१. मेट्रोला जितका खर्च येईल तेव्हढ्या पैशात पी एम टी स्वतःची बस कंपनी काढू शकेल व त्यातून शहराला लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गाड्या तयार करु शकेल. त्यासाठी टाटा किंवा इतर कंपन्यांशी सहकार्य करार करता येईल
२. मेट्रो स्टेशन पर्यंत नागरीकांनी कसे पोहोचायचे? गाडीने?, स्कुटरने? ते वाहन कुठे ठेवायचे?
३. उतरण्याच्या ठिकाणाहून इच्छीत स्थळी कसे जायचे? रिक्षाने? बसने?
४. मेट्रोला जितका खर्च येइल त्या पैशात किती बसेस विकत घेता येतील?
५. पुढील १०-१५ वर्षात जितकी लोकसंख्या वाढणार आहे ती कुठे वसणार आहे? सध्याच्या पुण्यात नाही. मग त्या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सध्याच्या पुण्यात मेट्रो का?
६. पुण्यात सार्वजनिक वाहतूकीला काय काय पर्याय आहेत हे पाहण्यासाठी म्युनिक शहरातील वाहतूकीचा अभ्यास करावा. तेथे जायची गरज नाही. फक्त इंटरनेटवरुन त्यांच्या वाहतूकीचा साधनांचा नकाशा पाहिला तरी ते समजेल.
आम्हाला मेट्रो हवी आहे- आमचे प्रश्न सोडवणारी
गाभा:
प्रतिक्रिया
22 Jan 2010 - 7:13 am | पाषाणभेद
अगदी मनातले प्रश्न मांडलेस भावा.
थोडक्यात हा प्रकल्प प्रश्नांची भर घालण्यासाठी केला जातोय हे आपल्याला समजते तर राजकारण्यांना का नको समजायला.
आताच "'मेट्रो' सायडिंगला; गटबाजीच सुसाट" अशा बातम्या येत आहेत.
अवांतर: मी पण एक रस्ता तयार करणारी किंवा खोदलेले रस्ते बुजवणारी कंपनी स्थापन करावी म्हणतो. मेट्रो होवो न होवो माझा फायदा होईलच.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद
(करीता) पाषाण रोड कंन्स्र्टक्शन कंपनी लिमीटेड
22 Jan 2010 - 8:13 am | II विकास II
मेट्रोचा आधी फिझिबिलीटी स्ट्डी झालाय का>
असेल तर त्यात ह्यातील बर्याचशया प्रश्नांचा उहापोह नक्कीच झाला असेल.
22 Jan 2010 - 9:43 am | प्रभो
१. मेट्रोला जितका खर्च येईल तेव्हढ्या पैशात पी एम टी स्वतःची बस कंपनी काढू शकेल व त्यातून शहराला लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गाड्या तयार करु शकेल. त्यासाठी टाटा किंवा इतर कंपन्यांशी सहकार्य करार करता येईल
मान्य..पण ते चालवायची लायकी आहे का पुणे महानगर पालिकेची???
२. मेट्रो स्टेशन पर्यंत नागरीकांनी कसे पोहोचायचे? गाडीने?, स्कुटरने? ते वाहन कुठे ठेवायचे?
३. उतरण्याच्या ठिकाणाहून इच्छीत स्थळी कसे जायचे? रिक्षाने? बसने?
बस
४. मेट्रोला जितका खर्च येइल त्या पैशात किती बसेस विकत घेता येतील?
एका बस मधे ४०-५० लोक बसो शकतात, मेट्रोत शेकड्यावारी बसतील...सुरुवातीला का नसेना नंतर तरी पेट्रोल बचत होईलच ना??
५. पुढील १०-१५ वर्षात जितकी लोकसंख्या वाढणार आहे ती कुठे वसणार आहे? सध्याच्या पुण्यात नाही. मग त्या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सध्याच्या पुण्यात मेट्रो का?
राजकारणी धोरण.जास्त मतदार सध्याच्याच पुण्यात आहेत.
६. पुण्यात सार्वजनिक वाहतूकीला काय काय पर्याय आहेत हे पाहण्यासाठी म्युनिक शहरातील वाहतूकीचा अभ्यास करावा. तेथे जायची गरज नाही. फक्त इंटरनेटवरुन त्यांच्या वाहतूकीचा साधनांचा नकाशा पाहिला तरी ते समजेल.
ह्म्म्म...बघ्तो..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
23 Jan 2010 - 6:13 am | प्रमेय
अहो प्र.भो.,
उनिरेल हा उपाय चांगला आहे त्यापेक्षा...
कमी जागा, नो डायवर....
जरा जवळ पास बघा, किती जागा लागते मेट्रोला...
कित्ती जागा लागते त्याच्या पार्किंगला...
किती मान्सं लागतात ती चालवायला?
सोडायला-न्यायला येणार्या लोकसंख्येची सोय नको?
स्वच्छ्ता ठेवायला नको?
काही पन...
हे राजकारणी पन ना...
मित्रा-मित्रात भांडन लाउन देतात आणि आम्ही मित्र बसतो भांडत...
23 Jan 2010 - 1:17 pm | प्रभो
ह्म्म
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
22 Jan 2010 - 11:56 am | जे.पी.मॉर्गन
हे मेट्रो प्रकरण लोकांना खुष करायचा पुढच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन केलेला मोठा फार्स आहे. सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर ह्यांचा मध्यंतरी खूप माहितीपूर्ण लेख सकाळ मधे आला होता (शोधून दुवा पाठवीनच). खुद्द महापौरांचा ह्या प्रकाराला विरोध आहे.. कारण तो एकटाच माणूस फीजिबिलिटीचा विचार करतोय! शिवाय प्रस्तावित मेट्रोचा एक मार्ग सध्याच्या पुणे - मुंबई लोहमार्गालगतच आहे. एक लोहमार्ग असताना दुसर्याची काय गरज?
मोठमोठ्या कंपनीज आणि आय आय टी कडून अहवाल करून घेतल्यानंतरपण जर ह्यांना असंच मॉडेल बनवणं सुचत असेल तर सगळ्यांच्याच अकलेबद्दल प्रश्नचिन्ह आहे.
22 Jan 2010 - 3:34 pm | मी_ओंकार
एक लोहमार्ग असताना दुसर्याची काय गरज
हे बाकी एकदम बरोबर.. :D
22 Jan 2010 - 3:38 pm | llपुण्याचे पेशवेll
जेपींशी सहमत आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
23 Jan 2010 - 11:47 am | प्रमोद्_पुणे
अगदी बरोबर.. आधी पी एम टी सुधारा..पुण्यात सलग चार दिवस पुणे लोणावळा लोकल वेळेवर जात नाही तिथे मेट्रो हा पर्याय हास्यास्पद आहे. आणि ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणे सुधा केवळ अशक्य आहे.विद्यापीठ सर्कलचा फ्लायाओवर पूर्ण व्हायला किती वर्षे लागली ते आठवा (आणि तो कसा बान्धला गेला आहे ह्यावर न बोललेले बरे). बी आर टी चे काय झाले? पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत टूकार आहे. मी स्वतः लोकल, बस ने बरेच वर्षे प्रवास केला आहे आणि अजूनही करतो..तक्रारी सुधा य वेळा केल्या आहेत काही फायदा नाही झाला..मेट्रो प्रकरणा मुळे आणखी घोळ नकोच...
23 Jan 2010 - 1:25 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री मॉर्गन, कृपया मेट्रोस विरोध का आहे याविषयी विस्तृत उहापोह करावा.
दुसर्याची गरज का आहे किंवा नाही याबाबत विचार करण्याकरता काही विदा आवश्यक आहे. जालावर शोध घेऊनही यासंदर्भात फारसा विदा उपलब्ध होऊ शकलेला नाही. आपले इतके ठाम मत होण्यासाठी काय कारणे आहेत याबाबत सप्रमाण खुलासा करावा, ही विनंती.
___________________
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
23 Jan 2010 - 7:03 pm | नितिन थत्ते
मेट्रोमार्ग जुन्या लोहमार्गाला समांतर असेल तर मेट्रोमार्गाची मुळीच गरज नसावी. सध्या पुणे लोणावळा लोकल तासा तासाने किंवा त्याहूनही उशीरा असतात. त्या दर २० मिनिटांनी केल्या जाऊ शकतात. त्यासाठी १० नव्या लोकल घ्यायला लागल्या तर त्यांची किंमत फक्त २५०-३०० कोटी होईल.
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 10:43 pm | अक्षय पुर्णपात्रे
असे पर्याय असल्यास त्यांच्यावरही विचार केला जावा.
.................................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
24 Jan 2010 - 9:39 am | नितिन थत्ते
अजून काय विचार करायचा?
मुंबईसारख्या ठिकाणी जेथे दर ३-४ मिनिटाला लोकल धावतात तेथे आधीची साधने पूर्णपणे वापरली गेली आहेत असे समजून नवी साधने निर्माण करणे ठीक. तिथेही असलेल्या मार्गाला समांतर मेट्रो बांधली जात नाहीये.
असले प्रकल्प केवळ भव्य दिव्य काहीतरी करण्याच्या हौसेखातर हाती घेतले जातात.
नितिन थत्ते
24 Jan 2010 - 10:21 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री थत्ते, मेट्रो प्रकल्पाच्या बाजूने अथवा विरोधात माझे काहीच मत झालेले नाही. तसे न होण्याचे कारण पुरेशा माहितीचा अभाव हा आहे. तेव्हा ज्यांचे विरोधात किंवा बाजूने मत झाले आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
पुणे ते लोणावळा लोहमार्गावर दर एका मिनिटाला लोकल सोडली तरी इतरत्र -जेथे हा मार्ग वाह्तूकीसाठी वापरला जात नाही- तिथे काही फरक पडणार आहे का? मेट्रो प्रकल्प केवळ या एकाच समांतर मार्गावर अवलंबून आहे का? तसे नसल्यास असलेल्या मार्गावर अधिक लोकल सोडल्या जाव्यात व इतर ठिकाणीही अशा प्रकारचे कमी खर्चाचे आणि तापाचे पर्याय असल्यास ते वापरले जावेत. (अर्थात अधिक लोकल सोडल्याने समस्या सूटणार आहे आणि तसे करण्यास काही अडचणी नसाव्यात हे गृहीत धरले आहे.)
*या दुव्यावर प्रकल्पाची पीडीएफ प्रत मिळाली.
असे प्रकल्प जगाच्या अनेक शहरांत आहेत. प्रत्येक ठिकाणी भव्य काही करायचे म्हणूनच हाती घेतले आहेत असे वाटत नाही.
....................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
22 Jan 2010 - 2:23 pm | चिरोटा
ह्या बाबतीत 'साहेबांचे' काय म्हणणे आहे? त्यांना प्रश्नांची जाण्,दूरद्रूष्टी वगैरे आहे असे सगळे म्हणतात.
भेंडी
P = NP
22 Jan 2010 - 6:53 pm | नितिन थत्ते
साहेबांना विचारू नका. नाहीतर लवकरच बसची आणि रिक्षाची भाडी वाढण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी करतील. ~X( =))
नितिन थत्ते
22 Jan 2010 - 7:22 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री बाजार यांच्याशी सहमत आहे. साहेबांच्या दृष्टीकोनातून फिजीबिलिटी स्टडी झालाय का? जर साहेबांच्या दृष्टीने लाभदायक ठरणार नसेल तर मेट्रो रेल्वे अस्तित्त्वात येणार नाही. (मग सामान्यांसाठी चांगली असो वा वाईट)
22 Jan 2010 - 5:12 pm | उमराणी सरकार
१. मेट्रोला जितका खर्च येईल तेव्हढ्या पैशात पी एम टी स्वतःची बस कंपनी काढू शकेल व त्यातून शहराला लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गाड्या तयार करु शकेल. त्यासाठी टाटा किंवा इतर कंपन्यांशी सहकार्य करार करता येईल-- तुम्हाला पी.एम.पी.एम.एल म्हणायचे आहे का? मेट्रो सारख्या लोकोपयोगी प्रकल्पाचे पैसे पीएमपीएमएल ला वळवून त्यांचे चरायचे कुरण वाढवायची आवश्यकता आहे का?२. मेट्रो स्टेशन पर्यंत नागरीकांनी कसे पोहोचायचे? गाडीने?, स्कुटरने? ते वाहन कुठे ठेवायचे?--क्षुल्लक प्रश्न - दिल्ली मेट्रो च्या प्रत्येक स्थानकावर पार्कींग ची सोय आहे. मेट्रो च्या आसपासच्या प्रभागातून स्थानकावर येण्यासाठी किंवा स्थानकावरून आसपासच्या प्रभागात जाण्यासाठी, दिल्ली मेट्रो च्या मिनि-बसेस सदैव उपलब्ध असतात.३. उतरण्याच्या ठिकाणाहून इच्छीत स्थळी कसे जायचे? रिक्षाने? बसने?-- अजून एक क्षुल्लक प्रश्न - पीएमपीएमएल ने उतरल्यावर इच्छीत स्थळी कसे जायचे? या प्रश्नाचे उत्तर शोधा आणि इथे कॉपी करा. क्र.२ आणि ३ चे आक्षेप निरर्थक वाटतात. कृती करा आणि मग विचार करा. विचार करून कृती टाळू नका.४. मेट्रोला जितका खर्च येइल त्या पैशात किती बसेस विकत घेता येतील?-- कल्पना नाही. त्यासुध्दा घेऊ, पण नॉट अॅट मेट्रो'ज कॉस्ट. एक लक्षात घ्या की मेट्रो मूळे तेलाची बचत होणार. विनातिकीट प्रवासाला आळा बसणार आणि लोकांना आरामदायी प्रवास करता येणार. हे पुरेसे नाही का?५. पुढील १०-१५ वर्षात जितकी लोकसंख्या वाढणार आहे ती कुठे वसणार आहे? सध्याच्या पुण्यात नाही. मग त्या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सध्याच्या पुण्यात मेट्रो का?-- मग ती जिथे वसणार तिथे ट्रॅक टाकायला सुरूवात करायची का? मेट्रो चे एक्झीक्युशन टप्प्याटप्प्यात होणार आणि ठरावीक प्रभागातील लोकांना ती ठरावीक कालावधीत उपलब्ध होणार. प्रश्नांचे निराकरण असेच ओवर दी पिरीयड होते.६. पुण्यात सार्वजनिक वाहतूकीला काय काय पर्याय आहेत हे पाहण्यासाठी म्युनिक शहरातील वाहतूकीचा अभ्यास करावा. तेथे जायची गरज नाही. फक्त इंटरनेटवरुन त्यांच्या वाहतूकीचा साधनांचा नकाशा पाहिला तरी ते समजेल.-- हास्यास्पद विचार - वाहतूकीच्या साधनांचा नकाशा म्हंजे काय हो? भूक लागल्यावर जेवायची गरजच काय. भरल्या ताटाकडे पाहून मस्त ढेकर द्यावी गड्या. या विकेन्ड ला फॅमिली ला महाबळेश्वर ला घेवून जायचा विचार रद्द. गूगल अर्थ वर दाखवतो की.उमराणी सरकार न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
22 Jan 2010 - 6:33 pm | मी_ओंकार
नाहीतरी पुणेकरांना सगळ्या चांगल्या गोष्टीत खोडा घालण्याची सवयच आहे. हेल्मेट सक्ती केली तर पगडी घालून जातील.
उद्या एका बसच्या किमतीत १००० सायकली आल्या तर काय सायकलवरुन जायचे का सगळयांनी.
23 Jan 2010 - 9:21 am | llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला पी.एम.पी.एम.एल म्हणायचे आहे का? मेट्रो सारख्या लोकोपयोगी प्रकल्पाचे पैसे पीएमपीएमएल ला वळवून त्यांचे चरायचे कुरण वाढवायची आवश्यकता आहे का?
बरोबर त्याऐवजी ते कुरण इतर एखाद्या सर्कारी संस्थेला द्या..
क्षुल्लक प्रश्न - दिल्ली मेट्रो च्या प्रत्येक स्थानकावर पार्कींग ची सोय आहे. मेट्रो च्या आसपासच्या प्रभागातून स्थानकावर येण्यासाठी किंवा स्थानकावरून आसपासच्या प्रभागात जाण्यासाठी, दिल्ली मेट्रो च्या मिनि-बसेस सदैव उपलब्ध असतात
म्हणजे परत बस आलीच ना! त्याऐवजी आहे ती बस सुविधा सक्षम केली तर स्वस्तात काम होईल. उगाच मोठ्या मोठ्या बाता मारण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी सुधारूनही प्रगती करता येईल.
अजून एक क्षुल्लक प्रश्न - पीएमपीएमएल ने उतरल्यावर इच्छीत स्थळी कसे जायचे? या प्रश्नाचे उत्तर शोधा आणि इथे कॉपी करा. क्र.२ आणि ३ चे आक्षेप निरर्थक वाटतात. कृती करा आणि मग विचार करा. विचार करून कृती टाळू नका
आमच्या कॉलनीच्या २२ गल्ल्यांपैकी ३ गल्ल्यांच्या तोंडाशी पीएम्पीमल्चे स्टॉप्स आहेत. तसे ते मेट्रोचे होणार आहेत का? नसतील तर त्या मेट्रोपर्यंत पोचायला इतर काहीतरी साधन लागणारच. त्यापेक्षा पब्लिकला जरा शिस्त आली आणि रस्ते आहेत त्यापेक्षा थोडे नीट झाले तरी बरेच साध्य होईल.
मग ती जिथे वसणार तिथे ट्रॅक टाकायला सुरूवात करायची का? मेट्रो चे एक्झीक्युशन टप्प्याटप्प्यात होणार आणि ठरावीक प्रभागातील लोकांना ती ठरावीक कालावधीत उपलब्ध होणार. प्रश्नांचे निराकरण असेच ओवर दी पिरीयड होते.
हो ना. मग लोकं सुधारली की ओव्हर द पिरीयड ऑफ टाईम बस सेवा आणि पब्लिकही सुधारेल अशी आशा करुया.
हास्यास्पद विचार - वाहतूकीच्या साधनांचा नकाशा म्हंजे काय हो? भूक लागल्यावर जेवायची गरजच काय. भरल्या ताटाकडे पाहून मस्त ढेकर द्यावी गड्या. या विकेन्ड ला फॅमिली ला महाबळेश्वर ला घेवून जायचा विचार रद्द. गूगल अर्थ वर दाखवतो की.
६ पैकी सर्वात हास्यास्पद. नकाशे आणि इतर सुविधा प्लॅनवर जास्त चांगल्या बघता येतात. ट्रॅफिकचे फ्लो नकाशात जास्त चांगले दाखवता येतात. प्रत्यक्ष चौकात जाऊन तितक्या नीट ते कळणार नाही. आणि अभ्यासच करायचा असेल तर तितका खर्च करायची गरज नाही नकाशे देखील बरेच बोलके असतात. आणि हो पैसे कशातही खाता येतात. असो.
पेशवे सरकार
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
23 Jan 2010 - 7:11 am | अमृतांजन
मला जे प्रश्न गहन वाटले ते उमराणी सरकार ह्यांना हास्यास्पद अथवा क्षुल्लक का वाटले हे कळले नाही. कदाचित त्यांना ह्या विषयातील सखोल माहिती असवी. एखाद्या विष्याची सखोल माहिती असणे अत्यंत चांगलेच. अशी माणसं मिपावर आहेत हे ही आपल्या भाग्याचेच.
मला एका गोष्टीचा उलगडा मात्र झाला नाही- ज्या लोकांना एखाद्या विषयाची सखोल माहिती असते ते इतरांच्या प्रश्नाचे धिंडवडे काढतात, विचारांना हास्यास्पद ठरवतात.- त्यांची अशी विचारसरणी कशा मुळे होते?
बाकी मला पडलेले आणखी काही प्रश्न-
१. मेट्रो सारख्या लोकोपयोगी प्रकल्पाचे पैसे .....?
-किती टक्के लोक मेट्रोतून प्रवास करणार आहेत?
२. दिल्ली मेट्रो च्या प्रत्येक ...मिनि-बसेस सदैव उपलब्ध असतात.
-मला पुणे स्टेशनने वाकडला जायचे आहे. मेट्रो + बस असा प्रवास मी कसा करायचा?
अशा काही युज केसेस देता येतील का?
असा मेट्रो + बस प्रवास केल्याने माझा किती वेळ वाचेल? किती पैसे वाचतील?
३. ..एक लक्षात घ्या की मेट्रो मूळे तेलाची बचत होणार...
- आमच्या पैशाची व वेळेची बचत होणार का?
४. मग ती जिथे वसणार ...प्रश्नांचे निराकरण असेच ओवर दी पिरीयड होते.
- किती गृहप्रकल्प कुठे आणि कधी होणार ह्याची कल्पना पालिकेला आहे. गावात किती टीडीआर विकला आहे ते ही माहित आहे. तितकी बांधकामे होणार आहेत्च. त्यातून किती घरे तयार होतील, त्यात अंदाजे किती लोक राहतील हे खूप सोपे गणित आहे
मेट्रोचा प्रकल्प आताच्या वस्तीत केला जेव्ह्ढा खर्च होईल त्याच्या कितीतरी पटीने कमी खर्च पुढील ३ ते ५ वर्षात होणाऱ्या नव्या पुण्यात मेट्रो अथवा ट्राम केल्याने होईल.
जगात ज्या-ज्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रश्न कुशलतेने व परिणामकारकतेने सोडवला गेला आहे, तेथे बस, ट्राम व मेट्रो असे तिनही वाहतूक प्रकार वापरले जातात.
तुम्ही म्हण्ता त्याप्रमाणे ओव्हर-दी-पिरियड हे प्रश्न कसे निकाली काढायचे हे ठरले आहे का?
५. वाहतूकीच्या साधनांचा नकाशा म्हंजे काय हो?
- तुम्ही गुगलवर शोधून पाहिलत?
६. न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
ही रचना ज्या ग्रंथात आहे त्यात आमच्या सारख्या लोकांनी कोणते प्रश्न विचारावे आणि कोणते विचारु नयेत ह्याबद्दल काही मार्गदर्शन केले आहे का?
बाकी पुण्याचे पेशवे ह्यांच्या प्रतिसादाला तुमची उत्तरे काय असतील ह्याची उत्सुकता आहे.
24 Jan 2010 - 10:00 am | उमराणी सरकार
त्यांची अशी विचारसरणी कशा मुळे होते?
-- नकारात्मक विचारसरणीच्या माणसांचे रडगाणे ऐकल्याने असावे कदाचित.
किती टक्के लोक मेट्रोतून प्रवास करणार आहेत?
-- मेट्रो रिकाम्या धावणार नाहीत हे नक्की. आज स़काळीच हैदराबाद हून पूण्यात आलो. मगरपट्टा वाहतूक दिव्याच्या चौकात स्वारगेट ला जाण्यासाठी पीएमपीएमएल ची वाट पाहत होतो, सकाळी ६.१५ वाजता. समोरून ३ बसेस रिकाम्या गेल्या पण एकानेही थांबवायची तसदी घेतली नाही. अखेर एक दयाळू चालक भेटला. त्याने गाडी थांबवली नाही, पण वेग थोडा कमी केला. हातातील अवजड सामान सांभाळत कसाबसा चालत्या गाडीत प्रवेश केला. असा अनुभव तुम्हाला मेट्रोत येईल का?
अशा काही युज केसेस देता येतील का?
-- दिल्लीतील ८ महीन्याच्या माझ्या वास्तव्यात मी बराचसा प्रवास मेट्रोने केला. माझ्या रहायच्या ठीकाणापासून मेट्रो स्थानक १.५ कि.मी वर होते. तेथे जाण्यासाठी मेट्रो च्या बसेस जवळच चौकातून मिळतात. परंतू मी पायीच जायचो. पुणेरी पेशव्यांसारखे गल्लीच्या तोंडावर मेट्रोने सोडावे अशी अपेक्षा अस्णार्यांसाठी मेट्रो नाही.
किती वेळ वाचेल? किती पैसे वाचतील?
-- वरील प्रवासास (जनकपूरी वेस्ट ते शादीपूर) मेट्रो ला ११ मि. लागतात. हाच प्रवास ब्लू लाईन (दिल्लीतील बस सेवा(?)) ने केल्यास किमान ३५ मि. लागतात.
आता समजा तुम्हाला द्वारका से.९ हून शाहदरा येथे जायचे असेल, तर मेट्रो ने से.९ ते राजीव चौक(१ ला टप्पा) , राजीव चौक ते कश्मिरी गेट (२रा टप्पा) व
कश्मिरी गेट ते शाहदरा असा ३ टप्प्यात प्रवास करावा लागतो. सदर प्रवासासाठी मेट्रो ने ५० मि. लागतात तर बसने किमान २ तास लागतात. अंतर सुमारे ३३ कि.मी. कोलकात्यात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. थोडक्यात वेळेची व पर्यायाने पैशाचीही बचत होते.
