एक टक्का अपवाद वगळता ९९ टक्के सासू या कधीच सूनेची आई होवू शकत नाही. स्वतःच्या मुलीशी जशी वागते तशी सुनेशी का वागू शकत नाही? जी सासू स्वतःच्या सुनेशी आईसारखी वागत नाही, ती मात्र स्वतःच्या मुलीच्या सासू बाबत तीची सासू आईसारखी असावी अशी अपेक्षा का बाळगते?
जेव्हा सून म्हणून एक कुणाची तरी 'मुलगी' नव्या घरात येते, तेव्हा घरातील सासूचेच मुख्य कर्तव्य असते तीला आपलेसे करणे. जर प्रत्येक गोष्टीत ती सून आणि मुलगी असा दुजाभाव करत असेल तर मग तीने तरी सुनेकडून मुली सारखी अपेक्षा का करावी?
हा वैश्विक (भारतीय) प्रश्न कसा सुटेल? सुनेत आणि मुलीत नेहेमी भेदभाव का केला जातो? कामाला सून आणि आरामाला मुलगी. स्वतःच्या सुनेकडून कामाची अपेक्षा करणारी सासू स्वतःच्या मुलीच्या सासरी तीला कमीत कमी काम असावे अशी अपेक्षा का ठेवते? सगळ्या सासू-सूनांनी यात मनापासून भाग घेवून आपापले मत मांडावे.
सासू- सून यांना चर्चेद्वारे कळू द्यात एकमेकांची मते!!
प्रतिक्रिया
31 Dec 2009 - 7:02 pm | पर्नल नेने मराठे
हल्ली दिवस बदललेत हो.. उगाच हे नाते बदनाम झालय.
आणी ह्या नात्याला खालिल उपमा दिलि गेलिये.
चुचु
31 Dec 2009 - 7:03 pm | माधुरी दिक्षित
चाकु काय , विळीच चित्र नाही का मिळाल =))
31 Dec 2009 - 7:06 pm | पर्नल नेने मराठे
:D ह्म्म...विळ्या भोपळ्याच ना
चुचु
31 Dec 2009 - 7:20 pm | घाशीराम कोतवाल १.२
१ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
२काथ्याकूट सासू ही 'आई' का होवू शकत नाही?
३विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी?
४ भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?
५ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
काय मालक हे काय ब्रेकिंग न्युज सारखे एकदम ५ लेख पाडलेत
तुमचा बोळा निघुन एव्हड्या दणक्यात ५ लेख प्रसवलेत कमाल आहे हो तुमची तुम्ही जालिंदरबाबांचा गंडा घालुन एव्हडे लेख पाडलेत
लगे रहो !!!
भले शाब्बास
(लेखाच्या अखेरचा सोबती ) कोतवाल
31 Dec 2009 - 7:22 pm | घाशीराम कोतवाल १.२
.
31 Dec 2009 - 7:44 pm | प्रियाली
यावर उपाय सोपा आहे. मुलांनी घरजावई व्हावे. जसे सासरे आणि जावई यांचे नाते गोड असते तसे सासू सुनेचे नाते लांब राहून बरे राहिल.
लग्नात सासू सुनेला जवळ घेऊन सांभाळ हो माझ्या लेकराला अशी विनंती करेल.
मुलीच्या आई-वडलांकडे मुलाचे आई वडिल जाऊन "आमच्या मुलाला सांभाळून घ्या. चुकलं-माकलं तर पोटाशी घ्या" अशी विनंती करतील.
लग्नात सासू सुनेचे पाय धुवेल.
सुनेच्या चपला लपवून तिचे कान किंवा केस (झिंज्याही चालतील) ओढावेत.
अशाप्रकारे प्रथा बदलल्या की हळूहळू सासू सुनेचे संबंध प्रेमाचे होतील.
आशावादी रहा.
1 Jan 2010 - 10:25 am | महेश हतोळकर
जमणार नाही.
