अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो!

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
24 Mar 2010 - 10:32 am
गाभा: 

डिडब्लु टिव्ही हा जर्मन चॅनेल माझा आणि माझ्या कुटुंबाचा आवडता चॅनेल आहे. आम्ही रोज न चुकता या चॅनेलवरचे काही कार्यक्रम बघत असतो. हा चॅनेल सातत्याने बघून जर्मनी हा पण माझा देश आहे आणि सारे जर्मन माझे बांधव आहेत ही भावना आमच्यात वाढीस लागली आहे.

काही दिवसांपूर्वी या चॅनेल वर टुमॉरो-टुडे या शास्त्रीय नियतकालिकात एका आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त एका औषध-विज्ञानाच्या विद्वान प्राध्यापकांची मुलाखत झाली. मुलाखतीचा विषय होता - सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत प्लासिबो-इफेक्टचा अंतर्भाव अधिकृतपणे करावा का? प्राध्यापक महाशयांनी 'काही हरकत नाही' असा सूर लावला होता. कारण त्याचे फायदे निश्चित आहेत हे आता आधुनिक वैद्यक मान्य करत आहे.

प्लासिबो-इफेक्टबद्दल एवढे सन्मानाने बोलले गेलेले प्रथमच ऐकायला मिळाले. त्यामुळे आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची याबाबतीतली भूमिका जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

प्रतिक्रिया

Nile's picture

24 Mar 2010 - 10:38 am | Nile

डिडब्लु टिव्ही हा जर्मन चॅनेल माझा आणि माझ्या कुटुम्बाचा आवडता चॅनेल आहे

आँ! काय सांगता!!

तुमचे मत सांगायचे विसरलात का? :)

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2010 - 10:46 am | बिपिन कार्यकर्ते

खुद के साथ बातां :

धागा भलत्याच वळणावर जाईल असा प्रतिसाद द्यायचा उद्देश समजला नाही. धागाप्रवर्तक सदस्यनाम बघून असे होत असेल का?

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

24 Mar 2010 - 11:54 am | Nile

माफी संपादक साहेब, जे वाचले त्यावर विश्वास न बसल्याने आलेली उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती, असो. युयुत्सुंच्या चर्चा नेहमीच वाचनीय, चिंतनीय इत्यादी इत्यादी असतात त्यामुळे 'फ़ॉलो' करेनच.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2010 - 10:42 am | बिपिन कार्यकर्ते

रोचक विषय. या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण आणि गंभीर चर्चा झाली तर मला वाचायला आवडेल.

सकृद्दर्शनी तरी 'प्लासिबो इफेक्ट'च्या बाजूने मत होते आहे. कशाने का होईना रोगी बरा झाल्याशी मतलब. खरे तर माझ्या माहितीतले काही अनुभवी / वृद्ध डॉक्टरांनी अशा प्रकारे काही रोग्यांना उपचार दिल्याची माहिती आहे. विशेषतः जेव्हा रुग्ण काही मानसिक समस्यांनी ग्रस्त असतो किंवा आपल्याला विशिष्ट रोग झालाच आहे असे समजत असतो अशा प्रकरणांमधे....

बिपिन कार्यकर्ते

योगी९००'s picture

24 Mar 2010 - 10:50 am | योगी९००

कोल्हापूरात "डिडब्ल" चा वेगळाच अर्थ आहे..

हे चॅनेल तसलेच आहे का?

खादाडमाऊ

प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय व त्याचे फायदे म्हणजे नक्की काय याची व्याख्या करणं चर्चेच्या आधी आवश्यक आहे. चर्चाप्रस्तावकाने किंवा अन्य कोणी जाणकाराने ते करावं अशी मी विनंती करतो.

कुठच्याही उपचार प्रक्रियेत डॉक्टरने अगर मान्यवर तज्ञाने 'तू बरा होशील' हे सांगणं याने फरक पडतो. यात 'आपलं वाईट होणार' हा नकारात्मक विचार जाण्याने, किंवा 'मी बरा होणार' या सकारात्मक विचाराने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सुधारणा अधिक वेगाने व्हायला मदत होते. त्याची काही साधी कारणं असू शकतील - चिंता कमी झाल्याने झोप चांगली लागणे, मानसिक ताण नष्ट होण्याने शारीरिक ताण कमी होणे इत्यादी. हा 'उपचार' अर्थातच मुख्य उपचाराला पूरक म्हणून वापरला जावा अशी त्या प्राध्यापकाची भूमिका असावी असं वाटतं. तसं नसल्यास कृपया स्पष्ट करा.

