आज स्त्री पुरुष समानतेचे जरा जास्तच स्तोम माजवले जात आहे. समानतेचा मूळ विधायक उद्देश मागे पडून फक्त पैसे आणि वाटणी (हक्क) मिळवण्यासाठीच त्याचा फक्त वापर केला जातो.
मुलगी मुलाच्या बरोबरीने वडीलांच्या संपत्तीत वाटा मागते -- हक्क!
पण आई-वडीलांची आजारपणं, त्यांना सांभाळणं, त्यावारचा खर्च हा सगळा "वाटा" फक्त मुलगाच उचलतो. --कर्तव्य !
तेव्हा कुठे जाते ही समानता?
मुलींना संपत्तीत वाटा असतो तसाच आई-वडीलांच्या आजारपणाचाही, त्याला लागणाऱ्या खर्चाचाही "वाटा" त्यांनी उचलावा, असा कायदा आहे का? नसल्यास तो करायला हवा.
मध्यंतरी एक कायदा आला की, आई-वडीलांना मुलांनी सांभाळले पाहिजे. बरोबरच आहे. पण त्यात बदल करून कायदा असा हवा-
"मुलाने आणि मुलीने सारख्याच प्रमाणात आई-वडीलांना सांभाळावे. नाहीतर कारवाई केली जाईल. दोघांवरही...."
कारण आई-वडील मुलाला जसे शिक्षण देतात, तसेच मुलीला ही देतात. त्यावारच ती नोकरीही करत असते. पुन्हा मुलीच्या लग्नाला भरमसाठ खर्च येतो तो वेगळा....तसेच, हुंडा किंवा इतर गोंडस नावाखाली लग्नानंतरही सतत येणाऱ्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात...
समानता ही हक्क आणि कर्तव्य या दोघांबाबत असायला हवी. नाही का?
आपल्याला काय वाटते?
प्रतिक्रिया
23 Jan 2010 - 3:17 pm | अनामिका
तुमच्या या विचारांशी १००००% सहमत
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
23 Jan 2010 - 4:11 pm | प्रकाश घाटपांडे
काही लबाड स्त्रिया पारंपारिकचे व आधुनिकचे असे दोन्ही फायदे घेतात. सासरकडच्यांकडुन पतिच्या उत्पन्नात अर्धा वाटा व माहेरकडुन भावांच्या वाटणीत समान वाटा. पुरुषप्रधान संस्कृतीत सासरकडे पुरुष म्हणुन पतिचे कर्तव्य व माहेरकडे पुरुष म्हणुन भावाचे कर्तव्य समाजाने मानले आहे.
पण पुरुषप्रधान संस्कृतीत बहुसंख्य अन्याय हे स्त्रियांवर होतात. त्याचे परिमार्जन करण्यासाठी कायद्याने हे झुकते माप दिले असावे.
पण काही स्त्रिया या हक्क व कर्तव्य दोन्ही बाबत पुढे असतात.
आता आईवडिलांनी आपल्या वृद्धावस्थेची सोय तरुणपणातच करुन ठेवावी हे शहाणपणाचे. म्हातारपणी मुलागा असो वा मुलगी सारख्याच लाथा घालतील
अर्थातच हे मत सरसकट नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Jan 2010 - 7:53 pm | विकास
प्रकाशरावांशी सहमत!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
23 Jan 2010 - 8:43 pm | बिपिन कार्यकर्ते
+२
बिपिन कार्यकर्ते
23 Jan 2010 - 10:56 pm | प्रभो
सहमत
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
25 Jan 2010 - 9:52 am | सहज
>आता आईवडिलांनी आपल्या वृद्धावस्थेची सोय तरुणपणातच करुन ठेवावी हे शहाणपणाचे.
वेळप्रसंगी मुलांवरच्या खर्चात कपात करा पण स्व:ताच्या म्हातारपणासाठी तरतूद आधी करा :-) म्हातारपणी मुलांवर अवलंबून नसणे हे स्व:तासाठीच नव्हे तर तुम्ही मुलांसाठी केलेले एक मोठे काम असेल.
बाकी माझ्या समजुतीनुसार आईवडलांची स्वकमाई (वारसाहक्काने मिळालेली नाही )त्यांनी मुलांसाठी ठेवलीच पाहीजे असे काही कायद्याने बंधनकारक नाही. इतरही पर्याय आहेत.
25 Jan 2010 - 11:10 am | नितिन थत्ते
सहमत.
स्वकमाई मुलांसाठी ठेवली पाहिजे असे बंधन नसले तरी जर मृत्युपत्र किंवा इतर व्यवस्था झाली नसेल तर वाटणी करावी लागते.