जसे सासरे आणि जावई यांचे नाते गोड असते
असे झाले तर सासरे आणि जावई यांचे गोड नाते कडू होईल. एक सामाजीक प्रश्न सोडवण्यासाठी दुसरा निर्माण करण्याचा हा मार्ग योग्य नव्हे. दुसरं काही तरी सुचवा.
31 Dec 2009 - 7:58 pm | वेताळ
क्षणाचा सोबती भावा अजुन वेळ गेलेली नाही. स्वःताला सांभाळ. टीव्हीवर उगाचच सासु ,सुन ,गोजीरवाणे घर अश्या भिकार मालिका बघुन त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवु नकोस.
वाटल्यास मायाजाल वर अश्लील साईटी बघ. पण ह्या मालिकेपासुन स्वःताचा बचाव कर.
वेताळ
31 Dec 2009 - 9:02 pm | jaypal
आजुन माहीती हवी अस्ल्यास ईथे टिचकी मारा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
31 Dec 2009 - 9:04 pm | अमृतांजन
सासू - सुनेच्या भांडणात कोणाची बाजू घ्यावी हे पुरुषाला जेव्हा कळेल तेव्हा हा प्रश्न सुटेल.
31 Dec 2009 - 10:20 pm | बिपिन कार्यकर्ते
सारख्या सूचना ---- सूचना नको
आता वादाचा मुद्दा इतका मूलभूत असल्यावर कसं पटणार? खरं की नाही?
बिपिन कार्यकर्ते
1 Jan 2010 - 1:52 pm | भडकमकर मास्तर
खूप छान..
आवडले लेखन..
मनपसंत...
1 Jan 2010 - 8:22 pm | रेवती
काहीतरीच प्रश्न आहे बुवा!
सासू ही 'आई' का होवू शकत नाही?
आमच्याकडे तरी सासूबाई आधी माझ्या नवर्याच्या आई झाल्या(बर्याच वर्षांपूर्वी ). आणि आमचं लग्न झाल्यानंतर सासू झाल्या. त्यामुळे कोणतीही महिला ही एक आई असल्याशिवाय सासू कशी काय बुवा होऊ शकेल? सासू होण्यासाठी मुलाचीच आई असण्याची अटसुद्धा नाही.....मुलीची आई ही जावयाची सासूच असते.
रेवती
3 Jan 2010 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ब्येश्ट रेवतीताई!
असो. सासूने आई का बुवा व्हायला पाहिजे? उद्या म्हणाल आत्याने काका व्हायला पाहिजे ... एक जन्मदात्री, पालनकर्ती आई पुरत नाही का? आणि नसेल पुरत तर हा दोष सासूचा का आपला?
अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.
30 Jan 2010 - 10:56 am | अमृतांजन
कन्यादान केल्यानंतर ऑफिशियली कन्या तिकडची होत नाही का?
एका अर्थाने एक जन्मदात्री आई असतांना दुसरी कशाला होऊ घातली पाहिजे- जे नैसर्गिकच नाही ते बळजबरीने नैसर्गिक कसे होऊ शकते हा ही विचार योग्य वाटतो. त्यामुळे सासूने "सासू" हाच रोल करावा हेच बरे. फक्त तो रोल कसा करायचा असतो हे काही कुठे शिकवले जात नाही.
भारत अमेरीका नसल्यामुळे तेथे जसे "सेल्फ हेल्प" प्रकारच्या पुस्तकातून अनेक अशा स्वरुपाचे विषय मांदले जातात तसे भारतातील लेखकांनी खालील विषयावर पुस्तके लिहावीत-
१. सासूने कसे वागावे
२. वन मिनट सासू
३. द न्यु एज ऑफ सासू
४. द सासू
५. कॉग्निशन ऑफ सासू
६. हाऊ टू विन सून
भारतातील लोकांना इतिहासात युगपुरुषांनी केलेल्या चूका चघ्ळायला जास्त आवडते पण सद्य स्थितीतील असलेल्या अडचणी न सोडवून ते भविष्यातील लोकांना त्यांच्या आत्ताच्या चूका चघळायला देण्याची तजवीज करुन ठेवतात. -
अमृतांजन
30 Jan 2010 - 12:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओहो ... म्हणजे इ.स. २०१० फक्त कॅलेंडरात असून विचारमात्र इ.स. १७५६ मधे फ्रीज झालं आहे तर .. मग चालू द्या!
कन्या म्हणजे वस्तू आहे का, दान करायला? आणि ती मुलगी म्हणजेही रोबो आहे का, एका क्षणात 'आई बदलली' हे मान्य करायला! आणि सासूसुद्धा दुसरा रोबो आहे का, एका क्षणात सूनेला मुलगी मानायला.
सासू आई होत असेल तर आनंद आहे, पण चांगली सासू असेल तरीही त्यात आनंद मानायला काय हरकत आहे?
अदिती
30 Jan 2010 - 2:06 pm | अमृतांजन
[ अवांतर- माझ्या मते भारतीय विवाह पद्धतीत ज्या प्रोसीजर लिहिल्या गेल्या त्या पाहून युरोपमधील उद्योगधंद्यांनी आय एस ओ वगैरे स्टॅंडर्ड लिहीली.]
लग्नविधी हे पुजापाठ वगैरे अशा नजरेने आपण बघत नाहीच. ते एक मोठ्या चतुरतेने मांडलेले विधी आहेत. त्याला सध्या आलेले रुप नजरेसमोर न आणता जर त्या विधींच्या पलिकडे पाहिले तर त्यातील चतुराई दिसते. ज्या समाजाने हे विधी मान्य केले आहेत ते त्यांनी स्वीकारलेले असतातच. त्यास बरा पर्याय असेल तर त्याचाही वापर केला जातो.
तरीही तुम्ही-आम्ही ज्या समाजात राहतो, त्या समाजाने मुलीने सासरी जाणे हेच मान्य केले आहे.- मुली सासरी जातात व नाव बदलतात. अपत्यास, कुटूंबास अधिकृतपणा- कायद्याने व सामाजिक रितीने येण्यासाठी हे करावेच लागते. - जो पर्यंत कायदा तसा आहे तो पर्यंततरी. पुढे पुरुषाने लग्न झाल्यावर पत्नीचे आडनाव घेऊन तिचे नाव वडीलांच्या जागेवर घेऊ देण्यास कायदेशीर व सामाजिक मान्यता मिळाली की, ते ही शक्य होईलच; आजतरी ही परिस्थीती नाही.
वधूचे आई-पिता आता ह्या कन्येवरील "हक्क" सोडत आहेत असा एक मेसेज कन्यादान विधीतून दिला जातो. (त्यामुळेच लग्नानंतर जन्मदात्रीचा त्यांच्या संसारातील ढवळा-ढवळ उचित नसावी.) तुमचा विरोध कन्यादान ह्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाला आहे की, त्यातून दिल्या जाणाऱ्या मेसेजला?
सप्तपदीतून जे मेसेज नवरा-बायकोला दिले जातात ते ही जर तटस्थपणे पहा. ते फक्त स्त्रीलाच लागू पडतात असे नव्हे. नवऱ्यानेही हे समजून घेणे आवश्यक असावे की, ही स्त्री माझ्याबरोबरीने संसाराला तयार होतांना तीने सर्वस्वाचा त्याग करुन माझ्या बरोबर येत आहे. तिला तीच्या इगो पेक्षा काय महत्वाचे वाटत आहे- माझ्या बरोबरीने कशा स्वरुपाचा संसार करायचा आहे हे ती मला सांगते आहे. आणि हे ती सगळ्या मान्यवर कुटूंबियांसमोर, समाजातील इतर नातेवाईकांसमोर सांगत आहे. हे ही तिच्या मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे. हे त्याला समजणे आवश्यक आहे. [मराठी-हिंदीतील सिरियल मधील स्त्री पात्रांच्या कळत-नकळत घडणाऱ्या घटनांना विवाहसंस्थेच अधिकृत स्थान नाही हे दोघांना त्यावेळेस समजावे हेच त्यातून सांगायचा प्रयत्न केला गेला आहे.- मोठ्या चतूरतेने]
मग सौभाग्याची लक्षणे म्हणून त्या स्त्रीस जी आभूषणे द्यावी लागतात ती परीधान करणे ह्यातील मेसेज काय हे स्त्रीयांना इतरांनी काय सांगावे.
