पुण्यात बाँबस्फोट

बाबुराव's picture
बाबुराव in काथ्याकूट
13 Feb 2010 - 9:31 pm
गाभा: 

पुण्यात कोरेगाव पार्क मधे असलेल्या जर्मन बेकरी मधे स्फोट होवून
दहा लोक मरण पावल्याची आन अनेक जखमी झाल्याची बातमी हाय.
काय खबर ?

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

13 Feb 2010 - 9:37 pm | मदनबाण

हे वाचा :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5569895.cms

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

बाबुराव's picture

13 Feb 2010 - 9:44 pm | बाबुराव

विदेशी लोकायला टार्गॅट केलेले दिसून राह्यलं
चाळीसाच्यावर जखमी

बाबुराव

टारझन's picture

13 Feb 2010 - 9:41 pm | टारझन

काही नाही .. :) समदं पोलीस त्या येडझव्याच्या पिक्चर रिलीज च्या सौरक्षणार्थ पाठवलंय !

स्वप्निल..'s picture

13 Feb 2010 - 10:05 pm | स्वप्निल..

दुसरं काही काम नाहि सरकारला!!

:(

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 10:55 pm | विसोबा खेचर

समदं पोलीस त्या येडझव्याच्या पिक्चर रिलीज च्या सौरक्षणार्थ पाठवलंय !

खरं आहे...

तात्या.

दादा कोंडके's picture

13 Feb 2010 - 9:42 pm | दादा कोंडके

च्यायला या काँग्रेसच्या तर आXX XX.
करा म्हणावं त्या खानाच्या पिक्चरची वॉचमनगिरी. आणि इथं निरपराध लोकं मरताहेत!

सनविवि's picture

13 Feb 2010 - 10:05 pm | सनविवि

तेच ना च्यायला!! Intelligence warning होती पण पोलिसांना आणि Congress ला खानाची जास्त काळजी!
आता पुणे पण :(

रेवती's picture

13 Feb 2010 - 10:00 pm | रेवती

हम्म! नुकतीच ही बातमी समजली.
आजकाल फक्त गावाचं/शहराचं नाव बदलतं. बाकी तेच प्रसंग आणि तसेच फोटो. वाईट वाटण्यापेक्षाही सुन्न होउन जातो आपण!

रेवती

टारझन's picture

13 Feb 2010 - 10:18 pm | टारझन

बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी मोटी घटणाये होती रहती है ..

- आरारा पाटील

रेवती's picture

14 Feb 2010 - 12:42 am | रेवती

श्री रा रा टारझनसहेब,
आपण भावी मंत्री आहात हे तर दिसतच आहे, आम्हाला विसरू नका.
पुढंमागं कधी संरक्षण देता आलं सामान्य जनतेला, तर द्या.
आणी ज्या सिनेमाच्या नावामुळं कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होइल अशी शंका जरी आली तरी त्याचं नाव बदलायला भाग पाडा. बरेच दंगे टळतील त्यामुळे (अर्थात टाळायचे असल्यास..).
'माय नेम इज खान' अश्या नावाचा चित्रपट (नाव न बदलता)प्रदर्शीत होऊ कसा दिला? आता कोणी कसलीच निदर्शनं केली नाहीत!:(

रेवती

विकास's picture

13 Feb 2010 - 10:07 pm | विकास

Officials suspect the explosion to be a bomb blast because the bakery is close to a Jewish centre, Chabad House, in Koregaon area of Pune.

http://bit.ly/bYXL4r

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सनविवि's picture

13 Feb 2010 - 10:43 pm | सनविवि

जहांगीर हॉस्पिटल मध्ये एबी+व्ह आणि बी+व्ह रक्त पाहिजे आहे....१०६६ - फोन नंबर.

सुनील's picture

13 Feb 2010 - 10:55 pm | सुनील

आताच भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांची अत्यंत हसतमुख मुलाखत एका वाहिनीवर पाहिली.

जय क्षूद्र राजकारण!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शुचि's picture

14 Feb 2010 - 12:21 am | शुचि

मिपावर बातमी वाचली आणि तडक आई-बाबांना फोन लावला. मिपा चे आभार बातमी दिल्याबद्दल.

जे लोक या आमच्या विद्यानगरीत नाहक बळी गेले ईश्वर त्यांच्या आत्म्यांस शांती देवो.

अतिरेकी लवकरात लवकर सापडोत अणि त्यांना शिक्षा होवो.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

स्वप्निल..'s picture

14 Feb 2010 - 12:27 am | स्वप्निल..

>>अतिरेकी लवकरात लवकर सापडोत अणि त्यांना शिक्षा होवो.

सापडले तरी शिक्षा होणे खुप कठीण आहे .. :(

जयेश माधव's picture

18 Feb 2010 - 3:37 am | जयेश माधव

अतिरेकी लवकरात लवकर सापडोत अणि त्यांना शिक्षा होवो.....कोण करणार या॑ना शिक्षा??आपल॑ सरकार्?समजा उद्या हे सापड्लेच तर काय होणार या॑च॑ ? कसाब सापडलाच ना,काय झाल॑ त्याच? मस्त महाराष्ट्र सरकारचा पाहूणचार घेतोय.अफजल गुरु सापडलाच ना? दिली का फाशी त्याला?
हे कायद्याचे राज्य आहे.ईथे कोणीही याव॑,काहीही कराव,सर्व क्षम्य आहे.

अनामिका's picture

14 Feb 2010 - 12:44 am | अनामिका

अतिरेकी लवकरात लवकर सापडोत अणि त्यांना शिक्षा होवो.
इतका आशावाद भारतासारख्या निधर्मीवादी(? )देशात बाळगणे योग्य नव्हे.........आंम्ही अतिरेक्यांना प़कडले तरी त्यांची सरकारी इतमामात चोख व्यवस्था व बडदास्त ठेवतो .थोडक्यात काय तर करदात्यांच्या पैशातुन त्यांना यथेच्छ् पोसतो....मुळात आज जरी लष्करे तोयबा वर् संशयाची सुई असली तरी उद्या ती उलटी फिरुन मुळात अस्तित्वात नसलेल्या
हिंदु-दहशतवादाकडे वळण्याची शक्यता या खानांच्या राज्यात नाकारता येत नाही..
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

पाषाणभेद's picture

14 Feb 2010 - 3:13 am | पाषाणभेद

आता नेहमी प्रमाणे चिदंबरम, मनमोहनसिंग पाकिस्थानला कडक शब्दात इशारा देतील. चिदंबरम परत इतर शहरात रेड अलर्ट देतील. शेपूटघालू.
बाकी आपले आबा काय म्हणतील कोणी सांगू शकेल काय?

मृतांच्या नातेवाईकाना मनःपूर्वक सहानुभूती. जखमींच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना असेच म्हणतो.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

चिरोटा's picture

14 Feb 2010 - 3:38 am | चिरोटा

बाकी आपले आबा काय म्हणतील कोणी सांगू शकेल काय?

'जाणता राजा' त्यांना जे म्हणायला सांगेल ती वाक्ये ते तंबाखू तोंडात ठेवून सांगतील.
१)पुणे पोलिसांना ह्याची खबर आधीच मिळाली होती.
२)केंद्रिय गुप्तचर संस्थांनी माहिती वेळेवर दिली नाही.
३)नागरिकांनी शांतता पाळणे गरजेचे आहे.
४)राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी नागरिकांची पण आहे.
५)दहशवादाचा बिमोड करण्यास पोलिस खात्यास २५० कोटी रुपयांची घोषणा.
भेंडी
P = NP

देवदत्त's picture

17 Feb 2010 - 4:53 pm | देवदत्त

आता नेहमी प्रमाणे चिदंबरम, मनमोहनसिंग पाकिस्थानला कडक शब्दात इशारा देतील.
बॉम्बस्फोट करणार्‍यांना तर नाही पण काल धमकी देणार्‍यांना दम दिलाय.

मटावरील बातमीप्रमाणे,
"दहशतवाद्यांची मनमानी खपवून घेणार नाही, असा सज्जड इशाराही गृहमंत्र्यांनी आज दिला""

स्वाती२'s picture

14 Feb 2010 - 3:46 am | स्वाती२

बाप रे! आता पुणेही!
त्या सिनेमासाठी सगळे पोलिस वेठिला धरले होते आणि आता असे झाल्यावर हे सांगणार 'शांत रहा'. सगळच कठिण आहे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

14 Feb 2010 - 7:22 am | डॉ.प्रसाद दाढे

राहुलचे जोडे कवटाळणारे माननीय गृहराज्यमंत्री पुण्याचेच आमदार आहेत.. त्यांची उतरली असेल कदाचित किंवा चेहरा आणखीन रडका होईल इतकेच

डॉक्टरसाहेब, ते जोडे नव्हते, त्या पादुका होत्या! आपले राज्य गृहमंत्री आधुनिक 'भरत' आहेत! त्यांच्या या उदात्त भावनांची अशी रेवडी नका उडवू!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

समंजस's picture

15 Feb 2010 - 11:43 am | समंजस

काळे साहेब, थोडी दुरुस्ती करू इच्छितो हरकत नसल्यास.
आपले राज्य गृहमंत्री हे आधुनिक 'भरत' नव्हेत, तर आधुनिक 'भरत' हे आपले प्रिय प्रधानमंत्री आहेत. ते सध्या आधुनिक 'रामाच्या' पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवत आहेत.
कारण आपले आधुनिक 'राम' हे सध्या अश्वमेध यज्ञात गुंतलेले आहेत, त्यांचा अश्वमेधाचा घोडा घेउन ते अखिल भारतातील संपूर्ण राज्यांमधे फिरत आहेत.
जी राज्ये त्यांच्या अधिपत्याखाली नाहीत, त्या राज्यांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याकरीता त्यांनी अश्वमेध यज्ञ आयोजीला आहे :)
काही दिवसांपुर्वी बिहार या एकेकाळच्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या (आणि आता फक्त गुंडगीरी, भ्रष्टाचार, आणि सरकार दरबारी उच्च पदस्थांवर असलेल्यांची पैदास करणारा ही ओळख असलेला) राज्यात त्यांचा अश्वमेध यज्ञाचा घोडा घेउन ते तिथे पोहोचले होते. तिथे असताना त्यांच्या कानी बातमी आली की त्यांच्याच अधिपत्याखाली असलेल्या राज्यांपैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र, इथे काही प्रमाणात असंतोष पसरला आहे आणि वेळीच या असंतोषाचा बिमोड नाही केला तर हे राज्य नजीकच्या भविष्यात त्यांच्या अधिपत्याखालून जाण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांनी आपल्या अश्वमेध मोहीमेचा मार्ग थोडा बदलून, महाराष्ट्र या पुरोगामी राज्यात आपली हजेरी लावली तसेच या राज्यात कारभार चालवण्यार्‍या आपल्या सरदारांचा उत्साह वाढवण्याकरीता तसेच त्यांची भिती :? घालवीण्याकरीता सामान्य जनांच्या दैंनदीन वापराच्या वाहनातून सुद्धा प्रवास केला :)
(एकेकाळी पुरातन रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती आणि आता आधुनिक 'रामाची' ही कृती :) )

जेव्हा ही सर्व राज्ये आधुनिक 'रामाच्या अधिपत्याखाली येतील, तेव्हाच आधुनिक 'राम' हे आधुनिक अयोध्येला परततील आणि त्यांनतर आधुनिक 'भरत' सिंहासनावरच्या पादुका त्यांच्या पायात घालतील त्यानंतरच आधुनिक 'राम' हे अखिल भारतवर्षावर राज्य करतील आणि परत एकदा भारतवासीयांना रामराज्य अनुभवायला मिळेल.
(तो पर्यंत भारतवासीयांनी थोडा धीर धरावा. असल्या बॉम्बस्फोटांना घाबरून जावू नये. आता रात्र असली तरी पहाट होणारच आहे. जगलो वाचलो तर रामराज्य सुद्धा बघून घेवू) :)

सनविवि's picture

15 Feb 2010 - 12:06 pm | सनविवि

हाहा....लई भारी!

