'स्रोत' का 'स्त्रोत' ? : मदत हवी आहे

दिपोटी's picture
दिपोटी in काथ्याकूट
21 Mar 2010 - 8:38 am
गाभा: 

मंडळी,

सध्या एक लेख लिहीत आहे. तो लिहून झाल्यावर येथे प्रकाशित करीनच. त्याआधी एक मदत हवी आहे.

इंग्रजीतील 'source' या शब्दाला मराठी समानार्थी शब्द हवा आहे ... माझ्या मते 'स्त्रोत' (strot असा टंकलेला) हा शब्द बरोबर आहे पण ओळखीतल्या एका जाणकाराचे मत 'स्रोत' (srot असा टंकलेला) बरोबर आहे.

तेव्हा येथील जाणकार याचे निरसन करतील काय : 'स्रोत' का 'स्त्रोत' ?

माझ्या मते 'स्रोत' चा अर्थ 'झरा' (म्हणजेच 'stream') असा होतो तर 'स्त्रोत' चा अर्थ 'source' असा होतो ... पण अर्थात माझे मत चुकीचे सुध्दा असू शकते.

- दिपोटी

प्रतिक्रिया

Nile's picture

21 Mar 2010 - 8:46 am | Nile

(उर्जेचा) स्त्रोत(source) बरोबर. अर्थात मी जाणकार नाही म्हणा. :)

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2010 - 9:09 am | प्रकाश घाटपांडे

सरळ उगम म्हना म्हंजी वांधे व्हनार नाईत. अर्थात उगम म्हणजे स्त्रोत नव्हे अशा बौद्धिक चर्चा होतील
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नितिन थत्ते's picture

21 Mar 2010 - 11:01 am | नितिन थत्ते

स्रोत की स्त्रोत एवढेच हवे असेल तर स्रोत बरोबर असे वाटते.
घाटपांडेसाहेबांचा सल्ला उत्तम.

नितिन थत्ते

युयुत्सु's picture

21 Mar 2010 - 11:24 am | युयुत्सु

स्रोत बरोबर

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

अरुंधती's picture

21 Mar 2010 - 1:12 pm | अरुंधती

माझ्या मते स्रोत हा संस्कृत शब्द असून त्या ऐवजी उगम हा सुटसुटीत शब्द वापरावा. उद्गम, उपज हे शब्दही आहेत.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चिंतातुर जंतू's picture

21 Mar 2010 - 8:54 pm | चिंतातुर जंतू

हा संदर्भ पाहावा. स्रोत हा संस्कृत शब्द हिंदी आणि मराठीमध्ये वापरला जातो.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

संदीप चित्रे's picture

21 Mar 2010 - 9:28 pm | संदीप चित्रे

'स्त्रोत' (strot) हा शब्द योग्य आहे.

टारझन's picture

21 Mar 2010 - 9:42 pm | टारझन

सोत्र असा शब्द आहे !

धनंजय's picture

22 Mar 2010 - 5:42 am | धनंजय

स्त्रोत हा मराठी अपभ्रंश आता मानून घ्यावा का? कोणास ठाऊक.

अग्निहोत्र्यांच्या मराठी शब्दकोशात "स्त्र" अशी सुरुवात असलेला एकच मूळ शब्द आहे - "स्त्री".

तुम्हाला हव्या त्या अर्थाने "स्रोत" शब्द शब्दकोशात आहे.

अविनाश ओगले's picture

29 Mar 2010 - 9:36 pm | अविनाश ओगले

स्त्रोत असा काही शब्द कोशात आढळला नाही.
source साठी मराठीत स्रोत हा शब्द वापरला जातो.
मराठीत स्र (sr) ऐवजी स्त्र (str) अनेक ठिकाणी चुकीने वापरले जाते.
स्राव ऐवजी स्त्राव
सहस्र ऐवजी सहस्त्र