नमस्कार मंडळी ,
काय म्हणता कसा झाला विकांत?
या विकांताला काही मित्र घरी आले होते. थोडीफार आचमन झाली. त्या सोबत तोंडी लावायला केलेल हे एक चिकन स्टार्टर.
करायला सोप्प आणि झटपट तयार होणार चिकन साते.
साहित्यः
चिकन ब्रेस्ट लांब उभे तुकडे करुन
डार्क सोया सॉस.
स्वीट चीली सॉस.
टॉबॅस्को सॉस.
१/२ लहान चमचा कोल्हापुरी ठेचा (जास्त तिखट आवडणार्यांसाठी)
१लहान चमचा आल-लसुण पेस्ट
चवी नुसार मीठ.
कृती:
वरील सर्व सॉस, मीठ, आल-लसुण पेस्ट आणि ठेचा चिकनला लावुन कमीत कमी २ तास मुरत ठेवावे.
लांब काड्यांमध्ये मुरवलेले चिकनचे तुकडे अडकवावे. एका नॉन्स्टीक पॅन मध्ये १ लहान चमचा तेल तापवुन त्यावर हे चिकन दोन्ही बाजुंनी फ्राय करुन घ्यावे.
झटपट चिकन साते तयार.
लहान मुलांना न्युडल्स आणि सुप बरोबर सर्व्ह करा (मुलांसाठी काही चिकन कमी तिखट वापरुन वेगळे मुरवुन करता येइल.)
आणि हे मोठ्यांसाठी
एन्जॉय माडी :)
प्रतिक्रिया
15 Feb 2010 - 5:04 pm | विसोबा खेचर
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
(खल्लास) तात्या.
7 Mar 2010 - 12:39 pm | नितिनकरमरकर
साते ह एक मलेशिया आणि इन्डोनेशिया मधे खल्ला जाणारा कबाब सारखा पदार्थ आहे. त्याला भारतिय श्रुंगार चढ्व्ल्याबद्द्ल धन्यवाद
15 Feb 2010 - 8:28 pm | अविनाशकुलकर्णी
यम्म्म्म्मी.....
खायेजा खायेजा गणपाजीके गुण गाये जा
15 Feb 2010 - 8:52 pm | शानबा५१२
टॉबॅस्को सॉस मिळणे कठीण वाटते,काही पर्याय आहे का त्याला?
15 Feb 2010 - 9:00 pm | टारझन
ए१ रे गणप्या ... भारतात कधी येतोय बोल .. :)
15 Feb 2010 - 10:00 pm | प्राजु
दिवस सत्कारणी लागला...
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
15 Feb 2010 - 11:30 pm | वेताळ
भारतात आला तर आमच्या कडे एक दोन दिवस राह्यला या.
म्हणजे ह्या डिश आम्हालापण खायला मिळतील. :D
वेताळ
15 Feb 2010 - 11:36 pm | ऋषिकेश
=P~ =P~ =P~ =P~
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
16 Feb 2010 - 6:01 am | सन्जोप राव
पाककला, लेखन आणि छायाचित्रणाचा सुरेख त्रिवेणी संगम. तुमची रसना सदैव बहरत राहो....
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
16 Feb 2010 - 12:12 pm | वाहीदा
गणपा
तुमची पाकृ. नेहमी प्रमाणेच छान आहेच, पण एक प्रश्न
यात तुम्ही काहीच saute केले नाही .. #o
तुमच्या पाकृ.चे नाव चिकन स्टार्टर सार्थक वाटते
Chicken Saute ची पारंपारीक रेसीपी अशी आहे
Ingredients
4 boneless chicken breasts
3/4 lb mozzarella cheese, grated
1/2 cup fresh tomato
4 teaspoons butter, melted
1/2 cup yellow onion
2 cups cooked rice
1 cup white wine
parmesan cheese, grated
parsley, chopped
Directions
1Pound chicken with meat hammer to flatten and tenderize.
