अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या कथेत, अलिबाबाला त्या चाळीस चोरांच्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द कळला आणि त्याने आत जाऊन त्यातील फक्त हवे तेवढे सोने, दागिने स्वतःकरीता आणले. त्याचा भाई कासिम ह्याने गळ लावून अलिबाबाकडून त्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द मिळविला. गुहेत गेल्यावर आतील खजिना पाहून तो वेडाच झाला. त्यात तो परवलीचा शब्द विसरला आणि मग त्या चोरांच्या हाती लागून स्वतःचा जीव गमावून बसला. सर्वांना माहित असलेल्या कथेचा भाग संपला.
अलिबाबाची कथा आजच्या जीवनात धरली तर, आपण ह्यातील एकच असे कोणी नाही तर त्यांच्या एकत्रित केलेल्या प्रकारात येतो. आपल्याच महत्त्वाच्या गोष्टी आपण गुहेत परवलीच्या शब्दाने सांभाळून ठेवतो. पण एखाद्याला तो परवलीचा शब्द कोणाला कळला तरी नुकसान होऊ शकते. तसेच आजकाल गळ लावलेले विपत्र येतात (ज्यांना फिशिंग मेल म्हणतात) त्यातही कोणी आपला परवलीचा शब्द इतरांना सांगू शकतो. तिथेही आपण गोत्यात येऊ शकतो. त्याकरीता खबरदारी एवढीच की ते सदस्यनाम आणि परवलीचा शब्द सांभाळून ठेवणे.
आंतरजालावर आपण विविध ठिकाणी खाते उघडलेले असते. विपत्र, आंतरजालीय बँक, खरेदी, संगणक संबंधी चर्चास्थळे, सामाजिक संकेतस्थळे, वैयक्तिक संकेतस्थळे. तसेच कार्यालयातील संगणकात प्रवेश, त्यात मग त्यांची विविध प्रकारचे संकेतस्थळे, सॉफ्टवेयर... वगैरे वगैरे. आता ह्यात एकदम सुरक्षित रहावे अशा गोष्टी म्हणजे बँक, क्रेडीट कार्ड, विपत्र ह्यांची खाती आणि कार्यालयातील विविध गोष्टी. इतर ठिकाणी सहसा कुणी तुमच्या खाते आणि परवलीचा शब्दाच्या मागावर राहत नाही. आणि त्यात परवलीचा शब्द विसरलाच तर त्या ठिकाणी "परवलीचा शब्द विसरला आहात का?" पर्यायाने आपण तो जुना शब्द रद्द करून नवीन बनवू शकतो. तिथे काही बंधने नाहीत की ठराविक प्रयत्नांनंतर तुमचे खाते गोठविण्यात येईल. पण बँक आणि क्रेडीट कार्ड करीता ही बंधने असतात. (अर्थात आपल्याच सुरक्षिततेसाठी). त्यामुळे तो परवलीचा शब्द विसरणे काही वेळा अडचणीचे ठरवू शकते. कारण नवीन शब्द बँकेने बनबून द्यायला ७ दिवस जाऊ शकतात. कार्यालयातही एकवेळ ठिक आहे, तिथे संबंधित विभागाला सांगून आपण तो लगेच चालू करू शकतो.
वेगवेगळ्या ठिकाणचे सदस्यनाव व परवलीचा शब्द लक्षात ठेवणे थोडे वैतागाचे काम आहे. त्यात आजकाल मी हे शब्द विसरणे हे वाढत चालले आहे. ह्या संकेतस्थळावर हे सदस्यनाव आहे. त्याचा परवलीचा शब्द काय आहे बरे? ह्यातच काही वेळ निघून जातो. अर्थात महत्त्वाची संकेतस्थळे जसे नेहमीच्या वापरातील बँक, विपत्र खाते ह्याचे सदस्यनाम मी सहसा विसरत नाही. पण काही वेळा अडचण येते नवीन खाते उघडले तेव्हा नवीन परवलीचा शब्द दिले असले तर आणि काही वेळा नुकतेच परवलीचा शब्द बदलले असले तर. त्यामुळे एक दोन वेळा माझे खाते बंदही पडले आहे. मग पुन्हा बँकेला फोन करून तो नवीन बनविणे हे आलेच.
त्याकरीता केलेले काही प्रयत्न असे:
- काही वेळा त्या खात्याशी संबंधित परवलीचा शब्द ठेवणे जरा सोपे वाटते. पण आपल्या नावासोबत इतर खाजगी माहितीतील संदर्भ वापरणे ही धोक्याचे ठरू शकते. तरीही त्यात ठराविक साच्याप्रमाणे परवलीचा शब्द ठरविणे मी काही वर्षांपासून केले होते. पण त्यातही आता तोच तोच पणा आला असे वाटते. म्हणून तो प्रकारही बदलवला आहे.
- सगळीकडे एकच परवलीचा शब्द ठेवणेही चुकीचे. कारण एखाद्याला तो परवलीचा शब्द कळला तर मग काम संपले. तसेच तो साचाही कळला तरी अडचण.
- तसेच आंतरजालावर विविध सॉफ्टवेयर उपलब्ध आहेत परवलीचा शब्द जपून ठेवण्याचे. म्हणजे तुम्ही त्यात खाते नाव आणि परवलीचा शब्द लिहून ठेवा व ती फाईल एका वेगळ्या परवलीचा शब्दाने सुरक्षित ठेवा. ह्यातही वेगळी अडचण. जर त्या एका फाईलचा परवलीचा शब्द कोणाला कळला तर...
- माझा एक मित्र त्याचे विविध खाते क्रमांक, सदस्य नाव एका डायरीत लिहीत असे. त्याला विचारले "काय रे ह्यात परवलीचा शब्दही ठेवतोस का? तुझी डायरी एकदा पळवली पाहिजे ;) " मी हा प्रकारही आधी केला होता. डायरी पळवण्याचा नाही, सदस्यनाम आणि परवलीच्या शब्दाचा संदर्भ लिहून ठेवण्याचा. :) आता नाही करत. स्वत:ची स्मरणशक्ती चांगली आहे असे वाटून ते बंद केले.
- मध्ये अशाच एका चर्चेत मी कोणालातरी परवलीचा शब्द ठरवण्याचे थोडे प्रकार सांगितले होते.त्यातील एक म्हणजे सिनेमाचे नाव किंवा त्याची पहिली अक्षरे. ह्यांचे एकत्रित शब्द पण तेही आता नीट वाटत नाही आहेत.
तर मी परवलीचा शब्द न विसरणे किंवा तो लक्षात कसा ठेवणे ह्या विचारात आहे. हे लिहित असतानाच माझी दुनिया ह्यांनी लिहिलेल्या ब्लॉगवर एक प्रकार मिळाला. तो कसा आहे हे सध्या पडताळून पाहत आहे.
आणखीही इतर नवीन प्रकार कोणी सुचवू शकतो का?
प्रतिक्रिया
21 Mar 2010 - 2:15 pm | शानबा५१२
वापरात असलेल्या Email idवरुन स्वःतालच एक email पाठवा,त्यामधे तुमचे परवलीचे शब्द लिहा.
तो email delete करा,delete केल्यानंतर तो email Trash मधे जाईल.
Trash मधले संदेश सहसा कोण वाचत नाही व ते email accountच्या परीवलीच्या शब्दाने सुरक्षीत असतात.
मग पाहीजे तेव्हा ते आपण पाहु शकतो.ते email account आपल्याशिवाय कोणी ईतर वापरत नसेल तर तो message चांगल्यापैकी सुरक्षित राहील.
स्त्रोत : आमच सुपिक डोसकं.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा.........*****
21 Mar 2010 - 2:42 pm | टारझन
=)) =)) =))
नाय भो शाणबा ..
३० दिवसांनी ऑटो डिलीट झाले की दोन चिपळ्या घ्याव्या आणि व्हिटी ते ठाणे .. " किहो ना पियार हिये ... " असं गात फिरावं मग =))
21 Mar 2010 - 3:42 pm | देवदत्त
=)) =))
21 Mar 2010 - 4:08 pm | शानबा५१२
ते तर आहेच........२९व्या दीवसानंतर परत email करावा.
आपण आपले ४-५ passwords डोक्यात ठेउन तेच वापरतो सगळीकडे.........................
प्रायोजक : खैनी छैनी चैन से मजाल लोsssssssssss
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा.........*****
22 Mar 2010 - 2:52 pm | अस्मी
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
- अस्मिता
22 Mar 2010 - 2:48 pm | अस्मी
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
- अस्मिता
21 Mar 2010 - 2:39 pm | टारझन
आय डोंट ओपन माय शिक्रेट्स :)
21 Mar 2010 - 3:41 pm | देवदत्त
सहमत.
इवन आय डोंट ओपन माय सिक्रेट्स.
पण हे जरा सामायिक प्रकार होते म्हणूनच लिहिले. पण मी नेमके काय करतो, त्याचे संदर्भ काय आहेत ते नाही लिहिले. ;)
21 Mar 2010 - 3:58 pm | Nile
माझे परवलीचे शब्द म्हणजे, माझ्या मैत्रीणींची(फक्त मलाच माहीत असलेली) टोपणनावं आणि त्यांच्यासंबंधीत तारखा इ. ;) आता कुठल्या मैत्रीणीचं नाव कुठल्या ठिकाणी वापरायचं हे शिक्रेट आहे. :)
21 Mar 2010 - 4:57 pm | नितिन थत्ते
सहसा सगळीकडे तेच तेच परवलीचे शब्द वापरणे चांगले.
पण अनेकदा तो शब्द अस्सा नको आणि तस्सा नको अशा काही सायटींच्या अटी असतात. तेव्हा पंचाईत होते.
पण दोन तीनच परवलीचे शब्द असावे हे उत्तम.
अनेक बँका स्टेटमेंट पाठवतात ती पण प्रोटेक्टेड असतात पण त्यांचा परवलीचा शब्द सहसा नावाची अक्षरे + जन्मतारीख अशा प्रकारचा असतो. तसा शब्द बनवणे उत्तम.
नितिन थत्ते
21 Mar 2010 - 5:50 pm | चिरोटा
परवलीचा शब्द कोणी हॅक केला तर ते धोकादायक ठरु शकते.
cryptography ह्या विषयात अनेक शब्द encrypt करायच्या आज्ञावल्या असतात्.पण त्या ह्या कामासाठी वापरणेम्हणजे जरा अति होईल.
त्यातल्या त्यात सोपा आणि 'घरगुती' उपाय म्हणजे एक संख्या मनात धरणे-समजा,१3. परवलीचा शब्द आहे-"devdutt123" प्रत्येक अक्षर आणि संख्या १३ ने पुढे न्यायची आणि जो नविन शब्द तयार होईल तो लिहायचा.अशा प्रत्येक शब्दाचे करायचे आणि ते सर्व शब्द mail account वर ठेवा.एखादा परवलीचा शब्द विसरलात की encrypt केलेला शब्द बघायचा आणि १३ अक्षरे/संख्या मागे नेवून खरा हब्द मिळवायचा.अर्थात brute force पद्धतीने हे शब्दही हॅक करता येवू शकतील पण शक्यता खूपच कमी.
भेंडी
P = NP
21 Mar 2010 - 6:33 pm | अरुंधती
अहो देवदत्तभाऊ,
ह्या सन्दर्भात मागे मी सायबरक्राईम (सायबरनामा) सदराखाली सकाळमध्ये मन्गेश कोळपकर यांचा चांगला लेख वाचला होता. त्यात एक वेबसाईटचा पत्ता होता, जिथे तुम्ही तुमचे सर्व पासवर्डस सुरक्षितपणे एकत्र ठेवू शकता. तिथे लॉग इन व्हायलापण एक पासवर्ड लागतो, तो मात्र कुठे साठवायचा ह्या चिन्तेत पडलात तर मग काय माहिती नाही बुवा! कोणाला त्या साईटचं नाव, गाव, पत्ता माहित असल्यास कृपया देणे. मी 'विस्मरण'ग्रस्त झाले आहे! :?
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
21 Mar 2010 - 7:08 pm | Nile
हा हा! म्हणजे काम सोपंच की, त्याच एका साईटला हॅक करा, खल्लास! :)
21 Mar 2010 - 7:17 pm | II विकास II
>>हा हा! म्हणजे काम सोपंच की, त्याच एका साईटला हॅक करा, खल्लास!
हेच बोलतो.
काय पण लोक आहेत !!!
असो.
21 Mar 2010 - 9:25 pm | चतुरंग
माजी हॅकरने सुरु केलेली असेल तर आणखीनच छान!
काहीही हॅक न करता लोकं आपसूकच येऊन स्वतःची माहिती देताहेत!! मस्तच!!! :D
(AES+3SHA)चतुरंग
22 Mar 2010 - 12:47 pm | II विकास II
भुरटा असेल तर ती माहीती वापरेल.
'हॅकर दादा लोकां'चे नियम वाला असेल तर मात्र हसुन हसुन मरेल
22 Mar 2010 - 10:27 pm | देवदत्त
धन्यवाद अरूंधती ताई, तो लेख शोधून वाचतो.
बाकी त्या साईट मध्ये माहिती ठेवणे म्हणजे धोकाच :)
21 Mar 2010 - 8:51 pm | नेत्रेश
परवलीचा शब्द = सासुचे नाव + सासर्याची जन्म तारीख = एका दगडात अनेक पक्षी
23 Mar 2010 - 5:11 am | अगोचर
संस्थळाच्या नावावरून परवलीचा शब्द बनवण्यासाठी एक सूत्र बनवावे.
उदाहरणार्थ:
मिसळपाव चा म घेऊन त्याची बाराखडी वापरत ma101mi201
ह्याच चालीवर गुगल चा परवलीचा शब्द ga101gi201 असा होईल.
असे केल्याने सूत्र एकच असल्याने लक्षात ठेवायला सोपे जाते. आणि प्रत्येक संस्थळा साठी वेगळा शब्द आपोआप तयार होतो.
(आणि नंतर कुठेही सूत्रे टंकत फिरू नये, नाहीतर पुन्हा रामाची सीता कोण. असो )
अवांतर:
(( माझ्या परवलीच्या शब्दांची सूत्रे वेगळी आहेत, इथे केवळ एक उदाहरण दिले आहे))
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान