२४ जानेवारी. इंडियानापोलिस कोल्ट्स विरुद्ध न्युयॉर्क जेट्स. फुटबॉल म्हणजे पार्टी टाईम. तेव्हा पार्टी साठी चिकन विंग्ज.
साहित्य
१२ चिकन विंग्ज
२ टे. स्पून बटर
१/४ कप ऑल परपज फ्लोर
सॉस साठी
१ टे. स्पून फ्रँक रेड हॉट सॉस
३ टे. स्पून KC Masterpiece बार्बेक्यु सॉस (तुम्ही तुमच्या आवडीचे वापरु शकता)
किंवा
१ टे. स्पून बटर , वितळलेले
१ टे. स्पून व्हाइट व्हिनेगर
२-३ टी स्पून फ्रॅंक रेड हॉट सॉस
चिमुटभर मीठ
जोडीला सेलरी, ब्लू चीज ड्रेसिंग वगैरे आवडी प्रमाणे.
कृती
ओवन ४२५ F ला गरम करत ठेवा.
चिकन विंग्जचे जॉइंटवर कापुन तीन तुकडे करा. टोकाचा तुकडा टाकून द्या. जास्तीची स्किन कापुन टाका. चिकन विंग्ज पिठात घोळवून घ्या. विंग्जना लागलेले जास्तीचे पीठ झटकुन टाका. मोठ्या झीप लॉक बॅग मधे पीठ घेऊन त्यात विंग्ज टाकुन हलवले तर पसारा न होता हे काम होते.
१३x9 च्या पॅन मधे २ टे. स्पून बटर घालुन वितळवा. बटर वितळले की पॅन मधे विंग्ज सिंगल लेयर मधे ठेवा. ओवन मधे २० मिनिटे बेक करा. बाहेर काढुन उलटा आणि पुन्हा २०-२५ मिनिटे बेक करा. बाहेर काढुन पेपर नॅपकिन वर ड्रेन करत ठेवा. एकिकडे सॉसचे साहित्य मोठ्या बोल मधे नीट मिक्स करुन घ्या. त्यात चिकन विंग्ज घालून नीट ढवळा. विंग्जना सर्व बाजूने सॉस लागले पाहिजे.
चला तर मंडळी. थंडगार बीयर बरोबर आस्वाद घ्या चिकन विंग्जचा.
प्रतिक्रिया
22 Jan 2010 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच भारी फोटो.
और भी आने दो...!
-दिलीप बिरुटे
22 Jan 2010 - 7:57 pm | प्राजु
जबरदस्त!!!
मस्त दिसताहेत. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
22 Jan 2010 - 8:03 pm | गणपा
ए१.
=P~ माझा आवडता पदार्थ. =P~
22 Jan 2010 - 8:04 pm | निमीत्त मात्र
भारीच की! तळलेले नसल्याने स्वास्थ्यास तितके हानीकारकही नाहीत. कोल्ट्सचा गेम बघताना नक्की हादडणार. (पण गेम एकतर्फिच होणार असे दिसते आहे!)
22 Jan 2010 - 9:17 pm | विंजिनेर
आई ग्गं... मेलो...
जाता जाता: विंग्स म्ह्टलं की मला बफलो विंग्स दुधाच्या ग्लासमधे बुडवुन खाणारा "यु.. मी... अँड ड्युपरी" मधला निवांत ओवेन विल्सन आठवतो ...
22 Jan 2010 - 9:56 pm | अक्षय पुर्णपात्रे
स्वातीतै, छान पाकृ.
23 Jan 2010 - 12:06 am | चित्रा
विंग्ज भलतेच छान दिसतायत.
23 Jan 2010 - 9:19 am | बट्ट्याबोळ
इंडियानापोलिस कोल्ट्स विरुद्ध न्युयॉर्क जेट्स म्हणजे मुंबै विरुद्ध कर्नाटक का गं ?
का पोलिस विरुद्ध मध्य रेल्वे ?
आम्हाला तेवढच माहिती :)
आणि भारतात सॉस कुठला वापरू ?
बाकी विंग्स मस्तच !!
23 Jan 2010 - 3:51 pm | स्वाती२
>>इंडियानापोलिस कोल्ट्स विरुद्ध न्युयॉर्क जेट्स म्हणजे मुंबै विरुद्ध कर्नाटक का गं ?
का पोलिस विरुद्ध मध्य रेल्वे ?
सांगता नाही येणार पण इथल्या फुटबॉलची मजा वेगळीच!
भारतात असाल तर चायनिज साठी वापरतात तो चिली सॉस वापरता येइल. किंवा दुसरी पद्धत खाली देतेय.
१/३ कप सोया सॉस + १/३कप मध + १ टे. स्पून आलं लसूण पेस्ट+ चविप्रमाणे चिली सॉस एकत्र करुन त्यात विंग्ज तासभर मुरवत ठेवायचे. मॅरिनेड म्धुन काढुन पीठात न घोळवता नुसते बेक करायचे. ३० मिनिटे बेक केल्यावर उरलेले मॅरिनेड ब्रश ने लावायचे आणि अजून २० मिनिटे बेक करायचे.
23 Jan 2010 - 11:25 pm | बट्ट्याबोळ
स्वातीतै मला दत्तक घे :)
पुढच्या रविवारी करुन बघीन !!
23 Jan 2010 - 3:27 pm | स्वाती२
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
24 Jan 2010 - 8:33 am | श्रीयुत संतोष जोशी
एकदम खल्लास.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
24 Jan 2010 - 1:05 pm | सुनील
कोंबडीत माझी पहिली पसंती असते ती तिच्या तंगड्यांना! पण हे विंग्सदेखिल छान दिसताहेत!
थंडगार बीयर बरोबर आस्वाद घ्या चिकन विंग्जचा
हे छानच!
बाकी मॅच बघताना काही खायचे-प्यायचे तर, त्रयस्थाच्या भूमिकेत रहायला हवे, तरच खाण्यापिण्यात समतोल राहतो!
नाहीतर, "आपली" टीम जिंकत असेल तर, खाणे जास्त होते आणि हरत असेल तर, पिणे जास्त होते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Jan 2010 - 8:58 am | बंडू बावळट
उत्तम..!
26 Jan 2010 - 11:27 pm | प्रभो
मस्त...कधी येऊ खायला??
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी