--पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते, असा "स्त्री-पुरुष" समानतेच्या काळातही कायदा आहे.
(स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा)
पण याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो तो असा-
(१) समजा डावीकडील सीट रिकामी आहे, आणि तरीही स्त्री उजवीकडच्या रिकाम्या सीटवर बसते, तर हा सुद्धा हा कायदा टोडण्याचाच प्रकार आहे. कारण, डावीकडची सीट रिकामी असल्यावर सुद्धा मुद्दाम मुली/स्त्रीया/आडदांड बाया, उजवीकडेच बसतात. थोडे काही म्हटले तर उगाच सगळ्या प्रवाशांचा रोष पत्करण्याची भीती. कारण बहुतेक कायदे पुन्हा स्त्रीकडून. म्हणजे पुरुषांची हकाची एक सीट जाते.
-- डावीकडील पूर्ण सीटस भरलेली असतील तरच उजवीकडे स्त्रीयांनी बसले पाहिजे.
(उजवीकडे बसू नका असे आम्ही म्हणू ही शकत नाही, कारण, त्यांचे उत्तर तयार असते- "उजवीकडे, पुरुषांसाठी राखीव असे थोडेच लिहिले आहे?")
(२) बसमध्ये पुरुष उभे असताना, पैसे खिशातून काढत असतांना वगैरे अगदी चुकून धक्का एखाद्या स्त्रीला लागला तरी त्या अशा काही नजरेने बघतात की बापरे. विशेष म्हणजे बसमधल्या प्रत्येक मुलीला/ स्त्रीला असे (गैरसमजापोटी) वाटत असते की तीच फक्त जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे, आणि जणू काही बसमधले सगळे (सगळ्या वयाचे) पुरुष/ मुलगे फक्त तिलाच बघत आहेत.
-- बसमध्ये उभे असतांना कुणीही मुद्दाम धक्के देत नाही. बसमध्ये पुरुषांना हे टाळण्यासाठी अगदी चोरून उभे राहावे लागते.
(३) रविवारी कामाचा दिवस नसला तरी सुद्धा डावीकडच्या जागेसाठी स्त्रीया कंडक्टरकडे भांडत बसतात.
" डावीकडील पूर्ण सीटस भरलेली असतील तरच उजवीकडे रिकामी जागा असल्यास स्त्रीयांनी बसले पाहिजे."
अशी सूचना बसमध्ये लावली गेली पाहिजे.
नाहीतर, "उजवीकडील पूर्ण रांग पुरुषांसाठी राखीव करावा लागेल."
सर्व पुणेरी मंडळींना काय वाटते?
इतर शहरातील मंडळींनी सुद्धा मत व्यक्त करायला हरकत नाही.
प्रतिक्रिया
10 Feb 2010 - 2:50 pm | सुनील
प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!! ;)
चालू द्या....
(ठाणेकर) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Feb 2010 - 5:15 pm | जे.पी.मॉर्गन
धाग्यावर लक्ष ठेऊन आहे !
(पुणेकर)
जे पी
10 Feb 2010 - 10:55 pm | टारझन
"क्षणाचा सोबती" जी :) आपण हा आय.डी. का घेतला असावात तो ह्या धाग्यावरून समजते :)
आहोत ना बाप्या गडी :) धडधाकट ? उभे रहाण्यात काय गैर आहे ?
फायद्या तोट्यांचा विचार केला तर आरक्षणाचेच फायदे जास्त आहेत :)
घेऊन्द्या की म्हैलांना आरक्षणाचा लाभ ? मी तर म्हणतो संपुर्ण बसंच स्त्रीयांसाठी आणि बुढ्यांसाठी राखीव असावी :) हो .. आता कुजाट पोरी/म्हैला तर असतातंच सगळीकडे .. फाट्यावर मारायचं त्येंन्ला :) एवढा बारिक विचार नाही करावा ... लै बारीक पाहिलं तर बायांना बी दाडीमिषा दिसत्यात =))
म्हणून .. स्त्रीयांना आदर द्या :) आपलं चोरुन उभं र्हायलानं काय व्हतं ?
ह्यावरून आमच्या कॉलेजचे बसने प्रवासाचे दिवस आठवले ..
सकाळी सातची कॉर्पोरेशन ची बस :) ह्याच आरक्षणाचा बाऊ करून एका चाठाळ पोरीने एका आज्जोबांना जागेवरून उठवले ... बिचारे गयावया करत म्हणाले .. "पोरी.. मला सांधेदुखीचा त्रास आहो हो .." त्यावर पोरीने सातमजली आवाज चढवला :) आणि आजोबांना उठवले .. नंतर फोनवर गुलुगुल गुलुगुल गुलुगुल गुलुगुल .. अरेच्चा ? प्लानिंग तयार :)
णेक्स्ट डे :)
बस पावणेसातला स्टॉप ला उभी राहयची :) मुद्दाम मित्र-१ आणि मी लेडिज सिटची मधली सिट पकडली :) बाकी सर्व आरक्षित सिटे म्हैलांनी बरोबर भरली :) मॅडम हिल्स आपटत चढल्या ... आरक्षित सिट वर आम्हाला पाहून जागा मिळण्याच्या आशेने आल्या ...
अतिशय कुजट शब्दात .. " उठा .. "
आम्ही .. तोंडात नसलेला च्विंगम चावर कानातला मळ काढत पोरीच्या आरपार पाहिले .. जबरदस्त मिर्ची लागली :)
"हॅलो... स्टँड अप .. इट्स अ लेडिज सिट .. उठा उठा ... "
पलिकडून मित्र -२ ... "अर्रे .. उठला का रे ? "
मी ... "च्यायला .. बस मधे ? तुला काही वेळ काळ ?" ह्यावर बस हास्यहदर्यांनी हालते .. (तशीही आमच्या ग्रुप बरोबर पंगा कंडक्टर पण घेत नसायचा .. कोण तो कंडक्टर ? एकदा पंगा घेतला (करप्टेड साला .. पैसे घेऊन टिकीटं द्यायचा नाही ) त्याची सगळी तिकीटं हवेत भिरकावली होती =)) असो ..विषयांतर नको )
पोरगी अजुनंच चवताळते =)) आम्ही तिच्या आरपार पाहातो .. तिला पुर्ण इग्नोर करतो =)) कोणी वयस्कर म्हैला येतात .. त्यांना आम्ही आदराने सिट बहाल करतो =)) आणि बस मधुन खाली उतरतो .. "चला रे .. पुढच्या बसने जाऊया " हॅहॅहॅ
असो !
- धम्माल मुलगा
11 Feb 2010 - 2:22 pm | मदनबाण
सहमत...
(ठाण्यात टी.एम.टी जाऊन बेस्टची सेवा कधी चालु होईल त्याची वाट बघणारा)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
http://bit.ly/abk53o
12 Feb 2010 - 4:14 am | शुचि
बेष्ट - महीला आरक्षीत बसेस सुरु कराव्या म्हणजे ही जी डावी / उजवी गोची होते आहे ती थांबेल .... खी खी खी
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
12 Feb 2010 - 4:14 am | शुचि
बेष्ट - महीला आरक्षीत बसेस सुरु कराव्या म्हणजे ही जी डावी / उजवी गोची होते आहे ती थांबेल .... खी खी खी
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
10 Feb 2010 - 2:56 pm | नीधप
पुणे शहरातील स्त्री पुरूषांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर सीटस राखीव ठेवलेल्या असत्या तर जनरल सीटस वर बायांनी बसू नये हे म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
10 Feb 2010 - 3:04 pm | संदीप शल्हाळकर
बस मधुन जातांना पुरुष मंडळींना अगदी अपराध्यासारखा प्रवास करावा लागतो.
मी तर एकदा एका साठी उलटलेल्या आजोबांना एका मुलीने जागेवरुन उठवलेलं पाहिलं आहे. डोक्यात इतकी सणक भरली होती, पण मी काहीच करु शकलो नाही कारण मी पण धक्का बुक्की खात, जीव मुठीत धरुन उभाच होतो.
या वरुन मला मुंबईच्या लोकल मधला एक प्रसंग आठवला :
लोकल मधे स्त्रीयांसाठी स्वतंत्र डबे असतात. आणि त्यांच्या संरक्षणासाठी एक्-दोन रेल्वे पोलीस चोवीस तास त्या डब्यात असतात. गर्दीच्या वेळी स्त्रीयांच्या डब्यात नेहमी भांडण होत असतात. एकदा हे भांडण मोठ्या थराला गेलं म्हणुन रेल्वे पोलीसाला आत पडावं लागलं. तरी त्या स्त्रीया काही केल्या ऐकत नव्हत्या. आणि त्यांच्या भांडणात धक्का बुक्की मधे एका स्त्री चा हात निसटला आणि ती दारातुन खाली पडत असताना त्या पोलीसाने तिचा हात धरुन आत ओढले. जीव वाचला म्हणुन त्या स्त्रीने त्या पोलीसाचे आभार मानण्या ऐवजी त्याला न भुतो न भविष्यती अश्या शिव्या दिल्या आणि मारलं, त्याची कंप्लेन केली : हात धरला म्हणुन. त्या पोलिसाला निलंबित करण्यापर्यंत चर्चा सुरु होती. नंतर काय झाल माला माहित नाही.
कितिही विचार केला तरी याला कोणी काही करु शकत नाही....
या गोष्टीचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. मला वाटते की प्रत्येकाने आपले विचार व यावर काही उपाय असतील तर सुचवावेत.
10 Feb 2010 - 3:07 pm | नीधप
तीन वेळा लिहिलं म्हणजे बरोबर असं की काय?
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
10 Feb 2010 - 3:25 pm | राजकारणी
गांधी बाइंच राज्य ... दुसर काय... I)
10 Feb 2010 - 4:51 pm | विसोबा खेचर
हम्म! आम्ही काही पुणेकर नाही तरी चर्चा मात्र वाचत राहू! :)
तात्या.
10 Feb 2010 - 5:06 pm | शुचि
(२) र्या मुद्याबद्दल सांगायचं झालं तर अनेकदा वाइट अनुभव आलेले असतात त्यामुळे अम्ही बायका अॅज अ रिफ्लेक्स अॅक्शन रागाने बघतो. त्यात कुणाला अपमानीत करायाचा हेतू नसतो पण अ सेल्फ डिफेन्स मेकॅनिजम म्हणा.
बाकीचे मुद्दे पटण्याजोगे.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
10 Feb 2010 - 5:16 pm | सुवर्णा
सहमत..
10 Feb 2010 - 5:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अस्सं अस्सं ... रूपात मार खाल्लेल्या स्त्रियांवरही अत्याचार होतात, त्याही चुकीच्या गल्ल्यांमधे, इमारतींमधे सापडतात वगैरे आपणांस माहित नसावं! अगदीच रहावलं नाही म्हणून लिहीलं, पण धाग्याची मांडणी पहाता धाग्याबद्दल एकच प्रतिक्रीया:
पूर्वग्रहदूषित आणि अनाठायी सर्वसमावेशक!
आणि हो, उजव्या बाजूच्या सीटवर स्त्रिया बसल्या तर कोणता कायदा मोडला जातो या प्रश्नाचं उत्तर मिळेल काय?
बाकी झाडावर चढून बसले आहे, हाणामार्या पहाण्यासाठी! चालू द्या.
10 Feb 2010 - 5:44 pm | संदीप शल्हाळकर
उजव्या बाजूच्या सीटवर स्त्रिया बसण्यावर आमचा काहीही विरोध नाही. अट फक्त एकच : जर डावी बाजु रीकामी असेल, तर मात्र उजव्या बाजुला बसणं पुर्णपणे चुकिचं आहे.
10 Feb 2010 - 5:52 pm | नीधप
पण धाग्याची मांडणी पहाता धाग्याबद्दल एकच प्रतिक्रीया:
पूर्वग्रहदूषित आणि अनाठायी सर्वसमावेशक! <<
+ १
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
10 Feb 2010 - 6:15 pm | सनविवि
सहमत. माझ्या मैत्रिणींनी मला बरेच भयानक किस्से सांगितले आहेत. आपण स्वतःला कितीही सुसंस्क्रुत म्हणवत असलो तरी अजूनही सार्वजनिक ठिकाणी मुलींना सेफ वाटत नाही. त्यामुळे बसमध्ये त्यांनी सगळ्यांकडेच संशयाच्या नजरेने बघितले तर चूक त्यांची नाही तर समाजाची आहे.
पण डावीकडच्या जागा भरल्याशिवाय महिलांनी उजवीकडे बसू नये असे मलाही वाटते.
10 Feb 2010 - 5:49 pm | १.५ शहाणा
ब स च कापा ५०/५०
10 Feb 2010 - 5:54 pm | नितिन थत्ते
धागा वाचून
क्षणाचा सोबती = युयुत्सु (सप्तपदी फेम)
अशी शंका आली.
पहिल्या दोन गोष्टींचा मीही अनुभव घेतला आहे.
तरीही आरक्षण हवे अशाच जनरल मताचा मी आहे.
(पूर्वी बर्याच वेळा रत्नागिरीला जायचा प्रसंग येई. तेव्हा रात्रीच्या २ x २ बसने पुण्याला जाणार्या स्त्रिया -शेजारी कोणी असू नये म्हणून - डबल पैसे देऊन दोन्ही सीट रिझर्व करीत असलेले पाहिले आहे)
नितिन थत्ते
10 Feb 2010 - 6:41 pm | बिपिन कार्यकर्ते
तरीही आरक्षण हवे अशाच जनरल मताचा मी आहे.
सहमत... अर्थात सहसा कोणत्याही आरक्षणांबरोबर येते ती मग्रूरी मात्र नको असे नक्कीच वाटते... बरेच वेळा तरूण मुली / स्त्रिया बसलेल्या वृद्ध वगैरेंना केवळ आरक्षित आसनाचे कारण देऊन उठवत असतील तर मात्र ते समर्थनिय नाही.
बिपिन कार्यकर्ते
10 Feb 2010 - 6:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते,
च्यायला, हे काय आम्हाला माहिती नव्हते...! माहितीबद्दल धन्यवाद...!
>>बसमधल्या प्रत्येक मुलीला/ स्त्रीला असे (गैरसमजापोटी) वाटत असते की तीच फक्त जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे, आणि जणू काही बसमधले सगळे (सगळ्या वयाचे) पुरुष/ मुलगे फक्त तिलाच बघत आहेत.
हाहाहा हे मात्र कोणत्याही भौगोलिक प्रदेशाला लागू व्हावं...! :)
पुण्यातील बसच्या प्रवासाचा अनुभव नसल्यामुळे चर्चेसाठी मनःपुर्वक शुभेच्छा....!!!
-दिलीप बिरुटे
[सुंदर स्त्रियांना जागा देऊन अनामिक आनंदात उभ्याने प्रवास करणारा] :)
10 Feb 2010 - 7:29 pm | चिरोटा
पुण्यात व्हॉल्वो बसेस चालु झाल्या नाहीत का अजून? सीट पकडण्याची स्पर्धा तेवढी नसते व उभे राहुनही चांगला प्रवास होतो.
'जाणत्या राजाला' पुणेकर महिलांनी विनवणी करावी. ;)
(व्हॉल्वो प्रवासी) भेंडी
P = NP
10 Feb 2010 - 7:29 pm | ऍडीजोशी (not verified)
धोंडोपंत जोशांना त्यांच्या वडिलांनी सांगितले होते "बेंबट्या... कसली रे तुमची समानता? मेल्या रामराज्यातही रामाने हनुमानाचे शेपुट उपटून स्वतःला लावले नव्हते. राम माणूसच राहिला आणि हनुमान वानरच." आमची ह्या विधानावर श्रद्धा आहे. बाकी सोयीच्या समानतेविषयी न बोलणेच उत्तम.
10 Feb 2010 - 7:41 pm | रेवती
स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा
याचाच अर्थ असा कि समानता हवी आहे पण ती (बर्या बोलानं) मिळत नसल्यानं आरक्षण ठेवावं लागतं.
याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो
बसमध्ये बसण्याची जागा मिळायला हे करतात ना? बसमध्ये होत असलेल्या सहेतुक स्पर्शांपासून मिळाली तर तेवढीच सुटका हो, नाहीतर आजकाल वय वगैरेसारखे मुद्दे विसरून साठी सत्तरीचे आजोबा काय किंवा वीशी पंचवीशीची पोरं काय निर्लज्ज वर्तन करतच असतात. शाळा कॉलेजात असताना टाळण्याचे प्रयत्न असूनही अनेकदा स्पर्श होत असत. पंधरा दिवसांपूर्वीच्या भारतवारीत तर चाट पडण्याचे वेळ आली होती. एका पंचवीशीच्या आतबाहेर असलेल्या मुलाने रस्त्याने चालताना शेजारून जाताजाता पटकन माझा हात धरला. निदान स्रिया असले वर्तन तरी करत नाहीत (अपवाद वगळता). माझ्याकडे पाहून मला मुलगी तरी नक्कीच कोणी म्हणणार नाही. एखाद्या विवाहीत (अविवाहित महिलांवर तर बर्याचदा) महिलेवर अशी वेळ यावी (त्यावेळी मी सावध असते तर त्याने मार खाल्ला असता) तीही समानतेच्या जमान्यात? कुठला हो समानतेचा जमाना. कायदे/ आरक्षणं तरी किती देणार? मग या अनुभवांमुळे तिडीक येते. त्यासाठी प्रत्येकीने स्वत:ला सौदर्यवती समजण्याची गरज नसते.
रेवती
10 Feb 2010 - 8:33 pm | Dhananjay Borgaonkar
या गोष्टी फक्त भारतातच घडतात अस मला तरी वाटत नाही.