2Saute chicken breasts, onion, and tomatoes in butter, turning to brown on both sides until breasts are 3/4 cooked.
3Add wine and saute until liquid is reduced by 1/2, chicken is firm but springy to the touch.
4Put chicken in pan, then put cooked onion, tomatoes and liquid over.
5Top with mozzarella and place under broiler until cheese is melted and browned lightly.
6Place chicken on hot rice.
7Garnish with parmesan and parsley that has been mixed together.
बाकी तुमची रेसीपी ही झकास !! <:P
माझ्या किटी च्या मैत्रीणी आल्यावर तुमची पाकृ.ही नक्कीच करणार (किटी पार्टी चा बेत ठरला :-)
~ वाहीदा
16 Feb 2010 - 12:20 pm | प्रभो
वहीदाजी हे chicken saute नाही, तर chicken satay आहे...
ही एक थाई डिश आहे.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
16 Feb 2010 - 1:34 pm | वाहीदा
उच्चार सारखेच आहेत कि हो ....त्यामुळे तोंड उघडले ,नाहीतर गणपा सारख्या उत्तम chef समोर बोलण्याची , आमच्या सारख्यांची काय बिषाद ? @)
धन्यु प्रभो !!
~ वाहीदा
16 Feb 2010 - 1:39 pm | शुचि
होय बरोबर ...........ही थाई डीश आहे आणि थाई पीनट सॉस बरोबर काय लागते व्वा!!!!!!!!!!!!!! ......... अफलातून!!!!!!!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
16 Feb 2010 - 1:40 pm | शुचि
होय बरोबर ...........ही थाई डीश आहे आणि थाई पीनट सॉस बरोबर काय लागते व्वा!!!!!!!!!!!!!! ......... अफलातून!!!!!!!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
16 Feb 2010 - 3:01 pm | गणपा
सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार :)
16 Feb 2010 - 3:59 pm | खादाड
=D> मस्तच !!!!
16 Feb 2010 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त...!
-दिलीप बिरुटे
16 Feb 2010 - 8:20 pm | पाषाणभेद
हॅ हॅ हॅ आमाला आसलं काय चालत नाय.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
21 Feb 2010 - 12:58 am | गजा गाजरे
एकदा पुन्याला या राव ......
एकदम झकास.....बेत......
21 Feb 2010 - 2:19 am | राजेश घासकडवी
काय सुंदर दिसताहेत. शिवाय अगदी टप्प्या टप्प्याने फोटो दाखवून सगळी प्रक्रिया सोपी करून दाखवली आहे. पाहून आपल्याला सुद्धा जमेल असं वाटलं.
मी हे कधी केलेले नाही, पण जे थाई खाल्लेले आहेत त्यात त्या शेंगदाण्याची चव मला चिकनबरोबर तितकी भावली नव्हती. तुम्ही दिल्याप्रमाणे भारतीय मसाले वापरून नक्कीच चवदार लागेल.
धन्यवाद
21 Feb 2010 - 12:32 pm | जयवी
जबरी !!
गणपा..आता मात्र तुम्ही आम्हाला कॉम्प्लेक्स द्यायला लागलात हं !
कसली नेटकी कृती, साहित्य !!
करणं ही कसं स्वच्छ, नीटनेटकं !!
मान गये उस्ताद !!
आप तो छा गये :)
25 Mar 2013 - 9:37 pm | दिविजा
गणपा वरील मुलांचा डीश मधील सूपची रेसिपी मिळू शकेल का?माझ्या मुलीला साते प्रचंड आवडल..ते सूप पण मस्त दिसतंय...
25 Mar 2013 - 10:09 pm | तुमचा अभिषेक
काय जबरी आहे राव.. जेऊन आलोय तरी तुटून पडावेसे वाटतेय... :)
अवांतर - याचा उच्चात साते आहे होय.. मी आजवर चिकन सटाय, पनीर सटाय असे काहीसे बोलून खायचो.. :(