राजू परुळेकर : राजकीय पत्रकार ?

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in काथ्याकूट
26 Jan 2010 - 1:44 am
गाभा: 

राजु परुळेकर ... संवाद नावाची मुलाखतींची मालिका ई टीव्हीवर पूर्वी बघत असे...
चांगले लोक शोधून शोधून त्यांना ( उत्तरांपेक्षा लांबलचक) प्रश्न विचारण्याची कला त्यांना चांगली साधली आहे असे तेव्हा वाटत असे आणि आदर वगैरे वाटत असे...

पण सध्या त्यांची गाडी राजकीय पत्रकारितेकडे वळाल्यापासून त्यांचे मजेमजेदार लेख लोकप्रभेत वाचायला मिळत आहेत....

नितेश राणेंवर त्यांनी नुकताच लिहिलेला हा लेख वाचा...
http://www.loksatta.com/lokprabha/20100129/alke.htm

लेख वाचून छान छान वाटलं... ...

त्यातली काही महत्त्वाची वाक्यं...
१. आरतीच्या वेळी मात्र आम्ही सर्वजण एकत्र उभे होतो (देवासमोर सर्व समान!) त्यात माझ्या एका बाजूला राज होता, दुसऱ्या बाजूला नितेश राणे. त्या रात्री मी डायरी लिहिताना नोंद केली. नितेश राणे A man to be watched.
२.नितेशला ए.सी. चालत नाही. त्याला लगेच ब्राँकायटीसचा त्रास होऊन तापापर्यंत प्रकरण जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्यासोबत चर्चा करताना ए.सी., पंखे बंद असतात. मला हे भयानक वाटतं
३.दुसरं म्हणजे ‘झेंडा’ नावाचा एक विकृत चित्रपट उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि कशाकशाने अवधूत गुप्ते नावाच्या माणसाने नारायणराव, राज ठाकरे व इतर अनेकांचं असत्यावर आधारित चारित्र्यहनन करणारा चित्रपट काढला. नितेशने ‘झेंडा’विरुद्ध बंड उभारलं ते आपल्या वडिलांच्या प्रेमातून. ते बंड राजकीय नव्हतं.
४.उद्धवने एखाद्याला पकडला (उदा. आदेश बांदेकर, अवधूत गुप्ते) की त्यांच्या करियरचं वाटोळं निश्चित! राजने एखाद्याला माफ केलं की धोका लाखपट जास्त हा माझा अनुभव...

ते वरचं दोन नंबरचं वाक्य आहे ना, एसी आणि पंख्याचं, त्याचा संदर्भ मूळ लेखात पुन्हापुन्हा वाचूनसुद्धा कळाला नाही...
उद्धवच्या आशीर्वादाने काढलेला झेंडा विकृत आहे असे काही लिहिले आहे या लेखात... मी काही झेंडा पाहिलेला नाही, त्यामुळे काही कल्पना नाही...
ते असो..

एखादा पत्रकर अमुक एका पक्षाचा आहे, म्हणजे त्याने एक विशिष्ट पक्षाची भूमिका घेऊन बोलावं , त्या पक्षाला डिफेंड करत राहावं हे पाहणं मला अवघड जातं...
कुमार केतकर आणीबाणीच्या समर्थनपर काही लिहितात तेव्हा डोकं गरगरतं...
किंवा भरतकुमार राऊतांना तर शिवसेनेच्या (त्यांना स्वतःलाच न पटणार्‍या??!! ) गोष्टी डिफेन्ड करताना केविलवाणी धडपड करावी लागते असं मला सारखं वाटतं...

मिपावर फार छान सही होती ,(कोणाची बरं? आठवत नाहीये )
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

26 Jan 2010 - 2:33 am | चिरोटा

परुळेकरांचे लोकप्रभातले personality cult छापाचे लेख वाचून पूर्वीच अंदाज आला होता. कुमार केतकरही हेच करतात. हे पत्रकार खरोखर **** आहेत की वाचकांना **** समजतात तेच कळत नाही. असो.
लेखातूनच-

नितेश खूप समजूत असलेला, खोल माणूस आहे

खोल माणूस म्हणजे कसा?

मुख्य म्हणजे त्याची काम करण्याची पद्धत शिवसेना टाइप नाही. त्या टाइपची झाक असली तरी मूलत: त्याची खोली काँग्रेससारखी आहे.

काँग्रेसची खोली हा काय प्रकार आहे? आपण काँग्रेस हाउस ऐकून आहोत.!!

तो कार्यक्रम एका समूह चर्चेसारखा होता. राज्य आणि देशाबद्दलची दूरदृष्टी आणि शासन संस्था याबाबत चर्चा होती. सर्व चर्चा छान झाली.

क्लास !!. नितेश राणे,प्रणिती शिंदे,पंकज भुजबळ्,पूनम महाजन ह्यांनी राज्य आणि देशाबद्दलची दूरदृष्टी आणि शासन संस्था ह्याबद्दल चर्चा केली!!
ह्याचा अर्थ आता मी पण आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलू शकतो. :)
भेंडी
P = NP

नंदन's picture

26 Jan 2010 - 3:34 am | नंदन

लेखात मांडलेल्या निरीक्षणांशी सहमत आहे. काही नेत्यांशी असलेली सलगी सतत दाखवत राहणे, आपल्याभोवती स्वतःच आरती ओवाळून घेणे आणि बेधडक विधाने करणे हे त्यांचे अजून काही विशेष.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

26 Jan 2010 - 11:26 am | श्रावण मोडक

अंडरस्टेटमेंट का काय म्हणतात ना ती हीच नंदनराव. हेच परुळेकर विचारवंत म्हणून उद्या पुढे येतील तेव्हा ही स्टेटमेंट अंडरस्टेटमेंट कशी आहे हे समजेल आपल्या सगळ्यांना.
बादवे, मास्तर ती सही भोचक यांची.

Nile's picture

26 Jan 2010 - 4:03 am | Nile

परुळेकरांनी जेव्हा सुरुवातीला राज यांची मुलाखत घेतली (अन छापली) तेव्हापासुनच राजु परुळेकर यांना वाचणे बंद केले. एकदा का पत्रकार 'पक्ष'पाती झाली की तो पत्रकार म्हणुन संपला. त्यापेक्षा मग पक्षाचे जाहिरनामे वाचलेले काय वाईट? ;)

घाटावरचे भट's picture

26 Jan 2010 - 5:44 am | घाटावरचे भट

उपरीनिर्दिष्ट लेख आणि एकूणच परुळेकरांचं आजकालचं लेखन गंडलेलं आहे असे निरीक्षण आहे.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Jan 2010 - 7:16 am | कालिन्दि मुधोळ्कर

परूळेकरांचे लेखन अगदीच सुमार आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Jan 2010 - 7:31 am | अक्षय पुर्णपात्रे

हा सरळ सरळ लाळघोटेपणा आहे. खरोखरच मराठी पत्रकारितेची अवस्था इतकी बिकट झाली आहे का? श्री मास्तरांच्या निरीक्षणांशी सहमत.

......................................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

अविनाशकुलकर्णी's picture

26 Jan 2010 - 7:54 am | अविनाशकुलकर्णी

उगवत्या सुर्याला नमस्कार....सरशी तिथे पारशी..और क्या?

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 8:16 am | बंडू बावळट

राजू मूळातला गुणी पण बिघडला आताशा..

वरील सर्वांशी माझी सहमती..

बंडू बावळट.

प्रमोद देव's picture

26 Jan 2010 - 8:46 am | प्रमोद देव

पूर्वीच्या काळी राजेमहाराजांच्या पदरी भाट,चारण वगैरे लोक बाळगलेले असत.
जे त्यांच्या स्वामींची आरती/स्तुती गायचे.
आजकालच्या काळात नेते/सत्ताधारी हे देखिल एकप्रकारचे राजे महाराजे आहेत आणि त्यांनी पदरी बाळगलेले पत्रकार म्हणजे त्यांच्या आरत्या गाणारे भाट.
ह्या लोकांकडे फारसे गांभीर्याने पाहू नये.
राजु परूळेकर ह्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. ते तर स्वत:ला फार मोठे राजकीय विश्लेशक समजतात पण प्रत्यक्षात ते 'राज'कीय पत्रकार आहेत.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2010 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर निरिक्षणाशी सहमत. लोकप्रभेचा लेख वाचायला दिल्याबद्दल धन्यु....!!!

पत्रकारांना आपले कोणाशी कसे घनिष्ट संबंध आहेत हे दाखविण्याची खाज असतेच, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, राजू परुळेकर असावेत.[अजूनही असतील असेच] असो,...

-दिलीप बिरुटे

आनंदयात्री's picture

26 Jan 2010 - 9:07 am | आनंदयात्री

आधी हौसेने ते सदर वाचायचो. आत कुठे पटत नसतांनाही सगळे भारी म्हणतात म्हणुन तोंडदेखली का होईना मान हलवायचो ! पण आता मात्र अती झालेले आहे, दोनेक महिन्यांपासुन त्यांना वाचणे बंद केलेय, आपल्यातला केतकर म्हणुन दुर्लक्ष .. इतकेच.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Jan 2010 - 9:47 am | कालिन्दि मुधोळ्कर

>>सगळे भारी म्हणतात म्हणुन तोंडदेखली का होईना मान हलवायचो !

का?!
ह्या लेखकांचीही काही बांधिलकी आहे; अकोंटीबिलीटी आहे. आणि त्यांना आपण धारेवर धरले पाहिजे, नाही का?

महाराश्ट्रात १९९७ पासून दोन लाख शेतकर्यांनी आत्म्हत्या केल्या आहेत; हा आकडा देशात सर्वाधीक आहे. (हा दुवा)

असे चित्र असताना परूळेकरांच्या बालिशपणाचा आणि लाळ्घोटेपणाचा तिरस्कार करावा तेवढा कमि च आहे.

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 9:11 am | बंडू बावळट

ह्या चर्चेचा दुवा राजूला त्याच्या विरोप पत्त्यावर कळवला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2010 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>ह्या चर्चेचा दुवा राजूला त्याच्या विरोप पत्त्यावर कळवला आहे.

शाब्बास...! :)

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

26 Jan 2010 - 9:44 am | मदनबाण

श्री.बावळट, समाज कार्यात हातभार लावल्या बद्दल अभिनंदन... ;)
बाकी मास्तरांशी सहमत...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

मला राजाभाऊंचा (याने कि 'राज'साहेबांचा) विरोप पत्ता हवा आहे!
असल्यास कृपया द्यावा.
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2010 - 10:36 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ आम्ही बी त्तेंच्या ब्लॉगवर प्रतिक्रियेत लिवलय. http://rajuparulekar.blogspot.com/
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सहज's picture

26 Jan 2010 - 9:57 am | सहज

कदाचित पत्रकारीतेचा कंटाळा येउन आता त्यांना माध्यमसम्राट वगैरे बनायचे असेल. असो.

>राजने एखाद्याला माफ केलं की धोका लाखपट जास्त हा माझा अनुभव...

राज ठाकरे यांना विनंती त्यांनी लवकरात लवकर परुळेकरांना माफ करावे.

बाकी सारेगमपा कार्यक्रमात परिक्षकाचे काम करणारा अवधूत गुप्ते का दुसरा कोणी? त्याच्या करियरचे वाटोळे झाले, कधी, कसे?

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Jan 2010 - 9:59 am | कालिन्दि मुधोळ्कर

>>राज ठाकरे यांना विनंती त्यांनी लवकरात लवकर परुळेकरांना माफ करावे.
=D>
मस्त. कोणत्याही कारणानं...

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2010 - 11:30 am | बिपिन कार्यकर्ते

मला परूळेकरांचा संवाद हा कार्यक्रम आवडायचा, बर्‍यापैकी आवडायचा. त्यात खरंच खूप छान आणि मुख्य म्हणजे जास्त प्रसिद्ध नसलेले पण उत्तम कार्य करणारे लोक आमंत्रित असायचे. परूळेकरांचे प्रश्न पण अभ्यासपूर्ण वाटायचे. मधून मधून त्यांची सदरं वाचायचो, लेख वगैरे वाचायचो. मध्यंतरी, त्यांनी तेंडुलकरांवर लिहिलेले वाचले. त्यांची 'तें'शी असलेली सलगी कळली. आणि मग एकदम ते मनसेच्या वर्तुळात दिसायला लागले. मग ते अल्केमिस्ट्री सुरू झालं... त्यांचे काही लेख ठीक होते. पण या वेळचा लेख मात्र काही केल्या समर्थनिय वाटत नाही. अजिबातच नाही. परूळेकर हुशार आहेत, त्यांना भवतालाची उत्तम जाण असावी असे अजूनही मला वाटते. त्यांनी वेळीच योग्य त्या सुधारणा कराव्यात. आम्हाला अजून एक कुमार केतकर नको आहेत... एक आहेत तेच झेपत नाहियेत. असो.

वर उल्लेखिल्या प्रमाणे परूळेकर हे वाचत असतील तर त्यांनी यावर जरूर विचार करावा.

बिपिन कार्यकर्ते

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Jan 2010 - 11:52 am | कालिन्दि मुधोळ्कर

कुमार केतकरांचा संदर्भ कळला नाही. त्यांच्याशी मतभिन्नता असेल पण ते 'प्रश्नांवर'(ही) लिहीतात. ह्या साहेबांनी टीन-एज मासिकातली गोष्ट लिहिली आहे.

जाता जाता: आज मी मझ्या डायरीत एक नोंद करणारः "राजू परूळेकरः शोभा डे चा पुरूषी पण कल्पनाशून्य, पाणी घातलेला अवतार."

ज्ञानेश...'s picture

26 Jan 2010 - 5:13 pm | ज्ञानेश...

अगदी अगदी...! :)

अनामिका's picture

26 Jan 2010 - 7:04 pm | अनामिका

आज मी मझ्या डायरीत एक नोंद करणारः "राजू परूळेकरः शोभा डे चा पुरूषी पण कल्पनाशून्य, पाणी घातलेला अवतार."

=)) =))
»
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अनामिका's picture

27 Jan 2010 - 3:04 pm | अनामिका

प्रकाटाआ
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

संजा's picture

26 Jan 2010 - 11:49 am | संजा

प्रत्येकाला आपापला धंदा नफ्यामधे आणण्याचा अधिकार आहे.

मि. परूळेकर कीप ईट अप.

संजा

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 11:55 am | बंडू बावळट

प्रत्येकाला आपापला धंदा नफ्यामधे आणण्याचा अधिकार आहे.

एक वेगळा विचार! आवडला...! :)

बंड्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2010 - 1:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येकाला आपापला धंदा नफ्यामधे आणण्याचा अधिकार आहे.

स्सही ! =D> यालाच म्हणतात दृष्टीकोण !

[अशा लाजवाब प्रतिसादामुळे मिपावर मजा येते.]

-दिलीप बिरुटे

मी_ओंकार's picture

26 Jan 2010 - 3:44 pm | मी_ओंकार

मास्तर ,
अगदी नेमका विषय मांडलात. परवाच एका ब्लॉगवर परुळेकरांचा सचिन तेंडूलकर वरचा लेख आणि त्या ब्लॉग लेखकाने त्यांच्यावर केलेली टिका वाचली. तेव्हाच परुळेकर बिघडले हे लक्षात आले. हा लेख तर कहर आहे.

सचिन वर लिहिलेले लेख.

http://www.loksatta.com/lokprabha/20091127/alkem.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20091218/alke.htm

चिरोटा's picture

26 Jan 2010 - 4:24 pm | चिरोटा

परुळेकरांचे लेख मला विनोदी वाटतात. वरच्याच लेखातून-

सचिनचं एक मला आवडतं. त्याला उकडीचे मोदक आवडतात. मला पण.

लोकप्रभेसारख्या साप्ताहिकात परुळेकर लिहितात आणि लोकप्रभावाले ते खपवतातही ह्याचे आश्चर्य वाटते.
क्रिकेटबरोबरच राजकारण आणि चित्रपट ह्या गोष्टींचा भारतिय(मराठी) नागरिकांना मूर्ख बनवण्यास उपयोग होतो हे परुळेकर विसरलेले दिसतात.
भेंडी
P = NP

देवदत्त's picture

26 Jan 2010 - 7:28 pm | देवदत्त

राजू परूळेकरांचा 'संवाद' कार्यक्रम मी आवडीने पहायचो. तसेच त्यांचे 'माणसे: भेटलेली, न भेटलेली' हे पुस्तक ही चांगले वाटले होते.

पण अल्केमिस्ट्रीनंतर ती आवड कमी झाली. ते लेख मी वाचून सोडून द्यायचो. पण सचिनवरच्या लेखाने कहर केली. मी ही त्यावर दोन प्रतिक्रिया लिहिल्या होत्या.
http://maajhianudini.blogspot.com/2009/11/blog-post_22.html
http://maajhianudini.blogspot.com/2009/12/blog-post_14.html

प्रदीप's picture

26 Jan 2010 - 7:32 pm | प्रदीप

राजू परूळकरांची शैली कशी आहे, ती आपणास आवडते की नाही, त्यास काही दर्जा आहे अथवा नाही, ह्याबद्दल दुमत असू शकते. परंतु त्यांच्यावर लाळघोटेपणाचा आरोप येथे काही जणांनी केला आहे. त्याचे कारण, मी तरी त्यांचे गेल्या वर्षब्भरातील जे काही वाचले आहे त्यावरून, आणि त्यांचा वर निर्देशीत केलेला लेख वाचून मला कळू शकले नाही. एखाद्या व्यक्तिमत्वाने भारून जाऊन त्याविषयी काही चांगले लिहीणे म्हणजे लाळघोटेपणा? म्हणजे पत्रकारांनी नेहमीच 'आठ्याळ राखुंड्यां'ची भूमिका घ्यावी की काय? पूर्वापार मराठी पत्रकार राजकिय नेत्यांविषयी व्यक्तिगत भलावण करणारे लिहीत आले आहेत. आणी तसे करतांना त्यांची काही त्या त्या नेत्यांशी राजकिय बांधिलकी होतीच असे नाही. शरद पवार, कॉ. डांगे, बाळासाहेब ठाकरे, मधू दंडवते, ना. ग. गोरे, जॉर्ज फर्नांडिस.. अशी अनेक स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहेत, ज्यांच्या काही न काही गुणांविषयी लिहीणे झालेले आहे, ते आपल्या वाचनात आलेले आहे. त्यात, तसेच सदर लेखातही गैर नेमके काय आहे? येथे नितेश राणे हे त्यांचे मॅनेजमेंटच्या शिक्षणाचा वापर त्यांच्या सामाजिक/ राजकिय कार्यासाठी करत आहेत, त्याविषयी जे काही लिहीले आहे, त्यात नक्की काय आ़क्षेप आहे, हे मला समजलेले नाही. खरे तर नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय, हे दोन्ही अगदी (आपापल्या) कोपर्‍यातील नेते आहेत, त्यांची भवितव्ये अजून स्पष्ट नाहीत, तेव्हा त्यांची खुशामत करून परूळकरांना काही फायदा असे म्हणणे जरा खेचून ताणून आणल्यासारखे वाटते. आता ते ह्या नेत्यांच्या पुढील भवितव्याकडे नजर ठेऊन त्यांची आतापासूनच खुशामत करत असतील असे म्हटले तर त्यांच्या रिस्क-टेकिंगची दाद द्यायला व्हावी.

कुमार केतकरांचा उल्लेखही ह्या निमीत्ताने काही जणांनी केलेला आहे, आणी तोही ह्याच लाळघोटेपणाच्या संदर्भात. मला व्यक्तिशः केतकरांच्या लिखाणाविषयी तिटकारा आहे, कारण त्यात व्यक्त केलेली मते (व अलिकडे तर अगदी काँस्पिरसी थेयरीचा पाठपुरावा) मला अजिबात पटत नाहीत. त्यांची सोनिया- आरती मला पटत नाही. तरीही ते जे काही लिहीतात ते काही स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन लिहीतात असला आरोप मी करणार नाही-- अगदी उद्या ते काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले तरी.

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 7:33 pm | बंडू बावळट

प्रदीप यांचा प्रतिसाद विचार करण्याजोगा आहे. आवडला!

--बंड्या.

श्रावण मोडक's picture

26 Jan 2010 - 10:06 pm | श्रावण मोडक

नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय, हे दोन्ही अगदी (आपापल्या) कोपर्‍यातील नेते आहेत, त्यांची भवितव्ये अजून स्पष्ट नाहीत, तेव्हा त्यांची खुशामत करून परूळकरांना काही फायदा असे म्हणणे जरा खेचून ताणून आणल्यासारखे वाटते.
परुळेकरांना काही फायदा होतोय की नाही हे क्षणभर बाजूला ठेवूया. विचार करूया तो, समाजाचा, वाचकाचा काही फायदा होतोय का, याचाच. परुळेकरांनी लिहिलेलं चित्र हे संपूर्ण चित्राचा काही भाग आहे, असं मानायचं, की तेच पूर्ण चित्र आहे, असं मानायचं असा प्रश्न आहे. परुळेकरांनी हे सारे लेखन या अशा राजकीय नेत्यांचे चरित्रकार म्हणून जरूर करावे, पत्रकाराच्या भूमिकेत आल्यानंतर या लेखनाचे स्वरूप बदलेल. पाण्याच्या आंदोलनावर पोलिसांनी उगाचच लाठीमार केला, यासारखी परुळेकरांची,निष्कर्षी स्वरूपाची वाक्ये हे लेखन प्रचारकी बनवत असतील तर तो दोष त्यावरून त्यांच्या लेखनासंदर्भात निष्कर्ष काढणाऱ्याचच नाही, लिहिणाऱ्याचाही आहे.
संपूर्ण लेखात नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या लेखनाच्या कटुतेचा मुद्दा येतोय वारंवार! परुळेकरांनी केलेले ते त्या-त्या वेळेचे लेखन निर्दोष होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय या वारंवारितेमुळं. हे परुळेकरांच्या लक्षात येत नसेल असे म्हणणे धाडसाचे आहे. समर्थ युनियनशी संबंधित घटना तर अजबच आहे. परुळेकरांचा आक्षेप कशाला आहे? 'स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांनी नितेशचा फोटो तिथं नेणं याला, की तो तिथं नेलेला असल्यानं छापून येणं याला? तिथं नितेशचा फोटो न घेता 'स्वाभिमान'च्या माणसांनी जावं असं परुळेकरांचं म्हणणं असेल, तर त्याचा हेतू काय? नितेशला समोर न आणत त्यांच्या माणसांनी जे करायचे ते उद्योग करावेत?
हे आणि असे प्रश्न या (आणि परुळेकरांच्या बऱ्याच इतरही) लेखनातून उपस्थित होतात.
लोकापवादांचा विचार न करताही राणे कुटुंबाच्या भरभराटीविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचाही वेध घेतला गेला पाहिजे. लोकापवाद त्यात आणले तर चित्र आणखी भयंकर होतं म्हणून ते बाजूला ठेवू. पण अशा कुटुंबाविषयी (इथे राणे म्हणून मी फक्त राणे यांचा उल्लेख करतोय. उद्या त्यात सर्वपक्षीय इतरही अनेक जण येतील...) हे प्रश्न असताना, होणारे लेखन असे एकांगी किंवा प्रचारकी असेल तर त्याबाबत टीका होणारच.

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Jan 2010 - 10:35 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री प्रदीप, श्री परुळेकरांच्या लेखाप्रमाणेच आपला प्रतिसादही हास्यास्पद वाटला. तुमच्या प्रतिसादाचा विषय आहे 'हेत्वारोप'.

खरे तर नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय, हे दोन्ही अगदी (आपापल्या) कोपर्‍यातील नेते आहेत, त्यांची भवितव्ये अजून स्पष्ट नाहीत, तेव्हा त्यांची खुशामत करून परूळकरांना काही फायदा असे म्हणणे जरा खेचून ताणून आणल्यासारखे वाटते.

आता आमचा काय फायदा आहे परुळेकरांवर टिका करण्यात? वर अनेकांनी माझ्यासकट लाळघोटेपण किंवा तत्सम शब्द वापरला आहे. या सर्वांच्या फायद्याचे/ हेतूचे गणितही मांडा. एक महसूल मंत्र्याचा मुलगा आणि दुसरा ११ आमदार असलेल्या पक्षाचा प्रमुख. यांचा उदोउदो केल्यास काय फायदा मिळतो? कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे?

पत्रकारांनी व्यक्तिमत्त्वास भारावून जाऊन लिहिले आहे. त्या व्यक्तिमत्त्वांचा खोलात जाऊन का प्रभाव पडला याचा आढावा घेतला आहे. परुळेकरांच्या लेखात दोन-तीन वेळेला 'खोली' शब्द सोडून इतर काय आहे?

बाकी श्री मोडक यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत.

.................................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

भडकमकर मास्तर's picture

27 Jan 2010 - 12:38 am | भडकमकर मास्तर

या सर्वांच्या फायद्याचे/ हेतूचे गणितही मांडा. एक महसूल मंत्र्याचा मुलगा आणि दुसरा ११ आमदार असलेल्या पक्षाचा प्रमुख. यांचा उदोउदो केल्यास काय फायदा मिळतो? कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे?

>>>>>>>>>>>>>>>>
>

सहमत सहमत...

अक्षय पुर्णपात्रे's picture

29 Jan 2010 - 6:42 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री प्रदीप,

माझा पुर्वीच्या प्रतिसादात हेत्वारोप या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतल्याबद्दल क्षमस्व. माझा आणि धनंजयची याबाबत झालेली ख्ररडचर्चा:

प्रेषक : अक्षय पुर्णपात्रे, शुक्र, 01/29/2010 - 02:46

धनंजय, मदत हवी आहे. हेत्वारोप या शब्दाचा अर्थ काय? काहीतरी हेतू मनात ठेऊन केलेले आरोप की इतरांच्या हेतूंबाबत केलेले आरोप?

प्रेषक : धनंजय, शुक्र, 01/29/2010 - 03:45

काहीतरी हेतू मनात ठेऊन केलेले आरोप की इतरांच्या हेतूंबाबत केलेले आरोप?

पैकी दुसरा अर्थ. "हेतूचा आरोप". उदाहरण :
मित्र वेळेवर माझ्या मदतीला आला नाही. माझी फजिती व्हावी असा त्याचा हेतू होता, असे मी म्हणतो. अशा हेतूचा आरोप त्याच्यावर करतो. मित्राच्या वागण्याबाबत, किंवा मित्राबाबत मी हेत्वारोप करतो.

सामासिक शब्दाची फोड (रूढ अर्थ वेगळा नसल्यास) "अमुकचा/ची/चे तमुक" असा करणे, हा 'डीफॉल्ट' अर्थ. (शालेय व्याकरण आठवत असेल तर "षष्ठी तत्पुरुष". हा समासाचा सर्वात सामान्य प्रकार. अन्य प्रकार त्यामानाने अपवादात्मक असतात.)

श्री प्रदीप यांनी 'परुळेकरांवर आम्ही (मी व इतर) काहीतरी हेतू मनात ठेऊन आरोप करत आहोत' असे म्हणायचे आहे, असा चुकीचा अर्थ मी लावला. या चुकीबद्दल श्री प्रदीप यांची माफी मागतो आणि त्यांच्या प्रतिसादासाठी वापरलेला 'हास्यास्पद' शब्द मागे घेतो. लेखास 'लाळघोटेपणा' म्हणणे यावर आक्षेप घेणे निश्चितच हास्यास्पद नाही.

हे स्पष्ट करूनही श्री प्रदीप यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत मी असहमत आहे. ते म्हणतात तसे नितेश राणे व राज ठाकरे 'कोपर्‍यातले नेते' वाटत नाहीत. (वरच्या प्रतिसादात कारण स्पष्ट केलेले आहे.) ते म्हणतात:

येथे नितेश राणे हे त्यांचे मॅनेजमेंटच्या शिक्षणाचा वापर त्यांच्या सामाजिक/ राजकिय कार्यासाठी करत आहेत, त्याविषयी जे काही लिहीले आहे, त्यात नक्की काय आ़क्षेप आहे, हे मला समजलेले नाही.

सर्वप्रथम श्री परुळेकर यांनी केवळ 'परदेशात उच्च डिग्री घेतलेला*' एवढाच उल्लेख केला आहे. त्यात व्यवस्थापनाच्या अभ्यासाचाही उल्लेख नाही तसेच त्या अध्ययनाचा (व्यवस्थापन असो किंवा इतर काही) वापर केल्याचाही उल्लेख नाही. त्यामुळे 'शिक्षणाचा वापर करत आहे' हे दाखवणारा हा लेख नाही.

लाळघोटेपणाचा आरोप करण्याचे कारण म्हणजे लेखात खोल, A man to be watched, मानवी अँगलने विचार करणारा, सुसंस्कृतपणा, धारदार आणि स्पष्ट, स्वत:ची आयडेन्टिटी असलेला व इतर विशेषणे श्री नितेश राणे यांचे वर्णन करण्यासाठी वापरली आहेत आणि या विशेषणांना पाठबळ देणारे काहीच नाही. 'धारदार आणि स्पष्ट' नंतर त्याला एसी बाधतो, याचा उल्लेख आहे. प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल कळकळ आहे पण एकाही प्रश्नाबद्दल तो कसा सोडवणार आहे याचा उल्लेख नाही. मानवी विचार अ‍ॅंगलने विचार करतो म्हणजे नेमके काय करतो? हे काहीच धड स्पष्ट नाही. मग वाचक म्हणून एखाद्याने हे श्री नितेश राणे यांचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न असा अर्थ काढल्यास त्यात काय वावगे आहे? पत्रकार लिहितात तेव्हा हजारो लोक वाचतात. त्या लोकांना फक्त मतेच नाहीतर त्या मतांचे स्पष्टीकरणही हवे असते. लाळघोटेपणाचा वापर करुन बर्‍याच पत्रकारांनी काय-काय पदरात पाडून घेतले आहे हेही लोकांनी पाहिलेले असते. वाचकांनी का म्हणून एखाद्या पत्रकाराविषयी होमवर्क करावा? त्यांच्याकडे या सर्व उठाठेवी करायला वेळ नाही म्हणूनच तर ते पत्रकारांचे लिखाण वाचतात ना. हा लेख वाचल्यास वाचकांचा काही एक समज झाल्यास तो दोष लेखकाचा आहे, वाचकांचा नाही.

मी व अनेकांनी केलेले आरोप हे आता बरोबर अर्थाने हेत्वारोप आहेत, हे मान्य आहे. पण श्री परुळेकरांच्या लेखात असे अनेक आरोप आहेत. उदा. "दुसरं म्हणजे ‘झेंडा’ नावाचा एक विकृत चित्रपट उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि कशाकशाने अवधूत गुप्ते नावाच्या माणसाने नारायणराव, राज ठाकरे व इतर अनेकांचं असत्यावर आधारित चारित्र्यहनन करणारा चित्रपट काढला. " अधोरेखित केलेल्या आरोपांना काय पुरावा आहे? या विधानात काय 'सॅक्रेड फॅक्ट्स' आहेत आणि काय 'फ्री कमेंट्स' आहेत. आता लेखाबद्दल काही मत व्यक्त करण्यासाठी वाचकाने पुरावे शोधायला जायला पाहीजे आहे का?

तरीही ते जे काही लिहीतात ते काही स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन लिहीतात असला आरोप मी करणार नाही-- अगदी उद्या ते काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले तरी.

हा श्री प्रदीप यांच्या मनाचा मोठेपणा आहे. माझे मन दुर्दैवाने तितके मोठे नाही. श्री केतकर यांचे लिखाण काँग्रेससोडून काही वेळा वाचनीय असते. पण केवळ ते चांगले लिहितात म्हणून लाळघोटेपणा करत नसतील (म्हणजे सध्या ते करत आहेत असे म्हणायचे नाही) असे काही मी मान्य करणार नाही.

*परदेशात एसी असलेल्या वर्गात श्री नीतेश कसे बरे बसत असतील? त्यांना रोजच ताप येत असावा. त्यांच्यासाठी विद्यापीठाला वेगळीच व्यवस्था करावी लागली असेल.
**श्री प्रदीप यांनी अत्यंत सभ्यपणे मला हेत्वारोपाच्या अर्था संदर्भात तसेच त्यांची भुमिका स्पष्ट करणारा व्यनि पाठवला. त्यांच्या सभ्यपणाचे अतिशय कौतुक वाटते.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jan 2010 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे

पत्रकार हा सदा सर्वदा आदर्शवादी असु शकत नाही. ती व्यक्तीच असल्याने राग लोभ हेवा असुया यापासुन मुक्त असु शकत नाही. त्याने कुठलीही भुमिका घेतली तरी ती न पटणार्‍या लोकांना पक्षपाती वाटणारच आहे.
पत्रकारांना 'खूश' करणार्‍या लोकांना माहित असते की आज ना उद्या हे विरघळणारच. तो खर्च त्यांचा भांडवली असतो. पत्रकारांना आपण नि:पक्ष आहोत याची कसरत करताना कधी कधी बौद्धीक दांडगाई करावी लागते. कुमार केतकर त्याचे उदाहरण आहे. ते राज्य सभेवर खासदार होणार असल्याचे भाकीत आम्ही केले आहेच. यासाठी त्यांच्या देह व लेख बोली तुन पत्रिका मांडुन आम्ही ते भाकित केले आहे.
प्रदीप म्हणतात तसे पत्रकारांनी आठ्याळ राखुंड्याची भुमिका घेतलेली लोकांना नि:पक्ष वाटते.नावडतीचे मीठ अळणी ही भुमिका विवेकी नाही. पत्रकार हा माणुस असल्याने प्रवाहपतितच असतो. मागेवळुन पहाताना त्याला काय वाटते हे त्याची सदसद विवेकबुद्धीच सांगेल बाकी कोण?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

जीएस's picture

27 Jan 2010 - 12:51 pm | जीएस

लाळघोटेपणापेक्षाही 'मी लय भारी', माझ्या सगळ्यांशी कशा ओळखी हे बिंबवून काही फायदा उपटण्याचा प्रयतनच जास्त वाटला. त्या प्रयत्नात लेख इतका असंबद्ध झाला आहे की लेख असे म्हणवत नाही...

चिंतातुर जंतू's picture

27 Jan 2010 - 3:52 pm | चिंतातुर जंतू

आरतीच्या वेळी मात्र आम्ही सर्वजण एकत्र उभे होतो (देवासमोर सर्व समान!) त्यात माझ्या एका बाजूला राज होता, दुसऱ्या बाजूला नितेश राणे. त्या रात्री मी डायरी लिहिताना नोंद केली. नितेश राणे A man to be watched.

म्हणजे काय? आरतीला एकत्र असणार्‍या माणसांपैकी एका बाजूला राज होता, म्हणून दुसर्‍या बाजूचा माणूस to be watched का? तोंड भरून स्तुती करताना किमान एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध ठेवण्याची काळजी घेतली असती, तर थोडी अब्रू वाचली असती.

नितेश कोणत्याही विषयावर बोलताना खूप मानवी अँगलने विचार करतो. शक्यतोवर सुसंस्कृतपणा सोडत नाही

अच्छा, म्हणजे अवधूत गुप्तेला धमकी देण्यात सुध्दा 'सुसंस्कृतपणा' आणि 'मानवी अँगल' होता का?

झेंडा हा विकृत सिनेमा आहे, असं वादापुरतं मानलं, तरीही एका पत्रकारानं झुंडशाहीचा उदोउदो करणं, म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारणं होतं. आम्ही यालाही विकृतच म्हणतो.

- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

श्रावण मोडक's picture

27 Jan 2010 - 4:03 pm | श्रावण मोडक

...एका पत्रकारानं झुंडशाहीचा उदोउदो करणं, म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारणं होतं. आम्ही यालाही विकृतच म्हणतो.

खरंय आणि गंभीर आहे. आणि हे सारं ते करताहेत ते समाज लयाला चालल्याचा 'आक्रोश' करीत. दोन हजार वर्षांनी आपलंच लेखन कसं योग्य ठरेल याच्या गर्जना करीत. हास्यास्पद हे विशेषणही तोकडे पडावे.

चतुरंग's picture

27 Jan 2010 - 8:11 pm | चतुरंग

मास्तर एक चांगला मुद्दा ऐरणीवर आणल्याबद्दल अभिनंदन! :)

वरती बिका म्हणतोय तसे मलाही काहीवेळा राजूचे 'संवाद' आवडायचे. त्यातले प्रश्नही चांगले आणि बर्‍याचदा चाकोरीबाहेरचे असायचे. व्यक्तीही सर्वसामान्यपणे 'लाईमलाईट' मध्ये नसलेल्या असायच्या.
पुढे पुढे आपली एक 'वेगळ्याच धाटणीचा पत्रकार' ही तयार झालेली (की केलेली?) इमेज जपता जपता राजू परुळेकरांची वाटचाल पत्रकारितेचा मूळ गाभा सोडून भलतीकडेच झालेली दिसते आहे! माध्यमे आपल्या कह्यात आहेत ह्या भ्रमात राहून जे लोक पुढे जातात ते तोंडावर पडतात हे नवीन नाही.
पत्रकार हा माणूस आहे आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी त्याने काही क्लृप्त्या केल्या तर काय बिघडले? हे समजूनही नि:पक्षपातीपणाशी इतकी तडजोड बरी वाटत नाही!
'राजू बन जा जंटलमन!' ;)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2010 - 10:20 am | भडकमकर मास्तर

धन्यवाद रंगाकाका
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही...अंमळ असूया वाटली...
.... तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो...
गणपाची पहिली रेसिपी वाचली त्याच रात्री मी डायरीत नोंद केली.. ही इज अ मॅन टु बी वॉच्ड

श्रीयुत संतोष जोशी's picture

28 Jan 2010 - 10:05 am | श्रीयुत संतोष जोशी

हा राजु परुळेकर काय किंवा तो निखिल वागळे काय एक नंबरची येड_वी माणसं आहेत.
या लोकांबाबत चर्चा करून उगाच वेळ वाया का घालवायचा ?

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

प्रसन्न केसकर's picture

28 Jan 2010 - 5:04 pm | प्रसन्न केसकर

छान विषय आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार चो रामस्वामी यांनी या विषयावर चर्चा सुरु केली ती आजतागायत सुरुच आहे.

प्रथमतः अनेकांसाठी मीडीया हा उदात्त व्यवसाय राहिला नसुन धंदा झाला आहे हे तर मान्य करावेच लागेल. जशी टुथपेस्ट विकली जाते, तश्याच प्रकारे पेपर, नियतकालीकेपण विकली जातात अन चॅनेल्सबाबतही तसेच आहे.

अनेक पत्रकार अप्रामाणिक असतात हा टोन तर प्रत्येकजणाच्या बोलण्यात वारंवार येतो. फक्त अश्या चर्चेत विचार होत नाही तो असे का होते, ते कसे टाळता येईल अश्या मुद्यांवर.

सर्वप्रथम विचार व्हायला हवा तो समग्र सामाजिक नैतिकतेचा. शेवटी मीडीया समाजाबाहेरुन येत नाही तर तो समाजातुनच येतो अन समाजाचाच अपरिहार्य भाग असतो. पत्रकार देखील या समाजातलाच एक घटक असतो अन सभोवतालच्या परिस्थितीचा त्याच्यावर देखिल बदल होत असतो. संपुर्ण समाजाची नैतिकता शाबुत आहे अन फक्त मीडीयाचीच गेली आहे अशी तर परिस्थिती नाही ना? आजही अनेक मतदार पैसे घेऊन मत विकतात, अनेकजण मतदान तर करतच नाहीत पण राजकीय व प्रशासकीय यंत्रणेवर संपुर्ण माहिती न घेता टीका करतात, काहीजण मतदान करतात पण राजकीय यंत्रणेची कुठलीही माहिती न घेता ही परिस्थिती आहेच ना? ट्रॅफिक पोलिसानं अडवल्यावर अनेकजण चिरीमिरी देऊन सुटण्यात धन्यता मानतातच ना? हे सगळी अधोगतीचीच लक्षणे नाहीत? अन ती सर्व समाजातच दिसत असतील तर मीडीया यातुन कसा अन कितीकाळ बाहेर राहु शकेल?

दुसरा भाग येतो व्यावसायिकतेचा. वर म्हणले तसे मीडीया हा देखिल व्यवसाय आहे. त्यापेक्षादेखिल तो आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. बाजारात एखादे वृत्तपत्र/ नियतकालीक ज्या किमतीत वाचकाला विकले जाते, त्यापेक्षा त्याच्या निर्मितीवर अनेकपटीने जास्त त्याच्या निर्मितीवर खर्च येतो. नव्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेने वाढणार्‍या दर्जाची अपेक्षा नेहमीच वाचक करतात अन ते तंत्रज्ञान मिळवण्याने हा खर्च अधिकच वाढत जातो. या जमा खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी मीडीया हाऊसेसना अनेक तडजोडी कराव्या लागतात आणि त्यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट कमी करणे. अर्थातच पत्रकारांचे पगार नेहमीच त्यांचे शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कष्ट आणि व्यवसायानुरुप करावे लागणारे खर्च या तुलनेत अन्य बर्‍याच क्षेत्रापेक्षा खुपच कमी असतात. अनेकदा पत्रकारांना त्यांच्या पगारात घरखर्चही भागवता येत नाही. अश्या पत्रकारांकडुन मग पेड न्युज सारखे प्रकार होतात.

पत्रकार अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाने, विचारसरणीने भारावलेला असतो आणि यात गैर काहीच नाही. हा प्रभाव देखिल अनेकदा त्याच्या लिखाणात येतो अन ते साहजिकच आहे. पत्रकारितेच्या नैतिकतेनुसार `फॅक्टस आर सेक्रेड, कॉमेंटस आर फ्री' असे समजले जाते. याचा अर्थ असा की घटना, घडामोडी देणार्‍या बातमीत शक्यतो मतप्रदर्शन असु नये परंतु लेखांमधे ते चालते. हा निकष लावला तर उपरोक्त लेखामधे काहीही गैर दिसत नाही. येथे लेखकाने स्वतःची मते त्याच्या लेखात मांडली आहेत आणि त्यात लिहिलेल्या घटनाबाबतच्या फॅक्ट्स चुकीच्या आहेत असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही. शेवटी जर पत्रकार समाजाचे प्रबोधन करणार असेल, समाजाला दिशा देणार असेल तर तो त्याची मते मांडणारच. भले ती कुणाला पटो अथवा न पटो. असे न करणारा पत्रकार त्याच्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहे हेच संशयास्पद ठरेल. शिवाय स्वतःची मते मांडण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र त्याले द्यावेच लागेल. ती मते पटत नाही म्हणुन कुण्या पत्रकाराला लाळघोट्या म्हणणे, काही पत्रकारांना मिळालेली राजकीय पदे अश्या वर्तनानेच मिळाली असा सरसकट दावा करणे ही देखिल झुंडशाही आहे असे मला वाटते.

ही सर्व तात्वीक चर्चा वाचक पत्रकारांची भलावण म्हणुन बाजुला ठेवावी. त्यांना ते स्वातंत्र्य नक्कीच आहे. परंतु जर ही चर्चा माध्यमांच्या उपयुक्ततेत वाढ व्हावी म्हणुन असेल तर मी आशा करतो की वाचक जो न्याय बाजारात विकल्या जाणार्‍या अन्य प्रॉडक्ट ना लावतात तोच मीडीयालाही लावतील अन शिवाय कोणतीही टोकाची मते व्यक्त करण्याआधी वस्तुस्थिती काय आहे याबाबत माहिती घेतील.

सुनील's picture

28 Jan 2010 - 5:28 pm | सुनील

उत्तम विवेचन.

पत्रकार म्हटले की लोकांना टिळक्-आगरकरांची पत्रकारीता आठवते आणि त्यांच्या मापाने ते आजच्या पत्रकारांना मोजायला जातात!

बाजारात एखादे वृत्तपत्र/ नियतकालीक ज्या किमतीत वाचकाला विकले जाते, त्यापेक्षा त्याच्या निर्मितीवर अनेकपटीने जास्त त्याच्या निर्मितीवर खर्च येतो.

इथे तुम्ही वुत्तपत्र विकत घेणार्‍या व्यक्तीला त्या वृत्तपत्राचा ग्राहक समजत आहात, असे वाटते. ते चुकीचे आहे. एखाद्या व्यवसायाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या वर्गास त्याचा ग्राहकवर्ग असे संबोधायचे असल्यास, जाहिरात कंपन्या हेच वृत्तपत्रांचे मुख्य ग्राहक ठरतात. वृत्तपत्र विकत घेणारे नव्हेत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रसन्न केसकर's picture

28 Jan 2010 - 6:00 pm | प्रसन्न केसकर

तुम्ही वुत्तपत्र विकत घेणार्‍या व्यक्तीला त्या वृत्तपत्राचा ग्राहक समजत आहात, असे वाटते. ते चुकीचे आहे. एखाद्या व्यवसायाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या वर्गास त्याचा ग्राहकवर्ग असे संबोधायचे असल्यास, जाहिरात कंपन्या हेच वृत्तपत्रांचे मुख्य ग्राहक ठरतात. वृत्तपत्र विकत घेणारे नव्हेत!

हे प्रमेय पुर्णतः चुकीच्या समजुतीवर आधारित आहे. वृत्तपत्रांचे मुख्य ग्राहक (टार्गेट ऑडियन्स) वाचक हेच असतात. तेच जाहिरात कंपन्यांचे आणि इतर प्रॉडक्टसचे पण ग्राहक असतात. या ग्राहकांकडुन वृत्तपत्र तयार करण्याकरता आलेल्या एकुण खर्चापैकी फारतर ४० टक्के पैसे मिळतात. उरलेल्या ६० टक्केची तोंडमिळवणी करणे जाहिरातींना जागा विकुन शक्य होते. हे प्रमाण बिघडले तर धंदा चालणारच नाही. वाचक/ दर्शकांच्या संख्येनुसारच जाहिराती मिळतात. म्हणुन तर टीआरपी/ सर्क्युलेशन फिगर्स ना सर्वाधिक महत्व येते.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jan 2010 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रसन्न... विस्तृत प्रतिसाद वाचला. या प्रतिसादात मला कळले ते असे :

"माध्यमं आणि ती चालवणारे, या समाजाचेच भाग आहेत. समाजातील चांगल्या वाईटाचेच प्रतिबिंब दिसणार माध्यमातून. तस्मात... दोष असलाच तर माध्यमांचा नाही तर पूर्ण समाजाचा आहे."

पर्फेक्ट. सहमत आहे. फक्त त्याच अनुषंगाने असे म्हणावे लागते... असे असेल तर माध्यमांनी / पत्रकारांनी आता 'होलिअर दॅन दाऊ' प्रकारचा दृष्टिकोन सोडून इतर धंदेवाईकांसारखे वर्तन करावे.

बिपिन कार्यकर्ते

प्रसन्न केसकर's picture

28 Jan 2010 - 7:29 pm | प्रसन्न केसकर

मी मांडलेल्या मुद्यांपैकी एक कळीचा मुद्दा बरोब्बर उचललात बिपिनदा. तुम्ही म्हणता माध्यमांनी / पत्रकारांनी आता 'होलिअर दॅन दाऊ' प्रकारचा दृष्टिकोन सोडून इतर धंदेवाईकांसारखे वर्तन करावे. ओक्के! मला एक गोष्ट सांगा हा अ‍ॅटीट्युड कुठली माध्यमे आत्ता दाखवताहेत. किंबहुना माध्यमेच स्वतःची परखड समिक्षा करत आहेत. माझ्या प्रतिसादाची सुरुवात चो रामस्वामी या नावाने होते, कोण होते ते? नुकतेच पेड न्युज प्रकरण गाजले, ते काढणारे पी साईनाथ, प्रभाश जोशी कोण?

टीका करण्याला माझी कधीच हरकत नव्हती, आत्ताही नाही अन पुढेही असणार नाही. पण इथे जी टीका सुरु आहे त्या टीकेमधे अनेक सदस्यांनी स्वतः पत्रकारितेबाबत कोणतीही माहिती न घेता होलीअर दॅन काऊ दृष्टीकोन घेतलेला आहेच ना? वरील प्रतिसादांमधे किमान आठ तरी विधाने परुळेकरांवर व्यक्तीगत किंवा एकुणच पत्रकारांवर सवंग टीका करणारी आहेत. ती विधाने आणि परुळेकरांनी केलेली विधाने यात माझ्या मते गुणात्मक फरक काहीच नाही. परुळेकर किंवा केळकर लिहितात ते स्वतःची खरी ओळख देऊन ही उलट त्यांच्या दॄष्टीने जमेची बाजु ठरते.

अन सर्वात खेदजनक आहे ते हे की या माननीय सदस्यांनी काही पत्रकारांच्या त्यांना अयोग्य वाटलेल्या गोष्टींचे सार्वत्रिकीकरण केले आणि मीडीयाने केलेल्या अनेक उपयुक्त, समाजहिताच्या बाबींकडे पुर्ण दुर्लक्ष केले. मीडीयामधे दोष आहेत, पत्रकारांमधेही दुर्गुण आहेत. परंतु त्याचा अर्थ सर्वच मीडीया दोषयुक्त आहे असा सर्रास काढता येतो?

अन मीडीयामधे अनिष्ट, चुकीच्या गोष्टी चालतात तरी का? कारण सरळ आहे, वाचकांना त्या हव्यात म्हणुन. मी आधीच म्हणले वृत्तपत्रे, नियतकालिके, चॅनेल वगैरे टुथपेस्ट सारखेच प्रॉडक्ट आहेत. जर एखादा प्रॉडक्ट दोषयुक्त वाटत असेल तर आपण तो घेऊ? अन जर तो प्रॉडक्ट कुणी घेणार नसेल तर तो निर्माण तरी होईल. शेवटी डिमांड, सप्लाय आणि मॅन्युफॅक्चअरिंग हे कायमच परस्परांवर अवलंबुन असतात.

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Jan 2010 - 9:29 pm | अक्षय पुर्णपात्रे

पत्रकारिता समाजाचाच एक घटक आहे, व्यवसाय आहे वगैरे मान्य आहे. पण श्री परुळेकर यांच्या लेखाबाबत हे मुद्दे गैरलागू आहेत. पत्रकारांनी भारावून जाऊन चरित्रपर लेख लिहावे, यातही वावगे काही नाही.

तुम्ही केलेल्या विवेचनाने माझ्या मतात काडीचाही फरक पडलेला नाही. श्री परुळेकरांनी लेखन करू नये असे कोणीही म्हटले नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या. त्यांचे लेखन वाचून त्यांच्यावर टिका करणार्‍यांना करु द्या. परुळेकर पत्रकार आहेत, त्यांना स्वतःच्या लिखाणातून त्यांच्या भुमिकेचे समर्थन करू द्या. तुम्ही त्यांचे वकिलपत्र घेऊन, परकायाप्रवेश करून त्यांची भुमिका मांडण्याची आवश्यकता नाही.

शिवाय स्वतःची मते मांडण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र त्याले द्यावेच लागेल.

अहो परुळेकरांनी जे अभिव्यक्तीस्वातंत्र वापरले तेच आम्ही वापरले तर आम्हालाही ते वापरू द्या. श्री परुळेकर यांचे लेखन लाळघोटेपणा वाटणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्हाला तसे वाटत नाही तर ठीक आहे. माझे असे मत असणे आणि मी ते मिपावर मांडणे ही झुंडशाही कशी झाली ब्वॉ.

आता पत्रकारितेच्या व्यवसायात जाण्यासाठी आर्थिक दृष्ट्या त्याग करावा लागतो आणि काहींना तो झेपत नाही तर बाजारांच्या नियमाप्रमाणे पत्रकारितेकडे वळणारे लोक कमी होतील, प्रसारमाध्यमांची संख्या कमी होईल. भारतभर ती वाढतेच आहे म्हणजे चांगलाच तेजीचा व्यवसाय असावा. आजकाल लोक जाहीरातसंस्था काढण्याऐवजी वृत्तपत्र काढतात की काय? कारण तुमचे विवेचन वाचल्यास या दोन व्यवसायांत फारसा फरक नाही उलट वृत्तपत्रे भारीच पडतील. ग्राहक पैसे देऊन जाहीराती वाचतो यापेक्षा आणखी फायदेशीर काय असू शकेल.

येथे लेखकाने स्वतःची मते त्याच्या लेखात मांडली आहेत आणि त्यात लिहिलेल्या घटनाबाबतच्या फॅक्ट्स चुकीच्या आहेत असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही.

कोणाला एसीत थंडी भरते आणि कोणाला ते भयानक वाटते आणि कोणता चित्रपट विकृत आहे आणि कोण कोणाला माफ केल्यास कोणाच्या जीवनाचे कल्याण होते अशा लेखात काय चुकीचे दाखवावे?

आम्ही उगाच जगभर पत्रकार जीव धोक्यात घालून जे लेखन करतात, प्रामाणिकपणे, तटस्थपणे आपली मते मांडतात त्यांना पत्रकारितेतील गुणवत्ता समजत होतो. पण आता हे निकष तपासून पहायला हवेत कारण पत्रकारिता हा व्यवसाय आहे आणि त्यांचे प्रॉडक्ट हे त्यांचे लिखाण आहे. तुमच्या गाडीत दोष असला तर तुम्ही गाडी उत्पादन करणार्‍या कंपनीस जबाबदार धरता का? तुम्ही तसे धरत नसल्यास श्री परुळेकर यांच्या लिखाणाबाबत प्रश्न न विचारणे योग्यच आहे.
........................................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

प्रसन्न केसकर's picture

29 Jan 2010 - 1:50 pm | प्रसन्न केसकर

असेच बव्हंशी म्हणावेसे वाटते.

पत्रकारिता समाजाचाच एक घटक आहे, व्यवसाय आहे वगैरे मान्य आहे. पण श्री परुळेकर यांच्या लेखाबाबत हे मुद्दे गैरलागू आहेत.

का बुवा? फक्त परुळेकर किंवा वर नावे आलेल्या काही पत्रकारांबाबतच ते मुद्दे का गैरलागु ठरावेत?

आता पत्रकारितेच्या व्यवसायात जाण्यासाठी आर्थिक दृष्ट्या त्याग करावा लागतो आणि काहींना तो झेपत नाही तर बाजारांच्या नियमाप्रमाणे पत्रकारितेकडे वळणारे लोक कमी होतील, प्रसारमाध्यमांची संख्या कमी होईल. भारतभर ती वाढतेच आहे म्हणजे चांगलाच तेजीचा व्यवसाय असावा.

जरा पत्रकारितेबाबतचा विदा पहा. कुठल्या स्तरावरची वृत्तपत्रे वाढताहेत हे पहा मग कळेल. अन माध्यमांची, पत्रकारांची संख्या वाढते आहे म्हणजे त्यात छापुन येते ते बरेच मोठ्या संख्येने लोक वाचतात. आवडत नसेल तर पैसे खर्च करुन का वाचावे बुवा लोकांनी? की माध्यमे वाचकांना धमक्या देताहेत पैसे मिळवायला? कै च्या कै तर्कट!

आजकाल लोक जाहीरातसंस्था काढण्याऐवजी वृत्तपत्र काढतात की काय? कारण तुमचे विवेचन वाचल्यास या दोन व्यवसायांत फारसा फरक नाही उलट वृत्तपत्रे भारीच पडतील.

असं लिहिलय माझ्या एखाद्या प्रतिसादात? असेल बुवा! तुम्ही कोट करता म्हणजे नक्कीच असेल.

आम्ही उगाच जगभर पत्रकार जीव धोक्यात घालून जे लेखन करतात, प्रामाणिकपणे, तटस्थपणे आपली मते मांडतात त्यांना पत्रकारितेतील गुणवत्ता समजत होतो. पण आता हे निकष तपासून पहायला हवेत कारण पत्रकारिता हा व्यवसाय आहे आणि त्यांचे प्रॉडक्ट हे त्यांचे लिखाण आहे.

तटस्थपणे मते मांडतात म्हणजे? बातमी तटस्थ असते, लेख नाही. तटस्थ रहायचे तर लेख लिहायचा तरी कशाला. अन बातमी देखील अनेकदा तटस्थ न रहाणेच श्रेयस्कर असते. फक्त सर्वदा तटस्थ रहाणारे पत्रकारच थोर असतात? मला तसे नाही वाटत?

बरेच घोळ दिसतात पत्रकारितेविषयक संकल्पनांच्या समजुतीत आपल्या दोघांच्याही. परत एकदा समजुन घ्यावा हा व्यवसाय असे म्हणतो!

अक्षय पुर्णपात्रे's picture

29 Jan 2010 - 9:42 pm | अक्षय पुर्णपात्रे

छान कल्पनाविलास आहे.....असेच बव्हंशी म्हणावेसे वाटते.

कल्पनाविलास काय आहे ते समजावून घेऊ या. कल्पनाविलासात रंगण्यापुर्वी लाळघोटे म्हणणे म्हणजे झुंडशाही कशी? यावर आपण मौन बाळगून त्या मुद्द्याला बगल दिलेली नसावी तर नजरचुकीने राहीले असावे, अशी आशावादी अपेक्षा करतो.

गैरलागू वाटण्याची कारणे
या चर्चाप्रस्तावात श्री परुळेकरांचे काही व्यक्तिविषयक लेखन तसेच श्री राऊत आणि श्री केतकर यांचा संदर्भ आला आहे. हे सर्व पत्रकार सुस्थित आहेत, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यांचे लेखन वाचले जाते. तेव्हा पत्रकारितेतील समाजकारण आणि अर्थकारण या व्यापक प्रश्नाशी संबंध जोडण्यापुर्वी या पत्रकारांचे 'काही चुकते आहे का?' यावर प्रथम चर्चा व्हावी. तुम्हाला श्री परुळेकरांच्या लेखनात मतप्रदर्शनाचा निकष लावून काहीच गैर वाटत नाही. (संदर्भ: हा निकष लावला तर उपरोक्त लेखामधे काहीही गैर दिसत नाही.) जेव्हा काही चुकलेलेच नाही तर पत्रकारितेत होणार्‍या गैरव्यवहारांबाबत भाष्य करण्याची गरज नाही. पण तुम्ही चुकलेले नाही असा निष्कर्ष काढून आणि वर चुका घडण्याची व्यापक कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता श्री मास्तर यांनी काय मत मांडले आहे ते पाहू.

एखादा पत्रकर अमुक एका पक्षाचा आहे, म्हणजे त्याने एक विशिष्ट पक्षाची भूमिका घेऊन बोलावं , त्या पक्षाला डिफेंड करत राहावं हे पाहणं मला अवघड जातं

श्री मास्तर यांनी पत्रकारांमी एक प्रकारे पक्षाशी निष्ठा ठेऊन लेखन करू नये तसेच त्यांच्याकडून वाचकांनी एखाद्या पक्षाच्याच समर्थनार्थ लेखनाची अपेक्षा ठेऊ नये, असे मत मांडले आहे. मी आणि इतर सदस्यांनी थोडेसे पुढे जाऊन हा प्रकार श्री परुळेकर यांच्यापुरताच मर्यादीत ठेऊन, श्री परुळेकर यांच्या लेखावर मत नोंदवून मग श्री मास्तर यांच्या वर व्यक्त केलेल्या मताशी सहमती दर्शवली आहे. (मी मराठी पत्रकारितेच्या अवस्थेबद्दल शंका विचारली आहे.) या पार्श्वभुमीवर तुमचा प्रतिसाद पहावा. ज्यात समाजाची नैतिकता, समाजा घटक असल्यामुळे त्याचे पत्रकारितेवर होत असणारे परिणाम याविषयी चर्चा आहे पण यात तुम्ही श्री परुळेकरांना धारेवर न धरता निव्वळ वाचकांवरच ही (नैतिकता जोपासण्याची) जबाबदारी सोपवली आहे. या अर्थाने मला असे जाणवले की तुम्हाला या व्यवसायाबाबत अतिशय तळमळ आहे. जी योग्य आहे पण येथे तेवढ्या व्यापक पातळीवर न जाता श्री परुळेकरांच्या लेखनाबाबतच चर्चा व्हावी. कारण तुम्ही या लेखनाचे वर्णन 'लाळघोटेपणा' करणे यास आक्षेप घेतला होता.

तुमच्या प्रतिसादात तुम्ही म्हणता: काही पत्रकारांना मिळालेली राजकीय पदे अश्या वर्तनानेच मिळाली असा सरसकट दावा करणे ही देखिल झुंडशाही आहे असे मला वाटते. माझ्या आवडीच्या (ज्यांचे लेखन मी आवर्जुन वाचतो) काही पत्रकारांना राजकिय पदे मिळालेली आहेत. माझे श्री प्रदीप यांना दिलेल्या उपप्रतिसादातील विधान पुन्हा एकदा उदधृत करतो: कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? येथे सरसकट विधान न करता या पत्रकारांना मिळालेल्या पदांविषयी तसेच त्यांनी अनुसरलेल्या मार्गांविषयी शंका व्यक्त केली आहे. इतर कोणी तसे सरसकट विधान केल्याचे आढळत नाही. (श्री घाटपांडे पत्रकार माणसेच असल्याकडे बोट दाखवून त्यांनी गैरवर्तन केल्यास वाचकांना आश्चर्य वाटू नये, श्री केतकर राज्यसभेत जातील असे भाष्य केले आहे पण त्यांनीही सरसकट काहीच दावा केलेला नाही. उलट त्यांचे मत तुमच्या सामाजिक घटक असलेल्या मताच्याच जवळ जाणारे वाटते.)

मुद्दा एवढाच आहे की व्यापक कारणांवर चर्चा करण्याकरता प्रथम प्रश्न आहेत, हे मान्य करायला हवे. तुम्हाला त्यासाठी प्रथम श्री परुळेकर यांच्या लेखनाकडे वाचक म्हणून बघणे आवश्यक आहे. तुम्ही तसे न करता व्यापक चर्चा करू पाहत असाल तर ते गैरलागू आहे.

पत्रकारिता तेजीचा व्यवसाय आहे किंवा नाही?
एखाद्या व्यवसायात अधिक नफा असल्यास त्या व्यवसायात गुंतवणुकीचे प्रमाण वाढते, असे एक तत्त्व अर्थशास्त्रात आहे. तसा ढोबळ तर्क वापरल्यास पत्रकारिता हा तेजीचा व्यवसाय वाटतो असे मी म्हटले आहे. याचा अर्थ सर्वच पत्रकारांच्या आर्थिक समस्या नष्ट झाल्या आहेत का? पत्रकारांवर मालक अन्याय करीत नाहीत का? पत्रकारांच्या वेतनाबाबत उदासिनता नाही का? अजिबात नाही. आणि माझ्या विधानाचा तसा अर्थही नसावा. एक उदाहरण देतो. बांधकाम व्यवसाय आजकाल तेजीत आहे. म्हणजे बांधकाम करणार्‍या मजुरांच्या जीवनात सर्व आलबेल आहे, असे नाही. तुम्ही म्हणता:दुसरा भाग येतो व्यावसायिकतेचा. वर म्हणले तसे मीडीया हा देखिल व्यवसाय आहे. त्यापेक्षादेखिल तो आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. तर माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणावर मीडीयामध्ये गुंतवणूक होण्याचे काय कारण असावे? व्यवसाय जर इतका जिकिरीचा आहे तर मग गुंतवणूक का होत आहे? याची अनेक कारणे असू शकतील. मूळात पत्रकारितेच्या व्यवसायाशी, त्यातील नैतिक भुमिकेशी काडीचाही संबंध नसलेले लोक या व्यवसायात पैसे गुंतवतात. गुंतवलेले पैसे व त्यावर परतावा म्हणून अनेक उद्योग (उदा. पेड बातम्या) करतात, जे पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांना अनुसरून नाही. माझ्या विधानात अशा सर्व ग्रॅन्युलर घटकांवर काहीच भाष्य नाही. तुम्हाला तशी वेगळी चर्चा (माध्यमांचे अर्थकारण व पत्रकारितेची मूल्ये) सुरू करता येईल. (मला वाटते श्री घाटपांडे यांनी अशीच काही चर्चा सुरूही केलेली आहे.)

जाहीरातसंस्था आणि वृत्तपत्रे
तुम्ही हे दोन व्यवसाय एकच असल्याचे विधान केलेले नाही. मी तुम्हाला कोटही केलेले नाही. तुमच्या विवेचनावरून मी असा निष्कर्ष काढला आहे. तुम्ही पत्रकारितेच्या व्यवसायाचे अर्थकारण मांडून पेड न्युज वगैरे प्रकार घडण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. पण हे गैर आहे, हे थांबायला हवे याबद्दल काहीच मत नोंदवलेले नाही. तडजोडी म्हणून हे घडते आहे तर मग जाहीरातसंस्था (ज्या सरळ सरळ पैसे घेऊन पाहीजे तशा जाहीराती बनवून देतात) आणि वृत्तपत्रे जे पैसे घेऊन तुम्हाला हवी तशी बातमी छापतात, यांच्यातील सीमारेषा संपुष्टात आली आहे. तेव्हा जाहीरात संस्थांनी वृत्तपत्रे काढावीत म्हणजे लोकांचे लक्ष आकर्षुन घेण्याकरता पैसे घेण्याचीही गरज नाही वर लोक जाहीराती वाचण्यासाठी पैसेही देतील.

तटस्थपणा
तटस्थपणा म्हणजे मत न मांडणे असे नव्हे. नाण्याच्या दोन्ही बाजू मांडून तुम्ही एखाद्या बाजूने झुकण्याची कारणे देणे. असे केल्यास वाचकाविषयी, त्याच्या तारतम्यभावाविषयी आदर तर दिसतोच पण समाजही प्रगल्भ होत जातो. पत्रकारांनी मते मांडण्याला आक्षेप नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.

पत्रकारितेविषयक संकल्पना आणि घोळ
घोळ आहेच. मी पत्रकारितेच्या व्यवसायात नाही. पण पत्रकारितेमुळे माझे जीवन समृद्ध झाले आहे. मी पत्रकारांचे लिखाण वाचतो. ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी दिलेल्या माहिती आणि मतांवर अवलंबून निर्णय घेतो. (उदा. फ्लुची साथ आहे, पुन्हा पुन्हा साबण लावून हात धुवायला हवेत. शहरात रात्री लुटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत, मी सावध असले पाहीजे. वगैरे) थोडक्यात मी अनेकांप्रमाणे एक सुजाण वाचक आहे. पत्रकारितेच्या व्यवसायात असलेल्या लोकांनी माझी दिशाभूल करू नये, अशी माझी किमान अपेक्षा आहे. ही अपेक्षा गैरवाजवी असल्यास किंवा गैरसमजूत असल्यास माझ्या आकलनात बराच घोळ आहे.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत

कालिन्दि मुधोळ्कर's picture

28 Jan 2010 - 11:14 pm | कालिन्दि मुधोळ्कर

श्री पुनेरी,
प्रतिसादांमधे 'सर्व' पत्रकारांवर्/पत्रकारितेवर टीका झालेली नाही. _परूळेकरांच्यावर_ टीका आहे. तुमचे व (श्री घाटपांडे) यांचा मुद्दा की पत्रकार हा देखिल एक माणूस आहे व तो समाजाचाच एक भाग आहे वगैरे ह्या पळवाटा आहेत आणि हे कारण देऊन आपण कशाचेही/कुणाचेही समर्थन करू शकतो.

