इव्हा ब्राऊ हिटलर ची केवळ रखेल होती. तिची आणि हिटलर ची भेट हेनरिच होपमन घरी १९३० च्या सुमारास झाली होती हेनरिच होपमन हां हिटलर चा छायाचित्रकार होता. इव्हा ब्राऊ चा हिटलरशी झालेला परिचय हे गेली राउबल आत्महत्येचे एक कारण असावे. इव्हा ब्राऊ ही साधी,बेताची आकर्षक मुलगी होती. हिटलर आपल्याला सोडून देईल की काय अशी तिला नेहमी भीती वाटत असे. हिटलर ने तिला धूम्रपान करण्यास आणि नृत्य करण्यास बंदी केली होती. हिटलर जरी तिच्याकडे दिवसेंदिवस अक्षम्य दुर्लक्ष करीत असे, तरी तो तिच्याबाबतीत मत्सरी होता.तिची कुत्रा पाळण्याची साधी इच्छा ही त्याने मानली नाही. तिची दैनंदिनी सापडली आहे. व त्यातून तिच्या अस्वस्थ मन:स्थितीचे दर्शन घडते.
१९३५ मध्ये हिटलर तिच्याशी तीन महिन्यांपर्यंत काहीही बोलला नाही. तेव्हा तिने झोपेच्या पस्तीस गोळ्या एकदम घेतल्या. यापूर्वीही तिने नोव्हेंबर १९३२ मध्ये मानेवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचे हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाले. १९३६ मध्ये हिटलरची सावत्र बहीण फ्राऊ राउबल बर्घहोप सोडून गेली, तेव्हा तिची जागा इव्हा ब्राऊ ने घेतली. इव्हा ब्राऊ ला अज्ञातवासातच राहावे लागले. तिला घराचा मागचा जिना वापरावा लागे. तिला बर्लिनला यायला हिटलर ने अनेकदा परवानगी नाकारली. भेटायला पाहुणे आल्याबरोबर तो तिला आतल्या खोलीत पिटाळून लावी. पण लवकरच ती हिटलरच्या अगदी आतल्या वर्तुळातील गणली जाऊ लागली. तिच्या उपस्थितीतच हिटलर एकदा म्हणाला होता,"अतिशय हुशार माणसाने साधीभोळी आणि मूर्ख स्त्री पत्करली पाहिजे! माझ्या कामात ढवळाढवळ करणारी स्त्री मी जवळ केली असती तर माझे काय झाले असते विचार करा!".
संदर्भ :- हिटलर(चरित्र).
लेखक:- अ.ह.भावे.
प्रतिक्रिया
23 Mar 2010 - 3:11 pm | ज्ञानेश...
यात नवे काय? आणि हे सर्व आता मांडण्याचे प्रयोजन काय? :B
23 Mar 2010 - 4:04 pm | टुकुल
तुमच नाव आणी हा लेख वाचुन शंका येत आहे कि, बायकोवरचा राग इथे काढला आहात कि काय?
--टुकुल
23 Mar 2010 - 4:15 pm | बिपिन कार्यकर्ते
ब्राउ नाही हो... ब्राउन. मुदलातच घोळ झाला .... :)
बिपिन कार्यकर्ते
23 Mar 2010 - 9:21 pm | राजेश घासकडवी
मला वाटतं फ्राउन चं जर्मनमध्ये फ्राउ होतं तसं ब्राउनचं ब्राउ झालं असावं....:-)
राजेश
25 Mar 2010 - 3:43 pm | स्वाती दिनेश
फ्राउन असा शब्द तर जर्मन मध्ये ऐकला नाही..
फ्रोलाइन आणि फ्राऊ असे २ शब्द अनुक्रमे कुमारी आणि श्रीमती या अर्थी वापरले जातात.
इंग्लीश ब्राउन सारखाच ब्राउन त्याच अर्थी ( ब्राउन रंग, ब्राउन आडनाव)जर्मनमध्ये वापरतात. फक्त स्पेलिंग वेगळे..
इव्हा ब्राउनच आहे ती, ब्राउ नव्हे.
बाकी-- संदर्भ,आगापिछा नसलेल्या धाग्याबद्दल नो कमेंट्स..
स्वाती
28 Mar 2010 - 12:32 am | राजेश घासकडवी
फारच मनाला 'लाउन' घेतलीत....;-)
मी तिरकस विनोद करत होतो...'जाउन' देत...
29 Mar 2010 - 10:34 am | विशाल कुलकर्णी
फ्रोलाइन ?>>>>
ते फ्राऊलीन हवेय का?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Mar 2010 - 5:17 pm | वाहीदा
हिटलर वैयक्तिक आयुष्यात काय करत होता याच्याशी आपल्याला काय घेण ?? उगाच ताप ??
~ वाहीदा
23 Mar 2010 - 7:35 pm | परिकथेतील राजकुमार
बर मग ??
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Mar 2010 - 9:00 pm | डॉ.प्रसाद दाढे
एकदम संदर्भ नसलेले व आगापिछा नसलेले असे लेखन गुपचुपांनी का बरे केले असावे? इव्हाचे आकर्षण हिटलरला होते ना, बास झालं की राव ! आपण कशाला भावेंच्या पुस्तकाची जाहिरात करताय?
इव्हाचे स्विमिंगसूट मधले कलर व्हिडिओसुद्धा आता उपलब्ध आहेत, त्यावरून भाव्यांच्या डोक्यात जाण्याइतकी ती काही वाईट दिसत नाही
डॉ. अॅडॉल्फ दिढलर
23 Mar 2010 - 9:45 pm | घाशीराम कोतवाल १.२
तात्या दुसर्याच्या खवत लिहायचा अधिकार मला नाही
23 Mar 2010 - 9:50 pm | टारझन
मी हिटलर ला कधीही माफ करणार नाही !! निदान कुत्रा तरी ?
- डॉल्फिन बटलर
25 Mar 2010 - 7:52 pm | टिउ
मी पण...तिच्याकडे दिवसेंदिवस अक्षम्य दुर्लक्ष करायचंच होतं तर तिला साधा कुत्रा तरी पाळु द्यायचा. बिचारी!
- डॉगोबा बार्कर
25 Mar 2010 - 6:24 am | शुचि
मला इव्हा नाव फार आवडलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
25 Mar 2010 - 11:29 am | विसोबा खेचर
माझंही हे आवडतं नांव आहे..
बाकी, गुपचुपरावांचा छोटेखानी माहितीपर लेख छान वाटला..:)
तात्या.
25 Mar 2010 - 10:06 am | वेताळ
त्यामुळे जर्मनी कधी आपल्याला आपला देश वाटला नाही. त्यामुळे त्याबद्दल आपण काही लिहणार नाही.
वेताळ
25 Mar 2010 - 10:32 am | चिरोटा
खालील छायाचित्रात दोन कुत्रे दिसतात ते कोणाचे? एक जर्मन शेफर्ड हिटलर ह्याचा आणि दुसरा ईवा हिचा.
ईवा ब्राउची माहिती विकिपिडियावर वाचली.
Braun was very fond of her two Scottish Terrier dogs named Negus and Stasi (this dog is labeled "Katuschka" in Eva Braun's photo albums[24]) and they feature in her home movies. She usually kept them away from Hitler's German Shepherd "Blondi".[25]
भेंडी
P = NP
25 Mar 2010 - 8:03 pm | पाषाणभेद
ईवा ब्राउन ला एक नाय तर दोन दोन कुत्रे आवडत असल्यावर हिटलर तिच्यावर नाराज नाय होणार तर काय होणार? दोन दोन म्हणजे पंचाईतच की!
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
25 Mar 2010 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
इव्हा ब्राऊ ही हिटलरची प्रेयसी होती का रखेली होती? चर्चाप्रस्तावकाने सुरूवातीपासूनच घोळ घातलेला दिसत आहे.
तसेच माननीय सदस्य परिकथेतील राजकुमार आणि डॉ. अॅडॉल्फ दिढलर यांना अनुमोदन.
अदिती
25 Mar 2010 - 4:37 pm | प्रियाली
हिटलर आपला बाब्या असेल तर प्रेयसी पण हिटलर दुसर्यांचा कार्टा असेल तर रखेल. कसें? ;)
25 Mar 2010 - 4:47 pm | बिपिन कार्यकर्ते
हिहॉहॉहॉ!!! क्या टायमिंग मारेला हय... कॉमेंट आवडली... :)
बिपिन कार्यकर्ते
25 Mar 2010 - 6:08 pm | वाहीदा
गुड गुड गुडाड :-)
~ वाहीदा
27 Mar 2010 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार
हिटलर आपला बाब्या असेल तर प्रेयसी पण हिटलर दुसर्यांचा कार्टा असेल तर रखेल. कसें?
=)) =)) =))
एक नंबर प्रियालीतै.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
25 Mar 2010 - 2:57 pm | मिली
बिचारा हिटलर .. आमच्या लाडक्या चाचा (!) नेहरू नन्तर बहुतेक हिटलर चा नम्बर आहे ... who's next???
27 Mar 2010 - 6:36 pm | इन्द्र्राज पवार
या बाब्यावरून आणखीन एक उदाहरण आठवले ते म्हणजे अमेरिकेचे प्रेसीडेंट जॉन केनेडी यांचे -- जॉन सा-या भारतीयांना प्यारे म्हणून मेरिलिन मन्रो ही त्यांची प्रेयसी - तथापि बिल क्लिंटन यांच्याविषयी प्रेम नव्हते म्हणून त्यांची मोनिका लेविन्स्की ही रखेल -- असा हा सारा मामला ! हिटलर पहिलवान पडला म्हणून त्याच्याविषयीच्या सा-या बातम्यांचा "रंग माझा वेगळा".