लग्नाचा वाढदिवस..कसा साजरा कराल...???

मोकाट वळू's picture
मोकाट वळू in काथ्याकूट
11 Mar 2010 - 11:41 pm
गाभा: 

राम राम मन्डळी,
लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करन्यासाठि आपल्या भन्नाट कल्पना सुचवा...!!!

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

11 Mar 2010 - 11:55 pm | ज्ञानेश...

<:P

शुचि's picture

12 Mar 2010 - 12:00 am | शुचि

(१) ती उठायच्या आत नाश्ता तयार करा.
(२) तिला गुलाबाची फुलं द्या.
(३) मस्त बीचवर जा.
(४) तिला वारंवार सांगा तिच्या येण्यानी आयुष्याला कसा नवा अर्थ आला आहे ते.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

शानबा५१२'s picture

11 Mar 2010 - 11:58 pm | शानबा५१२

दारु ढोसा.थोड्यावेळेसाठी विसरा की लग्न झालेय म्हणुन
आणि जा आनंद लुटायला 'दुसरी'कडे

Dhananjay Borgaonkar's picture

12 Mar 2010 - 12:43 pm | Dhananjay Borgaonkar

मेलो प्रतिक्रिया वाचुन...

=)) =)) =)) =))

चतुरंग's picture

11 Mar 2010 - 11:58 pm | चतुरंग

तरी 'मोकाट वळू'सारखे हिंडू नका! ;) (ह.घ्यालच)

(खुद के साथ बातां : रंगा, काय काय प्रश्न पडतात नै लोकांना, लग्नाचा पहिला वाढदिवस आहे तर विचारायचंय काय त्यात? छ्या..!! ~X( )

(बांधलेला वळू)चतुरंग

वाटाड्या...'s picture

12 Mar 2010 - 12:16 am | वाटाड्या...

'न विसरता' साजरा करा...

शुचि's picture

12 Mar 2010 - 12:17 am | शुचि

=))
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

संताजी धनाजी's picture

12 Mar 2010 - 10:15 am | संताजी धनाजी

विसरलात तर आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट मिळेल ;)
- संताजी धनाजी

शाहरुख's picture

12 Mar 2010 - 2:06 am | शाहरुख

श्री. वळूंना "भन्नाट" कल्पना हवी आहे..बीच, फुलं नी दारु काय घेऊन बसलाय ?
व्यनि करतो ;-)

शुचि's picture

12 Mar 2010 - 2:16 am | शुचि

ओ शाहरुख साहेब, आम्ही सांगीतलेली सूचना अंमलात आणली की दिवसाचा शेवट "भन्नाट" होणार ;)

समझा करो यार!!! ....... अनुभवी लोकांचं ऐकावं

***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

संदीप चित्रे's picture

12 Mar 2010 - 8:46 am | संदीप चित्रे

शुचि,
अग... लग्नाची पहिली अ‍ॅनिवर्सरी आहे ... दिवसाची सुरूवात, मध्य आणि शेवटही 'भन्नाट' व्हायला हवी... समझा करो यार ;)

इंटरनेटस्नेही's picture

12 Mar 2010 - 2:36 am | इंटरनेटस्नेही

माझ्या प्रामाणिक आणि सरळ (honest and frank) मतानुसार, लग्नाचा पहिलाच काय कोणताही वाढदिवस ती गोष्ट करून साजरा व्हावा जी गोष्ट सभ्य समाजात लग्नानंतरच करतात.

--
प्रामाणिक आणि सरळ,
इंटरनेटप्रेमी

शुचि's picture

12 Mar 2010 - 2:44 am | शुचि

या पुरुषी मेंटॅलिटी चा निषेध असो. आधी तिच्या भावनांना हात घाला आणि मग .. जाऊ द्या.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

इंटरनेटस्नेही's picture

12 Mar 2010 - 7:00 am | इंटरनेटस्नेही

शुची ताई कृपया गैरसमज करून घेवू नका. मी असे म्हणालो नाही की सहचारीणीच्या भावनांचा आदर करू नये म्हणून.
उलटपक्षी, जो पती आपल्या पत्नेच्या भावनांची कदर करीत नाही त्याला पतीच म्हणू नये असे माझे प्रामाणिक व सरळ मत आहे.

