म्हणतात...अंनिस प्रणित विधेयकाचे बारा वाजले?
अंनिस वाल्यांच्या एका व्याख्येप्रमाणे, "उत्कटपणे कृतीशील झालेली विवेकशक्ती" म्हणजे 'श्रद्धा' - ती ज्याची जागृत झालेली तो पंढरीचा वारकरी हा सश्रद्ध आणि "मूल्य विवेक उन्नत करते" ती 'श्रद्धा' या दुसऱ्या व्याख्येनुसार समतेच्या लढ्याच्या विविध आघाड्यांवर वारसंप्रदायाने पुढाकार न घेतल्याच्या आरोपामुळे वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा जोपासतो ...नक्की काय?...
...निवाडा करताना भलेभले गोंधळलेले...
... महाराष्ट्र सरकारने अंनिस प्रणित विधेयकाला रद्द करून ... बारा वाजवले?...
...साईमहात्म्याने भारलेले सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असताना अंनिसची उरलीसुरली आशा धुळीला मिळाली ...
...आता मिपावर पहावे तर एक एकांना परामानस लेखनाची नवनवीन सुरसुरी वाढते आहे. 'करनी' काय! 'प्लँचेट' काय!...
... ओकांनी तर नाडीकथनाचे धुमारे फुटतायत हल्ली! ...
श्रद्धेचा कस लावणाऱ्यांनी अंनिच्या कार्याला लागलेल्या ग्रहणाची चिंता करावी असे वातावरण निर्माण होत आहे.
...काय चाललय काय या पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमित?
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
प्रतिक्रिया
15 Mar 2010 - 11:26 pm | वेताळ
दुसरे काय....
वेताळ
16 Mar 2010 - 9:36 am | कवितानागेश
अन्निसवाल्यान्चीच 'उत्कट क्रुतीशीलता' कमी पडते, कारन त्यन्चिइ त्यन्च्य 'विधेयकाच्या विवेकशक्तीवर' श्रद्धाच नाही.
बिच्चारे!
============
माउ
16 Mar 2010 - 2:51 pm | अप्पा जोगळेकर
अंनिस बद्दलची जळजळ बाहेर पडत्येय. कोणती मात्रा घेतली ?
16 Mar 2010 - 3:24 pm | टारझन
कोण अंनिस ?
-(स्वतःचं निर्मुलण स्वतः करणारा) IIबांबुरावII
16 Mar 2010 - 3:44 pm | विजुभाऊ
समाजात इतकी दुर्दैवी घटना घडत असताना त्या दुर्दैवाचे हसे उडवावे इतकी बौद्धीक पातळी खालावली असेल असे नव्हते वाटले
एखाद्या चांगल्या हेतूने प्रेरीत गोष्टीची "बारा वाजले " म्हणत जाहीर विटंबना उडवण्यात मजा घेणारे नक्की कोणत्या प्रवृत्तीचे असतील कोण जाणे?
16 Mar 2010 - 4:31 pm | तुका म्हणे
अगदी मनातला बोललात विजुभाऊ
"माझाच खरं" - का हा हटवादी पणा? कदाचित याचे कारण असुरक्षितपणाची जाणीव हे तर नसावं?
16 Mar 2010 - 5:14 pm | प्रकाश घाटपांडे
अंनिस व धर्मश्रद्धा हा नरेंद्र दाभोलकरांचा लेख वाचा. मिपावरच याची चर्चा झालेली आहे.नवीन वाचकांसाठी ही माहिती देत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
17 Mar 2010 - 6:57 pm | शशिकांत ओक
१२ वाजले यातील विषाद...
तो काय कारणांनी झाला त्यात काही त्रुटी असतील तर त्या कशा दुरुस्त करायच्या याचे याचे चिंतन करताना काही वैचारिक गोंधळ वाटला तो समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कुप्रथांतील अं नि कार्य हे सतत व्हायला हवे हे वेगळे सांगायला नको, टिंगल टवाळी करण्याचा उद्देश नाही. मात्र एकाच मापाने सर्व बाबी- घटना- तोलताना कधी कधी नाडी ग्रंथांसारख्या विषयाला कुप्रथा मानण्या आधी त्यांचा अनुभव घ्यावा असे माझे नम्र निवेदन आहे. आव्हान नाही. इतकेच.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत