सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
9 Apr 2010 - 3:33 pm | अरुंधती
चेन्नई महाराष्ट्र मंडळ ची ही साईट पहा, थोडीफार माहिती नक्की मिळेल :
http://mahamchennai.page.tl/
त्यांच्या गेस्ट हाऊसची माहिती व दर :
http://mahamchennai.page.tl/MBT-_-Guest-House.htm
चेन्नईला जाणार्यांचे बहुतांश प्रश्न व त्यांची उत्तरे :
http://mahamchennai.page.tl/Chennai-FAQs.htm
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
9 Apr 2010 - 4:33 pm | Dipankar
१. चहा आपल्यासारखा फारच कमी ठिकाणी मिळतो (मध्य कैलाश जवळ हौट चिप्स मधे मुम्बैसारखा चहा आणि उत्तर भारतीय जेवण व पाणीपुरी)
२. वेल्लाचेरि बस स्थानकाजवळ मारुति भवन हाटेलात मुर्ति नावचा वेटर ला चक्क अस्खलित मराठी येते हाटेल हि छान आहे
३. बेसन्त नगर बीच जवळ मुर्गैन इडलि
४. स्पेन्सर प्लाझा माउन्ट रोड उत्तर भारतीय जेवण
५. टुकार पाणी (घरातील नळाचे पाणी तसेच्या तसे वापरु नये जड आहे)
६. रात्री अपरात्री बीच वर चुकुन सुदधा जाउ नये पोलिसान्चा तामिळ येत नसेल तर त्रास होउ शकतो (ही गोष्ट ऐकीव आहे सत्य माहीत नाहि) पण रात्री शहरात प्रवास करणे नक्की सुरक्षीत आहे काहीही धोका वाट्त नाही (हा स्वानुभव आहे)
७ रात्री (९ ०० नन्तर) महानगर पलिकेच्या बसेस फारच कमी असतात पण
खाजगी बस उप्लब्ध असतात (महिती २००७ सालाची आहे)
८. हल्ली लोक हिन्दि समजु शकतात
९. रिक्शावाले अत्यन्त माजोरडे आहेत पण बाकी लोक खुप मदत करतात
मला बरेच वेळा रिक्षा ठरवताना स्थानिक लोकानी मदत केली आहे
9 Apr 2010 - 4:07 pm | झकासराव
विजुभाउ सांगु शकतील बहुतेक.
9 Apr 2010 - 9:01 pm | सागरलहरी
माझे एक जवळचे नातेवाइक गेलि ५ वर्षे तिथे राह्तात तुमच्या आवश्यकते नुसार व्य. नि. ने माहिती देण्यास आनंद वाटेल..
9 Apr 2010 - 9:08 pm | सागरलहरी
चेन्नई बद्दल माहिती आवश्यकते नुसार देण्यास आनंद वाटेल..
मला तरी ते गाव बरे वाट्ते.
जुन्या वळणाचे लोक बरेच आहे...
पिण्याचे पाणि विकत घ्यावे लागते .
मराठी लोक ही बरेच आहेत..
शिक्षण दर्जेदार मिळू शकते.
जागांचे व भाड्याचे दर मात्र खूप भडकले आहेत...
आणि असह्य उकाडा सहन करता आला पाहिजे...
पावसाळा व उन्हाळ्याचे चक्र आपल्या पेक्षा थोडे वेगळे आहे...
पर्यट्नाची लयलूट आहे..
9 Apr 2010 - 9:09 pm | सागरलहरी
खाणे वगैरे .. थोडा लवचिक पणा असेल तर छान आहे.. फक्त काही काही गोष्टी... / पिठे वगैरे इकडुन नेलेली बरी पड्तात
9 Apr 2010 - 10:22 pm | घाशीराम कोतवाल १.२
तात्या मला लोकांच्या खवत लिहिता येत नाही आहे
You are not allowed to post in this guestbook.
असा मेसेज येतो माझा लोकांच्या खवत लिहायचा अधीकार काढुन घेतला काय :?
9 Apr 2010 - 10:22 pm | अन्या दातार
मलाही तिथे आय आय टी च्या परिक्षेसाठी जायचे आहे. त्यामुळे वरील मार्गदर्शनाचा उपयोग होईल.
10 Apr 2010 - 3:16 pm | चिऊ
सगळ्या॑चे मनापासून आभार :-)