नमस्कार मंडळी,
इंडो-चायनीझ च्या नवीन भागात आपल सहर्ष स्वागत :)
या विकांताला काही मित्र मंडळी आली होती. सगळे अट्टल नॉन व्हेज खाणारे असल्याने एक छोटे खानी कौल टाकुन एक मुखाने चिकनच्या निवडीवर शिक्का मोर्तब झाले. :)
आपल्या व्हेज मंडळीं साठी याच व्हेज वर्जन आधीच दिलेल आहे.
साहित्य:
३/४ किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करुन.
१ मोठा चमचा आल-लसुण पेस्ट.
३-४ पाकळ्या किसलेला लसुण.
१.५ लहान चमचा वर्हाडी ठेचा. (असल्यास)
२ चमचे सोया सॉस.
१ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे लाल तिखट.
३-४ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करुन.
३-४ कडिपत्याची पाने.
१ लहान चमचा घट्ट दही.
१ मोठा चमचा कॉन फ्लॉवर.
२ मोठे चमचे मैदा.
स्वादानुसार मीठ.
आवडत असल्यास तंदुर रंग.
तळण्यासाठी तेल.
कृती:
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
त्यात सोया सॉस, हळद,आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची, कडिपत्ता, ठेचा, किसलेला लसुण आणि लाल तिखट टाका.
त्यातच दही, मैदा , कॉन फॉवर, रंग आणि स्वादानुसार मीठ टाका.
चांगल मिक्स करुन १ ते २ तास मुरत ठेवा.
२ तासांनी कढईत तेल तापवून खरपुस तळुन घ्या.
नाटक्याशेठ पासुन स्फुर्ती घेउन एक जहाल मादक पेय बनवले. वॉटरमेलन्-मार्टिनी.
आस्वाद घ्या :)
प्रतिक्रिया
22 Feb 2010 - 5:27 pm | विंजिनेर
मस्त रे गणपा!!
(१२५ वाचने आणि गणपाच्या पाकृला पहिलाच प्रतिसाद? :O प्रतिसादांच्याबाबतीत मिपाचं नमोगत होऊ घातलंय काय? ;) )
22 Feb 2010 - 6:43 pm | बट्ट्याबोळ
गणप्या .. तू एक अतिरेकी आहेस !!!
किती मारशील आम्हाला !!!!
च्यायला .. तुझ्या पाक्रु करून खाउन वजन ६४ च ८० किलो झालं आहे.
आणि तुझ्यामुळे डाएट करताच येत नाही ...
22 Feb 2010 - 8:15 pm | प्रभो
हॅहॅहॅ...
गण्या, लेका एक प्लेट दे पाठवून... :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
22 Feb 2010 - 8:46 pm | टारझन
यम यम यम यम्मी !! :)
22 Feb 2010 - 8:47 pm | प्राजु
झालं!!
पुन्हा एकदा दिवस सत्कारणी लागला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
22 Feb 2010 - 9:02 pm | स्वाती दिनेश
मस्त फोटू आणि कृतीही..
स्वाती
22 Feb 2010 - 10:26 pm | विसोबा खेचर
नतमस्तक!!!!!
तात्या.
22 Feb 2010 - 10:34 pm | पक्या
जबर्या.
तुम्ही आता हॉटेल काढा राव.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
23 Feb 2010 - 12:55 am | मी-सौरभ
दोन्ही आयटम लै भा....हा री....ही
ही ही ...
ही ही ......
-----
सौरभ :)
23 Feb 2010 - 5:04 am | बेसनलाडू
तोंडाला पाणी सुटले.
(हावरट)बेसनलाडू
23 Feb 2010 - 7:42 am | चतुरंग
एकदाचा मी पुन्हा चिकन खायला लागलो म्हणजेच तुझा जीव शांत होणार आहे असं दिसतंय! ~X(
(सामिष - आमिष)चतुरंग
23 Feb 2010 - 12:54 pm | खादाड
हम्म्म्म्म्म !!!! 8>
23 Feb 2010 - 1:38 pm | वाहीदा
गणपा,
आता तुम्ही तुमच्या पाककृती पुस्तकाचे प्रकाशन च करून टाका
मग कधी येणार पुस्तक बाजारात ??? 8>
~ वाहीदा