मदत हवी - क्रॅश्ड हार्ड डिस्क

अश्विनीका's picture
अश्विनीका in काथ्याकूट
25 Mar 2010 - 11:57 pm
गाभा: 

नमस्कार... मिपाकरांची मदत हवी आहे.
एका मैत्रिणीच्या संगणकाची हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे. त्यावर खूप महत्वाचा डेटा होता.
शिवाय मुलांचे पहिल्या दिवसापासून ते शाळेचा पहिला दिवस असे विडिओज व फोटोज , त्यांच्या आवाजातील गाणी , अनेक दुर्मिळ फोटोज असं बरच काय काय होतं .
आणि बॅक अप अजिबात घेतलेला नव्ह्ता.
हा सर्व डेटा परत मिळवता (रिकव्हर करता ) येईल का? आणि शक्य असेल तर ते कसे करता येईल ?
प्लीज , कोणाला काही माहिती असल्यास सांगा.
धन्यवाद.
- अश्विनी

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

26 Mar 2010 - 12:57 am | चतुरंग

http://www.stellarinfo.com/
हा दुवा बघा, अनेक देशात यांची सर्विस आहे, भारतात सुद्धा आहे.
बहुतेक उपयोगी पडेल.

चतुरंग

रामपुरी's picture

26 Mar 2010 - 1:21 am | रामपुरी

नक्की काय झालंय माहीत आहे का?
Virus असेल तर एखाद्या चांगल्या AntiVirus ची मदत घ्या. हार्ड डिस्क पूर्णपणे बंद असेल तर नक्की काय झालंय याचा शोध घ्यावा लागेल.
बूट सेक्टर, पार्टीशनींग, असेंब्ली प्रोग्रामींग, इ. गोष्टी माहीत असतील तर घरच्याघरीही करता येईल अन्यथा व्यावसायिक मदत घेतलेली बरी.

विकास's picture

26 Mar 2010 - 2:07 am | विकास

एका मैत्रिणीच्या संगणकाची हार्ड डिस्क क्रॅश्ड झाली आहे.

कशावरून हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे असे वाटते? म्हणजे जर संगणक चालू करायला बटण दाबले तर काय होते?

त्या उत्तरावर आधारीत उपाय ठरू शकतात. म्हणजे व्हायरस असेल तर एक, पॉवर मिळत नसल्यास अथवा मदर बोर्ड गेला असल्यास अजून काही...

चतुरंग आणि रामपुरींनी वर सांगितले आहेच. त्यात थोडी अधिक स्वानुभवाधारीत भरः

जर संगणक चालू होऊ शकत असेल आणि जर अँटीव्हायरसची तबकडी असेल तर ती घालून संगणक चालू करता येतो का ते पहा. तो c:\ वर चालू करून बघा. मग सगळा विदा / डायरेक्टरी दिसते का ते पहा. तसे होत असेल तर मग अँटीव्हायरस वापरून पहा.

नाहीतर त्याला अथवा पॉवरसप्लायच मिळत नसेल आणि हे स्वतःलाच करावे लागत असेल तर हार्डडिस्क एन्क्लोजर विकत घ्या. तुमच्या संगणकाच्या पद्धतीवर ते बदलू शकते अथवा विविध पद्धतींना चालणारे एन्च्लोजरपण मिळते. येथे (तुम्ही कुठे राहता अथवा संगण कुठे राहतो ते माहीत नाही पण) अमेरिकेत साधारण $३५/४० मधे चांगले एन्क्लोजर हे स्टेपल्स, रेडीओशॅ़क मधे मिळू शकते. हा न्यू एगचा माहीतीखातर दुवा. ते आणा. संगणक उघडून अलगद पणे (स्वतःचा दुसरा हात अथवा एक पाय अर्दींगसाठी मेटल वर ठेवून) त्यातील हार्डडिस्क काढा. ती या एन्क्लोजर मधे घाला. त्याला पॉवरची आणि युएसबीची केबल असते. पॉवर चालू करा, युएसबी दुसर्‍या संगणकाला लावा. तुम्हाला तात्काळ या संगणकावर बाह्य हार्डड्राईव्ह दिसेल! सग़ळे व्यवस्थित कॉपी करून ठेवा आणि मग ही हार्डड्राईव्ह, बाह्य हार्ड ड्राईव्ह म्हणून वापरा!

आमचा संगणक बंद पडल्यावर नक्की काय करायचे याचे तंत्रज्ञाला बोलवण्यापासून स्वतः कर असे सर्व उपाय सुचवण्यात आले. त्यावर विचार करायला मी अजून सहा महीने घेतले... मग एक दिवस जाऊन सरळ एन्क्लोजर आणले. दुसर्‍या दिवशी (काहीच माहीती नसल्याने) धाकधूक करत संगणक उघडला आणि अक्षरशः १५-२० मिनीटांत सर्व काम पूर्ण झाले. :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

वाचक's picture

26 Mar 2010 - 6:02 am | वाचक

वरती म्हंटल्याप्रमाणे संगणकाशी संबंधित (हार्ड डिस्क शी नव्हे) उपाय करुन बघा. चालू झाले तर उत्तमच.

