नमस्कार मिपाकर!!!!!!!!!!!!!!!!!!!
बर्याच दिवसानी नवरोबाला पि़झ्झा बनवायची लहर आली,,,,,,, तेव्हा कालच्या विकांताचा मुहुर्त साधला आणि मस्त पि़झ्झा चापला,,,,,,, त्याची पा.क्रु. फोटोसहित ,,,,,, :>
रेसिपी नवरोबाकडून मि.पा. स समर्पित.
साहित्यः १. पि़झ्झा बेस (बाजारात तयार मिळतो)
२. चिज
३. टोम्याटो केचप
४. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो
५. अमूल बटर
६. चिमूटभर गरम मसाला, मीठ
१. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो एकदम बारीक चिरुन घ्या.
२. त्यामधे चिमूटभर गरम मसाला, मीठ आणि टोम्याटो केचप घालून एकजीव करून घ्या.
३. पि़झ्झा बेसवर बटर लावून गरम तव्यावर ठेवा म्हणजे थोडा ख्रिस्पिनेस येइल,त्यावर टोम्याटो केचप लावून घ्या आणि शेवटी त्यावर वरील मिश्रणाचा थर लावून घ्या.
४. ओवन मधे १५ मि. बेक करून घ्या म्ह्न्जे भाज्या पिझ्झा खाताना कचकच लागत नहीत, ओवन नसल्यास गॅसवर पॅनमधे झाकण ठेवून भाजावा,,,,, म्हणजे बेसची दुसरी बाजुही खरपूस होते. त्यानंतर त्यावर चिझचा थर देऊन अणि १० मि. ओवन अथवा गॅसवर ठेवुन द्या. चिझ मेल्ट झाले की पि़झ्झा खाण्यास रेडी,,,,,, :)
:)
प्रतिक्रिया
13 Mar 2010 - 2:52 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख, कॉलेजात असताना आई फ्राय पॅन मधे पिझा करत असे. चिरुन न घेता ति भाज्यांच्या गोल चकत्या करत असे, आठवण झाली :(
चुचु
13 Mar 2010 - 2:56 pm | शार्दुल
आमच्या ह्यांनी बनवलाय,,,,,,, :) तो नेहमी भज्या चिरुन घेतो,,,,
नेहा
13 Mar 2010 - 2:58 pm | दिपाली पाटिल
छान आहे झटपट पिझ्झा...जेव्हढ्या झटपट बनत असेल तेव्हढ्याच झटपट संपतही असेल...माझी आईपण फ्रायपॅनमध्ये बनवायची असाच पिझ्झा... एखादवेळेस उगाचच घरात बनवलेली नावडती भाजीपण टाकत असे...
दिपाली :)
13 Mar 2010 - 3:59 pm | बेसनलाडू
बे एरियात लॉरेन्स एक्सप्रेस वे वरील टेस्टी पिझ्झा अॅन्ड सब्स या दुकानात खास घरी बनवता येण्यासारखे, देसी पद्ध्तीचे पिझ्झा मिळतात. यावरील टॉपिंग्ज मध्ये छोले, बटर चिकन, साग, पालक-पनीर यांचा समावेश होतो व त्यांची नावेही शोले, हीरो, खलनायक, वीर-जारा अशी सिनेमांची आहेत! (यात नुकतीच ३ इडियट्स ची भर पडली आहे)
(चित्रपटप्रेमी)बेसनलाडू
माझ्या काकांच्या घरी पावभाजीची भाजी टॉपिंग्स म्हणून वापरली जाते. किंवा अगदी एखादी कोशिंबीरसुद्धा!
(घरगुती)बेसनलाडू
17 Mar 2010 - 5:14 am | शेखर काळे
थ्री इडियट्स पिझ्झा - रेड चिली, हालापिनो आणि बटर चिकन - सुन्दर !
13 Mar 2010 - 3:01 pm | शार्दुल
नावडती भाजी खायला घालण्याची,,,,,:)
नेहा
13 Mar 2010 - 3:03 pm | गणपा
एकदम सोप्पी सुटसुटीत कृती.
मस्तच.
आता करुन पहायलाच हवा :)
13 Mar 2010 - 3:13 pm | शार्दुल
:)
नेहा
13 Mar 2010 - 3:13 pm | शार्दुल
:)
नेहा
13 Mar 2010 - 3:07 pm | विसोबा खेचर
हम्म! पिझ्झा..!
आपण साला चार हात दूर..