सुधीर काळे's picture

15 Feb 2010 - 3:37 pm | सुधीर काळे

हरकत अजीबात नाहीं व तुमची दुरुस्ती बहारदार आहे.
पण तो "यूनियन" भरत (ज्याला मी राजगुलाम म्हटले होते) व आपला 'म्हमई'तला भरत आहे "गावठी" भरत. दोघेही जोडेवाहक!
पण सगळ्यात भिकार गोष्ट ही कीं आपणच या 'वानरां'ना निवडून देतो कारण सर्वच पक्षांत वानर भरलेत.
आता खर्‍याखुर्‍या रामाची प्रतीक्षा करायला हवी!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

प्रमोद्_पुणे's picture

15 Feb 2010 - 1:24 pm | प्रमोद्_पुणे

जर्मन बेकरी जिथे आहे तो भाग (को. पा.) भरत बागवेच्याच मतदार संघात येतो, हे आपले दुर्देव, अजून काय.. त्याने शनिवारी बर्यापैकी फूटेज खाल्ले सर्व वाहिन्यांवर झळकून.

सुधीर काळे's picture

14 Feb 2010 - 9:01 am | सुधीर काळे

खरं तर ९ माणसं दगावली याचं दु:ख सर्वात जास्त होतं! पण चव्हाणांचा अशोक व पाटलांचा आबा दोघेही मीडियाबरोबर हिंदीत बोलले याचेही दु:ख कांहीं कमी नाहीं.
जरासे अवांतर!
आम्हाला हल्ली इथे फक्त डीडीन्यूजच पहयला मिळते. म्हणजे राजमाता सोनिया, राजपुत्र राहुल ('जोडे' व 'मुंबई-लोकल'फेम) आणि राजगुलाम (ओळखा पाहू?) यांच्याच बातम्या पहायला मिळतात.
पुण्याची बातमी शृती शेट्टी (श्रुती नव्हे) ने हिंदीत दिली. हिंदीचे ९ पेक्षा जास्त खून तिने केले. मग दोन प्रश्न मनात आले:
१. महाराष्ट्राची वार्ताहार एक 'शेट्टी' कां? जर तिला फक्त इंग्लिशच येत असेल आणि हिंदी येत नसेल तर ती अपात्र का ठरविली जात नाहीं?
२. इंग्लिश व हिंदी भाषा येणारी/र्‍या मराठी मुले/मुली उरलीच/उरल्याच नाहींत कां?
(हे 'मराठी' संकेतस्थळ आहे हे माझ्या लक्षात आहे.)
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

मिसळभोक्ता's picture

17 Feb 2010 - 6:19 am | मिसळभोक्ता

च्यायला, तिकडे १०-१५ लोक मेले, पन्नास एक जखमी झाले. आणि इकडे मराठी/हिंदी वाद सुरू !

ट्याक्सीवाल्यांसारखे अतिरेक्यांना पण मराठी शिकणे सक्तीचे करावे काय ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

कौंतेय's picture

18 Feb 2010 - 5:13 pm | कौंतेय

इथेही मराठी/हिंदी वाद सुरू करणे म्हणजे मूर्खपणा आहे.

हुप्प्या's picture

14 Feb 2010 - 9:20 am | हुप्प्या

आपले पोलादी कण्याचे, खंबीर, निधड्या छातीचे नेते निषेधाचे पत्रक काढून असल्या प्रकारांची गय केली जाणार नाही हे सांगतील ह्याची वाट बघतो आहे.
त्यांचा "अत्यंत कडक" निषेध ऐकल्यावर माझा जीव भांड्यात पडेल आणि मग अगदी सुरक्षित वाटेल. तोपर्यंत मला धीर मिळणार नाही.
ह्या बहादूर लोकांचे आम्हा सामान्यांकडे लक्ष आहे आणि असले प्रकार ते सहन करत नाहीत हे पुन्हा पुन्हा सांगणे जरुरीचे आहे. म्हणजे निदान पुढच्या बॉम्बस्फोटापर्यंत आरामात राहू!
अहो भारतीय लोकशाहीचे शहेनशहा, बेगमसाहिबा, जहंपन्हा, शह्जादे! लवकर बोला आमच्याशी. आम्हा सामान्यांकरता असले मामूली हादसेही फार भीतीदायक असतात हो.

