एकापेक्षा एक ....झी मराठी नृत्यस्पर्धा...जय महागुरु...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in काथ्याकूट
7 Apr 2008 - 12:15 am
गाभा: 

आम्ही आधी ही स्पर्धा की काय आहे ते अजिबात पाहत नव्हतो...पण गेले पाच सहा भाग आम्ही घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर पाहिले...
जूरींनी एक वाक्य बोलायचे, महागुरूंनी स्वत:च्या कौतुकाची २० वाक्ये बोलायची आणि बान्देकरांनी निरर्थक १५ वाक्ये बोलायची, मधून मधून डान्स...असा हा कार्यक्रम आहे...

सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून ( 'अशी ही बनवाबनवी'चे आम्ही प्रचंड फ्यान आहोत आणि राहू...)आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील... ( इथे तर काय, सतत महागुरु आले, महागुरू गेले, महागुरु उठले , महागुरु बोलले, महागुरूंनी कौतुक केले...)हा माणूस नृत्यामधला महागुरू ?? बासच...
स्वत:च प्रोड्यूसर आणि स्वत:च डिरेक्टर असताना त्याच शो मध्ये स्वत:चे इतके कौतुक करून घेण्याचे कारण मला कळत नाही.... यांना कोणी मराठी थोर नृत्यदिग्दर्शक किंवा नर्तक मिळाला नाही काय???( आहेत , काही जूरी आहेत...असून नसल्यासारखे ... त्यांच्या कॉमेंट्स एका वाक्यात गुंडाळायला लावतात...)

आणि महागुरु स्वतः मात्र प्रत्येक कॊमेन्ट मध्ये प्रचंड फ़ूटेज खातात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे बघत एक वाक्य बोलून टाळ्या वाजेपर्यंत थांबणार, मग त्या कस्टमरी टाळ्या वाजणार, मग महागुरू पुन्हा ऐटीत डावीकडे उजवीकडे पाहणार, मग म्हणणार, " ..नाही , म्हणजे मला डीटेल्स कळत नाहीत, पण तू अन्तर्‍याच्या सुरुवातीला एक स्टेप मिस केलीस आणि विसरलीस , ऎम आय राईट?? " मग पुन्हा डावीकडे मग उजवीकडे लूक.... पुन्हा टाळ्या....
मग ..." मी जेव्हा बाईच्या वेषात डांस केला होता तेव्हा ....." ही ष्टोरी सांगून सम्पली की ..." कारण स्त्री ही देवतेसारखी असते , नारीची पूजा केली जाते तेथे ...." छापाची वाक्ये ..मग पुन्हा टाळ्या....पुढल्या वेळेला त्यांच्या लहानपणाची गोष्ट...टाळ्या टाळ्या....
ज्याची बॅट आणि बॉल असतो तो पोरगा तीन चार वेळा आउट होउनही परत बॅटिंग करतोच, तसं वाटतं हे पाहताना....

बान्देकरांचे एक कौशल्य बाकी मस्तच आहे, ते जोक करायचा प्रचंड प्रयत्न करतात....पन्धरा वीस प्रयत्नांनंतर त्यांना दीड तासांत एखादा जोक जमून जातो...काय चिकाटी आहे...!!! त्यांच्या जोक वरचे हशे एडिटिन्ग मध्ये इन्सर्ट करावे लागत असणार...बर्‍याचदा वाक्यरचना चुकल्यामुळे आणि टायमिंग चुकल्याने त्यांचे जोक फ़सतात, आणि स्पर्धकाला कसनुसं हसावं लागतं. ( ते तरी काय करणार बिचारे?) त्यांचे फ़सलेले जोक एडिट का करत नाहीत?? इतके जोक फ़सतात की एडिट तरी किती करणार म्हणा...( सचिन ने बान्देकरांचे कॉमेडी टायमिंग बद्दल क्लासेस घ्यावेत)...हा व्यवस्थित स्क्रिप्ट नसल्याचा परिणाम आहे... ( ऐन वेळी होते ती फक्त फजिती... पी .एल.)

पुढल्या वेळी सचिन आणि बान्देकर या दोन मंडळींनाच या स्पर्धेतून हाकलले तर स्पर्धा अधिक प्रेक्षणीय होईल....

कोण स्पर्धक आला आणि कोण गेला, कसा नाचला, यात आम्हाला स्वारस्य नाही परंतु या कार्यक्रमामुळे सचिन यांच्याबद्दलचा आदरभावाला धक्का निश्चित लागला....

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

7 Apr 2008 - 12:31 am | इनोबा म्हणे

सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )
मलाही हाच प्रश्न पडला होता.

महागुरु स्वतः मात्र प्रत्येक कॊमेन्ट मध्ये प्रचंड फ़ूटेज खातात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे बघत एक वाक्य बोलून टाळ्या वाजेपर्यंत थांबणार
अगदी अटलबिहारींच्या भाषणासारखे...

ही ष्टोरी सांगून सम्पली की ..." कारण स्त्री ही देवतेसारखी असते , नारीची पूजा केली जाते तेथे ...." छापाची वाक्ये ..मग पुन्हा टाळ्या....पुढल्या वेळेला त्यांच्या लहानपणाची गोष्ट...टाळ्या टाळ्या....
चित्रपटात इतका छान अभिनय करणारा हा माणूस... पण या कार्यक्रमात इतका नाटकी वाटतो की,अगदी नकोसा होतो.

पुढल्या वेळी सचिन आणि बान्देकर या दोन मंडळींनाच या स्पर्धेतून हाकलले तर स्पर्धा अधिक प्रेक्षणीय होईल....
त्यापेक्षा मी तो कार्यक्रम बघणेच बंद केलेय.

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2008 - 2:41 pm | भडकमकर मास्तर

....हा माणूस या कार्यक्रमात इतका नाटकी वाटतो की,अगदी नकोसा होतो.
अगदी खरंय.... १०० % नाटकी...

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2008 - 12:43 am | भडकमकर मास्तर

त्यापेक्षा मी तो कार्यक्रम बघणेच बंद केलेय.
हे सर्वात योग्य...
:)))))

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Apr 2008 - 7:10 am | llपुण्याचे पेशवेll

आता हा आदेश बांदेकर 'ताक् धिना धिन' मधे चांगले सूत्रसंचालन करीत असे. आता मात्र एकदम माज करत असतो त्या कार्यक्रमात येऊन.. आणि या सर्व कार्यक्रमातील लोकाना मराठीचे वावडे आहे का असे वाटते. एका वाक्यात ४ इंग्रजी शब्द नाही वापरले तर फाऊल मानला जातो इथे.... अगदीच चीड येणारे कार्यक्रम झाले आहेत ते सगळे.

पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 8:34 am | विसोबा खेचर

हे असे महागुरू, अजिंक्यतारा, इंडियन आयडॉल, वगैरेसारखे कार्यक्रम अत्यंत फालतू असतात! एसएमएस मुळे आणि सगळ्या बाजारूपणामुळे या वाहिन्यांनी हल्ली गायन, नृत्य यासारख्या कलांना त्यांच्या दारातल्या अक्षरश: बाजारबसव्या रांडा बनवल्या आहेत!

असो, काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल! कुठल्याही कलेतील उठवळपणा चार दिवसांवर टिकत नाही!

सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून

'हा माझा मार्ग एकला' हा सिनेमा सोडला तर सचिनने कधी अभिनय वगैरे केल्याचं मला तरी आठवत नाही!

असो!

भडकमकरसाहेब, लेख चांगला आहे!

तात्या.

मदनबाण's picture

7 Apr 2008 - 8:42 am | मदनबाण

एसएमएस मुळे आणि सगळ्या बाजारूपणामुळे या वाहिन्यांनी हल्ली गायन, नृत्य यासारख्या कलांना त्यांच्या दारातल्या अक्षरश: बाजारबसव्या रांडा बनवल्या आहेत!
एसएमएस पाठवुन जर कोणी विजेता बनणार असेल तर महागुरु आणि तज्ञ मंडळींची गरजच काय?

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2008 - 9:45 am | भडकमकर मास्तर

धन्यवाद तात्या,...
काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल! कुठल्याही कलेतील उठवळपणा चार दिवसांवर टिकत नाही!
हे अगदी खरे....
'हा माझा मार्ग एकला' हा सिनेमा सोडला तर सचिनने कधी अभिनय वगैरे केल्याचं मला तरी आठवत नाही!
हा हा हा .... :)))) .... हाणलाय जोरात.....बिचारा सचिन....
अवांतर : हा माझा मार्ग एकला हा सिनेमा सुद्धा आमचा आवडता आहे... राजाभाऊ झिन्दाबाद...

चित्तरंजन भट's picture

8 Apr 2008 - 10:58 am | चित्तरंजन भट

हे असे महागुरू, अजिंक्यतारा, इंडियन आयडॉल, वगैरेसारखे कार्यक्रम अत्यंत फालतू असतात! एसएमएस मुळे आणि सगळ्या बाजारूपणामुळे या वाहिन्यांनी हल्ली गायन, नृत्य यासारख्या कलांना त्यांच्या दारातल्या अक्षरश: बाजारबसव्या रांडा बनवल्या आहेत!

काय बोललास तात्या! एकंदरच ह्या तुफान माहितीयुगात समाजाचेच रंडीकरण फार झपाट्याने होते आहे. मराठीत एखाद्याला 'समाजाचे रंडीकरण' हा शब्दप्रयोग फार कठोर वाटल्यास त्याऐवजी "स्लटिफिकेशन ऑफ सोसायटी" वाचावे.

मनस्वी's picture

7 Apr 2008 - 11:33 am | मनस्वी

आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील...

स_भंशी सहमत

'हा माझा मार्ग एकला' हा सिनेमा सोडला तर सचिनने कधी अभिनय वगैरे केल्याचं मला तरी आठवत नाही!

तात्यांशी सहमत
त्याच्या पिक्चरमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत, सुधीर जोशी, वर्षा ऊसगावकरच नेहेमी भाव खाऊन जायचे! असे माझे मत आहे.

सचिन एक डायरेक्टर म्हणून ओके वाटतो. तरी नवरा माझा नवसाचा अगदीच सुमार दर्जाचा वाटला.

वर्षा's picture

18 Nov 2008 - 12:17 am | वर्षा

'नवरा माझा नवसाचा' हाही 'बरा' असं म्हणायची वेळ आली 'आम्ही सातपुते' बघितल्यावर. कृपया कोणीही हा चित्रपट पाहू नये.
बाकी 'गंमत जंमत', 'अशी ही बनवाबनवी' हे सचिनचे चित्रपट मात्र मला खूप आवडतात. कितीहीवेळा बघू शकेन. पण इथे कोणीतरी म्हणालं तसं सराफ-बेर्डे, वर्षा उसगावकर, सुधीर जोशी या मंडळींमुळेच हे चित्रपट जास्त लक्षात राहिलेत.

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2008 - 11:50 am | प्रभाकर पेठकर

सचिन तू तू मैं मैं चे दिग्दर्शन करायचा. तो शो बर्‍यापैकी चालला. सासू आणि सून - रिमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर - ह्यांच्या मनोरंजक (?) भांडणाची ही मालिका सुरुवातीला बरी होती पण पुढे पुढे तिचे च्युईंग गम करून टाकले. पण सचिनने पैसे बरे कमावले.

श्री. स्_भडकमकर आणि इतर प्रतिसाद दात्यांच्या प्रत्येक मताशी सहमत.

हे सो कॉल्ड रिऍलिटी शोज पाहण्यापेक्षा तोच वेळ मिपावर कारणी लावता येतो.

विजुभाऊ's picture

7 Apr 2008 - 12:11 pm | विजुभाऊ

हल्ली कोठे पहा कोठे ना कोठे पाच चॅनेल मागे साडे तीन चॅनेल वर नाच काम चालले असते......सव्वा वर गाण्याच्या स्पर्धा असतात...
हे कमीच असेल तर ढु** हलवत नाच तर असे सुरु असतात् की त्या व्यतिरिक्त मानवी शरिरात इतर अवयव नाहीतच.
टी व्ही लोकांची आवड ठरवतो की लोक स्वतः स्वतः ची आवड ठरवात.
य बाबतीत मला एक कथा माहीत आहे...
ती पुण्यमुम्बैस्कन्द पुराण या ग्रन्थात आहे. भविष्यात केंव्हा तरी विजुभाऊ नामक ‍ॠषी झाले त्यानी हे गिर्वाण नागरी पुराण लिहीले
ती कथा अशी
ईश्वर आणि विज्ञान् यांच्यात एकदा
विज्ञानाने जेंव्हा ईश्वराला सांगितले की देवा मी तुझ्या वर मात केली आणि मनुष्याला मी दूर वीक्षेची कला देउन टाकली आहे. मानवला टी व्ही नामक यन्त्र दिले आहे.
तेंव्हा ईश्वर हसुन म्हणाले तुझे बरोबर आहे.तु ती विद्या मनुष्याला दीली. पण मनुष्य त्याचा वापर निरुपयोगी कामा साठी करेल.
तेंव्हा विज्ञान म्हणाले की मी यावर ही तोडगा काढेन्... विज्ञानाने मग रिमोट नामक अमोघ अस्त्र बनवले हे अस्त्र दूरुनच टी व्ही यन्त्रावर नियन्त्रण करत असे.
ईश्वर हे पाहुन पुन्हा हसला आणि म्हणाला ...........
विज्ञाना हुशार आहेस्........पण शहाणा नाहीस्.....ते रिमोट यन्त्र ;वापरायचे असते याचाच मानवाला विसर पडेल हे मला माहीत आहे.
तात्पर्य : ( मि पा कर हुशार आहेत ...शहाणे ही आहेत ...........ते अशावेळी सरळ जाला वर मिपा ला भेट देतात)
!! संदर्भः ‍ॠषी विजुभाऊ कथीत पुण्यमुम्बै पुराण सप्तम स्कन्द अध्याय सदतीस श्लोक २८ !!

नसनखवडी's picture

7 Apr 2008 - 11:58 am | नसनखवडी

सुन्दर दिसनार्‍या सुप्रियाताईला गटवनं हे एकच बरं काम केल सचिनभावनी.

प्रियाली

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2008 - 12:05 pm | प्रभाकर पेठकर

सुप्रिया ही सचिनच्या आईची निवड आहे असे सुप्रियाच्या मुलाखतीत ऐकले होते. कुठल्या तरी लग्नात सचिनच्या आईने सुप्रियाला पाहिले होते.

तिचे लग्न ठरले तेंव्हा सचिन-सारिका ही ताराचंद बडजात्याची जोडी फॉर्मात होती. सुप्रिया आपल्या मैत्रिणींना अभिमानाने सांगायची 'माझे लग्न ठरलेय, सचिनशी. अग! होऽऽ तोऽऽऽच सचिन- सारिकातला सचिन.'

देवदत्त's picture

9 Apr 2008 - 10:48 pm | देवदत्त

सुप्रिया ही सचिनच्या आईची निवड आहे असे सुप्रियाच्या मुलाखतीत ऐकले होते. कुठल्या तरी लग्नात सचिनच्या आईने सुप्रियाला पाहिले होते.
मी ऐकल्याप्रमाणे नवरी मिळे नवर्‍याला चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे प्रेम जमले व त्यानंतर त्यांनी लग्न केले.
असो.. ही मालिका पाहत नाही त्यामुळे काही टिप्पणी नाही.

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 12:05 pm | विसोबा खेचर

प्रियाली?? :)

काय? नांव बदलून 'प्रियाली'च्या नांवाने निरोप लिहायला ज्ञानेश्वरदादांनी शिकवलं वाटतं?! :)

असो! चालू द्या,चालू द्या तुमचे पालथे धंदे! फक्त तात्याला किंवा मिपाला सुधरवायच्या गोष्टी करू नका म्हणजे झालं! तात्या तुम्हा सगळ्यांचं बारसं जेवलेला आहे! :)

Thx to Misalpav's False Account Detector! :)

असो, आता निघायला हवं! ज्ञानेश्वरीवर प्रवचन ऐकायला जायचं आहे! म्हणजे मग पुन्हा सभ्यतेची झूल पांघरायला आम्ही मोकळे! :)
(स्वगत!)

तात्या.

प्रियाली's picture

7 Apr 2008 - 4:47 pm | प्रियाली

काय? नांव बदलून 'प्रियाली'च्या नांवाने निरोप लिहायला ज्ञानेश्वरदादांनी शिकवलं वाटतं?! :)

अहो, काही जळक्या बिब्ब्यांना प्रियालीला ठेचणे अद्याप शक्य झाले नाही त्यामुळे वय उतरली तरी पोरीसोरींना हाताशी धरून असले चाळे करत असतात.

Thx to Misalpav's False Account Detector! :)

बरं झालं कळवलं ते! नसनखवडीचं "लावण्य" बाहेर आलं.

विजुभाऊ's picture

10 Apr 2008 - 6:44 pm | विजुभाऊ

.

धमाल मुलगा's picture

7 Apr 2008 - 3:01 pm | धमाल मुलगा

खर॑ सा॑गायच॑ तर मला ह्या कार्यक्रमात नक्की काय घडत॑ हेच कळत नाही.

नव्या,ताज्या दमाच्या होतकरु कलाव॑तासाठी एक व्यासपीठ?
आदेश बा॑देकरा॑च्या फुटकळ विनोदासाठी नवी तजवीज?
हल्ली फारशी (?) काम॑ मिळत नसल्याने कॅमेर्‍यापुढे राहण्याची सचिनभौची धडपड?

पोरासोरा॑नी स्टेजवर येऊन आधी थयथयाट करायचा, न॑तर होम मिनिष्टर वाले साहेब येऊन उग्गाच त्या दमुन गेलेल्या जीवा॑ची माप॑ काढणार....अरे, जर माप॑ काढण्यासारखीच असतील ही पोर॑, तर घेता कशाला त्या॑ना?

त्यान॑तर सचिनशेठच॑ जोरदार भाषण...
आम्ही तर च्यायला, तो बोलायला लागला की घरभर 'रेबीज रेबीज' करत पळत सुटतो....कस्सला चावतो तो.

भडकमकर शेठ, पर्फेक्ट पकडल॑य!!!!

अवा॑तरः ते तुमच॑ नाटकाच॑ काय झाल॑ हो?

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2008 - 3:10 pm | भडकमकर मास्तर

आम्ही तर च्यायला, तो बोलायला लागला की घरभर 'रेबीज रेबीज' करत पळत सुटतो....कस्सला चावतो तो.
:))))... हे एक नंबर आहे....
अवा॑तरः ते तुमच॑ नाटकाच॑ काय झाल॑ हो?

मिसळपाव संमेलनादिवशीचे आमचे जुने नाटक अभयारण्य मस्त झाले... छोट्या प्रेक्षाग्रुहात ५० प्रेक्षकांची दाद म्हणजे मजाच आली... आपल्या शुभेच्छा होत्याच ना... :)
आणि नवीन नाटक का रे भुललासि मध्ये सध्या कलाकारांच्या आपापसातल्या मतभेदांमुळे अनिश्चित कालापर्यंत पुढे ढकलले आहे... हा हा हा....

धमाल मुलगा's picture

7 Apr 2008 - 3:31 pm | धमाल मुलगा

मिसळपाव संमेलनादिवशीचे आमचे जुने नाटक अभयारण्य मस्त झाले... छोट्या प्रेक्षाग्रुहात ५० प्रेक्षकांची दाद म्हणजे मजाच आली...
वा वा!!! अभिन॑दन.
वेळ नाही जमली आपली! नाहीतर आवर्जुन आलो असतो प्रयोगाला.

सध्या कलाकारांच्या आपापसातल्या मतभेदांमुळे अनिश्चित कालापर्यंत पुढे ढकलले आहे...
चालायच॑च. मराठी र॑गभूमी, त्यातून प्रायोगिक, आणखी काय असणार? आहे, कल्पना आहे काय होत॑ त्याची..

जाऊदे शेठ, आपण सध्या पुण्यात नाहीय्ये ना, म्हणून नायतर, आपणच उभे राहिलो असतो, क्काय?
( आणि तुम्हाला आमची स॑वादफेक, उत्तु॑ग अभिनयक्षमता इ.इ. पाहून झीट आली असती ही गोष्ट अलाहिदा. अडला हरी सुध्दा ह्या गाढवाचे पाय धरायला येणार नाही!)

अभिज्ञ's picture

7 Apr 2008 - 11:24 pm | अभिज्ञ

अतिशय चांगला लेख.माझे नशिब चांगले असावे म्हणून कि काय माझ्याकडे झी मराठी चॅनेल दिसत नाही.
तरी पण ह्या कार्यक्रमाचे २-३ भाग पाहिले आहेत.आपण म्हणताय ते तंतोतंत खरे आहे.

आजकाल टॅलेन्ट हंट च्या नावाखाली हे असले भयानक कार्यक्रम सर्वच चॅनेलवर
जोरात चालू आहेत.त्यात स्पर्धकांपेक्षा परिक्षक लोकच जास्त माज करताना दिसून येतात.
झी वरचा सा रे ग म पा हा कार्यक्रम तरी बराच बरा असतो.परंतु ह्या परि़क्षक लोकांच्याहि
संवादाचे काहि स्क्रिप्ट असते कि काय असा संशय ब-याच वेळा येतो.
चार आण्याची कोंबडि आणि बारा आण्याचा मसाला असाच एकंदर सर्व प्रकार.
सर्वच मराठी चॅनेल हे टुकार हिंदि चॅनेल्सची नक्कल करताना दिसतात.
चार दिवस ....,
त्या गोजिरवाण्या घरात.....
सारख्या टुकार मालिका मालिका तर बघवत नाहीत.इतक्या भानगडि होउनहि हे घर गोजिरवाणे कसे
काय असु शकते?
ज्या पध्दतिने आपण ह्या नृत्यस्पर्धेचे विच्छेदन केले आहे त्याच पध्दतिने ह्या असल्या वर्षानुवर्षे चालु असलेल्या टुकार मालिकांचे सुध्दा विच्छेदन वाचायला आवडेल.भडकमकर साहेब ह्या विषयावरहि एकदा असाच फर्मास लेख येउ देत.

अबब

भडकमकर मास्तर's picture

8 Apr 2008 - 10:02 am | भडकमकर मास्तर

वर्षानुवर्षे चालु असलेल्या टुकार मालिकांचे सुध्दा विच्छेदन वाचायला आवडेल.भडकमकर साहेब ह्या विषयावरहि एकदा असाच फर्मास लेख येउ देत.

कल्पना उत्तम आहे.. परंतु आम्ही मराठी डेली सोप पाहणे केव्हाच सोडून दिले आहे.... ( आम्ही तर अवन्तिका मालिकेत केलेली स्वतः ची टुकार भूमिका सुद्धा पाहिली नाही...) आणि वहिनीसाहेब नावाची एक भयन्कर मालिका चालू आहे असे ऐकतो.... आणि अवघाचि, सुखांनो या वगैरे ...आता म्हणाल नावे तर सगळी माहिती आहेत... तेवढीच माहिती आहे...

छोटा डॉन's picture

7 Apr 2008 - 11:32 pm | छोटा डॉन

मला पण मागच्या १०दिवसा पूर्वी घरी गेल्यावर "घरच्यांच्या आग्रहामुळे" हा कार्यक्रम बघण्याचा योग आला ...
डोकंच सणकल आपलं. अरे पाचळपणा करा [ आम्ही तरी दुसरे काय करतो] पण किती ?

मी एक नोटीस केलं आहे हं, जे जे मराठी कलाकार कुठल्या न कुठल्या शो च्या निम्मीत्ताने "हिंदी रिऍलिटी शो" चे पाणी चाखून आले आहेत त्यांच्यामधे एक नाटकीपणाचा नवा पैलू डेवलप झाला आहे. तुम्ही बघाना आजकाल "सुप्रीया, सोनाली कुलकर्णी, सचिन " कसा लाडालाडात बोलतो.
"सोनाली आणि सुप्रीयाचे बोलणे तर असे डोक्यात जाते की विचारू नका". तुमच्यातल्या कुणी "अदनान सामीच्या बोल बेबी बोल" हा कार्यक्रमातला "सचिन आणि सुप्रीयाचा" भाग जर बघितला असेल तर तुमच्या डोक्याला झीट येईल. अरे किती नाटकीपणा कराल ? जन्म इथच झाला ना? का थेम्सच्या काठावर किंवा गंगाकिनारी अलाहाबादला जन्मलात ? तो अदनान बिचारा यांना लायनीवर आणायचा प्रयत्न करत होता पण यांची गाडी सुटलीच होती ....

असले "ढोंगी" ड्युडपणाचे कातडे पांघरलेल्याला देव पण वाचवू शकत नाही ....
बाकी सचिनबद्दल म्हणाल तर आपण "तात्यांशी " सहमत आहे. बाकीचे पिक्चर म्हणाल तर अशोक सराफ, लक्ष्या, वर्षा, सुधीर जोशी होते म्हणून चालले.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर's picture

8 Apr 2008 - 9:56 am | भडकमकर मास्तर

मी एक नोटीस केलं आहे हं, जे जे मराठी कलाकार कुठल्या न कुठल्या शो च्या निम्मीत्ताने "हिंदी रिऍलिटी शो" चे पाणी चाखून आले आहेत त्यांच्यामधे एक नाटकीपणाचा नवा पैलू डेवलप झाला आहे.
हे बरोब्बर बोललास.....
मी बर्‍याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्रमात पुष्कळ जणांच्या डोक्यात जाताना दिसतो... सामान्यतः चॅनल जागरूक पणे फीड्बॅक ठेवत असते असा माझा समज आहे.... ( आपल्याला कितीही वाईट वाटणार्‍या मालिका दूरदूरच्या भागात उत्तम पाहिल्या जातात, त्यामुळे काही थोड्या लोकांसाठी ते इतका प्रेक्षकवर्ग सोडू शकत नाहीत ... असो.... म्हणजे ज्या अर्थी हा कार्यक्रम सतत चालू असतो ( नाचाचा) त्या अर्थी " सचिन किती छान कॉमेंट्स करतात नाही?".. बान्देकर तर " केवळ अप्रतिम " असे म्हणणारे लोक अस्तित्त्वात असणार्.... :)))) आनन्द आहे...

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Apr 2008 - 10:40 am | डॉ.प्रसाद दाढे

सगळ्या॑नी मस्त शाल जोडीतले हाणले आहेत सचिन-आदेश नामक बाष्कळ जोडीला :)
खर॑ म्हणजे सध्या चा॑गले स॑गीत, लेखन वगैरे निर्माण होत नाही व उपलब्ध असलेले जुने साहित्य वाचण्याचे कष्ट फार कोणी घेत नाही, मग आदेशभावजी॑च्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोट्या॑ना पोट धरून हसू फुटणारच.. जरा पुल, चिवि वाचा की भाड्या॑नो मग कळेल विनोद म्हणजे काय..
बाकी सध्या ह्या निरूद्योगी वाहिन्या॑मुळे अर्ध्या हळकु॑डात पिवळ्या झालेल्या तथाकथीत तज्ञा॑चे पीक फारच माजले आहे. एक-दोन अल्बम थोडे फार खपल्यावर स्वतःला ह्रदयनाथ समजणारे अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी त्यातलेच आहेत. मला कल्पना आहे की माझे विधान त्या॑च्या चहात्या॑ना आवडणार नाही पर॑तु परीक्षक बनण्यासाठी आवश्यक तो अनुभव, स॑गीताचे ज्ञान व एक॑दरीत मॅच्युरीटी यायला अजुन अवकाश आहे पण तेव्ह्ढा वेळ वाहिन्या॑ना कुठे आहे? (अवधूत गुप्तेच्या कॉमे॑टस ऐकून मला तर हसूच यायचे; विशेषतः देवकी प॑डीता॑च्या (खरोखरच्या) एक्सपर्ट कॉमे॑टसच्या तुलनेत..
वरील विधाने माझी वैयक्तीक मते आहेत व त्यामुळे कुणाची मने दुखावली असतील तर माफ करा पण सुधीर फडके, ह्रदयनाथ, यशव॑त देव, वस॑त प्रभू, राम कदम ह्या॑ना॑च मी महागुरू मानतो व त्या॑च्या स॑गितरूपी लखलखत्या प्रतिभासूर्यापुढे ह्या तथाकथीत स॑गीतकारा॑चे काम 'पानी कम' आहे. 'असा बेभान हा वारा' असो वा 'जिवलगा कधी रे येशील तू' असो, त्या॑च्या जवळपाससुद्धा पोहोचणारी एकही रचना एव्हढा टेक्निकल सपोर्ट हाताशी असता॑ना ह्या महागुरू॑ना जमत नाही ही खेदाची बाब आहे. परमेश्वर त्या॑ना प्रतिभेचे वरदान देवो..

विसोबा खेचर's picture

8 Apr 2008 - 11:16 am | विसोबा खेचर

पण सुधीर फडके, ह्रदयनाथ, यशव॑त देव, वस॑त प्रभू, राम कदम ह्या॑ना॑च मी महागुरू मानतो व त्या॑च्या स॑गितरूपी लखलखत्या प्रतिभासूर्यापुढे ह्या तथाकथीत स॑गीतकारा॑चे काम 'पानी कम' आहे. 'असा बेभान हा वारा' असो वा 'जिवलगा कधी रे येशील तू' असो, त्या॑च्या जवळपाससुद्धा पोहोचणारी एकही रचना एव्हढा टेक्निकल सपोर्ट हाताशी असता॑ना ह्या महागुरू॑ना जमत नाही ही खेदाची बाब आहे. परमेश्वर त्या॑ना प्रतिभेचे वरदान देवो..

लाख रुपये की बात! दाढेसाहेबांशी सहमत आहे...!

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

8 Apr 2008 - 4:02 pm | भडकमकर मास्तर

उपलब्ध असलेले जुने साहित्य वाचण्याचे कष्ट फार कोणी घेत नाही, मग आदेशभावजी॑च्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोट्या॑ना पोट धरून हसू फुटणारच..
अगदी योग्य बोललात...
परीक्षक बनण्यासाठी आवश्यक तो अनुभव, स॑गीताचे ज्ञान व एक॑दरीत मॅच्युरीटी यायला अजुन अवकाश आहे पण तेव्ह्ढा वेळ वाहिन्या॑ना कुठे आहे?
हे ही खरेच.... वाहिन्यांच्या अर्थकारणाचे गणित वाहिन्याच जाणोत्.....तरी अवधूत पेक्षा सलिल बरा असे आमचे वैयक्तिक मत आहे...पहिल्या पर्वात अवधूत एका गायिकेला म्हणाला होता की " तू चष्मा काढ, दुसरा घाल, तुझे डोळे दिसत नाहीत इ. .."... आता गाण्याची स्पर्धा होती की मिस इन्डिया व्हायची??
... आणि सारेगमप हा एकापेक्षा एक पेक्षा बरा कार्यक्रम आहे, इतकेच म्हणू शकतो.....( निदान त्यात प्रभाकर जोग यान्च्यासारखे गेस्ट जज तरी येतात...)
___________ वाहिन्यांवर सध्या इतकी सांस्कृतिक बोंबाबोंब आहे की हा कार्यक्रम यापेक्षा बरा, तो त्यापेक्षा बरा पण उत्तम कोणताच सापडत नाही , ही सत्य परिस्थिती...
<एक-दोन अल्बम थोडे फार खपल्यावर स्वतःला ह्रदयनाथ समजणारे अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी त्यातलेच आहेत.
असं कधी म्हणाले ते?? आश्चर्य आहे.... हे तुमचं बेष्ट आहे, आत्ता आलेल्या लोकांची एकदम एवढ्या मोठ्या माणसांबरोबर कशाला तुलना करताय राव?? मग एकदम बोलतीच बंद होणार ना !!! { इथे फरक बघा, सचिन स्वतःच्या कार्यक्रमात स्वतःलाच महागुरु म्हणवून घेतो, त्यामुळे तो जास्ती डोक्यात जातो}

समजा उद्या तुम्ही स्वतः सन्गीत देऊन भावगीतांची सीडी काढलीत आणि लोकांना ती तुफान आवडली की मग आम्ही समजा म्हणालो ," हॅ ,खळेसाहेब उत्तम सन्गीत देतात, ती मजा नाही दाढेसाहेबांच्यात..."...मग झोपलातच ना तुम्ही....कोणी नवीन काही करायलाच नको ...जे जुनं चांगलं आहे ते आहेच पण जुन्यात रमताना प्रत्येक नव्या गोष्टीला शिव्याच दिल्या पाहिजेत असे नाही, असं आपलं आम्हाला वाटतं.....
पण नव्या संगीतकारांनीसुद्धा नवनवीन उत्तम शोधायच्या प्रयत्नांत राहिले पाहिजे, प्रयोग करून पाहिले पाहिजेत...तरच काहीतरी नवीन तयार होईल... चांगलं आहे की नाही ते लोक आणि काळ ठरवेल...

गिरीराज's picture

8 Apr 2008 - 1:22 pm | गिरीराज

काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल! कुठल्याही कलेतील उठवळपणा चार दिवसांवर टिकत नाही!
... तात्यांचे म्हणणे अगदी खरे आहे... काळाच्या कसोटीवर जे चांगलं आहे ते नक्किच तावून सुलाखून बाहेर येइल आणि कचरा जळून जाईल!

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Apr 2008 - 10:57 pm | डॉ.प्रसाद दाढे

काळाच्या ओघात जे उत्तम असेल तेच टिकेल!
आजकाल स्वतःची सीडी काढणे काहीच अवधड नाही, मी जर तशी सीडी काढलीच तरी स्पर्धा॑ना परीक्षक बनण्याचे धारीष्ट्य (तेही देवकी प॑डीता॑सारख्या कसलेल्या व बुद्धीमान गायिकेच्या बरोबरीने?) मी निश्चीत दाखविणार नाही. वाहिन्या॑च्या बालीश निर्मात्या॑नी कितीही आग्रह धरला तरी माझी 'लेव्हल' मलातरी नक्कीच माहीत पाहिजे. 'अर्ध्या हळकु॑डात पिवळे होणे' हा वाक्प्रचार मी त्याचसाठी वापरला. अवधूतचे अथवा सलीलच्या स॑गीताची प्रत फडके- खळे॑च्या तुलनेचीआहे कि॑वा नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे पर॑तु स्वतःला एक्सपर्ट समजून अर्थहीन कॉमे॑टस देणे मलातरी हास्यास्पद वाटते. ते पद माझ्या मते खळेसाहेब, श्रीधरजी, जोगसाहेब, दशरथ पुजारी॑सारख्या मुरलेल्या व्यक्ती॑नाच शोभते.. मी येथे श्रीधर फडके॑चाही जाणून-बुजून उल्लेख केला आहे. ते वयाने पुजारी॑साहेबा॑एव्हढे मोठे नसले तरी त्या॑नी आत्तापर्य॑त दिलेल्या स॑गितातून त्या॑ना जोखता येऊ शकते. 'ऋतू हिरवाशी' 'जय जय महाराष्ट्राची' तुलना करू धजावशील काय?
तसे पाह्यला गेले तर सचिनही बरा नाचतोच की ('ही नवरी असली' हे गाणे व नाच मला आवडले होते) पण तेव्हढ्याने त्याला मराठीचा (अथवा 'गरीबा॑चा' :) बिरजूमहाराज म्हणणे धार्ष्ट्याचेच होईल. परीक्षकाचे पद मिळविण्यासाठी सचिनला अजून बरीच मजल मारणे आवश्यक आहे. माझे 'सारेगमप' बद्दल हेच मत आहे.
माझा नवीन गाण्या॑ना, स॑गीतकारा॑ना अजिबात विरोध नाही. पण मुळात प्रतिभेचे वरदान हवे आणि त्याबरोबर हवी प्रच॑ड मेहेनत, वाद्या॑चा अभ्यास, लोकस॑गीताचा मागोवा, प्रयोगशीलता.
तू प॑चम-मॅजिकचा कार्यक्रम पाहिला आहेस, त्या तीन तासा॑त मी वर दिलेल्या सगळ्या गोष्टी प॑चममध्ये एकवटलेल्या आपण पाहिल्या होत्या.. आणि मग तयार होतात 'कारवान' आणि 'तीसरी म॑झील' ! प॑चमच्या पहिल्या चित्रपटाची गाणीसुद्धा अफाटच होती (छोटे नवाब) त्यातही त्याचे कष्ट दिसून येतात. तसे कष्ट आपल्या पिढीने घेतले तर 'लक्षात राहतील' अशी गाणी आपणही देऊ शकू..

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 1:50 am | विसोबा खेचर

मी एकदा भीमण्णांच्या घरी त्यांची विचारपूस करायला, त्यांना भेटायला, नमस्कार करायला गेलो होतो. अण्णा जर मुडात होते. केव्हा आलात मुंबईहून? बसा घटकाभर, चहा घ्या! ते झी टीव्हीवालेही आता यायचे आहेत!

झी टीव्हीवाले कशाला येणार आहेत ते मला समजेना! मनाशी म्हटलं, असेल एखादा अण्णांचा इंटरव्ह्यू वगैरे! मी आपला नेहमीप्रमाणे त्यांचा मुंबईत आता पुढचा कार्यक्रम केव्हा आहे, कुठे आहे वगैरे जुजबी चौकशी करत होतो.

तेवढ्यात ती झी टीव्हीची मंडळी आली. नमस्कार-चमत्कार झाले, त्यांनी अण्णांना पुष्पगुच्छ वगैरे दिला. ती मंडळी कुठल्यातरी मेगा फयनलचे परिक्षक व्हाल का, असं अण्णांना विचारायला आली होती. अण्णांनी सुरवातीला मला ते शक्य होणार नाही असा एकदोनदा नम्रपणे नकार दिला. तरी ती मंडळी ऐकेचनात! शेवटी अण्णा त्यांना हसून म्हणाले, अहो अजून मलाच गाण्यातलं फारसं काही येत नाही! मीच अजून जमेल तसं शिकतो आहे. मग मी परिक्षक कसा काय होणार? तेव्हा मला क्षमा करा, परिक्षक वगैरे होण्याइतपत माझी पात्रता नाही!

शेवटी ती झी टीव्हीवाली मंडळी हात हलवत परत गेली! :)

तात्या.

व्यंकट's picture

9 Apr 2008 - 2:13 am | व्यंकट

ज्यांना येतं ते बोलत नाहीत आणि ज्यांना येत नाही ते खूप बोलतात ह्या अर्थाची अवधी मधे एक म्हण आहे; त्याची आठवण झाली.

व्यंकट

भडकमकर मास्तर's picture

9 Apr 2008 - 3:21 pm | भडकमकर मास्तर

आजकाल स्वतःची सीडी काढणे काहीच अवधड नाही, मी जर तशी सीडी काढलीच तरी स्पर्धा॑ना परीक्षक बनण्याचे धारीष्ट्य (तेही देवकी प॑डीता॑सारख्या कसलेल्या व बुद्धीमान गायिकेच्या बरोबरीने?) मी निश्चीत दाखविणार नाही. वाहिन्या॑च्या बालीश निर्मात्या॑नी कितीही आग्रह धरला तरी माझी 'लेव्हल' मलातरी नक्कीच माहीत पाहिजे.
हा मुद्दा एकदम मान्य...
'ऋतू हिरवाशी' 'जय जय महाराष्ट्राची' तुलना करू धजावशील काय?

नाही , शक्यच नाही...काहीतरीच काय?
माझा नवीन गाण्या॑ना, स॑गीतकारा॑ना अजिबात विरोध नाही.
हां.. आता कसं बोललात... तुमच्या आधीच्या उत्तरांत तसे वाटेना , त्यामुळे एवढेच जरा तपासून पहायचे होते .... काही अधिक उणा शब्द गेला असेल तर माफ करा.... :)

आंबोळी's picture

8 Apr 2008 - 11:10 pm | आंबोळी

व्वा दाढे साहेब.... फारच मुद्देसुद प्रतिक्रीया आहे.

हे रियालीटी शोज खरच किती रियल आसतात हे कोणाला माहिती आसल्यास क्रुपया येथे सान्गावे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Apr 2008 - 6:27 pm | डॉ.प्रसाद दाढे

वयाची साठी उलटलेले श्री. केर्सी लॉर्ड आपल्यापैकी काही जणा॑ना ठाऊक असतील, तरी थोडे त्या॑च्याविषयी- स्वतः स॑गीत स॑योजक (अरे॑जर) केर्सीजी॑ची ऍकॉर्डियन व ताल वाद्या॑वर विलक्षण हुकुमत आहे. त्या॑नी अ॑गावर रोमा॑च उभे करणारे ऍकॉर्डियन पीसेस 'रूप तेरा मस्ताना', 'रूत जवा' 'अच्छाजी मै॑ हारी','बार बार देखो' इ. गाण्या॑मध्ये वाजविले आहेत. शिवाय 'ओ हसीना झुल्फो॑ वाली', 'तुमने मुझे देखा' (तीसरी म॑झील) ह्या गाण्या॑मधील धुमाकूळ घालणारा ड्रम वाजविला आहे. पाश्चात्य स॑गीत लिपीचा महान तज्ञ असलेल्या केर्सीजी॑नी प॑चमदा, मदन मोहन (तुम जो मिल गये हो' चे अप्रतिम स॑योजन) इ. बरोबर खूप काम केले आहे.
तुम्ही म्हणाल ह्या सगळ्याचा इथे नक्की काय स॑ब॑ध आहे? कटू सत्य असे आहे की एव्हढा महान कलाकार सध्या सक्तीचे निवृत्त आयुष्य जगत आहे. त्या॑च्यापाशी ज्ञानाचे प्रच॑ड भा॑डार असले तरी सध्याचा एकही स॑गीतकार वा बजवय्या त्या॑च्याकडे शिकायला जात नाही. त्या लोका॑नी खरोखरच दिवस-रात्र एक करून मेहेनत पिसली तेव्हा अशा अजरामर रचना बनल्या. दुर्दैवाने माझ्या पिढीचे लोक एव्हढी तोशीस जिवाला लावून घ्यायला तयार नाहीत. माझ्या बहिणीने जेव्हा केर्सीजी॑ची मुलाखत घेतली ते॑व्हा हीच ख॑त बोलून दाखविली. खर॑ म्हणजे म॑दार आपण दोघेही हौशी सि॑थेसायझर वादक आहोत, आपण त्या॑च्या पायाशी बसून धडे घेतले पाहिजेत.

भडकमकर मास्तर's picture

9 Apr 2008 - 11:21 pm | भडकमकर मास्तर

खरंय यार.... आपल्या पिढीत फटाफट प्रसिद्धी, फटाफट पैसा हवा असणारी मंडळी फार....( कोणाकडेही शिकायला गेले की "मी टीव्ही वर कधी दिसेन ? " असले भंपक प्रश्न पालकही विचारतात गुरूला... माझ्या भावाच्या तबला गुरूंना एका मुलाने विचारले, " मला कधी तबला येईल? " ते उखडले, " ..जन्मभर घासली तरी येणार नाही...").....
मला माहित आहे की या विषयावर तू खरंच फार तळमळीने बोलतोस... उत्तमोत्तम गुरूंकडे तू वाद्यवादन शिकला आहेस, फार मजा आली होती तुझं वादन ऐकून...( आम्ही इकडे तिकडे पाहून पाहून थोडे थोडे वाजवणारे लोक... आमच्या नशिबी असेल तर उत्तम गुरू लाभेलही...)

उच्चैश्रवा's picture

10 Apr 2008 - 5:44 pm | उच्चैश्रवा

बांदेकरांना विनोदही करता येतो ?

धमाल मुलगा's picture

10 Apr 2008 - 5:53 pm | धमाल मुलगा

ठण्ण्ण्ण्ण्ण.......
एकच नंबर !!!

ह्याला म्हणतात, "सौ सुनार की, इक लुहार की"
उग्गाच फाफटपसारा नाही...एक वाक्य, आख्खी ११ जणांची टीम ० धावांत तंबूत परत!

उच्च...उच्चै...उच्चैश..ह्या: किती हे अवघड नाव हो! फाफललो ना मी.

उच्चैश्रवा, पुणे-३० का? एकदम मला घराच्या आसपास असल्यासारखं वाटलं.

डॉ.प्रसाद दाढे's picture

10 Apr 2008 - 6:12 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझ्या नशिबाने मला मोठ्या कलाकारा॑चे काम जवळून पाह्यला मिळाले आहे. स॑गीतकार दशरथ पुजारीसाहेब व प्रख्यात व्हायोलीन वादक रमाका॑तजी परा॑जपे या॑च्या पायाशी बसून थोडे-फार शिकता आले. तसेच मी 'आशाबा॑ई॑चे व श्रीधर फडके॑चे' एक रेकॉर्डी॑गही त्या॑च्या बाजूला उभे राहून पाहिले आहे.. विलास डफळापूरकर, सुराज साठे, मनोहारी सि॑ग, प्रभाकर जोगसाहेब यासारख्या थोर वादका॑नासुद्धा वाजवता॑ना मी खूप वेळा अगदी जवळून निरखू शकलो आहे. म्हणूनच खूप वाईट वाटते. असो, ईश्वरेच्छा बलियसी.. आशा करूया हि॑दी-मराठी चित्रपट स॑गीताचा तो सुवर्णकाळ पुन्हा येईल

आंबोळी's picture

18 Apr 2008 - 11:47 am | आंबोळी

एका पेक्षा एक हा कार्यक्रम मी कधीच पहात नाही. पण हा टॉपिक वाचुन त्या एका पेक्षा एक विषयी कुतुहल चाळवले होते. काल एक एपिसोड बघायची संधी मिळाली. पण तो सुध्धा मी पुर्ण पाहू शकलो नाही इतका बाचकळ पणा सुरु होता.
बान्देकरांचे संवाद : (एका मुलीने डोळ्यातून पाणी काढल्यावर) आले आले चिमणी लडली.... कावूची गोष्ट सांगू? चिमणी हाशली......

या नंतर महागुरूनी एक सॉलिड डॉयलॉग मारला.... "जिनके घर शीशे के हो..." वगैरे सारखा तो फारच खतरनाक वाटला म्हणून येथे देत आहे.

महागुरू: "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुध्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

(टाळ्या.... टाळ्या... वर कुणीतरी सांगितल्याप्रमाणे महागुरू डावीकडे मग उजवीकडे बघून टाळ्या स्विकारतात. क्यामेरा प्रेक्षक्,जुरी,बान्देकर्,नाचणारी मुले हे सगळे टाळ्या वाजवतायत हे दाखवून परत महागुरूंवर स्थिरावतो. टाळ्या शांत झाल्यावर महागुरू पुढचे वाक्य टाकतात)

"कारण जर तुम्हाला तहान लागली आसती तर तुम्ही नक्की फसला आसतात."

(टाळ्या.... टाळ्या... वर कुणीतरी सांगितल्याप्रमाण (..... कृपया वरच्या कंसातील वाचावे.... काही फरक नाही)...)

मनस्वी's picture

18 Apr 2008 - 11:56 am | मनस्वी

"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुध्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आजुबाजुचे जोरात गोल गोल फिरतंय असं वाटतंय.

भडकमकर मास्तर's picture

18 Apr 2008 - 3:07 pm | भडकमकर मास्तर

सगळे आधी पाठ करून ठेवलेले वन लाइनर.... नवज्योत सिधु पाठ करून यायचा नं म्हणी, आणि वाट्टेल तिथे बडबडायचा, तसेच हे....

मनस्वी's picture

18 Apr 2008 - 3:30 pm | मनस्वी

चिमणीने कानफटात मारली.

आंबोळी's picture

19 Apr 2008 - 11:42 am | आंबोळी

चिमणीने कानफटात मारली.

मनस्वी ताई हा टोला कळाला नाही.

मनस्वी's picture

21 Apr 2008 - 9:57 am | मनस्वी

बान्देकरांचे संवाद : (एका मुलीने डोळ्यातून पाणी काढल्यावर) आले आले चिमणी लडली.... कावूची गोष्ट सांगू? चिमणी हाशली......

असा गरीब विनोद मारल्यावर समोरची मुलगी बांदेकरला काय करेल..

भडकमकर मास्तर's picture

24 May 2008 - 3:21 am | भडकमकर मास्तर

मला महागुरूंबद्दल तीन गोष्टी सांगाव्याशा वाटतात...

१.बकवास

२.बकवास

आणि ३.बकवास..
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

24 May 2008 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर सहमत आहे तुमच्याशी... तुम्ही कालचा एपिसोड बघितलेला दिसतोय... त्यात 'महागुरू' असेच वदले होते.

बिपिन.

गुरुनाथ's picture

14 Jun 2008 - 11:09 am | गुरुनाथ

य कार्यक्रमात नाच कमी आणि रडणच जास्त झाल आहे. रोज कोण ना कोण तरी रडत असतो/ती . आणि घरच्याना तेच पहयच असत नाचा पेक्शा.

विट्ठल प्रभू's picture

14 Jun 2008 - 3:37 pm | विट्ठल प्रभू

ह्या कर्यक्रमाचे नाव हास्यसम्राट हवे. त्यातले मुख्य कलाकार सचिन आणि आदेश

भडकमकर मास्तर's picture

14 Jun 2008 - 4:17 pm | भडकमकर मास्तर

परवा कोण बाहेर जातो बघायला मी म्हटलं ,थोडा वेळ बघूया...
तर सचिनजींची बॅटिंग थांबता थांबेना.... "...गेल्या वेळी कसं कोणाला काढलं नाही, या वेळी कसं तसं जमणार नाही, मी कसा तसा स्ट्रिक्ट आहे,..." मग आदेशचा प्रश्न, "कोणी आजारी पडला तर काय? " मग उत्तर, " शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम"...मी कंटाळून उठलो... पण करमणूक मात्र पुष्कळ झाली...
मी एक पाहिलंय," ही सगळी कलाकार सेलेब्रिटी मंडळी एकमेकांना आणि महागुरूंना आदर दाखवायची खोटी गोग्गोड ऍक्टिंग छान करतात..."..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भाग्यश्री's picture

14 Jun 2008 - 10:14 pm | भाग्यश्री

ही सगळी कलाकार सेलेब्रिटी मंडळी एकमेकांना आणि महागुरूंना आदर दाखवायची खोटी गोग्गोड ऍक्टिंग छान करतात...

अगदी अगदी !! सगळे आदेश बांदेकरच्या बडबडीला तर किती बोर होतात हे त्यांच्या चेहर्यावरूनच कळते.. महागुरूंबद्दल काय बोलावे !! इतका डॉक्क्यात्त कध्धी गेला नव्हता हो तो !!! हा कार्यक्रम करून बांदेकर आणि पिळगावकरांनी होती नव्हती ती प्रतिष्ठा धूळिला मिळवलीय !!

हां, पण कार्यक्रम एकदम एन्टरटेनिंग हा!! मी आजकाल करमणूकीचा म्हणून बघत असते मुद्दाम ! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

स्वानन्द's picture

17 Nov 2008 - 7:43 pm | स्वानन्द

भडकमकर मास्तराना व समस्त मि.पा. कराना .........
महागुरू व प्रधान मन्त्री बान्देकर यान्ची बडबड टाळून फक्त मुद्द्याच बघायच असेल तर उत्तम उपाय म्हणजे झी २४ तास वरच पुनर्प्रक्शेपण बघणे. १५ ते २० मिनीटात काम तम्माम!!

कशाला ती बडबड ऐका आणि त्यावर डोकेफोड करा!!