गाभा:
महागाईला कृषीविभाग जवाबदार हाय. कृषीमंत्री जवाबदार हाय असे आरोप होत हायेत.
वर्षभरापुर्वी महागाईवर नियंत्रण आनन्यासाठी देशातल्या सार्या मुख्यमंत्र्याची बैठक व्हणार व्हती.
ती अजून झाली नाही. भाववाढीबाबत राज्यसरकार आन केंद्रसरकार जवाबदारी झटकून राह्यले.
त्यामुळं म्हागाईवर नियंत्रण राह्यलेले नाय. आपल्याला काय वाटतं महागाईला जवाबदार कोण ?
प्रतिक्रिया
25 Jan 2010 - 11:50 am | मदनबाण
ज्यांनी अशा दयाळु सरकारला ५ वर्षासाठी निवडुन दिले आहे ,तेच लोक महागाईला जवाबदार आहेत !!!
(साखर कंपन्याचे शेयर सुद्धा असेच किंमतीने वाढतील काय ? :?)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
25 Jan 2010 - 11:56 am | उग्रसेन
सरकार जसे जबाबदार हायेत तसे हे धान्य-वस्तूचे साठे करणारे शेठलोकबी
जबाबदार हायेत त्यायच्यावरबी कारवाई व्हाला पाह्यजेन काय म्हणता ?
बाबुराव :)
25 Jan 2010 - 12:08 pm | मदनबाण
मढ्यावरच सोन उचलणार्यांची कमी नाही इथे...
http://www.prahaar.in/mumbai/18428.html
(कडुलिंब गोड लागतो की साखर कडु... :?)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
25 Jan 2010 - 12:16 pm | उग्रसेन
आरं बाबा ! सगळी चर्चा साखरेवरच काहून व्हून राह्यली.
पवार सायबाला काहून टार्गेट करुन राह्यले. आता ते म्हणले ना.
यंदा गहू-तांदळाचा उत्पादन चांगलं व्हईन. त्याचा भाव कमी राह्यले पाह्जेन.
बाबुराव :)
25 Jan 2010 - 12:32 pm | मदनबाण
बाबुराव जसं मीठा शिवाय जेवण अळणी होत्...तसंच साखरे विना गोडवा... ;)
चला तर आता गहु-तांदळाचा स्टॉक करुन ठेवला पाहिजे काय ? ;)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
25 Jan 2010 - 12:28 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
25 Jan 2010 - 1:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
स्वतः च्याच दोन थोबाडात मारुन घ्याव्याशा वाटतात असले काही वाचले की.
साखरच्या आयाती वरचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
साठे बाजांवर कड्क कारवाई केली जाईल
रेशनच्या दुकानांमधे ३ रुपये कीलो दराने साखर उपलबध्द केली जाईल
ईत्यादी व असेच काहीसे दिशाभुल करणारे समर्थन सरकार तर्फे केले जाईल. कोणतीही ठोस उपाय योजना केली जाणार नाही. शासकिय / राजकीय संरक्षणात दलाल गब्बर होत जातील. बळीराजाच्या हातातली उरलेली करवंटी आणि सामान्य माणसाची फाटकी लंगोटी सुध्दा आता हिसकाऊन घेतली जाईल.
याला उपाय एकच.
आपण सगळ्यानी एकत्र आले पाहीजे. आणि आपली ताकद दाखवुन दिली पाहीजे. करण्या सारखे बरेच काही आहे. फक्त करण्याची इच्छा असली पाहीजे.
आपला शंढ पणाच आपल्याला नडतो आहे. मला काय करायचे ही मध्याम वर्गाची मनोवॄत्ती जो पर्यंत बदलणार नाही तो पर्यंत असल्या चर्चा करुनच आपण आपला उद्वेग शांत करायला पहाणार.
भेकड, हलकट, शेळपट आणि लाचार लोकांच्या नशीबी महागाईची चर्चा करण्या पलीकडे काय असू शकते.