१) येथे कोणीही परुळेकरांकडून उदात्त, स्वतःचा जीव जोखमीला लावून केलेल्या लिखाणाची अपेक्षा केलेली नाही. किमान दर्जाची अपेक्षा आहे.

२) "येथे लेखकाने स्वतःची मते त्याच्या लेखात मांडली आहेत आणि त्यात लिहिलेल्या घटनाबाबतच्या फॅक्ट्स चुकीच्या आहेत असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही."
खरंच? नितेश राणे यांना ए.सी.चालत नाही इ. "सेक्रेड फॅक्ट्स"? आणि त्यांच्या "मानवी" एंगल विरुद्द पुरावे नाहीत?

३) "शेवटी जर पत्रकार समाजाचे प्रबोधन करणार असेल, समाजाला दिशा देणार असेल तर तो त्याची मते मांडणारच."
मते मांडण्याला कोणाचा आक्षेप कसा असेल? इथे त्यांनी हेतुपुरस्सर सत्तेत अस्लेल्या लोकाची आरती ओवाळली आहे.

तुमचे काही मुद्दे मान्यः मिडीयाचे व्यावसायिकरण; पत्रकारांना सोयी, नीट शिक्षण, पगार याबाबत.

श्री परुळेकरांनी ह्या लेखातुन नितेश राणे ह्यांचे इमेज बिल्डींग करायचा प्रयत्न केला आहे. काही आठवड्यांपूर्वी आय.बी.एन. लोक्मत वरील लाइव्ह कार्यकर्मात नितेश राणे यांनी सरळ सरळ धमकीची भाषा वपरली ती अनेकांनी पाहिली. आता त्यांच्यावर असा स्तुतीपर लेख लिहून राणेंची इमेज "म्यानेज" करायचा प्रयत्न होत आहे.

आजही पी. साईनाथ, हिमांशू उपाध्याय आणि अनेक पत्र्कार आहेत जे चांगले काम करत आहेत. परुळेकरांनी आत्मपरिक्षण करावं.

प्रसन्न केसकर's picture

29 Jan 2010 - 2:12 pm | प्रसन्न केसकर

पहिले वाक्य वाचले अन गिर्‍या तो भी टांग उप्पर असा काहीसा वाक्प्रचार आहे तो आठवला. किमान आत्तापर्यंत लिहुन आलेय ते तरी नीट वाचायचे होते. पत्रकारांना आपले कोणाशी कसे घनिष्ट संबंध आहेत हे दाखविण्याची खाज असतेच, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, राजू परुळेकर असावेत.... एक महसूल मंत्र्याचा मुलगा आणि दुसरा ११ आमदार असलेल्या पक्षाचा प्रमुख. यांचा उदोउदो केल्यास काय फायदा मिळतो? कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? ही माझी विधाने नाहीत बरे! ती वरच्या प्रतिसादांमधुन कट पेस्ट केलेली वाक्ये आहेत. अन ही विधाने सार्वत्रिक नसतील असे म्हणायचे असेल तर अवघड आहे. आणि परुळेकरांच्या एका लेखाची अन त्यावरुन त्यांच्या समग्र गुणवत्तेची समिक्षा करताना त्यात केतकर, वागळे या मंडळींचा संबंध कसा येतो बुवा? असो! माझे तर्कशास्त्र कच्चे असावे!

तुमचे व (श्री घाटपांडे) यांचा मुद्दा की पत्रकार हा देखिल एक माणूस आहे व तो समाजाचाच एक भाग आहे वगैरे ह्या पळवाटा आहेत आणि हे कारण देऊन आपण कशाचेही/कुणाचेही समर्थन करू शकतो.

अगदी बरोबर! पण मी समर्थन करा असे म्हणतच नाहीये. उलट मी आजपर्यंत वेळोवेळी टीकेचे स्वागतच केले आहे आणि वाचकांनी त्यांचे मत व्यक्त करावे असेच माझे म्हणणे आहे. पण मतांमधेही लर्नेड ओपीनियन हा प्रकार असतो असे म्हणतात.

खरंच? नितेश राणे यांना ए.सी.चालत नाही इ. "सेक्रेड फॅक्ट्स"? आणि त्यांच्या "मानवी" एंगल विरुद्द पुरावे नाहीत?

नक्की कोणती फॅक्ट सेक्रेड असते अन सेक्रेड नसलेल्या फॅक्ट कश्या ओळखता येतात हे समजावुन द्याल मला प्लीज? मला वाटले सगळ्याच फॅक्ट सेक्रेड असतात. `मानवी' अँगल म्हणजे काय हे पण नाही कळले.

मते मांडण्याला कोणाचा आक्षेप कसा असेल? इथे त्यांनी हेतुपुरस्सर सत्तेत अस्लेल्या लोकाची आरती ओवाळली आहे.

हेतुपुरस्सर म्हणजे हेतु ठेवुन असेच ना? मग तो हेतु पण जरा स्पष्ट करा की. अन सत्तेत असलेले लोक म्हणजे नितेश राणेच ना? कितपत सत्ता आहे त्यांच्या हातात?

श्री परुळेकरांनी ह्या लेखातुन नितेश राणे ह्यांचे इमेज बिल्डींग करायचा प्रयत्न केला आहे. काही आठवड्यांपूर्वी आय.बी.एन. लोक्मत वरील लाइव्ह कार्यकर्मात नितेश राणे यांनी सरळ सरळ धमकीची भाषा वपरली ती अनेकांनी पाहिली. आता त्यांच्यावर असा स्तुतीपर लेख लिहून राणेंची इमेज "म्यानेज" करायचा प्रयत्न होत आहे.

परत मला जरा स्पष्ट समजावुन घेऊ द्या! काही दिवसांपुर्वी चॅनेल हल्ला प्रकरणी सेना, ठाकरे यांच्यावर आपण टीका केली. त्यांची स्तुती कुणी सिनेमा काढुन केली तर ते त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन त्यामुळे ते समर्थनिय. नितेश राणे यांनी धमकीची भाषा त्याच चॅनेलवरच्या कार्यक्रमात केली अन ती अनेकांनी पाहिली पण त्यांची स्तुती केली तर तो राणेंची इमेज मॅनेज करण्याचा प्रयत्न, लाळघोटेपणा असेच ना? छान आहेत व्याख्या!

आजही पी. साईनाथ, हिमांशू उपाध्याय आणि अनेक पत्र्कार आहेत जे चांगले काम करत आहेत. परुळेकरांनी आत्मपरिक्षण करावं.

या वाक्याशी मात्र सहमत!

चिरोटा's picture

28 Jan 2010 - 6:55 pm | चिरोटा

पत्रकार म्हटले की लोकांना टिळक्-आगरकरांची पत्रकारीता आठवते आणि त्यांच्या मापाने ते आजच्या पत्रकारांना मोजायला जातात

असे नाही. वाचक इंग्रजी व्रूत्तपत्रेही वाचतात.इंग्रजी पत्रकारांनाही राजकिय मते असतात पण एवढे उथळ मत प्रदर्शन क्वचितच दिसते.
दिलीप पाडगावकर(TOI), गोविंद तळवलकर्,शेखर गुप्ता, एन्.राम ह्यांनाही राजकिय मते होती/आहेत आणि कधी कधी त्यांच्या लेखनातून तसे जाणवतेही. पण त्यांचे लेखन एवढ्या खाली कधी घसरत नाही.
अर्थात प्रत्येक क्षेत्रात एक क्लास असतोच. वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचा क्लास परुळेकर्/राऊत ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे हे सहज कळते.
भेंडी
P = NP

असे म्हणणे चुकीचे ठरेल. प्रांतिक पत्रकारितेने बजावलेली कामगिरी आणि प्रांतिक पत्रकारांची समज व दर्जा कदाचित इंग्रजी पत्रकारांपेक्षा अधिकच असेल असे माझे मत आहे.

क्लास तर असतातच. पण त्यांचा संबंध भाषेशी नसतो. तो ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा टार्गेट ऑडियन्स यावर ठरतो.

ज्ञानेश...'s picture

28 Jan 2010 - 9:54 pm | ज्ञानेश...

"सर्वप्रथम विचार व्हायला हवा तो समग्र सामाजिक नैतिकतेचा.."
हा निकष लावला, तर जगातल्या एकाही कृत्याला 'अनैतिक' म्हणता येणार नाही.

मी आधीच म्हणले वृत्तपत्रे, नियतकालिके, चॅनेल वगैरे टुथपेस्ट सारखेच प्रॉडक्ट आहेत. जर एखादा प्रॉडक्ट दोषयुक्त वाटत असेल तर आपण तो घेऊ?"

मला वाटते, वरील चर्चा ही 'प्रॉडक्ट दोषयुक्त निघाल्याचीच' आहे.
पत्रकारितेचे 'प्रॉडक्ट' हे लेख किंवा बातमी नसून, 'सचोटी' हेच असते.
मिडीया, लष्कर, न्यायसंस्था, वैद्यक या सर्व सेवांना एक पावित्र्याची झालर आहे, ती उगाच नाही. सगळा समाजच अनैतिक आहे, मग आम्ही का अपवाद? असे वरीलपैकी लोक म्हणू लागले (आणि लोकांना ते पटू लागले) तर जे काही होईल, त्यालाच अराजक म्हणत असावेत !

समंजस's picture

29 Jan 2010 - 3:59 pm | समंजस

ज्ञानेश यांच्या वरील प्रतिक्रीयेशी सहमत...

संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचे चार आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.
संसद(नेते) आणि प्रशासन यांच्यावरचा लोकांचा विश्वास आधीच उडाला आहे.
आता न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावरचा विश्वास सुद्दा उडण्याची परिस्थीती आली आहे :(