गेल्या विकांताला घरा मागच्या आवारात फेरफटका मारत असताना केळीच्या झाडांना लोंगर लागलेले दिसले. तेव्हाच इरादा पक्का केला की या आठवड्यात आईकरते तसे केळफुलाचे कबाब /डाळवडे करुन पहायचे.
काल दुपारी लंच ब्रेक मध्ये घरी गेलो. चण्याची डाळ भिजत घातली. आणि एक बोंड (केळफुल) तोडुन आणल.
संध्याकाळी ऑफिस मधुन आल्यावर केळीच बोंड निसुन घेतल.
बाकिच्याही सामानाची जुळवाजुळव केली.
साहित्यः
१ बाउल चण्याची डाळ ३-४ तास भिजत ठेवलेली.
२/३ हिरव्या मिरच्या.
१ इंच आल.
२ पाकळ्या लसुण (आवडत असल्यास)
फोटोत दाखवल्या प्रमाणे , त्या जांभळ्या पाकळ्यांच्या आड ५-६ फुल असतात.
प्रत्यक फुलाच्या मध्ये ६ केसर (?) असतात त्यातला एकच इतरांहुन वेगळा असतो तो कढुन टाकातचा आणि एक लहान पाकळी असते ती पण काढुन टाकायची.
जस जस जांभळ्या पाकळ्या कमी कमी होत जातात तस तस आतला गाभा पांढरा दिसायला लागतो. तो कोवळा असतो. तो आख्खा घेतला तरी चालतो.
केळफुल साफकरुन आणि बारीक चिरुन.
१ लहान कांदा, उभा आडवा चिरुन.
१ चमचा जीर.
१ चमचा लाल तिखट.
१/२ चमचा धणे पुड.
१/२ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
तळण्यासाठी तेल.
कृती:
सर्वप्रथम डाळ + मिरची + आल + लसुण मिक्सरमध्ये भरड वाटुन घ्याव. जर घरी पाटा वरवंटा असेल तर त्यावर वाटलत उत्तमच.
मग एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण आणि बाकीचे मसाले, कांदा सगळे एकत्र करुन घ्या.
लहान लहान गो़ळे करुन वडयांसारखा आकार द्या.
एका कढईत तेल गरम करुन त्यात हे कबाब खरपुस तळुन घ्या.
चटणी सॉस सोबत गरमा गरम सर्व्ह करा.
हा हा म्हणता अर्ध्या/एक तासात मस्त कबाब तयार पण झाले.
(आणि खा खा करता ५-१० मिनिटात फस्त पण झाले.)
प्रतिक्रिया
8 Apr 2010 - 4:01 pm | खादाड
हा हा म्हणता अर्ध्या/एक तासात मस्त कबाब तयार पण झाले.
(आणि खा खा करता ५-१० मिनिटात फस्त पण झाले.)
इतके xxxy दिसले तर होतिलच साफ !!
8 Apr 2010 - 4:39 pm | सन्जोप राव
गुणवर्णनासाठी आता पहिल्यापासून सुरवात करावी म्हणतो!
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
8 Apr 2010 - 10:25 pm | बेसनलाडू
पाककृती आणि फोटो आवडले.
(हावरट)बेसनलाडू
8 Apr 2010 - 5:26 pm | प्रमोद्_पुणे
महान आहेस..एक नंबर कबाब..
8 Apr 2010 - 5:30 pm | स्वाती दिनेश
मस्तच दिसत आहेत,
केळफुल सोलायचं, स्वच्छ करायचं ,चिमण्याकावळे काढायचं किचकट काम करायला वेळ जायचा , हात त्या रापाने काळे ,चिकचिकित व्हायचे पण पुढे येणार्या त्या भाजीसाठी सारं सहन केलं जायचं!
अरे, सकाळी त्या कौसल्यामातेने फणसाची भाजी टाकली आता हा गणपा केळफुलाचे कबाब करतोय..
टीनातला फणस वापरुन दुधाची तहान ताकावर तरी भागवता येईल पण केळफुल कुठून आणू आता इथे? आता केळफुलाच्या भाजीसाठी भारतवारीपर्यंत थांबणे आले..
छे छे..छळ तरी किती सहन करायचा माणसानं...
स्वाती
8 Apr 2010 - 7:01 pm | रामची आई
एकदम सही दिसतायत!!
8 Apr 2010 - 7:56 pm | रेवती
भारी रे!!
यावेळेस बर्याच दिवसांनी आलास आणि सगळ्यांच्या भावनांचे वडे केलेस रे!;)
रेवती
8 Apr 2010 - 8:05 pm | धनंजय
मला तर नुसते केळफूल साफ करून चिरायलाच १ तास लागतो :-(
चित्रे आणि पाककृती मस्तच (नेहमीप्रमाणे).
8 Apr 2010 - 8:06 pm | प्राजु
सह्ही!!
मला भाजी फार आवडते.. हा प्रकार नविन आहे.
भारतवारीत बघूया जमते का?
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
8 Apr 2010 - 8:13 pm | चतुरंग
छ्या..मध्यंतरी ह्या गण्याचा बॅड पॅच सुरु होता तेव्हा जरा बरं होतं. आता आला हा पुन्हा छळायला! ~X(
(खुद के साथ बातां : हा देव तरी ना, गणपासारख्या माणसाला बागेत कशाला केळीचं झाडं देतो? आता बस म्हणावं केळी खात!! ;) )
चतुरंग
8 Apr 2010 - 8:39 pm | प्रभो
लै भारी!!
8 Apr 2010 - 8:49 pm | खादाड_बोका
मी सुद्धा कधीही खाल्ले नाहीत. ह्यावेळेस भारत वारीत ताईला करुन मागेल.
गणपाला चरणस्पर्श..... :)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
8 Apr 2010 - 10:21 pm | संदीप चित्रे
त्यांना केळफुलाची भजी खूप आवडायची.
मूळ गाव 'पालघर' असल्याने केळफुलं भरपूर मिळायची.
तुझी पाकृ (नेहमीसारखीच) नंबर १ रे मित्रा !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
9 Apr 2010 - 4:03 am | चित्रा
मला फार आवडतात केळफुलाचे वडे (का कबाब?)
9 Apr 2010 - 9:24 am | मदनबाण
गणा भाऊ... आरं कंचा पदार्थ करायचा बाकी ठेवलास ते सांग एकदाचं... ;)
बाकी यक मेशेज तुझात खवत पहा...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
10 Apr 2010 - 11:36 am | काजुकतली
केळफुल चिरुन पाण्यात घालुन ठेवावे लागते ना? कबाब करताना तसे करायची गरज नाही??
10 Apr 2010 - 2:51 pm | गणपा
केळफुलात मोठ्याप्रमाणात लोह असते. त्यामुळे जर ते आधीच कापुन ठेवले असेल तर काळे पडते.
आयत्यावेळी जर कापुन वापरल तर पाण्याय टाकुन ठेवायची गरज नाही.
10 Apr 2010 - 2:59 pm | गणपा
धागा वर आल्याच निमित्त साधुन सर्व मायबाप वाचक प्रतिसादक खवय्यांचे आभार मानतो.
धन्यु.
29 Apr 2010 - 8:59 am | समिधा
आजच करुन बघितले मस्तच झाले होते.
इकडे (अमेरीकेत) माझ्या इथे गेले ३ आठवडे इंडीयन स्टोअर मध्ये केळफुल मिळत आहे . त्यामुळे ह्या आठवड्यात आणुन करुन बघितल.
केळफुलाच्या भाजीची पण पाकृ माहित असल्यास सांग.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)