मंदिराच्या बाजूला मशीद

उग्रसेन's picture
उग्रसेन in काथ्याकूट
19 Feb 2010 - 1:02 pm
गाभा: 

''मुस्लीम बांधवांनी हिंदुच्या भावनांचा आदर करुन अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य राममंदिर उभारण्यासाठी मोठ्या मनाने सहकार्य करावे, आम्ही बाजूला बाबरी मशीद बांधून देऊ.” भाजपाचे नवे अध्यक्ष नितीन गडकरी. [बातमी ]

भाजपाला मुस्लीम बांधवांच्या मताची आठवण झालेली दिसून राह्यली. त्यायच्या मतावर सत्तेचं सपन पडाया लागून राह्यलं. हा आता असं केलं तर बंधूभाव वाढीला लागन का ? आन ही गोठ मुस्लीम बांधवाला आन हिंदू बांधवाला मान्य होईन का, काय म्हणता ?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

19 Feb 2010 - 1:55 pm | चिरोटा

ती जागा एका उडप्याला द्या.एखादे सत्कार्/शांतीसागर हॉटेल उघडेल तो.सकाळी मस्तपैकी इडली,वडा,डोसे.रात्री बिर्यानी,तंदूरी,पराठा.
सगळेच खूष.
भेंडी
P = NP

आनंद घारे's picture

19 Feb 2010 - 5:43 pm | आनंद घारे

उडप्याच्या बाजूलाच शोरबा, कबाब आणि बिर्याणी मिळायला हवी. तर सगळे खूष होतील.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

उग्रसेन's picture

19 Feb 2010 - 6:01 pm | उग्रसेन

भेन्डि बाजार आन घारे काका तुमच्या मताला सम्मती हाये
त्या जागावर एक मॉल काढाला पाह्यजेन
भानगडच नाय.

मह्या मनात सौंशेय हाय की मोहन भागवत सरांच्या डोक्यातून ही आयड्या गडकरी बापूंच्या डोक्यात गेलेली दिस्ते.

बाबुराव :)

एक's picture

19 Feb 2010 - 11:19 pm | एक

कुठल्याही ऐतिहासिक जागेवर (रामजन्मभूमी किंवा बाबरी मशीद हा पुढ्चा प्रश्न..) हॉटेल/मॉल काढणं हे नतद्रष्टं भारतीयांनाच सुचू शकतं...

आनंद घारे's picture

20 Feb 2010 - 8:24 am | आनंद घारे

इतर कोणत्या देशात रस्त्याच्या मधोमध 'ऐतिहासिक' कारणासाठी जपून ठेवलेली देवळे आणि मशीदी दिसतात?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

सुधीर काळे's picture

19 Feb 2010 - 5:47 pm | सुधीर काळे

अरे 'मिपा'करांनो,
खेळाडू आताच मैदानात उतरलाय्. पंचाकडून (umpire) अजून 'सेंटर' मागतोय्. अजून पवित्राही (stance) घेतलेला नाहींय् आणि तुम्ही लोकांनी शरीराच्या दिशेने चेंडूफेक (bodyline bowling) सुरू केली. जरा एक-दोनदा बॅट फिरवू दे, एक-दोन चेंडू खेळू दे! मग टाका 'आपटबार'!
पण माझं वैयक्तिक मत असं आहे कीं भारतीय मुस्लिम समाजाने जर असं केलं तर फाळणीच्या वेळेला झालेली मनांची ताटातूट संपेल!
तरी अशी आशा आहे कीं मुस्लिम बांधव ही संधी सोडणार नाहींत!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

उग्रसेन's picture

19 Feb 2010 - 6:06 pm | उग्रसेन

भारतीय मुस्लिम समाजाने जर असं केलं तर फाळणीच्या वेळेला झालेली मनांची ताटातूट संपेल!

खर बोल्ला काका. मुस्लीम इचारवंत काय म्हणतेत. हिंदू मानसिकता काय म्हणती त्याचाबी इचार करा पाह्यजे.
चांगल्या इषयावर प्रसार माध्यमबी मोकळ्या मनानं बोलना.

बाबुराव :)

हरकाम्या's picture

20 Feb 2010 - 1:21 am | हरकाम्या

भाजप अजुनही जुन्या जमान्यात वावरतो आहे हे खरेच. भाजपचा "कप्तान "बदलला तरी विचारसरणी अजुन जुनीच आहे.

हुप्प्या's picture

20 Feb 2010 - 5:55 am | हुप्प्या

कुराणात मूर्तीपूजा हे अक्षम्य पाप मानले जाते (४:४८).
कुराणात जे लिहिले आहे ते देवाने सांगितले आहे. त्यात बदल होऊ शकत नाही असा मुस्लिमांचा विश्वास आहे. त्यात काहीही चूक असू शकत नाही असाही विश्वास आहे.
असे असेल तर देवाला मंजूर असणार्‍या पद्धतीची प्रार्थना एका स्थळी आणि देव ज्याला अक्षम्य पाप मानतो त्या पद्धतीची प्रार्थना त्याच्या जवळच हे कुणातरी डोकेफिरु मुस्लिमाला खटकणे शक्य आहे आणि त्यातून काही उत्पात घडू शकेल. जसे आत्मघाती हल्ला.
हिंदू लोकांचा असा एकमात्र ग्रंथ नसल्यामुळे असे होण्याची शक्यता कमी असली तरी कुणीतरी आगलाव्या भाषणाने बिथरुन तोही मशिदीचे नुकसान करु शकेल.
त्यामुळे पुरेशी सुरक्षा व्यवस्था कायमस्वरुपी असेल तरच हा पर्याय व्यवहार्य आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Feb 2010 - 7:56 am | भाग्यश्री कुलकर्णी