नितिन थत्ते's picture

14 Feb 2010 - 1:14 pm | नितिन थत्ते

>>त्यांचा "अत्यंत कडक" निषेध ऐकल्यावर माझा जीव भांड्यात पडेल आणि मग अगदी सुरक्षित वाटेल.

पूर्वी एकदा आधुनिक लोहपुरुष देशाचे गृहमंत्री झाल्यावर आमचा जीव असाच भांड्यात पडला होता.

नितिन थत्ते

समंजस's picture

15 Feb 2010 - 11:50 am | समंजस

दुर्दैव!!!
परत त्यानंतर आधुनिक लोहपुरुष नाही मिळाला त्यामुळे जीव आता परत एकदा भांड्यात पडण्याची वाट बघतोय.
(त्या आधी बहुदा एखाद्या आतंकवादी हल्यातच बळी पडण्याची शक्यता आहे)

सुनील's picture

15 Feb 2010 - 12:04 pm | सुनील

सरदार पटेलांना पोलादी पुरुष असे म्हणत. त्याच पावलावर पाऊल ठेवून अडवाणींना (पोलाद already book झाल्यामुळे) लोहपुरुष असे म्हणच्याची फ्याशन काहींनी सुरू केली. कंदाहार आणि नंतर जीना प्रकरणापासून, त्यांचे हे उपनाम सार्थ असल्याची आमची खात्री झाली आहे! ;)

(पोलाद हे लोखंडापेक्षा मजबूत तर असतेच शिवाय त्याला (लोखंडाप्रमाणे) गंजदेखिल चढत नाही!! ;) )

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नाहीं हो! पोलादच गंजते (स्टेनलेस स्टील सोडून) व लोह (म्हणजे बीड, cast iron) गंजत नाहीं किंवा कमी गंजते. पण पोलाद चिकाटीयुक्त, चिवट असते व त्यामुळे तुटत नाहीं, मोडत नाहीं. पण बीड ठिसूळ व फुसफुशीत (brittle) असते.
कंदाहारला हा फुसफुशीतपणाच नडला. अटल-जी तर जातिवंत फुसफुशीत!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

Nile's picture

17 Feb 2010 - 6:52 am | Nile

लोखंड म्हणजे जर आयर्न असेल तर मात्र ते मउ आणि कठिण असे दोन्ही फॉर्म मध्ये असते! :)

अनामिका's picture

14 Feb 2010 - 10:10 am | अनामिका

, ते जोडे नव्हते, त्या पादुका होत्या! आपले राज्य गृहमंत्री आधुनिक 'भरत' आहेत"
स्वतः भरताची भुमिका बजावत बागव्यांनी जोडे उचलुन त्यांनी परंपरा जपली मग भले त्यांचा पक्ष मुळात रामाचे अस्तित्वच मान्य करत नाही ह्याचे भावनेच्या भरात त्यांना त्याक्षणी विस्मरण झाले होते.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

देवदत्त's picture

14 Feb 2010 - 1:02 pm | देवदत्त

मटामधील बातमीप्रमाणे,
गुप्तचर यंत्रणेचे अपयश स्फोटाला कारणीभूत ठरल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला.
बरोबर आहे. गुप्तचर यंत्रणेने आधीच सांगितले होते की असे काहीतरी होणार. ते लोक अपयशी नाहीत. पण तुम्ही लोक ते ऐकत नाही व त्याबाबत काहीच करीत नाही, हे कोणाचे अपयश ते ही सांगावे ?

मुख्यमंत्री आणि इतर मंत्री नेहमी म्हणतात, कोणी कायदा हातात घेतला तर पाहून घेऊ. आता घेतला त्यांनी कायदा हातात. काय करणार ते सांगा आता?

कसाबने तुमच्या डोळ्यादेखत कायदा हातात घेतला आणि आता पैशाची ही विल्हेवाट लावत आहे त्याला तर पोसतच आहात ना?
गेल्यावेळी पाटीलांनी राजीनामा दिला होता(की त्यांना काढले होते) तरीही त्यांनाच पुन्हा त्या पदावर बसवलेत. आता पुन्हा काय करणार ते ही सांगा.

आम्ही ऐकतच आहोत. बाकी काय करणार?

अनामिका's picture

14 Feb 2010 - 1:13 pm | अनामिका

गुप्तचर यंत्रणेचे अपयश स्फोटाला कारणीभूत ठरल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला.
देवदत्त अरे बरोबर बोलतायत ते
नाही नाही मुळीच गुप्तचर यंत्रणांच अपयश नाही ,यांच्या सारख्या षंढ राज्यकर्त्यांच तर नाहिच नाही.अपयश असलच तर ते आमच आहे सर्वसामान्य जनतेच आहे ..कारण यांना सत्ता प्राप्त करुन देतो ते आपणच करंटे.......या असल्या भ्याड हल्ल्यांमधे बळी पडतो तो सर्वसामान्य माणुस त्यांच्या रक्तामासांचा चिखल होतो..ज्यादिवशी राज्यकर्त्यांचा व राजकारण्यांच्या रक्तामासांचा चिखल हे अतिरेकी घडवतील तेंव्हा तो बघायला आणि उचलायला जनताच काय यांचे आप्तस्वकिय देखिल पुढे यायला धजावणार नाहीत.
वांझोटा संताप व्यक्त करण्यावाचुन व कळफलक बडवुन आपली उद्विग्नता व असहाय्यता व्यक्त करण्याव्यतिरिक्त हाती खरच काही नाही.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

नितिन थत्ते's picture

14 Feb 2010 - 1:42 pm | नितिन थत्ते

>>आता नेहमी प्रमाणे चिदंबरम, मनमोहनसिंग पाकिस्थानला कडक शब्दात इशारा ........

आता नेहमीप्रमाणे राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वाहणारे प्रतिसाद येतील.
आम्ही सुधारणा व्हावी म्हणून काहीच करणार नाही.
जमेल तेथे जमेल तसे कायदे मोडीत राहू, त्याबद्दल अभिमानही बाळगू.

निवडणुका आल्या की आम्ही मतदान न करता सुट्टी भोगू.

असो.

नितिन थत्ते

दादा कोंडके's picture

14 Feb 2010 - 2:18 pm | दादा कोंडके

हा हा हा...
तेही खरच! :S

अक्षय पुर्णपात्रे's picture

14 Feb 2010 - 9:29 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री थत्ते यांच्याशी सहमत आहे.

समंजस's picture

15 Feb 2010 - 12:04 pm | समंजस

बरोबर!!!
फक्त ५०% मतदानाच्या जोरावर जर सरकारे निर्माण होत असतील तर असलेच परिणाम समोर येणार.

सुधीर काळे's picture

14 Feb 2010 - 2:04 pm | सुधीर काळे

http://bilalsblog.blogspot.com/2008/01/capital-suggestion.html
वरील दुवा वाचनीय आहे. प्रतिसादांची प्रतही (quality) चांगली आहे. भारतीय मुस्लिमांचा प्रतिसादही झकास आहे.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

तिमा's picture

14 Feb 2010 - 7:59 pm | तिमा

आत्तापर्यंतचे बाँबस्फोट जर कोणी मोजले असतील तर ठीकच नाहीतर मोजायला सुरवात करा व आकडे कमी पडू नयेत म्हणून आधी बरीच ० ठेवा.
उदा. ०००००००००००००००००००००००००००००००१ या पध्दतीने! म्हणजे काँप्युटर एंट्री सोपी होईल.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

मी_ओंकार's picture

15 Feb 2010 - 12:43 am | मी_ओंकार

काँग्रेस सरकारबरोबरच शिवसेनेचाही निषेध.
शुक्रवारची 'माय नेम'चा तमाशा आणि शनिवारचा बॉम्बस्फोट या दोन्ही घटना एकापाठोपाठ घडल्यामुळे एक वेगळे चित्र पुढे आले. वर बर्‍याच प्रतिसादात पोलिस 'माय नेम' ला संरक्षण देण्यात गुंतले होते असा उल्लेख आहे. आणि ते चुकीचे पण नाही. पण यासाठी जबाबदार शिवसेनाच आहे. पोलिस नसते तर तिथे प्रचंड नुकसान आणि तोडफोड झाली असती. देशाच्या आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी पोलिसांवर असताना त्यात तोडफोड आणि धुडगुस घालून त्यांची कामे वाढवणार्‍या सर्व संघटनांचा निषेध. यात शिवसेना, मनसे, श्रीराम सेना, बजरंग दल, विहिंप, स्वाभिमान आघाडी सगळ्याच आल्या. अशा प्रकारे ते दहशतवादी संघटनांची मदतच करत आहेत.
या मध्ये कुठेही शाहरुख ला पाठिंबा नाही. तो बोलला ते बरोबर नव्हतेच. किंवा काँग्रेसलाही पाठिंबा नाही. शिक्षा झालेल्या अतिरेक्यांना पण जिवंत ठेवण्यार्‍यांना आणि पाकिस्तान शी बोलणी सुरु करणार्‍या सरकारला मुळीच पाठिंबा नाही. पण विरोध करताना तो कसा करावा हे विचार करायची वेळ आलेली आहे. पोलिसांवर ताण वाढवून उपयोग नाही.
उद्या शिवसेना म्हणेल की बघा आम्हीच बरोबर होतो. पण ते करताना त्यांनी निव्वळ राजकारणासाठी अख्खा पोलिसफाटा कामाला लावला हे विसरता कामा नये. असा काय फरक पडला असता पिक्चर लागला असता तर पण यांचा इगो महत्वाचा.
जाता जाता : शुक्रवारच्या मटा मध्ये 'माय नेम' मुळे पोलिसांना त्यांनी कष्टाने स्पर्धेसाठी बसवलेले नाटक सादर करता आले नाही अशी बातमी वाचली. ताण हलका करायच्या गोष्टीऐवजी तो आधी आला आणि नंतर दुसर्‍या दिवशी प्रचंड वाढला.
गुंडगिरी, झुंडशाही, तोडफोड या सगळ्याचा तीव्र निषेध.

- ओंकार.

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Feb 2010 - 3:15 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री ओंकार यांच्याशी (काही अपवाद वगळता) सहमत आहे.

शाहरुख's picture

15 Feb 2010 - 1:12 am | शाहरुख

जाता जाता : शुक्रवारच्या मटा मध्ये 'माय नेम' मुळे पोलिसांना त्यांनी कष्टाने स्पर्धेसाठी बसवलेले नाटक सादर करता आले नाही अशी बातमी वाचली. ताण हलका करायच्या गोष्टीऐवजी तो आधी आला आणि नंतर दुसर्‍या दिवशी प्रचंड वाढला.

वाईट वाटले..

चिरोटा's picture

15 Feb 2010 - 2:24 am | चिरोटा

हे खबाद्(की छबाद) हाउस काय प्रकार आहे?ज्यु धर्मियांचे ते प्रार्थनास्थळ एवढेच माहित होते.मध्यंतरी तिकडून इस्रायलच्या(मोसादच्या) कारवाया चालु असतात असे वाचले होते.२६/११ चा हल्लाही खबाद हाउसवर झाला होता.
भेंडी
P = NP

चिंतातुर जंतू's picture

15 Feb 2010 - 2:25 pm | चिंतातुर जंतू

खबद हा एक कर्मठ ज्यू पंथ आहे. त्यांची राजकीय भूमिका कट्टर उजवी असल्याने त्यांच्याकरवी मोसादचे काम होत असणे शक्य आहे, पण त्याविषयी खात्रीलायक माहिती मिळणे अशक्य आहे. पंथाविषयी अधिक माहिती इथे मिळू शकेल. ज्यू धर्मींच्या छोट्या वस्त्या जगभरात जिथे जिथे आहेत, तिथे खबद हाऊसेस आहेत. मध्यपूर्वेतील राजकारणामुळे व त्यातून उद्बवलेल्या मुसलमानांच्या इस्राएल- व ज्यू-द्वेषामुळे ती अतिरेक्यांच्या लक्ष्यावर आहेत. एखाद्या अतिरेकी हल्ल्याचा तेथील ज्यू धर्मींशी संबंध असल्याचा संशय आल्यास त्या घटनेस न्यू यॉर्क टाईम्स वगैरे मध्ये मोठी प्रसिध्दी मिळते. त्यामुळेही ही केंद्रे अतिरेक्यांच्या लक्ष्यावर असू शकतील.

- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

भडकमकर मास्तर's picture

15 Feb 2010 - 2:34 pm | भडकमकर मास्तर

खबद हाउस आणि मोसाद च्या कारवाया यांचा एकत्र उल्लेख कुमार केतकरांच्या एका लेखात वाचला होता. पण त्याबद्दल बाकी कुठे वाचण्यात आले नाही..... याबद्दल काही दुवे देऊ शकेल काय कोणी?
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

चिंतातुर जंतू's picture

15 Feb 2010 - 3:19 pm | चिंतातुर जंतू

या संस्थळावर आणि इतरत्रही 'पोलीस शाहरुखच्या चित्रपटाच्या संरक्षणात गुंतलेले होते, म्हणून अतिरेक्यांचे फावले', असा एक सूर आहे. मुळात जर्मन बेकरीला पोलीस संरक्षण मिळणे हे सर्वांच्याच गैरसोयीचे होते, त्यामुळे ती अशक्य कोटीतली बाब होती. त्याची कारणे खालीलप्रमाणे:

  1. बेकायदेशीर अतिक्रमण करून अगदी चिंचोळ्या जागेत ही बेकरी चाले. संरक्षण देण्याऐवजी पोलिसांनी बेकरी पाडूनच टाकली असती. अशी कारवाई करण्याचा पूर्वी प्रयत्न झालाही होता, असे वाटते.
  2. जागा अतिशय चिंचोळी असल्याने आत प्रवेश करण्याआधी पिशव्या/शरीरे वगैरे तपासणे अशक्य होते. रस्त्यावरची रहदारीच अडली असती, किंवा मुळातच कमी असणारी आतली आसनक्षमता जवळजवळ शून्य झाली असती. हे बेकरी चालकांना चालले नसते.
  3. अशी तपासणी केली असताही बाँबस्फोट घडवणे फारच सोपे होते. गल्ली इतकी चिंचोळी आहे, की समोरच्या पदपथावर किंवा शेजारील बोळात एक साधी सायकल उभी करून बेकरी उडवता आली असती.
  4. याशिवाय बेकरीत अंमली पदार्थांची विक्री आणि सेवनही चालत असे. त्यामुळे पोलिसांपासून दूर राहणे बेकरी चालकांनाही सोयीचेच होते.

- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

चिरोटा's picture

15 Feb 2010 - 3:38 pm | चिरोटा

उपयुक्त माहिती.

'पोलीस शाहरुखच्या चित्रपटाच्या संरक्षणात गुंतलेले होते, म्हणून अतिरेक्यांचे फावले', असा एक सूर आहे

देशाचा आकार्/लोकसंख्येची घनता बघता पोलिस सगळीकडे संरक्षण देवू शकणारच नाहीत. गेल्या २० वर्षात लोक आणि पोलिस्/गुप्तचर संस्था ह्यांत बरेच अंतर निर्माण झाले आहे.स्थानिक लोकांच्या मनात काय चालु आहे ह्याचा मागोवा घेण्यात पोलिस्/गुप्तचर संस्था अनेक कारणांमुळे अपयशी ठरतात.
भेंडी
P = NP

पुरणपोळी's picture

16 Feb 2010 - 12:28 pm | पुरणपोळी

माझ्या माहिती प्रमाणे योग्य उच्चार छाबाद्/खबड वैगरे नसुन हाबाद असा आहे