त्या यादीत अजून एक भर घालू शकतो ती म्हणजे 'उबंटू लिनक्स' उतरवून घेउन त्या सीडीवरुन चालू करुन बघा, विंडोज ची अडचण असेल तर ह्याने फायदा होउ शकेल.

बाह्य एन्क्लोजर मधे टाकून पहाणे हाही उत्तम उपाय.
त्यानंतर 'data recovery' टूल्स वापरणे योग्य ठरेल. ती इथे मिळू शकतील.
http://www.softpedia.com - search for 'data recovery' etc.

आणि तुमच्याकडे दुसरा संगणक असेल तर तुम्हाला हा खालचा प्रोगॅम नक्की उपयोगी पडेल. मी स्वत: वापरलाय आणि जवळजवळ २०जीबीचा विदा पुन्हा मिळवलाय.
वापरात असलेल्या संगणकावर EASEUS Partition Master 5.0.1 Home edition हा फुकट असलेला प्रोग्रॅम उतरवून घ्या. त्यानंतर त्या संगणकाला आपली बिघडलेली हार्डडिस्क जोडा आणि ह्या प्रोग्रॅममार्फत आपला बहुतांशी विदा मिळवा.हा प्रोग्रॅम कसा वापरायचा त्याबद्दलची पूर्ण माहिती त्यात दिलेली आहे.
अपघाताने अथवा जाणीवपूर्वक फॉरमॅट केलेल्या डिस्कवरून पुसलेला विदाही ह्याच्यामार्फत आपण मिळवू शकता.
विंडो जरी हार्डडिस्कला ओळखत नसली तरी हरकत नाही..EASEUS त्याचीही काळजी घेते.

पाहा,इथे बर्‍याच जणांनी बरेच उपाय सांगितलेले आहेत. आपल्याला जे जमतील ते करावेत. आपल्याला आपला विदा पुन्हा मिळो ही सदिच्छा!
तथास्तु!
आजच्या तरूणांच्या भाषेत सांगायचे तर संगणकासंदर्भात भरपूर किडे केलेला..

प्रमोदकाका उर्फ दूर्वास.

निखिलचं शाईपेन's picture

26 Mar 2010 - 9:40 am | निखिलचं शाईपेन

हार्ड डिस्क डिटेक्ट विंडोज मध्ये होत असेल तर वरीलपैकी आणि आणखी बरेच प्रोग्राम्स वापरता येतील. पण जर ती विंडोज मध्ये डिटेक्ट होत नसेल तर मात्र रिकवर ईट ऑल वापरा.
पहिल्या केस मध्ये मात्र कुठलेही सॉफ्टवेअर वापरण्याआधी आणि रिकव्हरी पूर्ण होईतो त्या ड्राईव वर काहीही राईट करू नका आणि जर सहज जमत नसेल तर नेट वरून व्यावसाईक माहिती रीकव्हर करणारे शोधून त्यांच्याकडून करवून घावे. जर त्या डिस्क वर काही लिहिलेले नसेल तर यूजवली डेटा रीकव्हर करता येतो.

-निखिल.

समंजस's picture

26 Mar 2010 - 11:22 am | समंजस

डेटा खुप महत्त्वाचा असेल तर आणि तुमच्या मैत्रीणीचं संगणका बद्दलचं ज्ञान हे फक्त संगणक वापरण्यापुरतंच मर्यादीत असेल तर, कृपया काहीही प्रयोग(R&D) करून बघू नये. कारण बरेचदा अश्या (अयशस्वी)प्रयत्नांमुळे डेटा परत मिळवण्याची जी काही शक्यता असते ती सुद्धा संपुष्टात येते.
तसेच दुसरी आणखी घ्यायची काळजी म्हणजे, या हार्डडिस्क वर काहीही लिहू नये(कुठल्याही फाईल्स कॉपी करणे, कुठलाही प्रोग्राम टाकणे असे काहीही करू नये)
डेटा परत मिळवण्या करीता बरेच उपाय आहेत, पण त्याकरीता तुम्हाला आणखी एक संगणक लागेल तसेच वरील काही प्रतिसादात दिल्या प्रमाणे डेटा रिकव्हरीची काही सॉफ्टवेअर हवीत आणि संगणका बद्दलचं हार्डवेअरचं ज्ञान हवं. हे सगळं शक्य असल्यास स्वतः प्रयत्न करून बघावे. हे शक्य नसल्यास तज्ञांकडून(हार्डवेअर ईंजीनियर) मदत घ्यावी.
कितीही खराब झालेल्या हार्डडिस्क मधून डेटा परत मिळवता येतो फक्त अट हि की, हार्डडिस्कचे तुकडे झालेले नसावेत :)
(मुंबईत मदत हवी असल्यास, मी तुम्हाला हमखास डेटा रिकव्हरी करून देणार्‍या कंपनीचा दुरध्वनी क्रमांक देउ शकतो)

