स्मार्टफोन : मदत हवीय

आशिष सुर्वे's picture
आशिष सुर्वे in काथ्याकूट
22 Mar 2010 - 3:45 pm
गाभा: 

नमस्कार मित्रहो..
आपल्या मिपावर बर्‍याच तंत्रज्ञ मंडळींचा वावर आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असलेल्या आपल्यासारख्या तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे.

मी सध्या नोकिया ६२७० हा भ्रमणध्वनी वापरीत आहे.
सध्या त्याची प्रकृती बरीच खालावली असल्याने मी सध्या एका नवीन भ्रमणध्वनीच्या शोधात आहे - जो 'स्मार्टफोन' (Smartphone) ह्या वर्गात मोडणारा असला पाहिजे.

मला खालील सुविधा असणारा 'स्मार्टफोन' हवाय:
१. टचस्क्रिन+की-बोर्ड (Full QWERTY tactile keyboard + Full QWERTY onscreen keyboard) - नुसता की-बोर्ड असेल तरी चालेल पण डिसप्ले-स्क्रिन बर्‍यापैकी मोठा हवा
२. वाईड स्क्रिन डिसप्ले
३. अ‍ॅन्ड्रॉइड (Android) / मॅइमो (Maemo) - ब्राउझर
४. इंटरनेट, ई-मेल
५. वाय-फाय
६. कमीतकमी १ जीबी अ‍ॅप्लिकेशन मेमोरी
७. निळादात (Bluetooth)
८. जी.पी.एस., जी.पी.आर.एस., ३ जी.
९. नकाशे (मॅप) वापरण्यासाठी सुलभ हवा.
१०. कॅमेरा - ३ मे.पि. ते ५ मे.पि.
११. TV out / Video out

माझे बजेट: रु. ३५,०००/-

मिपावरील माझ्या मित्रजनांना मार्गदर्शनाची विनंती..

(मी काही 'स्मार्टफोन्स' निवडले आहेत:
Shortlisted Smartphones:
1. Nokia N900 - http://maemo.nokia.com/n900/
2. Nokia Surge 6790 - http://reviews.cnet.com/smartphones/nokia-surge-6790-at/4505-6452_7-3372...
3. Motorola Milestone - http://asia.cnet.com/reviews/mobilephones/0,39051199,45120488p,00.htm
4. Sony Ericsson XPERIA X2 - http://asia.cnet.com/reviews/mobilephones/0,39051199,45004256p,00.htm

*Preferred Companies: Nokia, Sony, Motorola
*Non-preferred Companies: LG, HTC, Samsung
ह्यांतील अथवा ह्यावतिरिक्तही काही चांगले 'स्मार्टफोन्स' सुचवाल तर आपला आभारी राहीन.)

धन्यवाद
--
आपला
आशिष

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

22 Mar 2010 - 3:54 pm | युयुत्सु

तुमच्या पुष्कळशा गरजा Nokia E63 मध्ये पूर्ण होतात. त्याची किंमत पण त्यामानाने कमी आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शानबा५१२'s picture

22 Mar 2010 - 4:03 pm | शानबा५१२

रु. ३५,०००/- = नोकिया ५८०० + गूगल नेक्सस

दोन्ही मोबाईल iphone चे बाप आहेत.
नोकिया ५८००(Flash Support - play YOUTUBE videos in phone browser) मधे displayचा problem येतो हे खरे नाही.आणि गुगल नेक्सस पुर्ण वेगळा आहे .
ह्यांमधे सर्व आहे आपल्या गरजेनुसार,तेव्हा symbian आणि android(Advanced GPS)ची मजा घेता येते.
..........नोकिया व गुगलचा चाहता........

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

सविता's picture

22 Mar 2010 - 4:34 pm | सविता

नोकिया एन-९७

------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......

जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....