केंद्र्सरकार किंवा राज्य सरकार कडुन अपेक्षा करणे म्हणजे स्वतःच्या दारातला कचरा रस्त्यावर लोटुन देण्या पलीकडे काही नाही.
केंद्र्सरकार किंवा राज्य सरकार किंवा कोणा कडुनही कोणतीही भीक मागण्यात काय अर्थ आहे?
पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
25 Jan 2010 - 1:13 pm | उग्रसेन
स्वतः च्याच दोन थोबाडात मारुन घ्याव्याशा वाटतात असले काही वाचले की
हे मातर मान्य.
आपण सगळ्यानी एकत्र आले पाहीजे. आणि आपली ताकद दाखवुन दिली पाहीजे. करण्या सारखे बरेच काही आहे. फक्त करण्याची इच्छा असली पाहीजे.
म्होरं कोण व्हईन भाऊ ?
आता भाऊ तुमी बोल्लाच हाय तर सांगतो. आमी राशनाच्या दुकानावर राकेल ११ रुपये लिटर घेतो.
आता एवढं राकेल काय म्हहीनाभर जात नाय. तव्हा त्याच राशनवालाकडे गेल्यावर तेच राकेल २५ रुप्पंय लिटर देतो.
एकदा त्याची तकरार तहसीलदाराकडं केली. त्यांची मिटामिटी झाली. आन माहं राकेल बंद झालं..तुमच्या वाट्याचं राकेल अजून आलं न्हाय म्हणनत्यात, आता बोला !
बाबुराव :)
25 Jan 2010 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
प्रत्येक वेळी कुणितरी नेता असावाच लागतो का? त्या शिवाय आपले आपण काहीच करु शकत नाही का? मोर्चे, भाषण, आंदोलने, उपोषण या मुळे कोणता प्रष्ण कधी सुटलेला पाहीला आहे का? कुठल्या नेत्याच्या मागे गेल्याने आपले आज पर्यंत भले झाले आहे?
हे व्यापारी, दलाल कोणत्या नेत्या कडे जातात? ते स्वतःच्या मनगटाच्या जोरावरच तुम्हाला लुट्ण्याचे धाडस करतात ना? मग तुम्ही कशाला कुठल्या मसिहाची वाट पहाताय?
मी काही तुम्हाला कुठलेही दुकान लुटा गोदाम फोडा असे सांगत नाही. पण तुमच्या हातात असते तेवढे तुम्ही करु शकताच ना. साधा उपाय करा , जे आम्ही सुध्दा घरी केले आहे, साखर महाग झाली तर साखरकमी खा. मी बंद करा म्हणत नाही. पण आपण सगळ्यांनी मिळुन साखरेची मागणीच कमी केली तर भाव अपोआपच नियंत्रणा खाली येतील. माझ्या बर्याच मित्रांना, ज्यांच्या बरोबर मी या विषयाची चर्चा केली त्यांना, माझे हे दीवा स्वप्न वाटते. पण मला ठाम खात्री आहे की असे करुन आपण नफेखोरीला आळा घालु शकतो.
तुम्ही सगळे जण दुधवाल्याला दुधपिशवी टाकण्या साठी टाकणावळ देता की नाही? पुण्यात तर हा चार्ज सरसकट आहे. आमच्या सोसायटी मधे एकच दुधवाला आणि पेपर वाला आहे. ज्याच्य शिवाय दुसर्या कोणालाही आमच्या सोसायटी मधे प्रवेश नाही. तो आमच्या कोणा कडुनही टाकणावळ घेत नाही. प्रष्ण महीना १० रुपये वाचवण्याचा नाही. पण त्या मुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत.
डोंबिवलीत माझ्या मामाच्या सोसायटी मधे वाणसामानाची खरेदी संपुर्ण सोसायटी साठी एकत्र केली जाते आणि त्यांना बाजार भावापेक्षा कितीतरी स्वस्त आणि दर्जेदार माल मिळतो. बर्याच वस्तु आत ते थेट उत्पादकांकडुन / शेतकर्यांकडुन घेतात.
फार काही करायची गरज नसते, फक्त मनात प्रबळ ईच्छा असली पाहीजे.
पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
25 Jan 2010 - 4:17 pm | मैत्र
कष्ट करून गरजेपुरते पैसे मिळवणार्या दूध / पेपर टाकणार्या पोराला महिन्याला दहा रुपये दिले तर काय गैर आहे?
वाटेल त्या भावाला गरजेच्या वस्तु - गहू, तांदूळ, साखर, तेल, रेशनचे रॉकेल हे विकणार्या व्यापार्यांच्या विषयात थेट कष्ट करून जगणार्याला मध्ये का ओढलं आहे?
बहुतेक मध्यमवर्गीय विशेष चॅरिटी करत नाहीत. मग गरजू मनुष्याला काम देउन मदत करणं हे सहज शक्य आणि चांगलं कर्तव्य सोडून दहा रुपयांसाठी एकत्र येणं पटलं नाही. एकत्र येण्यासाठी इतर अनेक चांगली कारणं शोधता येतील.
27 Jan 2010 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार
क्षमा करा,
पण आमच्या कडे दुध आणि पेपर टाकणारा पोर्या म. न. पा. च्या निवडणुकीला उभा राहीला होता.
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
26 Jan 2010 - 9:14 am | बंडू बावळट
प्रचंड लोकसंख्या हे प्रत्येक प्रश्नाचे मूळ आहे!
26 Jan 2010 - 5:31 pm | II विकास II
महागाईला जबाबदार फक्त ग्राहक आहेत. त्यांनी जर खाणे-पिणे सोडले तर महागाई कशी होइल???
26 Jan 2010 - 5:37 pm | मदनबाण
दांड्यावाले विकास आपण कधीही अन्नग्रहण करत नाहीत का ? जर तसे असेल तर वरचा प्रतिसाद योग्य वाटतो...
(खादाड ग्राहक)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
26 Jan 2010 - 7:03 pm | तिमा
या महागाईला आपली सिस्टिम जबाबदार आहे, शेतकर्यांना रास्त भाव न देता तो मधल्या दलालांनाच वाढवून मिळाला आहे. ही मधली 'दलाली' व्यवस्था जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत शेतकरी व ग्राहक हे दोन्ही रडणार!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
27 Jan 2010 - 8:19 am | पाषाणभेद
महागाईला कोण जबाबदार आहे असा प्रश्न गौण आहे. महागाई ही हत्तीच्या पायाने आलेली आहे, जाणार मुंगीच्या पायाने. सगळ्यांनी घीर धरायला हवा. आम्ही शेतकर्यांसाठी कर्जमाफी दिली. त्याने आत्महत्या थांबल्या. हा आपल्या सरकारचा विजय आहे. महाराष्ट्र सोडून ईतर ठिकाणी आत्महत्या होत नाही हा आपलाच विजय आहे. साखरेचे भाव पुढील महिन्यात कमी होतील. ईथॅनॉल ला आता चांगली किंमत येत आहे. शेतकर्यासाठी, सामान्यजनतेसाठी जे जे लागेल ते ते आम्ही करू. उसाला यंदा चांगला भाव दिला आहे. या वर्षी पाऊस कमी झाला असल्याने तो कमी पडलेला पाऊसच या महागाईला जबाबदार आहे. शासकिय कार्यालय मग ते कोणतेही असो, अगदी दिल्लीचे असले तरी ते या महागाईला जबाबदार नाही. गेल्या सदतीस वर्षात अशी महागाई भडकलेली नव्हती. कदाचीत आपले पंतप्रधान याला जबाबदार असतील. या महागाईवर उपाय शोधला पाहिजे. आपले पंतप्रधान या महागाईला जबाबदार नाही. बी-बियाणे, खते, शेती औजारे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पाटबंधारे खाते चांगले काम करत आहे. तिकडे महिलांचे बचत गट चांगले कार्य करून त्यातील गृहीणी, महिला, बाया ह्या त्यांच्या संसाराला हातभार लावत आहे. असेल असतांना महागाई कितीही झाली तरी त्याने काही फरक पडणार नाही.आलेल्या संकटाचा सामना आपण करू. येत्या पुढील आठवड्यात आम्ही दुधाला एक रुपया वाढवून देणार आहोत. त्याने शेतकर्यांचा फायदा होईल. खतांवरील सबसीडी वाढवून देवू. त्यानेही शेतकर्यांचा फायदा होईल. आपल्या भागातील सहकारी कारखान्यांची साखर पुढच्या महिन्यात कदाचित खुल्या बाजारात आल्यानंतर महागाई कमी होईल अशी आशा आहे. आपण दाळी परदेशातून आयात करत आहोत. असे असतांना मध्यमवर्गीय जनता त्याचा लाभ घेईल. त्यामूळे मला तरी महागाई कोठे आहे याचा ठावठिकाणा लागत नाही. महागाईत आपल्या कार्यालयाचा, पंतप्रधान कार्यालयाचा काही हात आहे असे मी कधीच म्हटलेले नव्हते. तरीही पुढील महीन्यात किंमती कमी होतील.
27 Jan 2010 - 8:30 am | मदनबाण
महागाईला कोण जबाबदार आहे असा प्रश्न गौण आहे.
हा प्रश्न गौण कसा ? सामान्य माणुस पेंढा खाऊन जगु नाही शकत... ;)
आम्ही शेतकर्यांसाठी कर्जमाफी दिली. त्याने आत्महत्या थांबल्या.
ऐकावे सॉरी वाचावे ते नवलच आहे...
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MumbaiEdition-3-1-2...
बाकी विचाराल तर,,, महागाईच्या आयचा घो !!! आणि दयाळु सरकारचा विजय असो... ;)
(सामान्य हिंदुस्थानी माणुस)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
27 Jan 2010 - 8:31 am | पाषाणभेद
बाना, आरं तुझं रुप तरी कोन्चं म्हनावं गड्या? आँ? तु फशीवला गेल्याच नाटक करूं र्हायला का काय?
------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
27 Jan 2010 - 12:25 pm | समंजस
महागाई :?
कुठे आहे महागाई 8| काय असते ही महागाई :S
अहो, पुरोगामी महाराष्ट्रातील आम्ही पुरोगामी जनता आहोत :>
महागाई सारख्या तुच्छ गोष्टींना आम्ही महत्त्व देत नाही (|: आणि असल्या निरर्थक गोष्टींना आम्ही निवडणूकीचा मुद्दा करत नाही आणि त्यामुळेच त्याला अनुसरून मतदान तर मुळीच नाही [( म्हणूनच आम्ही सत्ताधार्यांना मुळीच दोषी समजत नाही. व्यापारींना तर त्याहून नाही.
साखर/धान्याचं उत्पादन कमी झालं तर त्यात बिचार्या ह्या व्यापार्यांचा काय दोष? हि तर त्या आत्महत्या करणार्या शेतकर्यांचीच चुक आहे.
28 Jan 2010 - 6:20 pm | उग्रसेन
पेपरवाल्यांनी साखरेचे भाव तेलाचे भावगडगडणार
अशी खोटी-खोटी बातमी पेप्रात छापाची
दररोज लागणार्या वस्तूंचे भाव द्यायचे.
जुने दर आणि नवे दर.
जुने दर>> साखर ४० रु किलो.
नवे दर>> २० रु किलो
ज्यायनी ज्यायनी साठे करुन ठेवले हाय
त्यायनी नाय एका किलोला एक किलो साखर फ्री दिली तर नाव बाबुराव नाय ठेवणार.
बाबुराव :)
29 Jan 2010 - 12:51 am | प्रशु
महागाईला जबाबदार म्हणाल तर....
ज्योतिषी आणी त्यांचे पाळलेले पोपट
ज्योतिषी = राजकारणी
पाळलेले पोपट = राजकार्ण्याना निवडणुकित पे॑सा पुरवणारे