गाभा:
सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
दोन अगदी सारखे दरवाजे ...
एक स्वर्गाचे प्रवेशद्वार आणि एक नरकाचे...
पण कोणते कशाचे द्वार आहे हे कुठेच लिहिलेले नाही.
प्रत्येक दरवाज्याजवळ अगदी सारखे दिसणारे पहारेकरी...
दोन्ही पहारेकऱ्यांना माहिती आहे कोणते दार कशाचे आहे ते!
पण, त्यातला एक पहारेकरी फक्त नेहमी खरेच बोलतो आणि एक नेहमी फक्त खोटे!
पण नेमका कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, हे माहीत नाही.
एक मनुष्य त्या दोन्ही दरवाज्यांजवळ आला.
त्याने कोणत्यातरी एकाच पहारेकऱ्याला फक्त असा एकच प्रश्न विचारायला हवा की त्या प्रश्नाच्या येणाऱ्या उत्तरातून त्याला कळले पाहिजे की स्वर्गाचे दार कोणते आहे?
बघा...
विचार करा.
आणि कोड्याचे उत्तर सांगा.
म्हणजेच, तो प्रश्न सांगा जो त्या माणसाने विचारला पाहिजे!
प्रतिक्रिया
24 Mar 2010 - 5:02 pm | मेघवेडा
पण नेमका कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, हे माहित नाही.
हे जरा वेगळं वाटतंय.. मला ठाऊक होतं त्यात असं होतं की स्वर्गाचा पहारेकरी नेहमी खरं बोलतो आणि नर्काचा पहारेकरी नेहमी खोटं बोलतो.. थांबा विचार करून सांगतो!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
24 Mar 2010 - 5:34 pm | चिरोटा
समजा अ आणि ब असे दोन पहारेकरी आहेत.
त्याने एका पहारेकर्याकडे(अ) जायचे आणि विचारायचे-
मी जर ब ला विचारले की तो स्वर्गासमोरच्या दरवाजासमोर उभा आहे की नाही तर तो त्याचे उत्तर काय देईल?
जर अ ने उत्तर नाही असे दिले तर अ स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा आहे.
जर उत्तर हो असे आले तर ब हा पहारेकरी स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा आहे.
भेंडी
P = NP
24 Mar 2010 - 6:05 pm | शानबा५१२
पण कळणार कस तो खर की खोट बोलतोय ते??????
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
24 Mar 2010 - 6:25 pm | मेघवेडा
त्याच्यासाठी डोकं पाहिजे!! नुसतं नावाचा 'शाना' असून भागत नाही!!! हॅहॅहॅ!!
=)) =)) =))
=)) =)) =))
अरे येड्या कोण खोटं बोल्तो कोण खरं बोल्तो कळायची गरजच नाही.. बघ कर विचार जम्तो तर!! :D हॅहॅहॅ!!
-- (एक केले से भी थकेला) अतिशानबा१०२४
24 Mar 2010 - 6:25 pm | चिरोटा
त्याला फक्त स्वर्गात जायचे आहे. खरे/खोटे बोलणारा कोण हे माहित करुन घ्यायची गरज नाही.
(सध्या पृथ्वीवरच)भेंडी
P = NP
25 Mar 2010 - 11:49 am | कवटी
प्रश्न : (कुठल्याही पहारेकर्याला विचारा.)"तो दारामागे लपून हळूच बघतोय तो यम आहे का?"
खरे खोटे बोलायची गरजच नाही.... कुठलाही द्वारपाल लगेच नरकाच्या दाराकडे बघेल कोण वाकून बघतय ते......
कवटी
25 Mar 2010 - 12:31 pm | राजेश घासकडवी
'मी जर दुसऱ्या पहारेकऱ्याला विचारलं की नरकाचं दार कुठचं आहे, तर तो काय उत्तर देईल?' पहारेकरी ज्या दाराकडे बोट दाखवेल ते स्वर्गाचं दार.
25 Mar 2010 - 1:05 pm | कवटी
पहारेकर्याकडून व्हरबली उत्तर हवे असेल तर घासकडवींचा प्रश्न बरोबर आहे.
कवटी
25 Mar 2010 - 1:05 pm | कवटी
पहारेकर्याकडून व्हरबली उत्तर हवे असेल तर घासकडवींचा प्रश्न बरोबर आहे.
कवटी
25 Mar 2010 - 2:09 pm | नि३
घासकडवी आपला प्रश्न बरोबर आहे पण ऊत्तर चुकिच आहे.
>>'मी जर दुसऱ्या पहारेकऱ्याला विचारलं की नरकाचं दार कुठचं आहे, तर तो काय उत्तर देईल?' पहारेकरी ज्या दाराकडे बोट दाखवेल ते स्वर्गाचं दार.>>
पहारेकरी ज्या दाराकडे बोट दाखवेल ते नरकाच द्वार आणी ज्या द्वारा कडे पहारी बोट नाही दाखवेल ते स्वर्गाचं दार
---नि३.
25 Mar 2010 - 2:44 pm | कानडाऊ योगेशु
शक्यता १)
समजा "अ" खरे बोलतो व तो नरकाच्या द्वारावर उभा आहे.