मेघवेडा's picture

22 Mar 2010 - 4:53 pm | मेघवेडा

Nokia N97, 5800 वापरले मी .. मजा नाय बा!! Android पाहिजे तुम्हाला तर Google G1/G2 किंवा Nexus One लई ब्येस (हेही HTC चेच फोन्स आहेत म्हणा!! भारतात Nexus One आला की नाही ते माहिती नाही..) HTC Hero सुद्धा चांगला आहे. पण तुम्ही म्हणता तुम्हाला HTC नको.. पण Android पाहिजे .. Android विकत घेतली ना राव Google ने! मग तुम्हाला Android पाहिजे तर दुसरा पर्याय नाही!! आणि तसंही Nokia, Sony, Motorola, Samsung हे सगळे Smartphone च्या क्षेत्रात सध्या बच्चे आहेत!! त्यांनी Music Phones, Camera Phones च काढावेत!! Smartphone च्या बाजारावर वर्चस्व गाजवणारा त्यां सगळ्यांचा बाप आहे बाप!!!! माझा सल्ला हाच राहील की HTC/Google वापरून बघा!! Nokia, Sony सगळं विसराल!!! :) आणि ३५००० चं बजेट एका फोनसाठी म्हणजे लई भारी की राव!! वाह!!

वाटल्यास एकदा Blackberry चा विचार करण्यासही हरकत नाही!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

नील_गंधार's picture

22 Mar 2010 - 5:04 pm | नील_गंधार

एवढा महागाचा फोन कशाला घेताय राव?
हरवला/चोरीला गेला की फारच चिडचिड होते.
ह्याच पस्तीस हजारात सहा एक महिन्यात अजून एक नवीन मॉडेल येईल.मग आपला हाच फोन बॅकडेटेड वाटु लागेल.
तेंव्हा,
कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा असा फोन पहा.
दोनेक सुविधा कमी मिळाल्या तरी चालतात. पुढच्या फोन खरेदीवेळी
कमी पैशात त्या सुविधा देखील मिळतात.
(स्पष्ट) नील.

लंबूटांग's picture

22 Mar 2010 - 6:26 pm | लंबूटांग

थोडीशी दुरूस्ती.

१. टचस्क्रिन+की-बोर्ड (Full QWERTY tactile keyboard + Full QWERTY onscreen keyboard) - नुसता की-बोर्ड असेल तरी चालेल पण डिसप्ले-स्क्रिन बर्‍यापैकी मोठा हवा
­

नुसता की-बोर्ड म्हणजे physical keyboard म्हणायचे आहे का?

२. वाईड स्क्रिन डिसप्ले =)) Wide screen TV ऐकले होते.
३. अ‍ॅन्ड्रॉइड (Android) / मॅइमो (Maemo) - ब्राउझर - तुम्हाला Operating System (OS) म्हणायचे आहे का?

स्मार्ट्फोनमधे HTC MOTOROLA सध्या बरीच नवीन models आणत आहेत.

वर शानबा आणि मेघवेडा यांनी लिहिल्याप्रमाणे मी सुद्धा Nexus One च recommend करेन. त्याखालोखाल G1. Motorola DROID अजून तरी फक्त CDMA साठीच available आहे अमेरिकेत पण लवकरच त्याची GSM आवृत्ती पण येणार आहे. DROID is the best phone to run ANDROID असे मागे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. पण Tech Specs मधे तरी Nexus One चांगला वाटतो आहे. DROID मधे physical keyboardआहे. आणि screen size Nexus पेक्षा किंचीत मोठा आहे.

Nexus One भारतात मिळतो का माहित नाही पण तुम्हाला हव्या असलेल्या सर्व सुविधा त्यात आहेत. 1 GB appln memory आज कोणत्या फोन मधे आहे मला कल्पना नाही पण Nexus One मध्ये 512 MB RAM (appln memory) अन 512 MB ROM आहे. तुम्ही additional storage साठी 32GB पर्यंत Memory card टाकू शकता. फोनबरोबर 4GB येतेच.

Hope that helps.

योगी९००'s picture

22 Mar 2010 - 7:40 pm | योगी९००

N900 मध्ये २GB app memory आहे हो..

खादाडमाऊ

लंबूटांग's picture

22 Mar 2010 - 8:24 pm | लंबूटांग

येथे दिल्याप्रमाणे तरी 1GB आहे आणि त्यापैकी 256 MB च RAM आहे बाकीची 768MB virtual आहे.

नोकियाचा हा फोन थोडा bulky आहे आणि त्यात multitouch capability नाही आहे. परंतु flash आणि 3D गेम्स supported आहेत जो एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. खाली तुम्ही लिहिल्याप्रमाणे काही bugs आहेत असेही वाचले. जर updates मधे हे फिक्स केले आणि multitouch वगैरे पण add केले तर खूपच छान.

योगी९००'s picture

22 Mar 2010 - 10:15 pm | योगी९००

1 GB appln memory आज कोणत्या फोन मधे आहे मला कल्पना नाही
ह्या प्रश्नाला उत्तर देत होतो. N900 मध्ये १ GBच आहे. चुकून मी टंकताना २ GB टाकली.

फोन थोडा bulky आहे हे मान्य पण multitouch ची जरूरी आहे असे वाटत नाही. Resistive screen असल्याने multitouch support करणे अवघड आहे. पण हातमोजे घालून सुध्दा touch screen व्यवस्थित काम करते. हे ही नसे थोडके...

बाकी नवीन PR 1.2 update ची वाट पहात आहे.
N900
खादाडमाऊ

रामपुरी's picture

22 Mar 2010 - 11:05 pm | रामपुरी

Nexus One मध्ये सगळी appln फक्त RAM (appln memory) वरच टाकता येतात असे ऐकले आहे. कितपत खरे आहे कुणी सांगू शकेल काय? असे असेल तर त्या 4GB चा नक्की उपयोग काय?

टारझन's picture

22 Mar 2010 - 7:15 pm | टारझन

नोकिया ११०० लय भारी फोन :)

नितिन थत्ते's picture

22 Mar 2010 - 10:36 pm | नितिन थत्ते

सही जवा ऽ ऽ ऽ ब. असा फोन दुसरा होणे नाही. (१६०० पण चांगला आहे).

असो. मी गेले दीड वर्ष HTC Touch वापरत आहे. फोनचा टचस्क्रीन वगैरे उत्तम आहे. वाय फाय पण आहे. तरुणाईला आवडणारं एफ एम मात्र नाही.

कॅमेरा आहे पण फ्लॅश नाही.

यू एस बी कनेक्टर, आणि हॅण्डस फ्री ची क्वालीटी चिनी वस्तूंप्रमाणे आहे. ;)

नितिन थत्ते

आशिष सुर्वे's picture

22 Mar 2010 - 7:35 pm | आशिष सुर्वे

आपणा सर्वांचे आभार.. अजून प्रतिक्रियांची वाट पहात आहे..

ता.क.: 'माईमो' वरून थेट 'माती'त आणून आदळ्याबद्दल 'ट्रॉयजन'चे विशेष आभार.

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

योगी९००'s picture

22 Mar 2010 - 7:35 pm | योगी९००

मी Nokia N900 वापरतो. झाले बहू होतील बहू परी या सम हाच..internet browsing exp is tooooo gooood. Only mobile which supports flash in browser.

तुम्ही दिलेले सगळे features + multitasking .

3D गेम performance पण उत्तम..It supports openGL embedded version.

Actually this is not phone but this is mini computer.

नवीन platform असल्याने काही bugs आहेत. काही दिवसात solve होतील अशी अपेक्षा आहे.