प्लासिबो इफेक्टचा अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंध काय हाही मुद्दा प्रस्तावकाने सविस्तर मांडावा अशी इच्छा आहे. कारण मुख्य उपचाराला पूरक म्हणून 'हा डॉक्टर चांगला आहे, तो मला बरं करील' असा विश्वास असणं, याला कोणाच निर्मूलकाचा विरोध नसावा असं वाटतं. पण केवळ विश्वास व इतर उपचार नाहीत किंवा तो विश्वास वाढवण्यासाठी भूलथापा ही परिस्थिती आक्षेपार्ह असावी...

विषय चांगला आहे, पण ही सर्व धूसरता जरा कमी झाली तर चर्चा अधिक चांगली होईल.

राजेश

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2010 - 11:44 am | बिपिन कार्यकर्ते

पूर्णतः सहमत.. मला नीट मांडता आले नव्हते.

बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा's picture

24 Mar 2010 - 5:14 pm | मेघवेडा

प्लासिबो इफेक्टचा अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंध काय हाही मुद्दा प्रस्तावकाने सविस्तर मांडावा

खरंच.. प्रस्तावात प्लासिबोची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची नीटशी सांगड घातलेली दिसत नाही.. मुद्दा फारच इंटरेस्टिंग आहे.. मजा येईल चर्चेला..

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

II विकास II's picture

24 Mar 2010 - 10:39 pm | II विकास II

>>खरंच.. प्रस्तावात प्लासिबोची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची नीटशी सांगड घातलेली दिसत नाही.. मुद्दा फारच इंटरेस्टिंग आहे.. मजा येईल चर्चेला..

रुग्णाचा डॉक्टरवर विश्वास असतो (बहुतेक ठिकाणाची आदर्श परीस्थिती), त्यामुळे डॉक्टरने दिलेल्या औषधामुळे आपली तब्येत बरी होईल. जर डॉक्टरने खोटे औषध दिले असेल तर त्याला काही वैज्ञानिक आधार नाही, पण रुग्णाला मानसिक आधार मिळेल, त्यामुळे त्याची रोगाशी झगाडायची इच्छा वाढेल.

हे सगळे रुग्णाचा डॉक्टरवर विश्वास आहे, त्यामुळे घडते. त्याला काही वैज्ञानिक आधार नाही.

ह्या विश्वास म्हणजेच अंधश्रद्धा असे युयुत्सु यांना म्हणायचे असेल,

मेघवेडा's picture

25 Mar 2010 - 3:10 pm | मेघवेडा

हे सगळे रुग्णाचा डॉक्टरवर विश्वास आहे, त्यामुळे घडते. त्याला काही वैज्ञानिक आधार नाही.

मग याला अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा अंधविश्वास म्हणणे योग्य वाटत नाही का? रुग्णाचा डॉक्टरवर विश्वास असतो. "रुग्णाची डॉक्टरवर श्रद्धा आहे" वाक्य जरा जड जातंय.. काही रोगांच्या बाबतीत अथवा एखादा गंभीर अपघात जेव्हा होतो आणि परिस्थिती डॉक्टरच्याही हाताबाहेर गेली आहे हे कळून चुकते तेव्हा डॉक्टरवरल्या विश्वासाची जागा देवावरली श्रद्धा घेते.. या श्रद्धेला काही वैज्ञानिक आधार नाही.. आता या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणावे काय?

मला तरी नाही वाटत ब्वॉ.

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रकाश घाटपांडे's picture

24 Mar 2010 - 11:25 am | प्रकाश घाटपांडे

प्लासिबो इफेक्टचा अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंध काय हाही मुद्दा प्रस्तावकाने सविस्तर मांडावा अशी इच्छा आहे. कारण मुख्य उपचाराला पूरक म्हणून 'हा डॉक्टर चांगला आहे, तो मला बरं करील' असा विश्वास असणं, याला कोणाच निर्मूलकाचा विरोध नसावा असं वाटतं.

राजेश, राजीव जी फारच कळीचे मुद्दे काढतात ब्वॉ!
श्रद्धा धार्मिकांचा प्लासिबो
आयुष्यातील रसच संपलाय हो

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

II विकास II's picture

24 Mar 2010 - 12:10 pm | II विकास II

प्लासिबोबद्दल बहुतेक चतुरंग यांनी लिहीले होते असे थोडे थोडे आठवते.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Mar 2010 - 12:47 pm | प्रकाश घाटपांडे

लिखाळ यांनी प्लासिबो वर लिहिले होते
http://www.misalpav.com/node/3973
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

...करुन दिलीत. धन्यवाद!

नितिन थत्ते's picture

24 Mar 2010 - 12:47 pm | नितिन थत्ते

घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे प्लॅसिबो काम करतो आणि उपयुक्त/आवश्यक आहे याबाबत कुणाचेच दुमत नाही. आक्षेपही नसेल.

प्रश्न प्लॅसिबोचा परिणाम पूरक आहे की नुसत्या प्लॅसिबोने गुण येतो हा आहे.

म्हणजे जे रोग शरीर आपोआपच बरे करते त्या रोगांवर प्लॅसिबो काम करेल. त्या खेरीज जे रोग आपोआप बरे होत नाहीत असे रोग नुसत्या प्लॅसिबोने (श्रद्धेने) बरे होतील असे म्हणण्याला आक्षेप आहे.

नितिन थत्ते

युयुत्सु's picture

24 Mar 2010 - 4:59 pm | युयुत्सु

ही चर्चा पुढे नेण्यासाठी श्री घासकडवींची एक मागणी प्रथम पुरी करतो. प्लासिबो आणि प्लसिबो परीणाम यांच्या पुढील व्याख्या मला नेट वर सापडल्या.

१. The placebo effect is the measurable, observable, or felt improvement in health or behavior not attributable to a medication or invasive treatment that has been administered.

A placebo (Latin for "I shall please") is a pharmacologically inert substance (such as saline solution or a starch tablet) that produces an effect similar to what would be expected of a pharmacologically active substance (such as an antibiotic).

http://www.skepdic.com/placebo.html

२. The phenomenon of an inert substance resulting in a patient's medical improvement is called the placebo effect.

A placebo has been defined as "a substance or procedure ... that is objectively without specific activity for the condition being treated". http://en.wikipedia.org/wiki/Placebo#Definitions.2C_effects.2C_and_ethics
मला या व्याख्या व्याधिनिवारणा पुरत्या मर्यादित वाटतात. श्रद्धेशी निगडीत अनेक मानवी अनुभव प्लासिबो-परीणामाच्या व्याख्येत बंदिस्त करता यायला हवेत. म्हणून मराठीत प्लासिबो परिणामाची अशी व्याख्या करता येईल असे मला वाटते.

दोन किंवा अधिक घटकांच्या एकत्र येण्याने अनुभवास येणारा कार्यकारणभावरहित व्यक्तीसापेक्ष सकारात्मक आणि अपेक्षित परिणाम.

ही व्याख्या निर्दोष आहे असे ठरल्यास इतर प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करीन.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राजेश घासकडवी's picture

24 Mar 2010 - 9:08 pm | राजेश घासकडवी

प्लासिबोची व्याख्या व्याधिनिवारणापुरतीच मर्यादित असावी. त्याचं साधारणीकरण होण्याइतका तो इतर क्षेत्रांत सिद्ध झाला आहे काय? मुळात उद्धृत केलेल्या उदाहरणात तो मर्यादितच आहे. तुम्हाला श्रद्धेशी निगडित इतर गोष्टी समाविष्ट करायच्या असतील तर त्याला दुसरं नाव द्या.

आपल्या साधारण व्याख्येतला कार्यकारणभावविरहित या शब्दाला आक्षेप आहे. तसंच अपेक्षित हा शब्द कोड्यात टाकणारा आहे. मी पहिल्या व्याख्येतल्या इफेक्ट शब्दातली व्यक्तिसापेक्षता अधोरेखित करून असं म्हणेन -

'प्लासिबो हा असा पदार्थ आहे जो दिल्याने काही मर्यादित रुग्णांसाठी तो देण्याआधीच्या रुग्णाने केलेल्या तक्रारींमध्ये (रिपोर्टेड सिंप्टम्स मध्ये) तो दिल्यानंतर घट होते. त्याला औषध म्हटलं जात नाही कारण सकृद्दर्शनी त्या पदार्थात रोगनिवारण शक्ती नसते, व रुग्ण तो पदार्थ इतर मार्गांनीही घेत असतो (मीठ, साखर इ.).'