घासकडवी जेव्हा त्याला प्रश्न विचारतील...
'मी जर दुसऱ्या पहारेकऱ्याला विचारलं की नरकाचं दार कुठचं आहे, तर तो काय उत्तर देईल?'
दुसरा पहारेकरी "ब".तो खोटे बोलतो.तो स्वर्गाच्या द्वारावर उभा आहे.
त्यामुळे तो नरकाचे दार म्हणुन स्वर्गाचेच दार दाखवेल.
व "अ" देखील त्याच दाराकडे बोट दाखवेल.
शक्यता २)समजा "अ" खोटे बोलतो व तो नरकाच्या द्वारावर उभा आहे.
घासकडवी जेव्हा त्याला प्रश्न विचारतील...
'मी जर दुसऱ्या पहारेकऱ्याला विचारलं की नरकाचं दार कुठचं आहे, तर तो काय उत्तर देईल?'
दुसरा पहारेकरी "ब".तो खरे बोलतो.तो स्वर्गाच्या द्वारावर उभा आहे.
त्यामुळे "ब" नरकाचे दार म्हणुन नरकाचेच दार दाखवेल.
पण "अ" खोटे बोलत असल्याने "ब" ने दाखविलेले दार म्हणुन दुसर्या दाराकडे म्हणजे स्वर्गाच्या दाराकडे बोट दाखवेल.
ह्यापध्दतीने बाकीच्याही शक्यता पडताळुन पाहता येतील.
(स्वर्गवासी) योगेशु.
टार्झनं प्रथमं वंदे खेचरं तदनंतरं | लत्ता प्रहारं पूर्वे मुष्टीप्रहारमं यथा||
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
25 Mar 2010 - 6:37 pm | मी-सौरभ
~X(
लोकाणा काय बी द्या खाजवत बसतात...
-----
सौरभ :)
25 Mar 2010 - 7:36 pm | निमिष सोनार
राजेश घासकडवी यांचे उत्तर अत्यंत अचूक आहे
'मी जर दुसऱ्या पहारेकऱ्याला विचारलं की नरकाचं दार कुठचं आहे, तर तो काय उत्तर देईल?' पहारेकरी ज्या दाराकडे बोट दाखवेल ते स्वर्गाचं दार.
अभिनंदन!!!
इतरांना समजले ना?
कसे ते?
----
माझ्या कार्टून्स च्या ब्लॉग ला जरूर भेट द्या:
http://cartoonimish.blogspot.com
इतर ब्लॉग्ज-
http://nimish-marathi.blogspot.com
http://nimish-english.blogspot.com
26 Mar 2010 - 2:24 pm | राजेश घासकडवी
भेन्डी बाजार नी देखील तेच उत्तर दिलेलं आहे असं माझ्या आत्ता लक्षात आलं. (ब काय म्हणेल हे अ ला विचारायचं. त्यात खरं व खोट्याचा गुणाकार होतो व नेहेमीच खोटं उत्तर मिळतं)
राजेश
27 Mar 2010 - 6:14 pm | कारभारी
घासकडवी यांचे उत्तर ए़कदम बरोबर आहे....... छान....
28 Mar 2010 - 8:40 am | एकलव्य
एक घोटाळा आहे...
दोन्ही पहारेकऱ्यांना माहिती आहे कोणते दार कशाचे आहे ते!
पण, त्यातला एक पहारेकरी फक्त नेहमी खरेच बोलतो आणि एक नेहमी फक्त खोटे!
पण नेमका कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, हे माहीत नाही.
तुम्हाआम्हाला माहीत नाही कोण खरे बोलतो आणि कोण खोटे तसेच त्या पहारेकर्यांनाही फक्त स्वतःचेच "गुण-अवगुण" माहीत असणे अपेक्षित आहे. भेन्डि बाजार आणि घासकडवी यांच्या उत्तरात दोघेही पहारेकरी एकमेकाला पुरते ओळखून आहेत हे गृहीत धरले आहे... चूभूद्याघ्या! ... पण हे गृहितक बरोबर असेलच असे नाही. (जसे एकाचा पगार दुसर्याला माहीत असेलच याची खात्री नाही तसेच!)
===================
कोणत्याही पहारेकर्यापाशी जा आणि प्रश्न विचारा - नेहमी खरे बोलणारा पहारेकरी स्वर्गाच्या दाराशी उभा आहे काय?
> उत्तर "नाही" आले तर दुसर्या दाराने स्वर्गात जा!
> उत्तर "हो" आले तर त्याच दाराने स्वर्गात जा!!
> काहीही उत्तर आले नाही तर दुसर्या दाराने स्वर्गात जा!!!
चीअर्स - एकलव्य
28 Mar 2010 - 10:19 am | तिमा
कुठल्याही पहारेकर्याला विचारायचे की भारत देशावर जास्त हक्क कोणाचा आहे ? त्या उत्तरावरुनच तो पहारेकरी खोटं बोलणारा(कांग्रेसी) का खरं बोलणारा हे कळेल. आणि अर्थातच खोटं बोलणारा नरकाच्या दाराबाहेर उभा असेल!!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|