एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत. अशातच या वादग्रस्त हुसेनांना कतारने नागरिकत्व देऊ केल्याच्या बातम्या द हिंदू सह टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात झळकत आहेत.
भारतीय नागरिकाने इतर देशांचे वा परदेशी लोकांनी भारताचे नागरिकत्व घेण्याच्या शेकडो घटना दररोज घडत असतात. मात्र एखाद्या इसमावर त्याच्या मायदेशात जर काही खटले चालू असतील तर त्या देशाचा आदर म्हणून इतर देश त्या इसमाला नागरिकत्व न देण्याचा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हणजे दुसर्या देशाला दिलेला एक संदेश समजला जातो.
अरबी देशांत भारतीयांना सहसा नागरिकत्व दिले जात नाही. या समजा बाहेर जाऊन व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलला डावलून कतारने ज्या इसमावर समाजाचा अपमान करणे, दंगल भडकवण्यासदृश साहित्य (चित्रे) प्रसिद्ध करणे, धार्मिक तेढ वाढवणे, सामाजिक तणाव वाढवणे अशा गंभीर अरोपांखाली अनेक खटले सुरु आहेत अशा इसमाला नागरिकत्व का दिले असावे?...
१. भारताला आम्ही जुमानत नाही. तसेच आमच्या अरब लॉबी मुळे भारत आमचे काही वाकडे करु शकत नाही असा माज.
२. भारतीय राज्यकर्त्यांकडे कणा नाही याची पूर्ण जाणीव.
३. आम्ही "सर्वच" भारतीयांना कनिष्ठ मानतो. पण काफिरांचा सर्व पातळीवर आपमान करणार्या भारतीय मुसलमानांना अरब देश भारताच्या कायद्यापासून वाचवतील असा संदेश देण्यासाठी.
४. 'भारतात अल्पसंख्यांकांच्या जीवाला धोका आहे' या पाकिस्तानी तसेच तथाकथित मानवतावाद्यांच्या लॉबींगला आकड्यांची मदत करण्यासाठी.
द हिंदूचे संपादक राम यांनी या घटनेवर टिपण्णी करताना असे म्हटले आहे की या महान चित्रकाराला आयुष्याच्या अंतिम कालखंडात मरण्यासाठी सुद्धा भारतात यायला जमत नसल्याने त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून कतारचे नागरिकत्व घ्यावे. का?
१. संपादक महोदयांना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलची वा त्यायोगे भारताच्या होणार्या नाचक्कीची माहिती नसावी.
२. संपादक महाशयांना भारताच्या इभ्रतीपेक्षा आपल्या स्नेह्यावरील खटल्यांची जास्त काळजी असावी.
वा आणखी काही?
अशा प्रकरणांत आपल्या देशाच्या विदेश मंत्रालयाकडून आपण काही अपेक्षा करु शकतो काय?
प्रतिक्रिया
26 Feb 2010 - 3:03 am | चिरोटा
जीवाला धोका आहेच. यापूर्वी त्यांच्यावर हल्याचे प्रयत्न झाले आहेत. तेव्हा भारतात राहण्याची भिती वाटत असेल तर गैर काय?
बरेचसे देश हे असे करत असतात्.माझ्यामते योग्य कारण त्या देशाचे प्रतिनिधीच सांगू शकतील.
अवांतर-८०च्या दशकात अनेक शीख दहशतवाद्यांना ब्रिटनचे अभय असायचे.(भारत्-ब्रिटन संबंध चांगले असले तरीही).
भेंडी
P = NP
26 Feb 2010 - 3:09 am | प्रशु
जीवाला धोका आहेच. यापूर्वी त्यांच्यावर हल्याचे प्रयत्न झाले आहेत. तेव्हा भारतात राहण्याची भिती वाटत असेल तर गैर काय?
मुळात हिंदुंची कळ काढावीच आधी?
दुसर्या धर्मांबद्द्ल असलं काहि करुन पहा आणि मग बघा...
दुसर्या कशाला हुसेन साहेबांनी स्वतःच्या धर्मांबद्द्ल असे काहि प्रयोग करुन पहावेत. मग कतार काय वागणुक देते ते बघा...
26 Feb 2010 - 3:14 am | भास्कर केन्डे
जर हुसेन साहेबांना त्यांच्या देशातल्या श्रद्धेवर नग्नचित्रे काढण्याची हौस असेल तर ते ती त्यांच्या नवीन देशास सुद्धा पुरवणार का? तिथल्या कायद्यानुसार तर त्यांना किमान हात गमवावे लागतील. :)
कदाचित या भितीने हुसेन "कतारी" होणार नाहीत व इकडे आपली इंग्रजी वृत्तपत्रे त्यांच्या देशप्रेमावर रकानेच्या रकाने भरतील.
26 Feb 2010 - 6:42 am | सुनील
तस्लिमा नसरीन यांच्या जीवाला बंगलादेशात प्रचंड धोका आहे, त्यांच्यावर खटलेदेखिल चालू आहेत, तर भारताने त्यांना नागरीकत्व द्यावे काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Feb 2010 - 8:23 am | विकास
तस्लीमा नसरीनच्या संदर्भात धार्मिक मूलतत्ववाद्यांनी केलेला गोंधळ आणि धमक्या ही नाण्याची एक बाजू आहे. मात्र दुसरी बाजू अशी आहे की: बांग्लादेश सरकारने धार्मिक भावना दुखावल्यानिमित्त वीनाजामीन अटक जाहीर केली. काही सेक्युलर हितसंबंधीयांच्या मदतीने ती काही काळ लपून राहू शकली. दोन महीन्यांनी तीला कोर्टाने जामीन मंजूर केला आणि देशातून हद्दपार केले. ही घटना १९९४ सालची आहे. तेंव्हापासून ती निर्वासीतच राहीली आहे.
१९९८ मधे ती अमेरिकेतून स्वतःचे संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेले निर्वासीत म्हणून असलेले कागदपत्र परत करून बांग्लदेश सरकारची परवानगी आणि त्यांनी पासपोर्ट रद्द केलेला असतानाही तो घेऊन बांग्लादेशात गेली. परत वीनाजामीन अटक जाहीर करण्यात आली आणि तीला देशाबाहेर काढण्यात आले.
हुसैन यांच्याबरोबर यातील काहीच झालेले नाही. त्यांना अजूनही देशात रहायला कोणी नाकारलेलेल नाही. संजय दत्त सारखा माणूस गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊनही उजळ माथ्याने हिंडू शकतो मग हुसैनना इतके घाबारायचे कारण काय?
दुसरा मुद्दा जो मी माझ्या चर्चेत मांडत आहे तो येथे येतो: प. बंगाल सरकारने तीच्या पुस्तकावर (२००३) धार्मिक भावना दुखावल्याच्या निमित्ताने बंदी घातली. तीच्या शब्दात २००७-८ मधे तीला काळ्या यादीत घातले. मग अशी धार्मिक भावनांची काळजी हुसैन यांच्या रेखाटनाच्या बाबतीत घातली गेली का?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
26 Feb 2010 - 10:09 am | सुनील
भास्कररावांनी सुरू केलेल्या चर्चेतील मूळ मुद्दा हा, जर एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मूळ देशात खटले सुरू असतील (निकाल लागला असेल किंवा नसेल) तर त्याने दुसर्या देशाचे नागरीक्त्व स्वीकारावे का, असा आहे.
माझा प्रतिसाद त्याच अनुषंगाने होता. त्याचे उत्तर मिळाले नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Feb 2010 - 10:17 am | विकास
भास्कररावांनी सुरू केलेल्या चर्चेतील मूळ मुद्दा हा, जर एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मूळ देशात खटले सुरू असतील (निकाल लागला असेल किंवा नसेल) तर त्याने दुसर्या देशाचे नागरीक्त्व स्वीकारावे का, असा आहे.
माझा प्रतिसाद त्याच अनुषंगाने होता. त्याचे उत्तर मिळाले नाही.
माझे उत्तर तुमच्या आधीच्या प्रतिसादातील "तस्लिमा नसरीन यांच्या जीवाला बंगलादेशात प्रचंड धोका आहे, त्यांच्यावर खटलेदेखिल चालू आहेत, तर भारताने त्यांना नागरीकत्व द्यावे काय" या प्रश्नासंदर्भात होते. त्याचा संबंध हुसैन यांनी नागरीकत्व स्विकारण्याशी नव्हता अथवा हुसैन यांच्याबरोबर जे चालले आहे त्याच्यासंदर्भात पण नव्हता तर फारतर कतारने नागरीकत्व द्यावे का याच्याशी होता असे म्हणता येईल.
आता भास्करारावांच्या मूळ प्रश्नाबाबत उत्तर सोपे आहे: जर त्यांना कतारची राणी नागरीकत्व देत असेल आणि त्यांना त्यांचे कलास्वातंत्र्य सिद्ध करण्याऐवजी अरबसंस्कृतीचे कलात्मक दर्शन दाखवण्यासाठी आणि अर्थातच कोर्टातील खटल्यांपासून लांब रहाण्यासाठी करायचे असेल तर करूंदेत. कुणी कुठे रहावे हा ज्याचा-त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र ते करताना इतरांना नावे ठेवत करू नका. तुमची इच्छा म्हणून करा असे (हुसैनना) सांगावेसे वाटते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
27 Feb 2010 - 8:46 am | विसोबा खेचर
या हुसेनला धरून एकदा चांगला चापटवायला हवा आहे..
तात्या.
27 Feb 2010 - 2:58 pm | गुपचुप
तात्यांशी पूर्णपणे ....... नागवा करून मारावा त्याला.
"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."
27 Feb 2010 - 3:00 pm | चिरोटा
तसे होण्याची शक्यता होती म्हणूनच ते कतारला गेले आहेत.!! :D
भेंडी
P = NP