अर्थात कुठेही झाली तरी ते चुकच आहे.
बाकी चालुद्या..
10 Feb 2010 - 8:32 pm | बट्ट्याबोळ
मला बस मध्ये सुंदर पोरींच्या शेजारी बसायला अवडतं !! त्यातून एखादीने हळूवार झटका दिला तर आणखीनच बर वाटतं.
सीट विभागून द्यायला पाहीजे :)
11 Feb 2010 - 9:19 pm | शुचि
=D>
इतक्या शत्रुत्वाचा वातावरणात प्रामणिक आणि मस्त ;) उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन!!
बाय द वे - झटका म्हणजे करंट म्हणायचय का तुम्हाला?
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 9:19 pm | शुचि
=D>
इतक्या शत्रुत्वाचा वातावरणात प्रामणिक आणि मस्त ;) उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन!!
बाय द वे - झटका म्हणजे करंट म्हणायचय का तुम्हाला?
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
10 Feb 2010 - 8:46 pm | प्रकाश घाटपांडे
स्त्री पुरुष भेद हा निसर्गालाच अभिप्रेत आहेत. भेद हा लिंगभावावर आधारला आहे. भेद असण म्हणजे एका सारख दुसर नसण. म्हणजेच सम नसण म्हणजेच विषम असणं. विषम शब्दाला शोषणाची काळी छटा आहे.
व्यक्ति म्हणुन स्त्री वा पुरुषाकडे पहाताना लैंगिकता विसरता येणार नाही. एखादी बलवान स्त्री किडकिडित नवर्याचा मार खाते त्यावेळी ती मानसिकतेची गुलाम असते. एखादा फटका मारला तरी तो नवरा कोलमडुन पडेल.
आरक्षणचा हेतु दुर्बल घटकांना संरक्षण देउन संधीत समानता आणणे हा असतो. नाही तर बळी तो कान पिळी म्हणुन संधी दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणारच नाही.
सबल स्त्रिया आरक्षण नाकारतात. पण आरक्षणातुन मानसिक सुरक्षितता मिळते.
सामाजिक लैंगिकता जशी जशी बदलेल तस तसे लिंगभेदावर असलेले आरक्षणाची गरज कमी होईल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
11 Feb 2010 - 12:02 am | टारझन
लैंगिक प्रतिसाद :)
11 Feb 2010 - 3:04 pm | संजा
>>>>सामाजिक लैंगिकता जशी जशी बदलेल
सामाजिक लैंगिकता म्हण्जे काय ? ती बदलेल म्हण्जे काय होईल?
संजा
12 Feb 2010 - 10:34 am | प्रकाश घाटपांडे
लैंगिकता या विषयी पहाण्याचा समाजाचा सामुहिक दृष्टीकोण. या विषयी रं धो कर्व्यांनी आपल्याकडे मोठे कार्य केले आहे. सध्या त्याच विषयावर समाजस्वास्थ्य हे मासिक पहा.
शंभर वर्षांपुर्वी स्त्री कडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टीकोण व आजचा यात जर आपल्याला फरक जाणवत असेल तर त्याला बदल म्हणावे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करताना दिसते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
10 Feb 2010 - 11:49 pm | देवदत्त
धक्का न लागण्याकरीता बसमधील पुढील जागा स्त्रियांना व मागील जागा पुरूषांना द्यावयास सांगा. स्त्रिया पुढचा दरवाजा वापरतील, पुरूष मागील दरवाजा. बंगळूरू मध्ये तरी हेच आहे माझ्या आठवणीप्रमाणे.
11 Feb 2010 - 9:01 am | भाग्यश्री कुलकर्णी
इथेही इंदोरात हाच नियम आहे मोठ्या सिटी लिंक बस मध्ये .
11 Feb 2010 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार
सत्पुरुष विकास (II चार बांबुवाले II) ह्यांच्या जुन्या लेखाची आठवण झाली.
बाकी बस आणी एस टी ह्यांच्या वाटेला चुकुन जात नसल्याने आरक्षण असले काय आणी नसले काय आनंदच आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Feb 2010 - 3:08 pm | संजा
>>>II चार बांबुवाले II
||खल्लास ||
संजा
12 Feb 2010 - 9:52 am | टारझन
>>>II चार बांबुवाले II
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
हा पर्या साला महा हलकट्ट आहे =)) =))
च्छ्या =)) डोळे पाणावले =))
11 Feb 2010 - 8:30 pm | रेवती
(II चार बांबुवाले II)
अरे काय रे हे? हा हा हा!
रेवती