दुधीची थालीपीठं/पराठे

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
26 Mar 2010 - 9:49 pm

दुधीची थालीपिठं, फार फार तर गेलाबाजार पराठे म्हणा..."नावात काय आहे म्हणा...आपला संबंध फक्त खाण्याशी"...हे हे हे...हे माझं स्वगत, जेव्हा मला सांगण्यात येत होतं की "हे दुधीचं थालीपिठ,पराठा नव्हे..." :D

दुधीच्या थालीपिठासाठी घरात असतील तेव्हढी पिठं एक-एक लहान मुठभर घ्यावीत...फक्त गव्हाचं पीठ एक मुठ जास्त घ्यावं...मी गहू, ज्वारी, कळणा, बेसन आणि तांदूळाचं पीठ घेतलं होतं...यात प्रत्येकी १ छोटा चमचा हळद, तिखट, धणे पूड, जीरे पूड, जीरे आणि चिमुट्भर ओवा, साखर, चिरलेली कोथिंबीर,चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल घालून मिक्स करुन घ्यावे..हे फुड-प्रोसेसर मध्येही करु शकता.

एक मध्यम आकाराचा दुधी किसून मस्त पिळून घ्यावा नी उरलेला रस घरातल्या गोंडस व्यक्तिंना द्या...तेव्हढाच उपयोग... :D :))
आता ६-७ लसूण पाकळ्या, १ इंच आलं आणि २ तिखट हिरव्या मिरच्या ठेचून घ्याव्यात आणि वरिल किसलेल्या दुधीत मिक्स करावे...आणि हे मिश्रण पिठांमध्ये टाकून मळून घेणे...
हे पराठे लगेचच बनवावे लागतात नाहीतर कणीक पातळ व्हायला सुरुवात होते...त्यासाठी बाजूला एक वाटी गव्हाचे पीठ ठेवावेच...
मग पोळपाटावर जरा जाड प्लास्टिकचा तुकडा टाकून त्यावर पीठ लावून पोळी लाटावी आणि तेल सोडून खरपूस भाजून घ्यावी...लोणी वापरले तरी चालेल...
वरिल साहीत्यात ८-९ थालीपिठं होतात....
मस्त लोणच्यासोबत, कढीसोबत किंवा आंबट-गोड रायत्यासोबत वाढावी...ही थालीपिठं ३-४ दिवस सहज टिकतात त्यामुळे आम्ही नेहमी भारतवारीसाठी किंवा कुठल्याही वारीसाठी सोबत नेतो... :)

प्रतिक्रिया

प्रभो's picture

26 Mar 2010 - 9:59 pm | प्रभो

हॅहॅहॅ..फोटो आणी पाकृ जबरदस्त असली तरी दुधीचा एकच प्रकार आवडतो आपल्याला....हलवा...बाकी सगळ्या पाकृ फाट्यावर... :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

चतुरंग's picture

26 Mar 2010 - 10:10 pm | चतुरंग

चार आण्यात 'दुधी हलवा'वाला हलवा नव्हे ना रे? ;)

(गाजर का हलुआ आवडनेवाला)चतुरंग

प्रभो's picture

26 Mar 2010 - 10:15 pm | प्रभो

परवाच बनवला होता..साला पाकृच टाकतो आता....

(दुधी हलवा बनवून खाणारा)प्रभो

चतुरंग's picture

26 Mar 2010 - 10:19 pm | चतुरंग

मला माहितीये तू चांगला सुगरण्या आहेस!!
लवकर टाक पाकृ!

(गोडघाशा)चतुरंग

चतुरंग's picture

26 Mar 2010 - 10:13 pm | चतुरंग

सध्या प्रयोगशाळा उघडलेली दिसते! :D
मस्त पाकृ आणि टेंप्टिंग फोटूज!

चतुरंग

पिंगू's picture

26 Mar 2010 - 10:13 pm | पिंगू

चला आता मातोश्रींना सांगायला मोकळे की करा म्हणून........

रेवती's picture

26 Mar 2010 - 10:24 pm | रेवती

भारीच दिसताहेत गं!
तू सध्या भारतात आहेस वाट्टं?
(खुद के सथ बातां: विचारलस? केलास आगावूपणा?)

रेवती

दिपाली पाटिल's picture

26 Mar 2010 - 10:30 pm | दिपाली पाटिल

हो..मी भारतात आहे...अगावूपणा कसला त्यात... :)

दिपाली :)

रेवती's picture

26 Mar 2010 - 10:34 pm | रेवती

तुझा नव्हे, माझा!;)
रेवती

दिपाली पाटिल's picture

26 Mar 2010 - 10:37 pm | दिपाली पाटिल

हॅ हॅ...

दिपाली :)

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 10:48 pm | विसोबा खेचर

सु
रे
ख..!

शुचि's picture

26 Mar 2010 - 11:43 pm | शुचि

फटाक छायचित्रं. बघूनच खल्लास.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

अरुंधती's picture

26 Mar 2010 - 11:53 pm | अरुंधती

येकदम आवडलं.... मी दुधीच्या वाट्याला फारशी जात नाही. पण ते मस्त मस्त फोटोज पाहिले आणि तोंडाला पाणी सुटले! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चित्रा's picture

27 Mar 2010 - 4:48 am | चित्रा

नेहमीप्रमाणेच छान एकदम.

मिसल चाह्ति's picture

28 Mar 2010 - 11:38 pm | मिसल चाह्ति

मस्त रेसिपी.

.....प ण मला जरा खाकरा कसा करायचा ते कोणी सान्गेलका?...

दिपाली पाटिल's picture

1 Apr 2010 - 5:17 pm | दिपाली पाटिल

प्रदीपा...खाकरा करायला...कणकेत किंवा मिक्स पिठे घ्यावीत त्यात तेल मीठ, तिखट, तीळ आणि बरंचसं तेल घालून अगदी घट्ट मळून घ्यावे मग अगदी पातळ पोळी लाटून तेल सोडत सोडत कापडाने दाबून दाबून शेकावी...आजकाल खाकर्‍यात बरेच प्रकार दिसतात..मेथी, मसाला, चाट मसाला...

दिपाली :)

प्रदीपा's picture

6 Apr 2010 - 12:13 pm | प्रदीपा

दिपाली ताई, धन्यवाद,
मी खाकरा करुन बघीतला, पण फक्त कणिक घट्ट भिजवुन घेतली आणि पोळी लाटुन तव्यावर शेकवताना अमुल बटर लावुन चान्गली कुरकुरीत शेकवली. हा खाकरा घरातील सगळ्यान्नी आवडीने खाल्ला. तुला पुन्हा एकदा धन्यवाद.