अश्विनीका's picture

26 Mar 2010 - 12:48 pm | अश्विनीका

चतुरंग , रामपुरी , विकास, वाचक , देव साहेब , निखील , समंजस - सर्वांनी छान माहिती दिलीय. सर्वांना धन्यवाद.
संगणकाच्या तांत्रिक बाबी बद्द्ल फारशी माहिती नाहिये. त्यामुळे तिला ही नक्की माहित नाही संगणक कशामुळे बंद पडला आहे.
एक प्रिंट आऊट काढत असताना प्रिंट कमांड देऊनही प्रिंट आउट निघाला नाही. मग तो जॉब कॅन्सल केला परत प्रिंट कमांड दिली. असे २-३ दा झाले. शेवटी परत जेव्हा प्रिंट कमांड दिली तेव्हा स्क्रीन वरचे चित्र (डिस्प्ले) तिरपे झाले आणी हलू लागले. आणि स्क्रीन बराचसा पांढरा झाला. पुढे काहीच होइना म्हणून तिने संगणक बंद केला. तो बंद झाला तो झालाच . परत चालू व्हायचे नाव घेईना. ( संगणका वर डेटा ठासून भरलेला होता. आणि अधुन मधुन २-३ प्रोग्रॅम्स ओपन असताना लो व्हरचुअल मेमरी असा मेसेज पॉप व्हायचा. शिवाय संगणक चालू करताना काही वेळेस सिपियु चे बटन दाबले तरी तो चालू व्हायचा नाही. मग ऑफ करून परत एकदा ऑन केले की मग व्यवस्थित चालू व्हायचा. पण असे १० तून २-३ दा होत असेल. )

वर सांगितलेल्या माहितीचा / सल्ल्याचा उपयोग होईलच. आणि डेटा रिकव्हर करता येतोय हे ऐकून दिलासा ही मिळेल. बघू या. संगणक चालू झाला तर इथेच कळवीन्..काय प्रॉब्लेम होता आणि कसा तो सॉल्व्ह झाला ते.
धन्यवाद.
- अश्विनी

प्रमोद देव's picture

26 Mar 2010 - 12:53 pm | प्रमोद देव

मालाडच्या आसपास कुठे राहात असाल तर सांगा..मी करू शकेन मदत..विनामुल्य.

Pankaj९४३२'s picture

26 Mar 2010 - 1:44 pm | Pankaj९४३२

वाशि प्लाझा मधे ८० गि बा करिता २५०० रुपये घेतात्...खुप महाग आहे....

इंटरनेटस्नेही's picture

26 Mar 2010 - 5:44 pm | इंटरनेटस्नेही

समंजस यांच्याशी १००.००% सहमत.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Mar 2010 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ..

ह्या सगळ्याची काही गरज नाही. खालील उपाय करा :-

१) संगणक चालु करा
२) संगणक चालु झाल्या झाल्या F8 हे बटन दाबत रहा, आलेल्या ऑप्शन्स मधुन 'सेफ मोड' सिलेल्क्ट करा.
३) संगणक सेफ मोड मध्ये चालु झाल्यावर Start = Run मध्ये जा.
४) 'रन' च्या बॉक्स मध्ये 'MSCONFIG' टाईप करा. आता तुमच्या समोर एक बॉक्स ओपन होईल. त्या बॉक्समधे (अथवा टूल्स च्या टॅब मध्ये जाउन) 'System Restore' सिलेल्क्ट करा.

आता कुठल्याही जुन्या तारखेला (सिस्टिम चेक पॉइंट) सिस्टीम रिस्टोर करा.

सिस्टिम रिस्टोर होउन संगणक आपला आपला रिस्टार्ट होईल तोवर वाट बघा. संगणक पुन्हा एकदा आहे त्या डेटा सकट व्यवस्थीत काम करु लागेल.

अधिक माहिती हवी असल्यास हा दुवा वाचावा.

(छायाचित्रे आंतरजालावरुन साभार)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सुहास's picture

27 Mar 2010 - 1:24 am | सुहास

+१

कोणताही खर्चिक पर्याय वापरण्याआधीचा सर्वात योग्य पर्याय..!

--सुहास

अश्विनीका's picture

27 Mar 2010 - 1:14 pm | अश्विनीका

धन्यवाद प.रा.
आपण सांगितलेला उपाय करून बघायला सांगेन. त्या उपायाने संगणक चालू झाला की आपल्याला कळवीनच.
- अश्विनी