त्यामुळे जुने ते मुर्खपणा असा सरसकट विचार अयोग्य आहे. त्यातील जो मेसेज देता यावा त्यासाठी तो सोहळा अधिकाधिक आनंदी वातावरणात व सर्व कुटूंबियांच्या साक्षीने व्हावा ह्यासाठी ज्या विधींचा प्लॅटफॉर्म दिला गेला त्यास आलेल्या भ्रष्ट स्वरुपाला तुम्ही नावे ठेवत असाल तर मान्य आहे.
प्रत्येक धर्माने जवळपास अशाच रितीने लग्नविधींना स्वरुप दिले आहे. तुम्हे निका कुबूल है असो किंवा डू यु ऍक्सेप्ट हिम/हर ऍज युवर हजबंड/वाईफ असो, तो विधी एक विशिष्ठ मेसेज देण्यासाठी दिला गेला आहे.
अनेकदा मुलींना स्वतःच्या घरी लाडाकौतूकात वाढवले जाते. आई तर तिच्या असंख्य चूका पोटात घेत असते. पण मग अशा मुळे त्या मुलीला त्या वातवरणाची स्वय होऊन बसते व जेव्हा इव्हॅल्युएटर वेगळा होतो तेव्हा त्या चूका खपवून घेतल्या जात नसतील तर घोटाळा होणारच. अर्थात हेच सासू-सुनेच्या बेबनावचे एकमेव कारण आहे असे मी मानत नाही. - पण महत्वाचे कारण आहे ह्याची मात्र खात्री आहे. वर म्हणाल्याप्रमाणे सासूला सासूगिरी म्हणजे काय हे शिकवणारी मिडीया काय आहे? कोणालाच आपल्यापेक्षा वरचढ व्यक्ति आपल्यावर वरचष्मा गाजवू पहात असेल तर इगो दुखावला जातोच व त्यास ती व्यक्ति विरोध करते.
मी मांडलेले विचार तुम्हाला तुमचा इगो दुखावेल असे वाटले तेर तुम्ही त्यास तुमची मते कशी जास्त योग्य आहेत हे सांगणारच. मुद्दा असा की, अशा इगो-रिलेटेड ताणतणावच्या मानवी भाव-भावना फक्त सासू-सुनेच्या सेटअप मधे होत नाहीत त्या सगळी कडे सदा-सर्वकाळ होत आहेत- आजन्म राहतील- नोकरीत, दुकानात (दुकानदाराने तुमच्या कडे लक्ष दिले नाही की), रस्त्यावर- रिक्षावाल्याने तुमच्या इच्छीत स्थळी येण्यास नकार दिला तर, वगैरे. तुम्ही त्याबद्दल त्रागा करता व तुम्हाला ते तेथेच विसरुन पुढे जावे लागते. पण सासू-सुनेच्या बाबतीत ते जर रोज अथवा नेहमी होत राहिले तर त्यावर इलाज काय? सुरुवातील नुसता त्रागा नंतर ही रोजची कटकट, इथून सुरु झालेला प्रवास वेगळे होऊन संपतो.
30 Jan 2010 - 4:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुलींनी सासरी रहावं आणि/किंवा नाव बदलावं असं कोणत्या कायद्यात लिहीलं आहे?
समाजात हेच आणि असंच होतं असं आपणांस वाटतं का? (अगदी माझ्या आई-वडिलांपासून) अनेक जोडपी माझ्या माहितीत आहेत की जी दोन्ही (नवरा-बायको दोघांच्या) आई-वडिलांपासून वेगळी रहातात.
अवांतरः १. (स्त्री/पुरूषांना) नाव बदलण्यासाठी लग्नाची गरज नसते. २. हिंदू कायद्याप्रमाणे वडिलोपार्जित संपत्ती मुलगा-मुलगी दोघांनाही समप्रमाणात मिळते.