(बहुधा प्रॉपर्टी वडिलांच्या नावावर असते आणि त्यांच्या मृत्यूनंतर आई+मुले+आजी असे वाटेकरी ठरतात).
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 5:51 pm | अमृतांजन
एकदम मान्य!
24 Jan 2010 - 9:34 am | नितिन थत्ते
लेखाच्या मूळ कल्पनेशी सहमत.
तपशीलाबाबत मतभेद आहेत पण सध्या सहमती.
येथे मुलगी वाटा उचलत नाही पण (एकापेक्षा जास्त असले तर) सगळे मुलगे आजारपणाच्या खर्चाचा वाटा बिनबोभाट उचलतात असे गृहीतक दिसते.
*बर्याच वेळा इस्टेटीत वाटा मागणारी मुलगी असली तरी तिचा बोलविता धनी तिचा नवरा असतो. आणि नवर्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन आईवडिलांचा खर्च करण्याइतके स्वातंत्र्य अजून कमावती नसलेल्या बाईला आहे अशी परिस्थिती सरसकट निर्माण झालेली नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात त्याप्रमाणे असे स्वातंत्र्य अपवादात्मक रीत्या काही स्त्रियांना असेलही*
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 9:25 pm | तिमा
आमच्या ओळखीच्यात अशा केसेस् आहेत. मुलीने बापाच्या मर्जीविरुध्द आंतरधर्मीय लग्न केले. तरीही वडिलांनी तिच्यासाठी आयुष्यभर भरपूर केले. एवढे होऊनही मुलगी बापाच्या पश्चात् इस्टेटीत वाटा मागत आहे. सख्ख्या भावाला अतिशय त्रास देत आहे. अशा बाबतीत तर हा मुद्दा पटतो.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
23 Jan 2010 - 9:46 pm | नीधप
बरोब्बर.
यात काही वाद नाहीच.
पण असा सरसकट कायदा अनेक स्त्रियांसाठी त्रासदायकच ठरू शकतो.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
23 Jan 2010 - 10:52 pm | पक्या
मुलगी नोकरी करत असेल तर हे अगदी मान्य. पण नोकरी करीत नसेल तर जावई बायकोच्या आई वडिलांचा आजारपणाचा खर्च करायला तयार होईल का?
शिवाय मुलीला तिचे सासू सासरे असतात ना. आर्थिक दृष्ट्या करावे नाही लागले तरी ज्या सूना त्यांच्या सासू सासर्यांना सांभाळतात त्यांना त्यांची आजारपणे पण काढावी लागतात. बर्याच घरात असे पाहिले आहे की मुलगी दुहेरि जबाबदारी उचलत आहे...स्वतःचे आई वडिल आणि सासू सासरे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
24 Jan 2010 - 9:11 am | नीधप
मुलगी नोकरी करत असेल आणि तिचा पगार कुठे खर्च व्हावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तिला असेल तर असं म्हणूया.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
24 Jan 2010 - 8:13 pm | निमिष सोनार
पक्या यांच्या म्हणण्याप्रमाणे- पण नोकरी करीत नसेल तर जावई बायकोच्या आई वडिलांचा आजारपणाचा खर्च करायला तयार होईल का?
याच जावयाला बायकोच्या वडीलांकडूण वेळोवेळी विविध वस्तू, पैसे, तसेच संपत्तीमधला "हिस्सा" घ्यायला जर "आवडत" असेल, तर मग त्याने खर्च करायला हवा.
24 Jan 2010 - 6:44 am | मितालि
कायद्याचि बंधनं आहेत म्हणुन जबाबदारी समजुन आइ वडीलांची काळजी घेण्यात काय अर्थ.. मुलगा असो वा मुलगी प्रत्येकाने प्रेमाने आपल्या आई वडीलांची काळजी घेतली पाहीजे.. काही लोक असे करत नाहीत.. मग तो मुलगा असो वा मुलगी..
24 Jan 2010 - 8:12 am | प्राजु
मुलगा वा मुलगी.. दोघांनी एकत्रित आई-वडीलांची जबाबदारी उचलली पाहिजे हे १००% खरे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
25 Jan 2010 - 5:01 pm | सुनील
मुलगा आणि मुलगी दोघांनीही आई-वडीलांची देखभाल करावी हे इष्टच.
परंतु. तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा, आई-वडिलांचा Parental Medical Insurance काढून ठेवला तर ते अधिक योग्य ठरेल. त्याच्या प्रिमिअमवर करात सवलतदेखिल मिळते.
