गाभा:
निर्लज्जपणाची हद्द!
"पुतळा उभारणीवर टीका करणार्यांना मी विचारते की, जिवंत माणसांचे पुतळे उभारू नयेत असं कुठल्या पुस्तकात लिहिलेय?" - इती (जिवंतपणी स्वतःचा पुतळा स्वतःच उभारणारी) मायावती
आपल्या देशात करदात्याच्या पैशाचा अपव्यय कधी आणि कसा होतो ह्याचं आणखी एक उदाहरण. मायावतीचा २०० कोटींचा हार .नुसता राग राग होतोय. तिकडे कुठल्यातरी गावात जेवण आणि कपडे मिळणार म्हणून चेंगराचेंगरीत लहान मुलं मरतात आणी इथे हे !!!
जाता जाता: जर युपीवाल्यांकडे इतका पैसा आहे तर मुंबईत कशाला येतात? का हा पैसा मुंबईतूनच तिकडे गेला आहे?? असं असेल तर आणखीनच तळतळाट!
प्रतिक्रिया
16 Mar 2010 - 1:06 am | विसोबा खेचर
ही मायावती म्हणजे साक्षात कैदाशीण आहे..कैदाशीण!
मला तर ती नेहमी अशोकवनात सीतेभोवती पहार्याला ज्या राक्षसीणी असतात ना त्यापैकी एक वाटते..
तात्या.
16 Mar 2010 - 11:58 am | केसुधिर
वा काय मस्त उपमा दीली. जाम आवडली.
16 Mar 2010 - 11:39 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
18 Mar 2010 - 12:22 pm | पांथस्थ
ती बरी....
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
16 Mar 2010 - 1:20 pm | चिरोटा
भारतात प्रत्येक राजकिय नेत्याला स्वतःचे ढोल पिटणे आवश्यक वाटते.मग त्या मायावती असोत वा जयललिता वा पवार. सर्वपक्षीय राजकारण्यांची 'एकमेका साह्य करु..' अशी भूमिका असते म्हणूनच ते असा निर्लज्जपणा करु शकतात.
मायावतींकडे पैसा आहे. जनतेकडे नाही. विदर्भातल्या/कोकणातल्या नेत्यांकडेही करोडोंनी माया आहे. तरीही तेथील जनता ही मुंबईत येतेच की!!
भेंडी
P = NP
16 Mar 2010 - 5:22 pm | विजुभाऊ
जर युपीवाल्यांकडे इतका पैसा आहे तर मुंबईत कशाला येतात
तो सगळा पैसा नेत्यांच्या कडे आहे म्हणूनच बीहार आणि यूपी मध्ये गरीबी जास्त आहे
16 Mar 2010 - 7:30 pm | शानबा५१२
हे सर्व फक्त गोंधळ माजवायला चालु आहे.
बोंबलतील आणि गप्प बसतील हे त्या बयेला माहीती आहे म्हणुन कोर्टाचे आदेश होउनही हत्ती 'बांधत' होती.
कोर्टाला पण फाट्यावर मारतात हे लोक..........आणि सामान्याना ते कोर्ट फाट्यावर मारते..च्यायचा%^$^*(
16 Mar 2010 - 8:06 pm | शानबा५१२
आपल्याला हे छोटे लेख खुप आवड्तात.....मराठे ते मोठं लिहु नका असच लिहा छॉट......
_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........
18 Mar 2010 - 12:48 pm | राजेश घासकडवी
अहो, एक कोटी एका मोठ्ठ्या बॅगेत कसेबसे मावतात याचं काही वर्षांपूर्वी प्रात्यक्षिक झालं. ही बया कितीही प्रचंड असली तरी असल्या दोनशे बॅगा एका वेळी गळ्यात बांधून घेईल हे विश्वास ठेवायला जरा 'जड' नाही का जात?
तुमच्या दुव्यावर हजाराच्या काही शे नोटांचा हार असं दिलंय. त्याचे दोनशे कोटी होत असते तर भारतातले निम्मे लोक फोर्ब्स ५०० लिस्टमध्ये नाही का येणार?
आजकालच्या राजकारण्यांना तीन चार लाख म्हणजे काहीच नाही...
राजेश