ओव्हर-दी-पिरियड हे प्रश्न कसे निकाली काढायचे हे ठरले आहे का?
-- ठरले असणार म्हणूनच तर या प्रकल्पाचा विचार पूढे आला असावा. आपल्या साचेबध्द आयुष्यात काही बद्ल घडणार असतील तर ते सहज स्विकारायची समाजाची मनोवृत्ती नसते. म्हणूनच कुठल्याही प्रकल्पाला विरोध करणारे व पाठींबा देणारे असे दोन्ही गट दिसतात.
जगात ज्या-ज्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रश्न कुशलतेने व परिणामकारकतेने सोडवला गेला आहे, तेथे बस, ट्राम व मेट्रो असे तिनही वाहतूक प्रकार वापरले जातात.
-- असे तुम्हीच म्हंता तर मेट्रोला विरोध का करता?
ही रचना ज्या ग्रंथात आहे त्यात आमच्या सारख्या लोकांनी कोणते प्रश्न विचारावे आणि कोणते विचारु नयेत ह्याबद्दल काही मार्गदर्शन केले आहे का?
-- सदर रचना गुरूचरीत्र अध्याय १४ यात आहे. त्यातील घटकांविषयी चर्चा करण्याचे हे व्यासपिठ नव्हे. व्यनितून तुमच्या शंका विचारा, उत्तर देवू.
बाकी पुण्याचे पेशवे ह्यांच्या प्रतिसादाला तुमची उत्तरे काय असतील ह्याची उत्सुकता आहे.
-- पेशव्यांचा प्रतिसाद वाचला. उत्तर द्यावेसे वाटले नाही.
उमराणी सरकार
24 Jan 2010 - 1:43 pm | प्रमोद्_पुणे
मेट्रो रिकाम्या धावणार नाहीत हे नक्की. आज स़काळीच हैदराबाद हून पूण्यात आलो. मगरपट्टा वाहतूक दिव्याच्या चौकात स्वारगेट ला जाण्यासाठी पीएमपीएमएल ची वाट पाहत होतो, सकाळी ६.१५ वाजता. समोरून ३ बसेस रिकाम्या गेल्या पण एकानेही थांबवायची तसदी घेतली नाही. अखेर एक दयाळू चालक भेटला. त्याने गाडी थांबवली नाही, पण वेग थोडा कमी केला. हातातील अवजड सामान सांभाळत कसाबसा चालत्या गाडीत प्रवेश केला. असा अनुभव तुम्हाला मेट्रोत येईल का?
अहो असा पी एम टी चा अनुभव नको म्हणून मेट्रो हवी?? किती बालिश कल्पना आहे.. हातचे सोडून पळ्त्याच्या पाठी..सध्या पुणे स्टे. ते चिंचवड असा प्रवास साधारण ३५ मी. होउ शकतो (हा रस्ता आता खुपच चांगला झाला आहे) जर पी एम टी नीट धावली तर.. त्याच मार्गावर पुन्हा मेट्रो चे काम सुरु झाले कि पुन्हा बट्ट्याबोळ....आधि आहे ती सा. वाहतूक व्यवस्था निट तरि चालवून बघुदेत..मला अजूनही वाटते की पी एम टी/ लोकल नीट धावली तर खूपसे प्रश्न मार्गी लागतील.
24 Jan 2010 - 2:08 pm | उमराणी सरकार
प्रमोद_पुणे,
तुम्हाला कल्पना बालीश वाटली याचा खेद वाटतो. माझ्या जागी एखादी वयोवृध्द व्यक्ती असती तर कल्पना करा.
"पी एम टी/ लोकल नीट धावली तर खूपसे प्रश्न मार्गी लागतील"
१००% सहमत. मात्र इथे पी.एम.पी.एम.एल ला पर्याय म्हणून मेट्रोचे समर्थन मी करत नाहीये तर आहेत त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत व्यापक आणि सर्वांगिण बदल व्हावेत असा हेतू आहे.
असो.
