अभिनंदन आणि हाबिनंदण

प्रदीप's picture
प्रदीप in काथ्याकूट
12 Mar 2010 - 5:30 pm
गाभा: 

अभिनंदन--- निर्धाराने पाठपुरावा करून २००२ सालच्या 'बाली बाँबिंग'मागील प्रमुख सूत्रधार दुलामतिन ह्या दहशतवाद्याचा शेवट केल्याबद्दद्ल इंडोनेशियन सरकारचे. गेल्या काही वर्षात हे सरकार दहशतवादाविरूद्ध अत्यंत निर्धाराने खंबीर पाऊले उचलत आलेले आहे.

हाबिनंदण-- आपल्या खंबीर सरकारचे. अलिकडे नक्शलवाद्यांनी केलेल्या (आणखी) एका हल्ल्यानंतर त्यांना टक्कर देण्याचा आपला निर्धार अजून बळावला आहे, असे त्याने जाहीर केले आहे, म्हणून. ह्यानिमीत्त, 'बच्चे लोग, ताली बजाओ!'

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2010 - 5:38 pm | बिपिन कार्यकर्ते

=D>

बिपिन कार्यकर्ते

इडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष युधोयोनोंनी ही बातमी अभिमानाने ऑस्ट्रेलियात जाहीर केली. ते तिथे शाही पाहुणे म्हणून सध्या गेलेले आहेत. बालीच्या हल्ल्यात ८०-९० टक्के लोक Aussies होते त्यामुळे या बातमीचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले.
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)

तिमा's picture

12 Mar 2010 - 8:37 pm | तिमा

आता मला समजला हाबिनंदण या शब्दाचा अर्थ!
आमच्याकडून पण टाळ्या या न**क सरकारला!!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

परवा एक विनोदी घटना घडली!
एका भारतीय वृत्तपत्रात (बहुदा इं.ए.) बातमी होती, "Terror attacks on our mission in Afghanistan will not bend our will." ती बहुतेक म. मो. सिं. यांची गर्जना होती.
आजच आणखी एका बातमीत वाचले की भारत अशा हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानमधील आपली उपस्थिती कमी करणार आहे.
म्हणजे एकदम घूम जाव!
डुर्रर्रर्रर्र...म्याँssssssव! उर्फ ट्यांव, ट्यांव फिस्स!
मी सर्वांना लिहिणार आहे असल्या ३-४ गोष्टींबद्दल.
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)

विकास's picture

12 Mar 2010 - 9:45 pm | विकास

आजच आणखी एका बातमीत वाचले की भारत अशा हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानमधील आपली उपस्थिती कमी करणार आहे.म्हणजे एकदम घूम जाव!

बाकी सहमत असलो, तरी येथे थोडे वेगळे आहे असे वाटते: अफगाणिस्तान मधील भारतीय नागरीकांना (civilians) तेथे राहू नये असे सुचवले गेले आहे. त्यात काही गैर नाही. मात्र भारताच्या दृष्टीने "गरज" असलेली प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भारतीय उपस्थिती कमी होईल असे वाटत नाही.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विकास's picture

12 Mar 2010 - 9:41 pm | विकास

हबिनंदणाशी एकदम सहमत!

का कोणास ठाऊक हे वाचून एक ऐकीव गोष्ट आठवली:

१९६३ साली आलेल्या छोटा जवान चित्रपटात गदीमांनी लिहीलेले आणि वसंत देसाईंनी स्वरबद्ध केलेले एक छान आणि प्रसिद्ध गाणे आहे, त्यातील प्रमुख शब्द आहेत, "जिंकू किंवा मरू". १९६२ नुकताच होवून गेलेला असल्याने, आचार्य अत्रे तिरक्या विनोदाने आणि खेदाने म्हणाले होते, "बहुतेक मरूच"

आशा करतो, की असले विनोद करायची वेळ आपल्या कुणावर येणार नाही...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मी-सौरभ's picture

14 Mar 2010 - 6:16 pm | मी-सौरभ

=D> =D> =D> =D>

-----
सौरभ