बाकी चालू द्या..फोटू मात्र छान आलेत! :)
(पिझ्झा, बर्गर वगैरे मुळीच न आवडणारा) तात्या.
13 Mar 2010 - 3:11 pm | शार्दुल
हा होममेड पिझ्झा आहे,,,,,,, हट मधला नव्हे,,,, एकदा खाउन बघा,,, :)
नेहा
13 Mar 2010 - 3:14 pm | विसोबा खेचर
ठीके. तू स्वत: कर आणि बोलाव कधीतरी घरी! :)
13 Mar 2010 - 3:15 pm | शार्दुल
:)
नेहा
13 Mar 2010 - 5:02 pm | टारझन
सताठ पिझ्झा अजुन वाढव हो .. शार्दुल -- . ;)
खाईन खाईन .. आणि बाकी पार्सल नेईन :)
-(पिझ्झा बर्गर फुल्टु चापुन खाणारा) टार्या.
13 Mar 2010 - 5:11 pm | शार्दुल
नक्की बनवेन हो,,,,,, :)
नेहा
13 Mar 2010 - 7:50 pm | मदनबाण
पिझ्झा एकदम भारी झालेला दिसतो... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
13 Mar 2010 - 8:46 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
13 Mar 2010 - 9:06 pm | रेवती
हा आपला देसी पिझ्झा आहे. मस्त लागतो!
अमेरिकन (कि इटालियन?) पिझ्झ्याची चव अजिबात नसते. फार्फार आवडतो मला असा पिझ्झा! आणि तुझ्या पतिराजांना सांग ,"फोटू मस्त आलेत" म्हणून. आता मलाही पिझ्झा करावासा वाट्टोय पण आमच्या इथे पूर्ण बेक्ड बेस मिळतो, त्याची तशी चव येत नाही गं!
आणि भारतीय दुकानान मिळतो कि नाही माहीत नाही......बर्याच जणी तयार नान वापरतात म्हणे!
रेवती
16 Mar 2010 - 4:23 pm | कुंदन
नक्को रे बाबा...
16 Mar 2010 - 4:25 pm | गणपा
विकांती करुन पाहीला.
फक्कड जमला होता.
सामिशप्रेमी असल्याने थोडे फेरफार केले होते.
एक सचित्र झलक..
16 Mar 2010 - 6:01 pm | टारझन
बास... लै झालं ...... हा निघालो मी डॉमिनोज ला !
16 Mar 2010 - 5:41 pm | शार्दुल
मस्तच रे,,,,,,,, आता हा मी ट्राय करुन बघते,,,,:)
नेहा
16 Mar 2010 - 8:17 pm | मराठे
माझ्या आईने बनवलेल्या पिझ्झाची आठवण आली. तिने कधी पिझ्झा खाल्ला नव्हता फक्त चित्र बघितलेलं. तिला त्यात काय टाकतात तेही माहीत नव्हतं पण आमच्या आग्रहासाठी तिने बनवला होता. जे.के.बेकरी मधून "पिझ्झा पाव" आणला, त्यावर टॉमॅटो कॅचप पसरला, नंतर आदल्यादिवशी केलेली पावभाजी पसरली, वरून पुन्हा कांदा, कोथिंबिर वगैरे पसरलं. चिझ घरात नव्हतं (नसायचंच) मग तिने चक्क शिजवलेला बटाटा किसून टाकला.
पण त्या पिझ्झाची चव इथल्या इटालियन रेस्टराँपेक्षा जास्त चांगली होती हे जाणवतं.
17 Mar 2010 - 4:41 am | पिवळा डांबिस
६. चिमूटभर गरम मसाला
:)
पावभाजीची भाजी टॉपिंग्स म्हणून वापरली जाते. किंवा अगदी एखादी कोशिंबीरसुद्धा!
=))
......बर्याच जणी तयार नान वापरतात म्हणे!
=)) =))
आदल्यादिवशी केलेली पावभाजी पसरली, वरून पुन्हा कांदा, कोथिंबिर वगैरे पसरलं.
=)) =)) =))
चिझ घरात नव्हतं ... मग तिने चक्क शिजवलेला बटाटा किसून टाकला.
=)) =)) =)) =))
पण त्या पिझ्झाची चव इथल्या इटालियन रेस्टराँपेक्षा जास्त चांगली होती हे जाणवतं.
:''(
अरे बस, पुरे की! हसून हसून डोळ्यात पाणी आलं आता!!!!
=)) :''(
17 Mar 2010 - 4:55 am | Nile
+१ =)) =))
सगळं ठीक आहे हो मंडळी पण फक्त त्याला पिझ्झा म्हणु नका! ;)
17 Mar 2010 - 11:17 am | पर्नल नेने मराठे
=)) काका एकदा करुनच पहा ;).
चुचु
26 Mar 2010 - 4:53 am | नेत्रेश
भारतात पिझ्झाहट मध्ये सुद्धा असाच पिझ्झा मिळतो का?(बहुतेक नसावा).
बहुतेक भारतीयांना ईटालीयन / अमेरिकन चीझच्या चवीची सवय नसल्यामुळे परदेशी मिळणार पिझ्झा आवडत नसावा.
चीझ नसलेला पिझ्झा :) :) :) क्लासिक ...
17 Mar 2010 - 5:32 am | राजेश घासकडवी
हा पिझ्झा फारच सुंदर दिसतो आहे.
आत्तापर्यंत तयार मिळणाऱ्या पिझ्झा बेसचा माझा अनुभव चांगला नाही. जर घरी ओव्हन असेल तर मी आधी दिलेली पावाची कृती वापरून पावाची कणीक तयार करावी. (वाटते तितकी कठीण नाही - सर्व घटक एकत्र करून फूड प्रोसेसरमध्ये मळून घ्यायचे व फुगवत ठेवायचे) ती पहिल्यांदा पंचडाऊन करून झाल्यावर लाटून मग भाज्या वगैरे कापायला घ्याव्या - त्यावर टॉपिंग घालेपर्यंत फुगण्याइतका वेळ जातोच... मग ओव्हनमध्ये सुंदर भाजून घ्यावा. ताज्या बेसने पिझ्झाला जी चव येते ती वेगळीच.
अशा लाटलेल्या पिझ्झाच्या पोळ्या फ्रीज करून ठेवता येतात. त्या महिनाभर सहज टिकतात. तयार बेसपेक्षा स्वस्तही पडतील, व पाहिजे तेव्हा पिझ्झा करता येतो.
बाकी मी खाल्लेल्या पिझ्झ्यांमध्ये शिकागो स्टाईल पिझ्झाइतका सुंदर पिझ्झा जगात दुसरा कुठचाही नाही (इटलीतलाही नाही..)
राजेश
17 Mar 2010 - 1:18 pm | स्वाती दिनेश
बाकी मी खाल्लेल्या पिझ्झ्यांमध्ये शिकागो स्टाईल पिझ्झाइतका सुंदर पिझ्झा जगात दुसरा कुठचाही नाही (इटलीतलाही नाही..)
यातील इटलीतलाही नाही शी असहमत..
रोमच्या फोंटानाच्या तिथल्या रेस्टॉरंटमधला पिझ्झा लाजबाब, फिरेंझच्या लहानशा हाटेलातला अप्रतिम चवीचा पिझ्झा आणि आमच्या फ्राफुतल्या रोमेनो ह्या इटालियन पिझ्झेरियातला पिझ्झा.. ज्याला तोड नाही!
स्वाती
17 Mar 2010 - 1:32 pm | राजेश घासकडवी
अमेरिकेतला पिझ्झा व इटलीतला हे दोन वेगळे प्राणी असतात. खूप दूरचे नातेवाईक. सिंह आणि मांजरासारखे. काही मांजरं छान असतात, पण...
असो. शिकागो स्टाईल पिझ्झ्याबरोबर मी मोठ्याचा अजून थोडा मोठा झालो, त्यामुळे पार्शल आहे.
कधीतरी रेसिपी टाकेन...
राजेश
17 Mar 2010 - 1:42 pm | स्वाती दिनेश
अमेरिकेतला पिझ्झा व इटलीतला हे दोन वेगळे प्राणी असतात. खूप दूरचे नातेवाईक.
अमेरिकन वे ऑफ पिझ्झा आणि इटालियन पिझ्झा हे खूप वेगळे अस॑तात.
आणि भारतीय व्हर्जनही वाचले वरती ,ते तर ..
स्वाती
ता.क: रेसिपीची वाट पाहत आहे...
18 Mar 2010 - 9:28 pm | रेवती
रोमच्या फोंटानाच्या तिथल्या रेस्टॉरंटमधला पिझ्झा लाजबाब
नको, नको, स्वातीताई, त्रास होतो असं वाचून्......त्यापेक्षा पाकृ टाक ना!:)
रेवती
18 Mar 2010 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार
वा छान !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Apr 2010 - 1:23 am | इंटरनेटस्नेही
सही... !