आम्ही आमची माहिती अशीच उघड करीत नाही.
तुम्ही तुमच्या प्रश्नाचे प्रयोजन काय ते सांगावे.
ही माहिती किती लोकांना देणार आहात?
त्याने आम्हालाही काही फायदा आहे का?
तुम्ही तुमच्या डब्यातील जेवण वाटून घेत होता. आता घेता का?
(हुश्श्श्श.. प्रश्नांची उत्तरे नाही दिलीत तरी चालेल :)
.. बस झाले राव एक ओळीचे धागे ;) )
मला माझं खाणं शेअर करायला अजीबात आवडत नाही, त्यावर तुटून पडायला आवडतं. अमेरीकेत अमेरीकन लोक तरी शेअर वगैरे फारसं करायच्या भानगडीत पडत नाहीत, मुकाट स्वतःचं सुरु करतात. मला ते फार आवडतं.
शेअर फक्त अति प्रेमाच्या व्यक्तीबरोबर करावं असं माझं मत आहे. माझ्या मुलीव्यतिरिक्त कोणालाही अन्न शेअर करण्याचा हक्क मी देत नाही.
"खाणं" हा माझ्याबाबतीत किती संवेदनशील मुद्दा आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
अंगत-पंगत करून डबा शेअर केल्याचे फायदे बरेच असतात!
१. पदार्थ व चव वैविध्य =P~
२. घरी, माझा डबा चार लोक शेअर करतात असे सांगितल्यावर त्यात दर्जात्मक बदल घडू शकतात :>
३. आपापसातील सलोखा वाढतो ;;)
४. बोअर होत नाही, हसत-खेळत लंच पार पडतो. <:P
५. अवांतर, उपयुक्त माहिती, खबरबात कळत राहते...... :)]
१. डब्यात कोणी उग्र दर्पाचा पदार्थ, जसे झणझणीत लसणाची फोडणी दिलेली भाजी, शेपूची भाजी इ.इ. प्रकार आणले असल्यास डबा 'शेअर' केल्याने प्रत्येकाच्याच मुखी तो वास.... त्यामुळे आपला इतरांना व इतरांना आपला मुखदर्प येऊन भोवंडायचे प्रकार कमी घडतात! ;-)
२. आपण आणलेल्या पदार्थाबद्दलची इतरांनी केलेली स्तुती घरी ऐकवली की दुसर्या दिवशी अजून फर्मास चवीचे कालवण प्राप्त होऊ शकते व तेही उदार प्रमाणात! :D
३. एखादे दिवशी आपण डबा न्यायला विसरलो/ जमले नाही तरी इतरांच्या डब्यातून आपली जेवणाची थोडीफार सोय होऊ शकते!! #:S
४. इतरांच्या खाद्यसंस्कृतीविषयी कळते! शिवाय सहकार्यांच्या खाद्यविषयक आवडीनिवडीही जाणता येतात. :)
प्रतिक्रिया
10 Apr 2010 - 10:18 pm | शेखर
तुम्ही काय करता?
10 Apr 2010 - 10:23 pm | अविनाशकुलकर्णी
मी करायचो
10 Apr 2010 - 10:33 pm | टारझन
का ? आमच्या इथे डब्बे खायला येणार का ?
:)
अजुन एक ओळीचे धागे येऊन द्या सायेब :)
10 Apr 2010 - 11:22 pm | देवदत्त
आम्ही आमची माहिती अशीच उघड करीत नाही.
तुम्ही तुमच्या प्रश्नाचे प्रयोजन काय ते सांगावे.
ही माहिती किती लोकांना देणार आहात?
त्याने आम्हालाही काही फायदा आहे का?
तुम्ही तुमच्या डब्यातील जेवण वाटून घेत होता. आता घेता का?
(हुश्श्श्श.. प्रश्नांची उत्तरे नाही दिलीत तरी चालेल :)
.. बस झाले राव एक ओळीचे धागे ;) )
10 Apr 2010 - 11:58 pm | अविनाशकुलकर्णी
काहि वेळा धाग्यांची व्याप्ति एक ओळी इतकीच असते त्या वेळी नेमके काय करावे या वर कुणी मार्ग दर्शन करु शकेल का>?
11 Apr 2010 - 1:53 pm | तिमा
अशा वेळेला तोच धागा तीनदा लिहावा. म्हणजे इतरांना आपण हिन्दी सिरीयल पहात आहोत असे समाधान मिळेल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
11 Apr 2010 - 12:25 am | इंटरनेटस्नेही
डब्बा नाही पण अजून बऱ्याच गोष्टी शेअर करतो..
11 Apr 2010 - 2:35 am | शुचि
मला माझं खाणं शेअर करायला अजीबात आवडत नाही, त्यावर तुटून पडायला आवडतं. अमेरीकेत अमेरीकन लोक तरी शेअर वगैरे फारसं करायच्या भानगडीत पडत नाहीत, मुकाट स्वतःचं सुरु करतात. मला ते फार आवडतं.
शेअर फक्त अति प्रेमाच्या व्यक्तीबरोबर करावं असं माझं मत आहे. माझ्या मुलीव्यतिरिक्त कोणालाही अन्न शेअर करण्याचा हक्क मी देत नाही.
"खाणं" हा माझ्याबाबतीत किती संवेदनशील मुद्दा आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
11 Apr 2010 - 4:41 am | सुचेल तसं
काही जण टिफीनच घेऊन जात नाहीत. दुसर्याच्याच डब्यातलं खातात. अशा लोकांवरती चर्चा होण्यासाठी कृपया एक वेगळा धागा काढण्यात यावा ही नम्र विनंती...
11 Apr 2010 - 8:39 am | नितिन थत्ते
हल्ली डबा नेत नाही.
पण डबा एकत्र बसून खाण्याचे काही फायदे असतात.
डब्यात कधी कधी नावडती भाजी (उदा. वांगी, कारले) असते. घरी काही बोलण्याची सोय नसते. :D
अशावेळी ग्रूपमध्ये आपली भाजी वाटून टाकता येते. आणि आपल्याला दुसर्याची भाजी खाता येते. :)
नितिन थत्ते
11 Apr 2010 - 8:43 am | II विकास II
डब्यात कधी कधी नावडती भाजी (उदा. वांगी, कारले) असते. घरी काही बोलण्याची सोय नसते. Big Grin
अशावेळी ग्रूपमध्ये आपली भाजी वाटून टाकता येते. आणि आपल्याला दुसर्याची भाजी खाता येते. Smile
== सही जा रहा, बॉस
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
11 Apr 2010 - 10:23 am | पर्नल नेने मराठे
डब्यात कधी कधी नावडती भाजी (उदा. वांगी, कारले) असते. घरी काही बोलण्याची सोय नसते.
अशावेळी ग्रूपमध्ये आपली भाजी वाटून टाकता येते. आणि आपल्याला दुसर्याची भाजी खाता येते.
=)) =))
मी ऑफिसमध्ये एकटीच शाकाहारी आहे. सो नो शेकरिन्ग. पण पेप्सी, ज्युस अश्या गोश्टी मला लोक देतातच :>
चुचु
11 Apr 2010 - 8:45 am | चित्रगुप्त
आपली बायको (करायला) अजिबात ऐकत नाही, असे पदार्थ इतरांचा डब्यातून खायला मिळतात.....
11 Apr 2010 - 1:45 pm | अरुंधती
अंगत-पंगत करून डबा शेअर केल्याचे फायदे बरेच असतात!
१. पदार्थ व चव वैविध्य =P~
२. घरी, माझा डबा चार लोक शेअर करतात असे सांगितल्यावर त्यात दर्जात्मक बदल घडू शकतात :>
३. आपापसातील सलोखा वाढतो ;;)
४. बोअर होत नाही, हसत-खेळत लंच पार पडतो. <:P
५. अवांतर, उपयुक्त माहिती, खबरबात कळत राहते...... :)]
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
11 Apr 2010 - 2:20 pm | इंटरनेटस्नेही
"घरी, माझा डबा चार लोक शेअर करतात असे सांगितल्यावर त्यात दर्जात्मक बदल घडू शकतात"
सहमत... माझा अनुभव असाच आहे!
11 Apr 2010 - 2:08 pm | चिरोटा
डबा पूर्वी न्यायचो तेव्हा कोबी,मेथी वगैर भाजी असली की इतरांना आग्रह करायचो.
एकत्र जेवायला बसणार्यांचा मुख्य उद्देश खरा हाच असतो.!!
भेंडी
P = NP
11 Apr 2010 - 2:15 pm | इंटरनेटस्नेही
अशा वेळी तो विषय डीटेल मध्ये लिहावा..
हा काथ्याकूट वाचा...
http://www.misalpav.com/node/11868
मी हाच विषय 'नैनो कशी वाटते' असे लिहुन ३ शब्दांत मांडु शकलो असतो. पण मी तसे केले नाही. कारण एक वाक्यी धागे वाचकांना कंटाळवाणे वाटतात.
(चुक - भुल द्यावी घ्यावी.)
11 Apr 2010 - 2:30 pm | अरुंधती
अजून काही फायदे.....