गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in काथ्याकूट
16 Mar 2010 - 2:26 am
गाभा: 

गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी

आपण सर्व गुढीपाडवा, दिवाळी, होळी अशा एक ना अनेक सणांच्या वेळांना शुभेच्छापर पत्र, एस.एम.एस. पाठवीत असतो.
माझ्या मते, अशा संदेश सोबतच, आपला संदेश्याच्या शेवटी एक तळटीप म्हणून आपण:

१. 'विजेचा काटकसरीने वापर करा.',
२. 'वाहन चालविताना फोनचा वापर करू नका.',
३. 'अंधविश्वासाला बळी पडू नका.'
४. 'हुंड्याची मागणी करणे बेकायदा आहे.'

अश स्वरूपाचे सामाजिक संदेश टाकल्यास, दीर्घ कालावधीने का होईना, निदान काही लोकांच्या वागण्यात अंशतः तरी फरक पडेल.
माझ्या आशावादाला समर्थन मिळते कारण, बहुतांश लोक असे शुभेच्छापर संदेश आल्यावर तेच पुढे पाठवत असतात. त्यामुळे आपण जरी असे संदेश मर्यादित लोकांना पाठविले तरी त्याचा प्रसार वेगाने होईल.

मी स्वतः असे करतो व असे संधेश वारंवार पाठविल्या मुले निदान काही लोकांच्या मानसिकतेत तरी फरक पडेल असे वाटते.

कृपया याबाबतीत सर्वांनी मते मांडावीत.

--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, महाराष्ट्र.

प्रतिक्रिया

शुचि's picture

16 Mar 2010 - 4:19 am | शुचि

सूचना स्वगतार्ह आहे.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

विसोबा खेचर's picture

16 Mar 2010 - 9:33 am | विसोबा खेचर

१. 'विजेचा काटकसरीने वापर करा.',
२. 'वाहन चालविताना फोनचा वापर करू नका.',
३. 'अंधविश्वासाला बळी पडू नका.'
४. 'हुंड्याची मागणी करणे बेकायदा आहे.'

या सूचना चांगल्याच आहेत, आवडल्या..

नाडीसंदर्भातही एखादी सूचना असावी का? :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2010 - 10:06 am | बिपिन कार्यकर्ते

विना नाडी नाही गोडी.
ज्याच्या हाती नाडी तो भल्याभल्यांना गाडी.
नाडी दाखवा हजार रूपये मिळवा.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

16 Mar 2010 - 11:42 am | विसोबा खेचर

:)

केसुधिर's picture

16 Mar 2010 - 12:10 pm | केसुधिर

केसुधिर सुचना उत्तम आहेत.अमलात व आचरणात आणणे गरजेचे.

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 11:53 am | अरुंधती

अशा प्रकारचे शुभसंदेश/ शुभेच्छासंदेशही पाठवू शकता :

१. नववर्षाचे स्वागत करण्या उंच उभारू ऊर्जाबचतीची गुढी!
२. आनंदाची, जागृतीची गुढी उभारुनी द्या अंधश्रध्देला निरोप!
३. चैतन्याच्या गुढीस वाहन-साक्षरतेचे तोरण |
जीव आहे अनमोल त्याची ठेवा आठवण ||
४. लक्ष्मीच्या रूपात उजळते समृध्दीची गुढी |
कन्यांचाही आदर करुनी हुंडा-प्रथा मोडी ||

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अप्पा जोगळेकर's picture

16 Mar 2010 - 1:10 pm | अप्पा जोगळेकर

हेतू खरोखरचं उदात्त आहे. पण एक शंका आहे. सिगरेटच्या पाकिटावरच्या सूचनेमुळे सिगरेट पिणारे स्मोकिंग कुठे थांबवतात ? त्यापेक्षा मला असं वाटतं की हे सगळ शाळांमधून शिकवलं पाहिजे. म्हणजे नुसता भडिमार केला पाहिजे मुलांच्या डोक्यावर.

( आम्ही Dipankar च्या पंथातले. कृतीपेक्षा तोंड वाजवणे अधिक योग्य समजतो. )

इंटरनेटस्नेही's picture

16 Mar 2010 - 5:35 pm | इंटरनेटस्नेही

शुची ताई... धन्यवाद.

अरुंधती ताई.. अप्रतिम... creatitivity म्हणजे काय हे कोणी तुमच्या कडून शिकावे!

मा. तात्या... तुमची ही कोपरखळी मारण्याची स्टाइल आपल्याला जाम आवडते बर का..! चालू ठेवा!

श्री. ए जोगळेकर.. ह्म्म्म खरं आहे तुमचं..

के सुधीर.. धन्यवाद.

--
आपला,
इंटरनेटप्रेमी.

मी-सौरभ's picture

20 Mar 2010 - 12:34 am | मी-सौरभ

मला वाटत अश्यान शुभेच्छांची मजा निघून जाईल :?

ह्या गोष्टी इतर वेळी पन सांगता येतील....

-----
सौरभ :)
उदा. पाणी वाचवा, पारोसे रहा.....