खादाडमाऊ (योगी९००)

मीनल's picture

23 Mar 2010 - 3:04 am | मीनल

यातील कुठले फोन अमेरिकेत वापरता येतात?
नोकियाचे काहीच मॉडेल इथे चालतात.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

प्रमेय's picture

23 Mar 2010 - 8:35 am | प्रमेय

मी नोकिया N900 आणि Moto Droid दोन्ही साठी स्वतः काम केले आहे (Dev team). दोघेही TI OMAP3430 वापरतात. त्यामुळे RAM size वर performance सगळ्यात जास्त अवलंबून आहे!
Milestone is GSM Droid! Not much difference in software!
आणि N900 ला अजून रूळायला वेळ लागतो आहे!
Nokia ने maps n navigation फुकट केले असले तरी N900 अजून ते पूर्णपणे वापरू शकत नाहिये! वाट बघावी लागेल! Symbian to Linux switch केल्यामुळे हा वेळ लागतो आहे!
या विरूध्द Milestone हा पुढे जाउन latest Android support करेल, त्यामुळे Moto अजून सरस होइल!
Browsing experience हा N900 वर बेस्ट आहे, + पुढे जाउन free navigation येइल. पण भारतात पूर्णपणे वापरता येइल की नाही शंका आहे!
Multitasking N900 मध्ये जास्त चागंल्याप्रकारे implement केले आहे!

वरील सर्व विचार करता, Milestone हा उजवा वाटतोय पण nokia चे स्वतःचे खूप फायदे आहेत!
माझी निवड N900!

Nokia प्रेमी,
प्रमेय

digitalmavala's picture

25 Mar 2010 - 1:29 am | digitalmavala

तुम्हाला खरच फोन घ्यायचाय काहो?
नाहि म्हनजे तुम्हि प्रश्न विचार्ताना वाट्ता तेवढे काहि ढ नाहि.
आनि तुमच्या अटि अग्दि कोढयासारख्या .
बर तुमच उत्तर.
मेघवेडा म्हनतो कि Nokia, sony अजुन बच्चे आहेत. त्याला म्हनाव जरा
nokia चि E-series and Sonyericsson चि P -series आठ्व. bestselling आहेत.
माझा सल्ला आहे Sonyericsson Xperia X10.
खुश होउन जाल.

मोहन's picture

25 Mar 2010 - 9:45 am | मोहन

आय फोन का नको? भारतात चालत नाही का?
मोहन

आशिष सुर्वे's picture

25 Mar 2010 - 12:55 pm | आशिष सुर्वे

तुम्हाला खरच फोन घ्यायचाय काहो?
>> चांभारचौकशा करण्याची माझी इच्छा नसते आणि वेळही..

नाहि म्हनजे तुम्हि प्रश्न विचार्ताना वाट्ता तेवढे काहि ढ नाहि.
>> माझी बुद्धि मापल्याबद्दल धन्यवाद!!

आनि तुमच्या अटि अग्दि कोढयासारख्या .
>> असते एकेएकेकाची आवड!!

बर तुमच उत्तर.
मेघवेडा म्हनतो कि Nokia, sony अजुन बच्चे आहेत. त्याला म्हनाव जरा
nokia चि E-series and Sonyericsson चि P -series आठ्व. bestselling आहेत.
माझा सल्ला आहे Sonyericsson Xperia X10.
खुश होउन जाल.

>> आपले अतिशय आभार..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

आशिष सुर्वे's picture

6 Apr 2010 - 9:42 am | आशिष सुर्वे

मित्रहो, आपल्या सर्वांच्या मदतीबद्दल अन् सल्ल्यांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..
लव अ‍ॅट फर्स्ट साईट च्या न्यायाने, मी ''Sony Ericsson Xperia X10i'' घेतला.. अहो काय सांगू, जेव्हा हा मोबाईल मी हातात घेतला, तेव्हा माझी अवस्था.. ''ती पाहताच बाला.. कलिजा खलास झाला'' अशीच झाली..
तंत्र आणि सुंदरता ह्यांचा अप्रतिम संगम आहे ह्यात!!

आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..