मर्यादित हे अशा अर्थाने की हा परिणाम अभ्यासलेल्या रुग्णांमधल्या सुमारे १०% च्या आसपास रुग्णांसाठी लागू असतो. जसजशी ही टक्केवारी १००% च्या जवळ जाईल, तसतसं त्या पदार्थाला प्लासिबो न म्हणता औषध म्हणणं योग्य ठरेल.

'प्लासिबो परिणाम - वरील व्याख्येतला प्लासिबो दिल्यामुळे काही मर्यादित रुग्णांसाठी तो देण्याआधीच्या रुग्णाने केलेल्या तक्रारींमध्ये (रिपोर्टेड सिंप्टम्स मध्ये) तो दिल्यानंतर होणाऱ्या घटीच्या औषधसदृश परिणामाला प्लासिबो परिणाम म्हणतात.'

राजेश

प्लासिबोची व्याख्या व्याधिनिवारणापुरतीच मर्यादित असावी.

याला मी दूराग्रह म्हणेन. आणि मग चर्चा संपेल. अमुक अमुक देवाला नमस्कार केला की मला पेपर चांगले जातात. किंवा अमुक एक पेन माझे लकी पेन आहे हा विश्वास निर्माण होणे याला प्लासिबो इफेक्ट नाही तर काय म्हणाल?

कार्यकारणभावरहित हा शब्द प्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. प्लासिबो म्हणून कार्य करणारे घटक आणि घडून येणारा अपेक्षित परिणाम यांच्यात "प्रत्यक्ष" कार्यकारणभाव नसतो, तर तेथे काही व्यक्तींच्याबाबत फक्त तसा आभास निर्माण होतो. म्हणून प्लासिबो परिणाम हा व्यक्तिसापेक्ष ठरतो. बहुसंख्य व्यक्तीना जर हा बहुसंख्य वेळा अनुभव आला तर साहजिकच तो प्लासिबो परिणाम न राहता "संख्याशास्त्रीय/वैज्ञानिक" कार्यकारणभाव ठरेल.ÿ
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 10:25 am | राजेश घासकडवी

याला मी दूराग्रह म्हणेन. आणि मग चर्चा संपेल.

चर्चा संपायला माझी काहीच हरकत नाही. अपूर्ण व्याख्यांवर आधारित असलेली व जिच्या पायाभूत संकल्पनांविषयी एकमत नाही अशी चर्चा संपलेलीच बरी असं मला वाटतं.

जर अमुक देवाला नमस्कार केला तर पेपर चांगले जातात हे प्लासिबो परिणामात अंतर्भूत करायचं असेल तर प्लासिबो परिणामाविषयी असलेल्या आकडेवारी इतकी समर्थ आकडेवारी सादर करावी. वैद्यकीय प्लासिबो परिणाम हा अवैद्यकीय परिस्थितीत लागू करण्याची इच्छा असेल तर किमान चर्चाप्रस्तावात तशी कारणपरंपरा तरी द्यावी. चार ओळी लिहून, वेगवेगळ्या वाचकांकडून वेगवेगळ्या संकल्पना गृहीत धरून संदिग्ध चर्चा करण्यात काय अर्थ आहे?

मूळ विषय चांगला आहे म्हणून म्हटलं.

राजेश

युयुत्सु's picture

25 Mar 2010 - 10:37 am | युयुत्सु

अपूर्ण व्याख्यांवर आधारित

माझी व्याख्या अपूर्ण कशी हे सिद्ध केल तर बरं होईल. अवैद्यकीय प्लासिबो परिणाम तार्किक पातळीवर सिद्ध करुन तो स्वीकारण्यात काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 11:35 am | राजेश घासकडवी

अवैद्यकीय प्लासिबो परिणामाला काहीच अधिष्ठान नाही. तुमची व्याख्या अपूर्ण सिद्ध करण्याची जबाबदारी माझी नसून ती पूर्ण आहे हे सिद्ध करण्याची तुमची जबाबदारी आहे. म्हणून तुम्हाला आकडेवारी वा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तार्किक पातळीवर सिद्धता करण्याचा प्रयत्न करायला सांगितला. जोपर्यंत तुम्ही तो प्रयत्नसुद्धा करत नाही, तोपर्यंत किमान माझ्यापुरता चर्चेतला रस संपलेला आहे.

इतक्या सुंदर विषयाचं असं भजं केल्याबद्दल.... धन्यवाद कसं म्हणू?

राजेश

युयुत्सु's picture

25 Mar 2010 - 12:16 pm | युयुत्सु

माझी व्याख्या चर्चेसाठी खुली ठेवली होती. अपूर्णत्वाचे सर्व आरोप खोडून काढले की पूर्णत्व आपोआप सिद्ध होईल. अपूर्णत्वाचा आरोप जो पर्यंत सिद्ध केला जात नाही तो पर्यंत तो खोडून काढणे मला बंधनकारक नाही.

मी तुम्हाला वेडं म्हटलं तरं तुम्ही वेडे नाही हे सिद्ध करायच्या फंदात पडाल की मला माझे म्हणणे सिद्ध करायचे आह्वान द्याल?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 12:23 pm | राजेश घासकडवी

मला कोणी कारणाशिवाय वेडं म्हटलं तर मी दुर्लक्ष करेन. मी जर स्वत:ला शहाणा म्हणवून घेत असेन तर कारणं देईन. असो.

माझ्यापुरती चर्चा लवकर संपवल्याबद्दल धन्यवाद. ज्यांना तुमची व्याख्या मान्य करून पुढे चर्चा करायची असेल त्यांना शुभेच्छा.

राजेश

युयुत्सु's picture

25 Mar 2010 - 12:40 pm | युयुत्सु

ज्यांना तुमची व्याख्या मान्य करून पुढे चर्चा करायची असेल त्यांना शुभेच्छा.

मी वाट बघत आहे...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विजुभाऊ's picture

24 Mar 2010 - 6:48 pm | विजुभाऊ

आपल्या मेंदूत अ‍ॅड्रीनलीन / सिरोटोनीन वगैरे सारखी जी द्रव्ये असतात; मनाच्या स्वास्थ्यावर त्या घटकांचे मेंदूतील प्रमाण कमी जास्त होणे ठरु शकते.
या द्रव्यांच्या प्रभावामुळे शरीर बरे होण्याची प्रक्रीया वेग घेऊ शकते.
"आ...ल इज वेल" मुळे आपण +Ve विचार करायला लागतो आणि गतीशील होतो.
यात अंधश्रद्धा निर्मुलन समिती चा संबन्ध कसा येतो? आण इत्याना शिव्या देण्याचा लेखकाचा नक्की मानस काय हे कळाले नाही.
अवांतरः बहुतेक साधकांच्या साधनेत ही पिशाच्चे कुठल्यातरी अवतारात येऊन अडथळे आणत असावीत.

देवदत्त's picture

24 Mar 2010 - 11:49 pm | देवदत्त

तुम्ही एका वाहिनीवर एका मुलाखतीत काही ऐकले आणि त्यावर अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची याबाबतीतली भूमिका जाणून घेण्यास उत्सुक आहात ते चांगले आहे.

पण थेट निषेधात्मक रित्या वापरल्या जाणार्‍या "अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो!" ह्या शीर्षकाचे प्रयोजन कळले नाही. दुसरा काही अर्थ अभिप्रेत असल्यास समजावून सांगावे.

II विकास II's picture

25 Mar 2010 - 7:55 am | II विकास II

देवदत्तशी सहमत,
'आयचा घो' हल्ली नवप्रतिष्ठित शब्द होउ लागला आहे. असो.

या शीर्षकाची प्रेरणा "शिक्षणाच्या आयचा घो" वरून मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रवर्तकांचा उर्मटपणा आणि हेकटपणा मी प्रत्यक्ष पाहिला आहे, आणि वाचला आहे आणि माझ्या मनात त्यांच्या बद्द्ल यत्किंचितही आदर आणि सहानुभुती नाही. त्यामुळे हे शीर्षक माझ्या भावना अत्यंत समर्पकपणे व्यक्त करते.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

या शीर्षकाची प्रेरणा "शिक्षणाच्या आयचा घो" वरून मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रवर्तकांचा उर्मटपणा आणि हेकटपणा मी प्रत्यक्ष पाहिला आहे, आणि वाचला आहे आणि माझ्या मनात त्यांच्या बद्द्ल यत्किंचितही आदर आणि सहानुभुती नाही. त्यामुळे हे शीर्षक माझ्या भावना अत्यंत समर्पकपणे व्यक्त करते.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 8:33 am | राजेश घासकडवी

इज इन द आय ऑफ द बिहोल्डर...

फक्त शीर्षकातल्या भावनांना पाठिंबा देणारं लेखन शीर्षकाखाली आलं असतं तर बरं झालं असतं, असंच सगळे आक्षेप घेणारे म्हणतातसं वाटतंय.

राजेश

देवदत्त's picture

25 Mar 2010 - 10:30 am | देवदत्त

फक्त शीर्षकातल्या भावनांना पाठिंबा देणारं लेखन शीर्षकाखाली आलं असतं तर बरं झालं असतं, असंच सगळे आक्षेप घेणारे म्हणतातसं वाटतंय
असेच म्हणायचे होते. पण फक्त त्या भावनांना नाही तर सोबत इतरही चालेल. इथे त्याबद्दल काहीच दिसले नाही म्हणून विचारले. :)

शीर्षकाची प्रेरणा कळली, पण लेखाशी समर्पकता वाटली नाही.

बाकी, तुमच्या लेखामुळे प्लासिबो बद्दल भरपूर माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

मी_ओंकार's picture

25 Mar 2010 - 11:28 am | मी_ओंकार

वर दुराग्रह असे काहीतरी वाचले. बाकी चालू द्या.
- ओंकार.

युयुत्सु's picture

25 Mar 2010 - 10:56 am | युयुत्सु

सध्या मी मोजकेच लिहायचे धोरण दोन कारणांनी स्वीकारले आहे. मोजके लिहिले की चर्चेवर आपले नियंत्रण राहते. चर्चा कमी बहकते. दूसरे कारण लॅपटॉपवर मला देवनागरी टंकन डेस्कटॉप सारखे करता येत नाही (माझा डेस्कटोप सध्या गतप्राण झाला आहे.)

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.सध्या मी मोजकेच लिहायचे ध

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

Nile's picture

25 Mar 2010 - 12:10 pm | Nile

अत्यंत वाचनिय चर्चा, काकु प्रवर्तकाचे अमुल्य विचार वाचुन कृतकृत्य झाले!

-कोणत्यातरी काथ्याची बंडले घ्यावीत, ती संस्थळावर कुटावीत, कुणीतरी, काहीतरी उत्तर देणारे नकी भेटेल.

मेघवेडा's picture

25 Mar 2010 - 3:27 pm | मेघवेडा

काकु प्रवर्तकाचे अमुल्य विचार वाचुन कृतकृत्य झाले

अरेरे! निळूभाऊ काय रे.. तुझं व्याकरण इतकं रे कसं कच्चं?? काय अर्थ अभिप्रेत आहे तुला इथे? कृतकृत्य कोण झाले? तू? तुझे विचार?? तुझी काकू की आणखी कोणीतरी??? सगळाच गोंधळ आहे बघ इथे .. काय्येक कळत नाही!

:)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

Nile's picture

25 Mar 2010 - 9:09 pm | Nile

काय्येक कळत नाही!

मग तुम्हाला अर्थ बरोबर लागला. :)

टिउ's picture

25 Mar 2010 - 8:12 pm | टिउ

अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची याबाबतीतली भूमिका जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

उत्तम चर्चा...अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांसोबतच अमर सिंग, स्टिव्ह टिकोलो, हिमेश रेशमिया, उदय चोप्रा आणी प्रेसिडेंट ओबामा या सर्वांचं या विषयावर काय मत आहे ते जाणुन घ्यायलाही आवडेल.

टिउ's picture

25 Mar 2010 - 8:14 pm | टिउ

अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची याबाबतीतली भूमिका जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

उत्तम चर्चा...अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांसोबतच अमर सिंग, स्टिव्ह टिकोलो, हिमेश रेशमिया, उदय चोप्रा आणी प्रेसिडेंट ओबामा या सर्वांचं या विषयावर काय मत आहे ते जाणुन घ्यायलाही आवडेल.