कन्येवर दुसर्या कोणाचा "हक्क"? एका माणसावर दुसर्या कोणत्याही माणसाचा हक्क?? आपल्यावर कोणाचा हक्क हे आपण ठरवू शकत नाही!
जाऊ दे, हे सगळं माझ्या अल्पमतीच्या पलिकडचं आहे. तेव्हा सौभाग्याची लक्षणं (सौभाग्य फक्त बायकांचंच असतं, सगळे पुरूष मेले दुर्भागी!), इगो, जुनं ते सोनं, आपली संस्कृतीच युरोपात निर्यात झाली वगैरे फारच पुढच्या गोष्टी झाल्या, त्या राहू देत!
अदिती
30 Jan 2010 - 8:38 pm | अमृतांजन
हक्क ह्या शब्दाचा असा अर्थ घेऊ नका हो, "माझी मुलगी आता तुमची सून झाली" असे त्यातून तुम्ही समजून घ्याल असे वाटले.
30 Jan 2010 - 5:48 pm | स्वाती२
>>तरीही तुम्ही-आम्ही ज्या समाजात राहतो, त्या समाजाने मुलीने सासरी जाणे हेच मान्य केले आहे.- मुली सासरी जातात व नाव बदलतात. अपत्यास, कुटूंबास अधिकृतपणा- कायद्याने व सामाजिक रितीने येण्यासाठी हे करावेच लागते. - जो पर्यंत कायदा तसा आहे तो पर्यंततरी.
मी माझे नाव बदलले नाही. कुठेही कायद्याने अडचण आली नाही. आता लग्नानंतर १६ वर्षांनी नाव बदलायचा निर्णय घेतलाय. त्यासाठी बर्याच कागदांवर सह्या कराव्या लागणार आहेत.
30 Jan 2010 - 8:44 pm | अमृतांजन
कायदा एखाद-दुसऱ्या व्यक्तिला नजरेसमोर ठेवून केस-टू-केस बेसिसवर करत नाहीत. असला असता तर अधिक उत्तम झाले असते किंवा सगळ्या युज केसेस घेऊन उपनियम, पोटनियम करुन तयार करुन त्यात ज्याला हवा तो कायदा निवडता आला असता तर चांगलेच झाले असते. आणि कोणताच कायदा संपूर्ण समाधान करणारा नसू शकतो हे कोणालाही पटेलच. तुम्ही आता नाव बदलता आहात ते काही कारणामुळेच ना. तीच कारणे महत्वाची असल्यामुळेच तुम्हाला ते करावे लागतेय. आणि तोच मुद्दा येथे आहे.
30 Jan 2010 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तो आधीचा हक्क वगैरे मुद्दा जाऊ देत, व्यक्तीचा स्वतःचाच स्वतःवर हक्क असतो, १८ वर्षांच्या वरच्या (जवळजवळ) प्रत्येकाला घटनेनेच अधिकार दिलेले आहेत, वगैरे लिहायला मला सध्यातरी वेळ नाही आहे.
कायद्याच्या कोणत्या कलमात लिहीलं आहे की मुलीने नाव बदलावं? माझ्या माहितीत काही जोडपी आहेत जिथे मुलीने नाव बदललं नाही आहे. एका जोडप्याने मूल दत्तक घेतले तेव्हाही त्यांना त्रास झाला नाही. काहींनी स्वतःच्या मुलांना जन्म दिला तेव्हाही त्रास झाला नाही. काही 'डिपेंडंट' व्हिजावर भारताबाहेर जाऊन आले, त्यांनाही काहीही कष्ट झाले नाही.
नाव न बदलणं (आमच्यासारख्या आळशी लोकांसाठीही) उत्तम, कालची पूजा बर्वे अचानक सायली वैद्य बनून इंटरनेटवर समोर आली की काहीही समजत नाही (गोष्ट खरी असली तरी नावं बदलली आहेत). मी सुद्धा नाव बदललं नाही आहे, काही ठिकाणी शिक्षणाचा माज दाखवणारं अभिधान नावाआधी सोयीसाठी लावते, तेवढंच. गेल्या दोन वर्षांत मला कोणत्याही सरकारी कागदपत्रांमधेही त्रास झालेला नाही.