शुचि's picture

12 Mar 2010 - 9:49 am | शुचि

अहो मी वादा करता वाद घालतेय :)
सिरीअस्ली घेऊ नका.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

शेखर's picture

12 Mar 2010 - 9:52 am | शेखर

वाण नाही पण गुण लागला :)

रेवती's picture

12 Mar 2010 - 3:49 am | रेवती

हे पहा मो. व. साहेब, आपल्या सौंनाच विचारा ना! त्यांच्या काही कल्पना असतील वाढदिवस साजरा करण्याच्या......
आम्हाला विचारून काय साध्य होणार?

रेवती

Dhananjay Borgaonkar's picture

12 Mar 2010 - 12:47 pm | Dhananjay Borgaonkar

रवती तै बहुतेक त्यांना सरप्राईज द्यायच असेल म्हणुन ते नवीन नवीन कल्पना शोधत असतील.

सुनील's picture

12 Mar 2010 - 9:19 am | सुनील

पहिला वाढदिवस - पण कुणाच्या लग्नाचा? तुमच्याच .. की??

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तुका म्हणे's picture

12 Mar 2010 - 10:13 am | तुका म्हणे

पहिलाच न? अहो मग विसरा आणि काहीही विशेष करू नका.
पुढे आयुष्य भर विसरणार नाही तुम्ही कि लग्नाच्या वाढदिवसाला काय करायचं असत ते. आणि कुणाला विचारायची गरज देखील पडणार नाही. :)
ह. घ.

यातले काही करू शकता
- बायको साठी छान स्वतःच्या हातचे जेवण (येत असल्यास)
- रात्री रोमांटिक डिनर
- एखादी गाण्याची मैफल (आवड असल्यास)
- कुठे तरी लांब ड्राईव
- एखादे मस्त गिफ्ट (always works)

बाकी मला विचारलं तर, यातलं काहीही करण्यात वेळ "घालवू" नका

नावातकायआहे's picture

12 Mar 2010 - 11:14 am | नावातकायआहे

+१
:)) =)) =))
>>दारु ढोसा.थोड्यावेळेसाठी विसरा की लग्न झालेय म्हणुन

jaypal's picture

12 Mar 2010 - 12:04 pm | jaypal

मोकाट वळु अणि (गरीब गाय) तुम्हा दोघांना माझ्याकडुन लग्नाच्या १ल्या वाढ दिवसाच्या शुभेच्छा

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

Dhananjay Borgaonkar's picture

12 Mar 2010 - 2:23 pm | Dhananjay Borgaonkar

दोन दिवसांसाठी सौं ना घेऊन एखाद्या रम्य ठिकाणी जा.
(सुट्टी मिळत नसेल तर म्यानेजरला फाटयावर मारा.)

मस्त hotel बुक करा आणि दोन दिवस मजेत घालवा.
जेवण वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडु नका, ते नंतर कधीतरी.
(भांड्ण झाल्यास तिला मनवण्यासाठी वगैरे वगैरे..)

छानशी गिफ्ट(स) घ्या. एक गिफ्ट सकाळी द्या.
स़काळच्या गिफ्ट मधे शक्यतो ड्रेस नका देऊ. एखादी वस्तु वगैरे दिलीत तर उत्तम. म्हणजे कस की दिवसाची सुरुवात एकदम झकास.
गिफ्ट बरोबर एक गुलाबाच फुल किंवा बुके.

डिनरला जायच्या आधी दुसरी गिफ्ट.एक छानसा ड्रेस (सौं च्या आवडीनुसार आणि कंफर्ट लेवल बघुन).

एक रोंमँटीक डिनर विथ शँपेन:) डिनर बरोबर मधुर संगीत असेल तर उत्तम.

आठवणी साठवण्यासाठी कॅमेरा आवश्यक.

---------------------------------------------------
अनुभवी लोकांनी अजुन मार्गदर्शन करावे.

(अविवाहीत)धनंजय

Dhananjay Borgaonkar's picture

12 Mar 2010 - 2:27 pm | Dhananjay Borgaonkar

दोन दिवसांसाठी सौं ना घेऊन एखाद्या रम्य ठिकाणी जा.
(सुट्टी मिळत नसेल तर म्यानेजरला फाटयावर मारा.)

मस्त hotel बुक करा आणि दोन दिवस मजेत घालवा.
जेवण वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडु नका, ते नंतर कधीतरी.
(भांड्ण झाल्यास तिला मनवण्यासाठी वगैरे वगैरे..)

छानशी गिफ्ट(स) घ्या. एक गिफ्ट सकाळी द्या.
स़काळच्या गिफ्ट मधे शक्यतो ड्रेस नका देऊ. एखादी वस्तु वगैरे दिलीत तर उत्तम. म्हणजे कस की दिवसाची सुरुवात एकदम झकास.
गिफ्ट बरोबर एक गुलाबाच फुल किंवा बुके.

डिनरला जायच्या आधी दुसरी गिफ्ट.एक छानसा ड्रेस (सौं च्या आवडीनुसार आणि कंफर्ट लेवल बघुन).

एक रोंमँटीक डिनर विथ शँपेन:) डिनर बरोबर मधुर संगीत असेल तर उत्तम.

आठवणी साठवण्यासाठी कॅमेरा आवश्यक.

---------------------------------------------------
अनुभवी लोकांनी अजुन मार्गदर्शन करावे.

(अविवाहीत)धनंजय

टारझन's picture

12 Mar 2010 - 5:14 pm | टारझन

काय एकेक प्रतिसाद आलेत =))

रेवतीचाच तो काय सेन्सिबल आणि प्रॅक्टिकल प्रतिसाद ..

बाकी सगळे गोट्या खेळायला लावणारे .. =))
आता "हनिमुन कसे साजरे करावे ? " ह्यावरही धागे निघाल्यास आश्चर्य वाटू नये.

-(खजुरवाले) चंदन
आमच्यात साजरे करण्यासाठी वाढदिवसाची वाट पाहात नाहीत.

राजेश घासकडवी's picture

13 Mar 2010 - 4:54 am | राजेश घासकडवी

चेष्टा करत नाही, मनापासून सांगतोय. तुम्हाला येत नसेल तर प्राथमिक मार्गदर्शन इथे आहे. त्यात तुम्ही प्रथम कुठे भेटलात त्या ठिकाणच्या किंवा तिने कुठचे कपडे घातले होते याचे काही बारकावे घालता आले तर बघा. त्या दिवशी त्या वेळी ती काय म्हणाली, तुम्हाला का आवडली हे सांगण्याचा प्रयत्न करा.

शब्द वेडेवाकडे झाले तरी काही हरकत नाही भावणा महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. तिच्याविषयी तुमच्या प्रथम कल्पना काय झाल्या, अपेक्षा काय होत्या व त्याच्याही पलिकडे तुमचं नातं कसं गेलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करा. सगळं कवितेतच जमणार नाही, काही नुसतं लिहून, काही डिनरच्या वेळी तोंडी सांगा. भावणा महत्त्वाची.
तिच्या आवडीचं एखादं स्थळ, सिनेमा, ड्रेस, तिने बऱ्याच वेळा 'हे घ्यावंसं वाटतं पण फार महाग आहे' असं म्हटलेली वस्तु असं काहीतरी घ्या.

शुचिंनी दिलेल्या कल्पना चांगल्या आहेत, पुन्हा भावणा महत्त्वाची. किमान एक दिवस प्रत्येक क्षण तिच्यासाठी, मुद्दामून प्लॅन केलेला. व रोमॅंटिक कविता वगैरे... तुम्ही शेवट भन्नाट होण्याची काळजीच करू नका. लक्षात ठेवा ब्रेन इज द मोस्ट इरॉटिक ऑर्गन इन द ह्युमन बॉडी...

राजेश

शुचि's picture

13 Mar 2010 - 6:26 am | शुचि

खरं आहे ........ सेक्स टेक्स प्लेस बिटवीन टू इअर्स (कान)
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

विजुभाऊ's picture

13 Mar 2010 - 11:00 am | विजुभाऊ

सदस्यनाम "मोकाट वळू"....आणि धाग्याचे शीर्षक यांचा संबन्ध लागतो का याचा विचार एकद येऊन लै हसु आले ;)

अप्पा जोगळेकर's picture

13 Mar 2010 - 8:06 pm | अप्पा जोगळेकर

हे असले धागे नका हो काढत जाऊ. आमच्यासारख्या तरुण, होतकरु, अननुभवी आणि अविवाहित तरुणांसाठी काही उपयोग आहे का? काहीतरी चटकदार असू दे. म्हणजे आम्हाला मार्गदर्शन होईल.

शेखर काळे's picture

14 Mar 2010 - 9:26 am | शेखर काळे

तुझे तू .. माझे मी