चॉकलेट चिप मूस
साहित्य
१ कप सेमी-स्वीट चॉकलेट चिप
१ पाकिट(८ औस) क्रिम चीज मऊ केलेले
१ टी स्पून वॅनिला
१ डबा(८ औस) फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग, थॉ करुन
शोभेसाठी पाकातल्या चेरी
मायक्रोवेव मधे चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. २-३ मिनिटात चिप्स वितळतात. चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवा. एका बोल मधे क्रिम चीज आणि वॅनिला फेटून घ्या. तो पर्यंत चॉकलेट गार झाले असेल. वितळलेले चॉकलेट क्रिम चीज मधे घालून फेटा. आता त्यात व्हिप्ड टॉपिंग हलक्या हाताने फोल्ड करा. बोल मधे घालून सर्व करेपर्यंत फ्रीज मधे ठेवा. सर्व करताना वर चेरी लावा.
प्रतिक्रिया
11 Feb 2010 - 7:10 pm | मदनबाण
व्वा...पाणी सुटलं जिभेला !!! :)
यकदम गार गार वाटलं... ;)
जाता जाता :--- च्यामारी या फोटोतली चेरी उचलुन घेण्याची काय सोय करता येईल काय ? :? )
( चॉकलेट प्रेमी)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
11 Feb 2010 - 8:17 pm | रेवती
छान दिसतय मूस!
हिवाळा संपेलच महिनाभरात, त्याची चाहूल मात्र या पदार्थाने लागली.
रेवती
12 Feb 2010 - 9:37 am | चित्रा
भारीच आहे कृती. एक चमचा खाल्ले की बास.
अधिक साखर घातलेली दिसत नाही, एवढीच साखर पुरे होते का?
12 Feb 2010 - 9:58 am | विसोबा खेचर
फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग म्हणजे काय?
थॉ करुन म्हणजे काय?
पाकृ समजली नाही. हा पदार्थ खाऊनच पाकृ कशी आहे ते कळेल..
(ठार देशी) तात्या.
12 Feb 2010 - 10:00 am | चिऊ
'च्यामारी या फोटोतली चेरी उचलुन घेण्याची काय सोय करता येईल काय ?' नुसती चेरी घेतली का पूर्णा बोल घेतला.... :( :-(
12 Feb 2010 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिला फोटो पाहून बोट बूडवून चाखण्याचा मोह झाला :)
मस्तच....!
-दिलीप बिरुटे
12 Feb 2010 - 6:01 pm | स्वाती२
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
@चित्रा
साखर घालायला लागत नाही. टॉपिंगमधे असतेच.
@तात्या
विप्ड टॉपिंग म्हणजे खोटे क्रिम. फेटलेल्या खर्या क्रिम सारखे दिसते पण बनवलेले असते हायड्रोजेनेटेड ऑईल पासून. याचे आईसक्रिम सारखे डबे मिळतात. थॉ करणे म्हणजे रुमच्या तापमानाला आणणे.
समर मधे या आमच्या इंडियानाला, हुजिअर पाहूणचार घ्यायला. :)
13 Feb 2010 - 10:52 pm | विसोबा खेचर
नक्की! :)
13 Feb 2010 - 3:11 am | सुमीत भातखंडे
...
13 Feb 2010 - 2:21 pm | आशिष सुर्वे
चॉकलेट चिप आणि क्रिम चीज म्हणजे आमचा 'कच्चा बिंदू'!
आणि आपली पाककृती म्हणजे... चाब्बूक!!
एक शंका आहे..
वॅनिला ऐवजी दुसरा एखादा 'फ्लेवर' घातला तर्र चालेल का??
मॅंगो.. इत्यादी?
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
13 Feb 2010 - 7:01 pm | स्वाती२
धन्यवाद.
वॅनिला ऐवजी मँगो sounds exotic! तुम्हाला ट्राय करावे लागेल.
मी आपली आल्मंड, हेजलनट, कॉफी, दालचिनी वगैरे नेहमीचे भरवश्याचे मेंबर वापरते. बर्याच जणांना मिंटही आवडतो पण आमच्याकडे नाही आवडत. माझा दुसरा चॉइस म्हणजे साध्या क्रिम चिज ऐवजी स्ट्रॉबेरी च्या स्वादाचे क्रिम चिज वापरणे.