हे भाजपाचे अधिवेशन इथे इंदोरात चालु होते.गडकरींनी ह्या मुद्याचा अगदी ओझरता उल्लेख केला.अन वर ही टिप्पणी ही केली कि जर हा मुद्दा मी चर्चेत घेतला नाही तर भाजपा अध्यक्ष ह्या मुद्द्याला विसरले असे लोक म्हणतील.
त्यांच्या पुर्ण भाषणात त्यांनी इतरही अनेक मुद्दे मांडले.पण मिडियाने नेहमीप्रमाणे ह्यासारख्या विषयालाच मुख्य मुद्दा बनवला.

उग्रसेन's picture

21 Feb 2010 - 10:41 am | उग्रसेन

भाजपा अध्यक्ष ह्या मुद्द्याला विसरले असे लोक म्हणतील.

भाजपा अध्यक्ष ह्या मुद्याला इसरले नाय आन सामान्य जनताबी इसरलेली नाय.
कसाबी करुन ह्यो मुद्दा धगधगत राह्यला पाह्यजेन. ते इंदोरात बोलो नाय तर कुठंबी बोलो
बराबर की नाय

बाबुराव :)

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Feb 2010 - 8:11 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री बाबुराव, मंदिराच्या बाजूला मशीद बांधणे शक्य आहे तर असलेल्या मशीदीच्या बाजूलाही मंदिर बांधणे शक्य होते. मग मशीद का पाडली? गडकरींनी ज्येष्ठांना मशीद पाडण्याचे कारण विचारून बोलायला पाहीजे होते. गडकरीबाबा तर असलेली वोटबँक घालवायच्या मागे लागलेले दिसतात ब्वॉ.

उग्रसेन's picture

21 Feb 2010 - 11:03 am | उग्रसेन

मंदिराच्या बाजूला मशीद बांधणे शक्य आहे तर असलेल्या मशीदीच्या बाजूलाही मंदिर बांधणे शक्य होते. मग मशीद का पाडली?

एकदम बराबर

गडकरींनी ज्येष्ठांना मशीद पाडण्याचे कारण विचारून बोलायला पाहीजे होते.
हेबी बराबर

बाबुराव :)

हेरंब's picture

20 Feb 2010 - 6:22 pm | हेरंब

ज्याच्या ह्रदयी राम आहे त्याला कुठल्याही मंदिराची जरुर नाही.
तसेच ज्याच्या ह्रदयी 'अल्ला' आहे त्याला कोणत्याही मशिदीची जरुर नाही.
दुर्दैवाने असे लोक सध्या स्वल्पमतात आहेत.

नितिन थत्ते's picture

20 Feb 2010 - 7:20 pm | नितिन थत्ते

मशीद पाडली गेली असल्याने या प्रस्तावाचा (मशीद बांधून देऊ) कसा भरवसा धरायचा. त्या ऐवजी मशीद होती तिथे बांधून द्या मग शेजारी मंदिर बांधायला "मोठ्या मनाने" सहकार्य करता येईल.

(अवांतर : हा प्रतिसाद गडकरींच्या विशिष्ट प्रस्तावाला आहे. अन्यथा काहीच बांधायची बांधून द्यायची गरज नाही. ठाकरे यांनी केव्हातरी म्हटल्याप्रमाने हॉस्पिटल बांधले तर बरे).

नितिन थत्ते

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2010 - 8:00 pm | प्रकाश घाटपांडे

आनंद पटवर्धनांच्या "राम के नाम" या लघुपटाची आठवण होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

chipatakhdumdum's picture

20 Feb 2010 - 9:27 pm | chipatakhdumdum

कुर्‍हा़डीचे दांडे हे सगळे..

टारझन's picture

20 Feb 2010 - 9:41 pm | टारझन

चर्चा वाचून झोप आली :) वाचनखुण साठवलीये :) कधी झोप नाही आली तर तेवढीच सोय :) चालू द्या :)

- गप्झोपराव
स्वप्नात सुंदर्‍या आहेत , तोवरंच झोपण्यात मजा आहे.

हर्षद आनंदी's picture

20 Feb 2010 - 10:16 pm | हर्षद आनंदी

टार्‍याशी सहमत..

चालु द्या पुढे!!

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही.. आमच्या देशात मशीदीला जागा नाही

उग्रसेन's picture

21 Feb 2010 - 10:56 am | उग्रसेन

कुरानातल्या आयतींचा चांगभला अर्थ सांगाचा
जिहाद च्या नावावर इश्वात हिंसा देनारं इचार आन विश्वावर सत्ता आसली पाह्यजेन
असे खोटं तत्वग्यान सांगून मुसलीम बांधवांना फितोले जातं.

तिथं दुस-या बाजूनं भाईचाराचा इचार सांगून जुनेच मढे उचकून काढाचं ग्यान नेते देऊन राह्यले.

द्वेष, कटूता, इषमता निर्मान व्हणारे कोणताबी इचार भारतालाल्या जनतेला भाईचाराकडं घेऊन जाणार नाय असं बाबुरावला वाट्टं

चर्चेत भाग घेणार्‍या समद्या बांधवायचे आभार. जय हिंद जय भारत

बाबुराव :)

कभी खुशीसे खुशी के तरफ नही देखा. बस तुम्हारे तरफ देखा, फिर किसीके तरफ नही देखा.