काही आतापर्यंत न सांगितलेले सुचलेच तर लिहीन म्हणतो
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

पुरणपोळी's picture

14 Apr 2010 - 3:51 pm | पुरणपोळी

केळीच्या पानात बिर्याणी?

दिपाली पाटिल's picture

14 Apr 2010 - 4:02 pm | दिपाली पाटिल

मस्त बिर्याणी...मी थोडा वेगळा मसाला वापरते बिर्यानीसाठी...पण अशा पध्द्तीनेही बनवेन.
गणपाच्या नुसत्या नावानेच पुर्ण किल्ला सर झालेला अस्तो...
दिपाली :)

इंटरनेटस्नेही's picture

15 Apr 2010 - 3:59 pm | इंटरनेटस्नेही

छान आहे. मातोश्रींना आताच प्रिंट करून दिली तुमची पाकृ... शनिवारी बनव म्हटलं!

sur_nair's picture

17 Apr 2010 - 12:30 pm | sur_nair

तोंडाला पाणी सुटलं राव. काय दिसतेय.

कारभारी's picture

18 Apr 2010 - 11:44 am | कारभारी

आवडले ....आपल्याला........

जयंत कुलकर्णी's picture

18 Apr 2010 - 7:52 pm | जयंत कुलकर्णी

मी ही बिर्याणी करतांना ( खरं तर कुठलिही) त्या मसाल्यात किंवा मॅरिनेशन मधे दुधावरची घट्ट साय पण घालतो.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2010 - 11:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपा बंद करा राव या पाकृत्या. प्रतिक्रिया काय द्याव्या सुचत नाही.
उत्तम, लय भारी, काय बोलू ,लाळ टपकू लागली, मस्त, और भी आने दो. या शब्दांना अर्थ उरला नाही राव.

प्लीज पुढे काही दिवस शुद्धलेखनावर काही तरी लिहा नाय तर कविता तरी करा.

-दिलीप बिरुटे

भानस's picture

18 Apr 2010 - 11:56 pm | भानस

गणपा, धन्यू रे..... कसले जबरी फोटू आहेत.... अगदी खुलासेवार... मला खूप आवडते व्हेज बिर्याणी... लई दिस झाले केलीच नाही... फोटू पाहून तोंडाला पाणी सुटलेयं... आता करतेच पटदिशी... :) बाकी तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

प्रभाकर पेठकर's picture

20 Apr 2010 - 1:38 am | प्रभाकर पेठकर

'बिर्याणी' अजून एक मोघलाई पदार्थ.
मुळात बिर्याणी फक्त मटणाचीच करतात. एक किलो मटणात फक्त अर्धा किलो तांदूळ. 'चिकन बिर्याणी' 'फिश बिर्याणी' 'अंडा बिर्याणी' ही सर्व व्हेरिएशन्स.
फक्त शाकाहारींसाठी 'व्हेज. बिर्याणी' 'मश्रूम बिर्याणी' ह्या पाककृती आपण भारतियांनी तयार केल्या.

'पुलाव' हा पदार्थही नॉनव्हेज आहे. मटणाचा स्टॉक बनवायचा. उर्दू भाषेत ह्याला 'याखनी' आणि मराठीत 'आखणी' म्हणतात. ह्या स्टॉक मध्ये मासाल्यासहित भात शिजवून, तो शिजल्यावर, स्टॉक बनविण्यासाठी जे मटण वापरले त्या, मटणाचे बारीक, हाडं विरहित तुकडे टाकायचे. म्हणजे तयार झाला 'पुलाव'.
'व्हेज. पुलाव' पुन्हा एकदा शाकाहारींसाठी खास भारतिय पाककृती.

'बिर्याणी' करायच्या अनेक पद्धती आहेत. मोघलाई, खैबरी, इराणी, लखनवी, हैद्राबादी, कोकणी, काश्मीरी इ.. 'मटण' हा मुख्य घटक बाकी मग ड्रायफ्रुट्स
घालून 'मेवेकी बिर्याणी' बनते तर रबडी वापरून 'मलईकी बिर्याणी' बनवितात.
खैबरी बिर्याणीत ड्रायफ्रुट्स वापरत नाहीत पण भरपूर मिठाच्या पाण्यात तांदूळ भिजवून नंतर (ते पाणी काढून टाकून) दह्यात तांदूळ भिजवतात आणि कच्चे मटण आणि कच्चे तांदूळ ह्यांचे थर लावून मंद आंचेवर बिर्याणी बनवितात.

ऐकिव माहिती अशीही आहे की मुळात बिर्याणी हे गरीबांचे खाणे होते. इराण अफगाणी स्थानातील रस्तेबांधणी आणि इतर उघड्यावरील काम करणारे कामगार ३-४ वेगवेगळे पदार्थ बनविण्यापेक्षा तांदूळ, मटण, भाज्या आणि गरम मसाले असे सर्व काही एका पातेल्या मिसळून रात्री उशीराने विझवलेल्या शेकोटीवर ते पातेले ठेवून देत. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत बिर्याणी तयार व्हायची ती सर्व मिळून खायचे. पुढे त्याच्या चवीमुळे बिर्याणी राजघराण्यांपर्यंत पोहोचली आणि बिर्याणीच्या अनेक व्हर्शन्सचा जन्म झाला.

व्हेज बिर्याणीत बटाट्या ऐव़जी (आवडत असल्यास) मश्रूम आणि/किंवा पनीर वापरून पाहावे.
२-३ टेबलस्पून केवडा किंवा गुलाबजल तसेच लिंबू रस आणि दुधात खललेले केशर वापरावे.
बिर्याणी झाल्यावर लगेच झा़कण न उघडता बिर्याणी जरा मुरू द्यावी. थेट डायनिंग टेबलावर सर्व जमले की झाकण उघडावे. झाकण उघडल्यावर जो एक सुगंध पसरतो तो अप्रतिम असतो.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.

बेसनलाडू's picture

20 Apr 2010 - 2:06 am | बेसनलाडू

(खवय्या)बेसनलाडू

आवडेश! :)

(बिर्यानीप्रेमी)चतुरंग

सहज's picture

6 Aug 2010 - 3:10 pm | सहज

टिव्हीवर कुठल्यातरी खाण्याच्या कार्यक्रमात मी पण असेच ऐकले होते की मुघल की पर्शियन (??) सैनीकांसाठी वनडीश मिल म्हणून बिर्यानी होती पण नंतर त्याला बल्लवाचार्य व खवय्ये यांनी ग्लॅमर दिले.

वाह गणपाशेट.. झक्कास...

मटनाशिवायही उत्तम बिर्यानी बनू शकते हे या धाग्यामुळे पटलं.

तुस्सी ग्रेट हो.

बादवे ...जिंजर हॉटेल्स (टाटा ग्रुप) यांच्या रुम सर्व्हिस मेनूतली व्हेज बिर्यानी खरोखर वंडरफुल असते हे निरीक्षण नोंदवतो. त्याचप्रमाणे पॉप टेट्सची व्हेज बिर्यानीही जगातभारी.