टीप - Parental Medical Insurance बाबतच्या अधिक माहितीसाठी अन्य स्त्रोत पहावेत. मी विमे विकत नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Jan 2010 - 2:17 pm | भडकमकर मास्तर
टीप आवडली..
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो...
26 Jan 2010 - 9:17 am | बंडू बावळट
माहीत नाही.
सहमत आहे!
26 Jan 2010 - 3:08 pm | रामदास
आज स्त्री पुरुष समानतेचे जरा जास्तच स्तोम माजवले जात आहे. हे वाक्य आवडले नाही.
आईवडीलांवर खर्च करणे आणि समानतेचा फारसा काही संबंध असावा असे वाटत नाही.
खर्च करण्यासाठी मन मोठे असावे लागते.ते असेल तर मुलगी आणि मुलगा असा काही फरक नसतो.
तरीपण बदलत्या परीस्थितीत आपण आपली सोय करावी हे मात्र पटते आहे.
26 Jan 2010 - 7:15 pm | नितिन थत्ते
सहमत.
नितिन थत्ते
28 Jan 2010 - 1:56 am | धनंजय
सहमत.
28 Jan 2010 - 3:50 am | चतुरंग
सहमत.
चतुरंग
27 Jan 2010 - 2:04 pm | विजुभाऊ
घाटपांडे काकांशी सहमत.
पण ही जबाबदारी पालकांनी योग्य पद्धतीने हाताळल्यास असे प्रश्न उद्भवणार नाहीत
28 Jan 2010 - 6:49 am | शुचि
मला वाटता मुलीला माहेर् हून जी सम्पत्ती मिळते तिला "स्त्रीधन" हा शब्द आहे. "सब घोडे बारा ट्क्के" असा Military खाक्या नात्यागोत्यान्च्या बाबतीत लागू करता येत नाही, अर्थात कायद्यानी नाजूक प्रश्न सुटत नाहीत.
पालक म्हणून आपण २ गोष्टी करू शकतो - पाल्याला चान्ग्ले सन्स्कार (values) देणे आणि आपली उद्याची तरतूद १००% करून ठेवणे. मुल आपल्याला विचारत नसतील तर आपल्या सन्स्कार देण्यात काही ऊणीव राहीली अजून काय.
मुलीनी (ती स्वतन्त्र असल्यास, आणि नवरा राजी असल्यास) खर्चाचा वाटा उचलावा या मताशी मी पूर्ण सहमत आहे. तसे नसल्यास मात्र मग वाटाही मागू नये.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो
28 Jan 2010 - 8:13 am | नितिन थत्ते
>>ती स्वतन्त्र असल्यास, आणि नवरा राजी असल्यास
या 'नवरा राजी असल्यास' यातच खरी मेख आहे. ती स्वतंत्र (पक्षी=मिळवती) असल्यास नवरा राजी असण्याची काय गरज आहे?
>>चान्ग्ले सन्स्कार (values) देणे
चांगले संस्कार ही सापेक्ष कल्पना आहे. पालक मुलांशी व्यवस्थित वागत नसतील तरी मुलाने/मुलीने कर्तव्य म्हणून त्यांची सेवा करावी असले संस्कार काय चांगले?
नितिन थत्ते
28 Jan 2010 - 5:35 pm | अनामिका
मुल आपल्याला विचारत नसतील तर आपल्या सन्स्कार देण्यात काही ऊणीव राहीली अजून काय.
दोन मुलांपैकी एक विचारतो आणि एक विचारत नसेल तर त्यासाठी देखिल संस्कारांत उणीव हाच निकष लावायचा का?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
28 Jan 2010 - 5:39 pm | अनामिका
मुल आपल्याला विचारत नसतील तर आपल्या सन्स्कार देण्यात काही ऊणीव राहीली अजून काय.
दोन मुलांपैकी एक विचारतो आणि एक विचारत नसेल तर त्यासाठी देखिल संस्कारांत उणीव हाच निकष लावायचा का?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
28 Jan 2010 - 8:22 pm | JAGOMOHANPYARE
१. कायद्यानुसार पालकांची जबाबदारी मुलामुलीम्वर असते... कायदा मुलगा मुलगी असा भेद जाणत नाही... आईवडील मुलीकडून पोटगी मागू शकतात..कायदा कमावत्या आणि न कमावत्या मुलीला सारखीच पोटगी देण्याचे आदेश देऊ शकतो.
२. मुलाच्या आईवडिलाम्ची जबादारी मुलाच्या बायकोवर नसते. तिने तिचा पगार त्याम्च्यावर खर्च केलाच पाहिजे असे बंधन नाही.
(ऐकीव माहितीवर आधारीत)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll