आपल्याला एकादी गोष्ट अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वाटत असते, पण इतराना वाटत नाही...आपल्याला स्वतःलाच त्याच गोष्टी कालान्तराने तश्या वाटेनाश्या होतात.....
तर हे अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे वाटणे म्हणजे काय गौडबन्गाल आहे बुवा?
खालील वाक्ये बघा :
१. पिकासो हा विसाव्या शतकातिल महत्वाचा चित्रकार होय...
२. मी पुष्कळ पैसा कमावला, पण त्याला काही अर्थ नाही......
३. तब्येत ठणठणीत असणे महत्वाचे.....
४. बाबारे, त्या पोरीच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे, त्यापेक्षा .....
५. मला त्यावेळी त्या गोष्टीच महत्व कळल नाही, पण आता पस्तावा होतो.....
६. या पुस्तकातला ( वा सिनेमातला वगैरे ) अमूक भाग महत्वाचा अहे........
७. आपल्या आयुष्यात खरोखर महत्वाचे काय आहे, हे जाणून घेणे महत्वाचे, त्यातूनच जीवन अर्थपूर्ण करता येइल.....
८. पैसा महत्वाचा, असे मानून त्याने एवढा पैसा मिळवला, पण आता तो अन्थरुणाला खिळून आहे, मग त्या पैश्याला काय अर्थ राहिला?......
९. आपल्याला सगळीकडे महत्व मिळावे, असे त्याला वाटत असते, त्याशिवाय त्याला कशातच अर्थ वाटत नही....
.........असो.......तर यावर काय म्हणता मण्डळी?
प्रतिक्रिया
20 Mar 2010 - 5:21 pm | वेताळ
हा खुपच महत्वाचा विषय आहे पण त्याला **चा अर्थ नाही.
वेताळ
20 Mar 2010 - 6:00 pm | राजेश घासकडवी
तुम्ही 'अर्थ' व 'महत्त्व' या संकल्पनांचा अर्थ व महत्त्व विचारताय... या अर्थ लावण्याच्या व महत्त्व ठरवण्याच्या प्रक्रियेचा हे उत्तर सांगण्यावर परिणाम होणार नाही का?
राजेश
20 Mar 2010 - 6:18 pm | चित्रगुप्त
ज्यातून आपल्याला भविष्यकालीन सुखाची आशा वाटत असते (मग तो भ्रम का असेना), ते आपल्याला त्या त्या वेळी महत्वाचे वाटत असते, आणी त्यात अर्थ आहे असे वाटते, हा एक भाग झाला, परन्तु या स्पष्टीकरणातून उदहरणार्थ "पिकासो हा विसाव्या शतकातिल महत्वाचा चित्रकार होय" वा "या पुस्तकातला ( वा सिनेमातला वगैरे ) अमूक भाग महत्वाचा अहे" असल्या विधाना चा उलगडा होत नाही....
20 Mar 2010 - 6:39 pm | देवदत्त
खरं तर आजकाल अर्थकारणालाच(पैशालाच) जास्त महत्व आहे. तुम्ही इतर गोष्टीला महत्व दिले तरी त्याला काही अर्थ नाही.
31 Aug 2020 - 6:42 am | चित्रगुप्त
दहा वर्षांपूर्वी या धाग्यात वाचकांना फारसा अर्थ वाटला नव्हता, आता बघूया याचे कितपत महत्व वाटते.
31 Aug 2020 - 8:12 pm | शशिकांत ओक
खर तर हा प्रश्न आपण कसा सोडवता आहात हे समजून घ्यायला आवडेल...