सगळे करतात म्हणून ते बरोबर असेल असं नाही, चुकीचं असेल असंही नाही; पण थोडं वेगळं करणार्या/वागणार्या लोकांबद्दलही हेच म्हणता येईल.
असो. स्वाती२ ताईंचे प्रतिसाद अगदी पटले. ओढून ताणून आई-मुलीचं नातं बनवण्यापेक्षा सासू-सुनेचं चांगलं नातं का जपू नये?
अदिती
31 Jan 2010 - 3:18 am | अमृतांजन
>>ओढून ताणून आई-मुलीचं नातं बनवण्यापेक्षा सासू-सुनेचं चांगलं नातं का जपू नये?>>>
खालील प्रतिसादातील-
http://misalpav.com/node/10651#comment-174412
ह्या वाक्यावर आपले काय मत आहे?
"एका अर्थाने एक जन्मदात्री आई असतांना दुसरी कशाला होऊ घातली पाहिजे- जे नैसर्गिकच नाही ते बळजबरीने नैसर्गिक कसे होऊ शकते हा ही विचार योग्य वाटतो. त्यामुळे सासूने "सासू" हाच रोल करावा हेच बरे."
31 Jan 2010 - 4:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कायद्याच्या कोणत्या कलमात लिहीलं आहे की मुलीने नाव बदलावं?
हा प्रश्न आता मी तिसर्यांदा याच धाग्यात विचारत आहे, कारण गेल्या दोन्ही प्रतिसादातल्या या मुद्द्याकडे आपण दुर्लक्ष करत आहात!
"ओढून ताणून आई-मुलीचं नातं बनवण्यापेक्षा सासू-सुनेचं चांगलं नातं का जपू नये?" हे वाक्य स्वातीताईंना पाठींबा देण्यासाठी लिहीलेलं होतं.
अदिती
31 Jan 2010 - 6:36 pm | अमृतांजन
ते कायद्याच्या कलमाचं-बिलमाचं जाऊ द्या, ते लिहित बसायला मला वेळ नाही. तुम्ही तो प्रतिसाद नीट वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की, माझे आणि तुमचे विचार एकाच समान गोष्टीचा मागोवा करत आहेत.
31 Jan 2010 - 4:05 am | स्वाती२
माझ्यासाठी आत्ताही नाव बदलणे आवश्यक नाहिये. पण होते काय प्रत्येक ठिकाणी Mr. X and Ms. Y असे लांबलचक लिहावे लागते. आमची दोघांचीही आडनाव लांबलचक स्पेलिंगवाली आहेत. त्या पेक्षा Mr. and Mrs. X सुटसुटीत होणार आहे. नवरा खरे तर आता एवढ्या वर्षांनी हे काय नविन खुळ म्हणूनच याकडे बघतोय.
1 Jan 2010 - 10:01 pm | चिरोटा
मराठी मित्राची पत्नी तामिळ आहे.तिला मराठी येत नाही.सासु-सुनेत त्यामुळे संवाद होत नाहीत्.मित्र मध्यस्थ म्हणून काम करतो.इतरांच्या मानाने त्याच्या डोक्यावर कमी पांढरे केस आहेत आणि तो बर्याचवेळा आनंदी दिसतो. सासु-सुनेत वितुष्ट यायला कारण समान भाषा हे असते असे मला वाटते.
तेव्हा, सासु-सुन ह्यांची मातृभाषा भिन्न असेल तर प्रश्न सुटायला हरकत नाही.
भेंडी
P = NP
30 Jan 2010 - 2:20 pm | अमृतांजन
काय लकी आहे तो नवरा- नक्कीच फिल्टर्ड निरोप देत असणार.
"त्या सटवीला सांग जरा लवकर उठत जा, आमच्या कडे ७ वाजेपर्यंत लोळत बसण्याची पद्धत नाही" असे सासूला सांगायचे असेल तर,
"मॉम सेज शी इज वंडरींग व्हाय डू यु गेटाप सो अर्ली; इप्फ शी डजन गेट एनफ स्ल्पिप, शी विल बी टायर्ड "सून"...
2 Jan 2010 - 12:43 pm | अविनाशकुलकर्णी
सासू ही 'आई' का होवू शकत नाही..
१..कारण सून मुलगी होवू शकत नाही..
२..कारण सासरा बाप होवू शकत नाही.
माझ्या ओळखिचि एक मुलगी आहे ति सासुला छाछु म्हण्ते..
3 Jan 2010 - 2:27 pm | पर्नल नेने मराठे
=))
छुछु ;)
3 Jan 2010 - 1:54 pm | नेहमी आनंदी
खोटी गोष्ट आहे. खर तर सुनेने घरात प्रवेश करतानाच एक मुलगी म्हणुन प्रवेश केला तर, आणि एक सासु ने सुन घरात न येता मुलगी घरात येतेय असे समजुन भावना प्रदर्शित केल्या तर हा मुद्दा अस्तित्वात येत नाही.
माझ्या घरी मला कधीच सुनेची वागणुक मिळाली नाही. आणि गम्मत म्हणजे माझे सासु सासरे सुद्धा माझ्या मुळे खुश होते.:)
3 Jan 2010 - 4:25 pm | अमृतांजन
>>माझ्या मुळे खुश होते>>
मग आता काय परिस्थिती आहे?
29 Jan 2010 - 11:27 pm | शुचि
सासूला सूनेची वाटणारी असूया - सून जास्त तरूण अणि सुन्दर असते
सासूला वाटणारी असुरक्षितता - नवी सून आता घर ताब्यात घेईल का?
_____
सूनेच म्हणाल तर - तारुण्यातील अविचारीपणा/ अननुभवीपणा/मस्ती
दुसर म्हणाल तर नुसत आई म्हणून कोणी आई बनत नसत ..... त्याला काळ जावा लागतो.
उपाय - लेट द टाइम टेक इट्स टोल
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो
30 Jan 2010 - 6:15 pm | स्वाती२
सासू ने 'आई' व्हावे किंवा सुनेने 'मुलगी' व्हावे अशी अपेक्षा करणेच चुकीचे. अशी ओढून ताणून नाती कशी जुळणार? सासू-सुन नात्याकडे दोघींनी सकारात्मक दृष्टीने पाहिले, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून एकमेकिंना आदराने वागवले तर कालांतराने मैत्री होऊ शकते, सहवासाने प्रेम वाढून नाते घट्ट होऊ शकते.
30 Jan 2010 - 6:22 pm | चिरोटा
आता हे कसे साध्य करायचे? उद्यापासून एकमेकींकडे जरा सकारात्मक द्रूष्टीने पाहत चला हे त्यांना कोण सांगणार? @)
सासु आणि सून एकमेकांपासून बर्याच अंतरावर असतील तर मतभेद कमी होतात असे माझे निरिक्षण आहे.एकत्र कुटुंब असले तर मुलगा मधल्यामधे चांगलाच 'सापडतो'.
भेंडी
P = NP
30 Jan 2010 - 6:17 pm | टारझन
इथलेही प्रतिसाद वाचून अंमळ मौज वाटली ;)
ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा !
सोडा तिच्यामायला कोणाच्या घरात कोण सुण कोण आई ह्यावर गोधड्या फाडण्यापेक्षा आपण आपल्या घरात काही प्रॉब्लेम होणार नाहीत ह्याची काळजी करतो.
जाता जाता :- घरजावई मुलगा का होऊ शकत नाही ?
30 Jan 2010 - 8:47 pm | अमृतांजन
कधी मौज अंमळ
कधी डोळ्यात जळ
टाऱ्या तुझे बळ
झालेय का पातळ?
30 Jan 2010 - 8:54 pm | बिपिन कार्यकर्ते
जाता जाता :- घरजावई मुलगा का होऊ शकत नाही ?
हॅहॅहॅ!!! तोडपाणी झालं वाटतं?
बिपिन कार्यकर्ते
30 Jan 2010 - 9:04 pm | अमृतांजन
हो असच वाटतं- ब्याकग्रावूंड तयार करतंय वाटतं.