अभामराठी साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री गैरहजर राहिले. ते काहून गैरहजर राहिले हे काय सांगाची गरज नाय.बीग बी उपस्थित राहिले. सात ठराव पास झाले. बेळगावच्या मराठी माणसावरचा अन्याव सहन केला जाणार नाय. कोर्टात महाराष्ट्र शासनाने मजबूत बाजू मांडावी. पुणे विद्यापीठाला क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे, असे काय ठराव मंजूर करण्यात आले.
प्राचार्य आन अभासामहामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यायनी तीन वर्ष मात्र गाजीले.विश्वसाहित्य संमेलन काय घेतले. अध्यक्षपदाची सुत्रे स्वताच काय दिली.आन पुण्याच्या साहित्य संमेलनात मिरून काय घेतले. काय काय केले आन काय नाय केले. आता साहित्य परिषदेची धुरा मुंबईकडे जाणार हाय. नवे महामंडळाचे अध्यक्ष आन कार्यवाह आता काय करतीन त्यो येणारा काळ ठरवीन. त्यायला शुभेच्छा.
पुण्यातील साहित्यसंलेनामधी साहित्याच्या काय काय चर्चा झडल्या. त्याच्यासाठी ह्यो काथ्याकूट. मुख्यमंत्र्यानं मातर नाराज केलं :(
प्रतिक्रिया
28 Mar 2010 - 7:58 pm | इन्द्र्राज पवार
"बेळगावच्या मराठी माणसावरचा अन्याव सहन केला जाणार नाय !" या बातमीवर बेळगावमधिल तमाम मराठी जनता दरसाल खो-खो हसते आणि आपआपल्या पोटापाण्याच्या कामाला लागते. कानडी पोलिसमामाच्या चेह-यावरील सुरुकुतीदेखील हालत नाही. १९५० पासुनचा हा "नटरंग" तमाशापट चालू आहे. कंटाळा आलाय.
29 Mar 2010 - 9:37 am | उग्रसेन
बेळगावमधिल तमाम मराठी जनता दरसाल खो-खो हसते
खरं बोल्ला भाऊ. शासन आन हे महामंडळ नुसते ठराव घेतेत. त्यायच्या घोषणामधी काय राम राह्यला नाय.चंद्रपूर आन गडचिरोली खेड्यातील लोक बी महाराष्ट्र सरकाराला कंटाळले त्यायला आंध्रपदेश आपला वाट्टो.महाराष्ट्र नाय.
बाबुराव :)
28 Mar 2010 - 10:03 pm | चिरोटा
मराठी साहित्य संमेलनाला बच्चन ह्यांनाही खास आमंत्रण होते का? अरेरे, काय दशा झाली ही सम्मेलनाची? ह्यापेक्षा गदग येथे भरलेले कन्नड साहित्य सम्मेलन चांगले होते.साधे आणि सुंदर्.ना कोणी बॉलिवूडचा झंप्या होता ना राजकारण्यांसाठी कोणी पायघड्या घातल्या.असो.
निष्कर्ष काय निघाला शेवटी?
भेंडी
P = NP
2 Apr 2010 - 10:42 am | स्वतन्त्र
ह्यांना मराठी साहित्यातला कळत काय...मग त्याना पाहुणे म्हणून बोलावण्याचा प्रश्नच उरत नाही...उगाच आपलं वादाला कहर अणि साहित्य संमेलनाची पुब्लिसिटी म्हणून हां सगळा उद्योग !
28 Mar 2010 - 10:36 pm | नावातकायआहे
मराठीतीलच काय पण सर्व भारतीय भाषांतील 'लाचार' पणा, 'बुळचट'पणा, 'हांडगे'पणा साठी असलेली सर्व विशेषणे वापरली तरीही 'व्यक्त' न करता येणारे हे अशोक खान ह्याचे क्रुत्य आहे......
ते लुगड धुत होत काय रे सोनियाच?
अशोक खाव्हान
30 Mar 2010 - 8:45 pm | अकेला
Are tyala kutra mhantala na tari kutryachya pramanikpanabaddal shanka ghetalya sarakh ahe
Bhava tu boltoys na te 10/10 correct ahe
29 Mar 2010 - 12:18 am | उल्हास
१०० % सहमत
ते विचारवंत म्हणणारी मंडळी कुठे लपुन बसलित
बिळाबाहेर पडा म्हणावे
29 Mar 2010 - 9:51 am | उग्रसेन
संमेलनाच्या समारोपाच्या भाषणाला द.भी.कुलकर्णी लय भारी बोलतेन असे वाटले होते. सुरुवातबी त्यायनी जोरदार केल्ती. 'उडाले पाखरु निळ्या आकाशी...ही कविता कोणाची हाय थेट सवाल केला. कोणाला वळखता नै आली कविता.
शरदचंद्र मुक्तीबोधाच्या कविता कोणाला वळखता येणार व्हती. साहित्याच्या आवारात द.भी घुसले. पर यासपीठावर बसलेले अभिताभ बच्चन याचं प्रेशर त्यायच्यावर राहिलं आन ते भरकटले.
'असावे घरटे आपूले छान' अशा संकुचित करणार्या मानसाचं काय खरं नाय म्हणले. जागतिकीकरणाच्या नावानं जनता बोलते. पर त्याचं काय इचार कराचा नाय म्हणले. मराठी माणसानं काय चुकीच्या गोष्टी करत्यात. त्या चुकीच्या गोष्टीला टाळ्या वाजून इसरून जाचं असं चिमटा त्यायनी घेतला.
विचारवंत, प्रज्नावंत, आन सारे म्हणू राह्यले. आता जगाचं काय खरं नाय राह्यले. तपमान वाढू राह्यले. जगसंपून जाईन. असे भेव वाटणारा इचार असतांना समाज कोसळाया लागला. पर सामान्य माणूस नाय कोसळला. ह्या सामान्य माणूस जान हाय म्हणले.
कलेवर प्रेम असणारा माणूस म्हंजी मराठी माणूस. लय जीव लावतो कला.सौंदर्य आन अभिरुचीला. स्टेजवरील बसलेले अभिताभला पाह्यला ऐकायला तुम्ही आला. असे म्हणून त्यायनी भाषणाला जयहिंद जय महाराष्ट्र केला.
केशवसुत,बालकवी,गोविंदाग्रज,मुक्तीबोध,भारातांबे, माधव ज्युलीयन,वसंत बापट यावर अधिकारानं बोलणारा माणूस साहित्यसंमेलनामधी दिसला नाही.एक रसिक म्हणून माही पार निराशा झाली.
बाबुराव :)
29 Mar 2010 - 10:04 am | चिरोटा
ग्रंथ प्रदर्शन वगैरे होते का?
भेंडी
P = NP
31 Mar 2010 - 9:44 am | उग्रसेन
ग्रंथ प्रदर्शन वगैरे होते का?
होते ना दादा.
पाच ते सात कोटीची उलाढाला झाल्याचे पेपरात बातमी हाय.
बाबुराव :)
29 Mar 2010 - 9:54 am | उग्रसेन
जागा बूक करुन ठेतो.
बाबुराव :)
29 Mar 2010 - 9:59 am | प्रमोद देव
राज्य सरकार अनुदान देतं म्हणून ...राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अशोकरावांना बोलावणं एकवेळ समजू शकतो...पण आपण गेली ४१-४२ वर्षे महाराष्ट्रात राहतो आणि जे काही आहोत ते महाराष्ट्रामुळे असे खोट्या विनयाने सांगणार्या बच्चमजीला इतक्या वर्षात मराठी भाषा का शिकाविशी वाटली नाही....
आणि अशा एका माणसाला...असेल तो हिंदी चित्रपट सृष्टीतला नामचीन माणूस...मराठी साहित्य संमेलनाला बोलावतांना आयोजकांना कशी लाज नाही वाटली?
मराठी नाट्यसंमेलन असो,साहित्यसंमेलन असो किंवा अमूक सन्मान तमूक सन्मान महोत्सव असो...अशा मराठी मातीशी नाळ नसलेल्या आणि मराठी भाषेचा गंध नसणार्या किंबहुना वेळोवेळी मराठी भाषेचा आणि लोकांचा अनादर करणार्या हिंदी चित्रपट सृष्टीतील तारे-तारकांना मानसन्मानाने बोलावतांना/गौरवतांना...ह्या आयोजकांना जनाची नाही तरी मनाची लाज कशी नाही वाटत?
कुठेही जा...सगळा लाळघोटेपणा नुसता...आपलं आपण फक्त मिरवून घ्यायचं.
मराठी प्रेक्षक/श्रोते काय...अशा कुण्या पाहुण्यांनी नुसते एखादे वाक्य/शब्द मराठीत उच्चारला...की अगदी गहिवरून येतात. शिवाजी महाराज,काही संत आणि मराठीतील काही गाजलेल्या व्यक्तिमत्वांची नुसती नामवळी तोंडावर फेकली की मग त्या पाहुण्याचा उदो उदो करण्यात सगळ्यांची..अगदी वृत्तपत्रांसकट सगळ्यांची नुसती स्पर्धा लागलेली असते. ह्या आधीचा त्यांचा मराठी भाषा आणि मराठी जनांचा जाणता/अजाणता केलेला अपमान विसरून आपण ह्या सगळ्यांना डोक्यावर बसवतो...आणि मग आहेच आपली ओरड....
महाराष्ट्रात मराठी माणूस मागे का?
तुम्हाला अशा समारंभाला कुणीही तोलामोलाचा मराठी पाहुणा आमंत्रित करता येऊ नये/वाटू नये...ह्यातच सगळं आलं.
29 Mar 2010 - 11:34 am | आवडाबाई
काय समजून त्याला बोलावलं काही समजलंच नाही ( जरी मी बच्चन फॅन असले तरी )
पुन्हा ( प्रथेप्रमाणे) तो मराठी कविता वाचणार असं घोषणा करून मोकळे !
तो मराठीत बोलला सुद्धा नाही
तुम्हाला अशा समारंभाला कुणीही तोलामोलाचा मराठी पाहुणा आमंत्रित करता येऊ नये/वाटू नये
त्याच्या तोलामोलाचा मराठी त सोडा हिंदीत कोणी नाहिये ( त्याच्या क्षेत्रात ).
पण मुळात गर्दी 'गोळा' करायची गरजच नव्हती हो ! ती तशी पण झाली होती
29 Mar 2010 - 11:48 am | पाषाणभेद
देव काकांशी शब्दशः सहमत.
आपले पुचाट, बुळचट राजकारणी. एकाही साहित्तिकाला या बाबत बोलावे वाटू नये म्हणजे त्यांचीही वर्णी आज त्यांच्या रांगेत लावावी का?
साहित्यसंमेलनाने तमाम मराठी माणसांचा अपमानच केला आहे. जाहिर निषेध.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
29 Mar 2010 - 2:13 pm | इन्द्र्राज पवार
".....मराठी भाषेचा आणि लोकांचा अनादर करणार्या हिंदी चित्रपट सृष्टीतील तारे-तारकांना मानसन्मानाने बोलावतांना/गौरवतांना...ह्या आयोजकांना जनाची नाही तरी मनाची लाज कशी नाही वाटत?"
.... हे निरीक्षण अतिशय योग्य आणि वस्तुस्थितीला धरून आहे. मागे एकदा चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी श्रीमती लता मंगेशकर यांचा हैद्राबाद येथे भव्य सत्कार केला होता. त्याचा सविस्तर वृतांत म. टा. व लोकसत्ताच्या अंकात त्यावेळी प्रसिद्ध झाला होता. चंद्राबाबूसह व्यासपीठावरील विविध क्षेत्रातील एकूण १३ महनीय वक्त्यांची भाषणे झाली. तथापि एकही वक्त्याने तेलुगु भाषेशिवाय कोणत्याही अन्य भाषेत लता दिदीचा उल्लेख केला नाही. महाराष्ट्रातू जे पत्रकार व अनिल अरुण यांचा संगीत ताफा तेथे गेला होता त्यांना या भाषणातील केवळ "लता मंगेशकर" हीच वाक्ये समजत होती. प्रत्यक्षात खुद्द लता दीदीनाहि इतक्या लोकांनी काय बोलले हे थोडेसेदेखील समजले नाही. याचाच दुसरा अर्थ असा की तुळू भाषेतदेखील ज्यावेळी संमेलनासारखे कार्यक्रम होत असतात त्यावेळी संयोजक आपल्या भाषेचा प्रत्येक व्यक्ती आब राखते की नाही हे आवर्जून पाहतात. एखाद्या प्रांतिक भाषेची वृद्धी होणार असेल तर ती अशा अभिमानाने होत असते, केवळ "गर्दी" छान पैकी जमणार म्हणून आपले लबाड संयोजक लोक (त्यातही मराठीतील प्रकाशक नावाची बनेल जात....ज्यांना संमेलनातील हालचालीपेक्षा आपल्या STALL वर झालेली गर्दी पाहण्यात ज्यादा उत्साह !!) बिग बी ला छानपैकी लोणी लाऊन बोलावत असतील तर पुढील वर्षी "Katarina Kaif "च्या दारात जायला अजिबात लाजणार नाहीत.....आणि जातीलदेखील !!
29 Mar 2010 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा तर पाहुण्याचा अपमानच झाला की! दिदींना बोलावलं आणि वर त्यांना न समजणार्या भाषेत बोलले हे म्हणजे घरी एखाद्या मधुमेही रुग्णाला पाहूणा म्हणून बोलवायचं आणि वर मिठाई द्यायची असंच झालं. सबब उदाहरण पटलं नाही.
बाकी अमिताभ जिंकला का मुख्यमंत्री हरले वगैरे चालू द्या.
अदिती
29 Mar 2010 - 4:44 pm | इन्द्र्राज पवार
अदितीताई... इथे ना तर दीदींचा अपमान आणी ना तर जमलेल्या रसिकांचा !! आपण आता व्यक्त केलेला प्रश्न त्यावेळी ही म. टा. मध्ये चांगलाच रंगला होता आणि मला वाटते त्याचे उत्तर व खुलासा रविवार पुरवणीचे अतिथी संपादक श्री. हेमंत देसाई यांनी केला होता. ते म्हणतात, "भाषेच्या माध्यमाबाबत तक्रार करायला अजिबात जागा नाही; कारण सत्कारापूर्वी कितीतरी अगोदर 'संपूर्ण कार्यक्रम केवळ तुळू भाषेत होईल' अशी कल्पना दीदी तसेच संबधित मंडळीना दिली होती. याला साक्षीदार स्वतः श्री. अनिल मोहिले ही होते." आता असे जर असेल तर लताताईनी कार्यक्रम का व कसा स्वीकारला हे विचारण्यात आता काही प्रयोजन नाही, नसावे ! प्रश्न भाषेच्या अभिमानाचा आहे. माझा point असा की उद्या "श्री. ए. आर. रेहमान यांना ऑस्करची बाहुली मिळाली" म्हणून आपल्या पुण्यनगरीत जाहीर सत्कार ठेवला तर आपल्यातील कितीजण/जणी संपूर्ण कार्यक्रम केवळ मराठी भाषेतच व्हायला हवा याचा आग्रह धरतील ?
30 Mar 2010 - 3:43 am | उमराणी सरकार
साहीत्य भाषेच्या जोखडात अडकवले तर कोमेजते. बच्चनचे पिताजी एक थोर साहीत्यिक होते. त्यांच्याकडून बच्चनने लेखनाचे नसले तरी अध्ययनाचे गुण जरूर घेतले आहेत. त्यामूळे बच्चनची साहीत्य संमेलनातील उपस्थिती निश्चितच स्पॄहनिय आहे. लुगडं धुणार्या नाठाळापेक्षा साहीत्याची जाण असणारा आणि जगद् विख्यात अभिनेता म्हणून नावाजलेल्या व्यक्तिमत्वाला विरोध कशासाठी?
बरे झाले आज स्वामि विवेकानंद हयात नाहीत. नाहीतर शिकागो मध्ये बंगाली मध्ये भाषण केले नाही म्हणून त्यांच्यावर बहीष्कार टाकला असता या देशात.
मराठीचा अभिमान जरूर असावा पण अतिरेकी आग्रह नको.
मग आता ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर बहीष्कार टाकण्याची हिम्मत अभासाम दाखवणार का?
उमराणी सरकार
2 Apr 2010 - 9:50 am | उग्रसेन
देव काका साहित्य संमेलनाला यापूर्वीबी दुसर्या भाषिक साहित्यातल्या जाणकाराला संमेलनाला बोलावलेली हाये.
अभिताभचं काय चुकले नाय. अभिताभ भाषणामधी काय म्हणला त्यो मुद्दा इचारात घ्याला पाह्यजे. त्याला नै येत मराठी भाषा म्हून काय बिघडत नाय. मराठी भाषा येऊनबी इंग्रजीत हिंदी बोलणार्या लोकाबद्दल काय म्हणता ?
त्यो हिंदीत म्हणला मराठी भाषेने मराठी साहित्यात येनारे अनुभव संपन्नतेने मांडलेले हाय आन ही अभिमानाची गोठ हाये.
राह्यला भाषेचा आग्रह धरण्याचा प्रश्न. प्राथमिक शाळेत इंग्रजी कंपलसरी शिकवल्या जाऊन राह्यली. त्याच्याबरुबर मराठी भाषाबी दहावी लोक कंपलसरी शिकाला पाह्यजेन. तुम्ही लोकं तिकडं लक्ष देत नाय. आन नसत्या इषयावर वाद करत्यात.
बाबुराव :)
29 Mar 2010 - 2:47 pm | नावातकायआहे
>>ज्यांना संमेलनातील हालचालीपेक्षा आपल्या STALL वर झालेली गर्दी पाहण्यात ज्यादा उत्साह !!)
काय कळले नाही :O
च्यामारी...तुम्ही जर प्रकाशक असता तर स्टॉल भाडे भरुन बंद ठेवला असता काय? पाटी लावुन? संमेलन चालु असल्याने बंद.
का स्टॉलवरील गर्दी हाकलत बसल असतात? चला रे गर्दी करु नका शेजारच्या स्टॉलमध्ये जा!
भाउ भंजाळे
29 Mar 2010 - 4:54 pm | इन्द्र्राज पवार
प्रिय भाऊ.... गेली कित्येक वर्षे मी नेमाने मराठी साहित्य संमेलनाला भाषाप्रेमी या नात्याने उपस्थित राहतोय !! एक प्रकाशक दुसऱ्या प्रकाशकावर कशी मात करता येते याबाबत या निमित्ताने लिहिता आले तर तो एक मोठा लेख होईल. मी असे म्हटलेले नाही कि आपले दुकान बंद करून त्यांनी मराठी भाषेच्या प्रगतीविषयी चाललेल्या संवादाला हजेरी लावावी. पण खरी मखलाशी अशी आहे की अन्य कुणाहीपेक्षा या जातीला पाहुणा "बिग" लागतो, कारण त्यांच्या लेखी धंदा ही बाब मराठीहून अधिक मोलाची आहे. शिवाय मी माझ्या नोंदीत "ज्यादा" उत्साह असा उल्लेख केला आहे, तो पुरेसा बोलका आहे. धन्यवाद !
29 Mar 2010 - 6:14 pm | समंजस
मराठी साहित्य संमेलन हे काय असते, कसे असते, कशा करता असते :?
हे मला माहित नाही, दुर्दैवाने आतापर्यंत अशा संमेलनाला हजेरी लावण्याचं भाग्य मला नाही मिळालं :(
मराठी साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा काही फायदा होतो का? बेळगाव प्रश्न सुटु शकतो का? राज्य सरकारच्या २५ लाखाच्या अनुदाना मुळे नेमका काय फायदा होणार? सरकारी अनुदान दिलंय म्हणून राज्यकर्त्यांचा संमेलनात सहभाग आवश्यक आहे का? त्यांच्या सहभागामुळे संमेलनाचा उद्देश पुर्ण व्हायला मदत होते का??
बाबुराव, माफ करा, भरपुर प्रश्न विचारतोय मी तुम्हाला :)
पण काय करणार, उत्सुकता ताणली म्हणून विचारतोय. तुम्ही उत्तरं देउ शकलात (किंवा कोणीही) तर आभारी आहे.....धाग्यावर लक्ष ठेवून आहे...:)
31 Mar 2010 - 9:53 am | उग्रसेन
साहित्य संमेलन ही साहित्यिक आन साहित्य रसिकांची जत्रा असते.
मराठी साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा काही फायदा होतो का?
मराठी भाषेचा कसा फायदा होतो ते एक्झॆक्ट सांगता येनार नाय. पर लोक येतात
परिसंवाद ऐकतात. अभ्यासू लोक बोलतात. कविता म्हणतात. साहित्य आणि भाषेची विचारातून देवाण घेवाण होते.साहित्य आन भाषेची लय मोठी चळवळ नसेल पर वळवळ चालू राहते ही गोष्ट मला मोठी वाटते.
सरकारी अनुदान दिलंय म्हणून राज्यकर्त्यांचा संमेलनात सहभाग आवश्यक आहे का?
तसं नाय पर पैसे देतो तर लाजेकाजे त्यायला बोलवावेच लागते ना. आना महाराष्ट्र सरकारकडे तसेही भाषाचा सांस्कृतिक विभाग हायेच तव्हा त्यायला बोलवालाच पाह्यजे. पर आता राजकारण चालते. त्यामुले मुळ इषय पांगतो.
त्यांच्या सहभागामुळे संमेलनाचा उद्देश पुर्ण व्हायला मदत होते का??
राजकारणी माणूस पाह्यल्यावर कोणत्या माणसा आनंद व्हतो. आन ते काय उद्देश पूर्ण करतीन. जे काय करतीन ते जनरल लोक करतीन हा का नाय.
बाबुराव :)
31 Mar 2010 - 11:22 am | समंजस
धन्यवाद बाबुराव!!
बरीचशी उत्तरे पटली :)