उमराणी सरकार
24 Jan 2010 - 4:26 pm | मी_ओंकार
उमराणी यांना पूर्ण सहमती आधी दर्शवलीच आहे. चर्चेत त्यांचेच मुद्दे फक्त विचार करून मांडलेले दिसतात कारण ते स्वतः दिल्लीत मेट्रोचा अनुभव घेउन आलेले आहेत.
मी केवळ एकदा दिल्लीत मेट्रोत बसलो आणि तेही केवळ दोन स्टेशन प्रवास केला. पण मेट्रो मधील प्रवासाची लगेच कल्पना आली. अत्यंत आरामदायी सुरक्षित प्रवास. प्रचंड जलद. याबाबत उमराणी यांनी उदाहरणे दिली आहेतच.
बसेस ची तुलना करताना विसरलेला सर्वात महत्वाचा मुद्दा रस्त्यांचा आणि रहदारीचा आहे. मेट्रोच्या पैशातून बसेस घेतल्यावर इतक्या बसेस हवेत उडणार आहेत का? म्हणजे परत फ्लायओव्हर वगैरे प्रकार आले. त्यात खाजगी वाहनांची पण गर्दी असणारच. म्हणजे वेळेची बचत शून्य.
पुण्याने म्युनिच पेक्षा बेंगलोर चे जरी उदाहरण समोर ठेवले तरी पुरेसे आहे. आणि त्यासाठी बेंगलोर ला येणे पण परवडण्यासारखे आहे. (नकाशा वगैरेची गरज नाही. ;) ) बेंगलोर मध्ये बीएमटीसी चांगली सुविधा देते. त्यांच्याकडे वातानुकुलित आणि इतर अशा जवळपास सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या बसेस आहेत. आणि पुण्यापेक्षा नक्कीच बर्याच चांगल्या अवस्थेत आहेत. तरीही इथे मेट्रोचे जोरदार स्वागत झाले. मेट्रोला इथे 'नम्मा मेट्रो' (आमची मेट्रो ) म्हणून नाव दिले आहे.
बसेस व मेट्रो हे अत्यंत वेगळे पर्याय आहेत. बस सुविधा चांगली नाही म्हणून मेट्रो नको हे अगदी हास्यास्पद आहे. मेट्रो आल्यानंतर ही पीएमटी ने मेट्रो स्टेशन पासून इतर जवळ्पासच्या भागात सुविधा दिल्याच पाहिजेत. त्या नसतील तर तसे मार्ग आखले पाहिजेत.
बाकी प्रदूषणाचा मुद्दा मजेशीर. आपण घरात जी वीज वापरतो त्यानेही इतर कुठेतरी प्रदूषण होतेच की. पण तिथे अशा प्लांट्स मध्ये नियमानुसार नियंत्रण केले जाते. शिवाय प्रदूषण हे सापेक्ष आहे. त्यामुळे ते दुसरीकडे झाले तरी ते तितके अपायकारक नसेल.
बाकी माझ्या घरापर्यंत मेट्रो आली पाहिजे असे म्हणणारे थोरच.
- ओंकार.
24 Jan 2010 - 6:32 pm | llपुण्याचे पेशवेll
काही प्रश्न.. आत्ता मी मेट्रोविषयी काही माहीती घेण्याचा प्रयत्न केला. की मेट्रोचे रूट कसे असतील. ते मला खालीलप्रमाणे दिसले.
First phase
The three routes that have been identified for the first phase are:
Pimpri - Chinchwad - Swargate, via Agriculture college (16.5 km, elevated)
Aundh - Kalyaninagar, via Shivajinagar and the Pune Railway Station (14 km, elevated)
Agriculture College - Swargate, via JM road and Mahatre bridge (9 km, underground)
[edit]Second phase
Second phase of the project will contain the extension of first phase:
Extension of lines from Chinchwad to Nigdi and Swargate to Katraj (11.5 km elevated)
Extension of lines from Aundh to Hinjewadi and Kalyaninagar to Kharadi Naka (13 km elevated)
Extension of line from Swargate to Hadapsar (9 km elevated)
New line from Vishrantwadi to Swargate (13 km under ground)
[edit]Third phase
Third phase will complete the project at once and it will contain only one line:
Agriculture college - Warje via JM road and Karve road (9 km elevated)
प्रश्न असे...
१. मला जर कोथरुडवरून हिंजवडीला जायचे असेल तर सगळ्यात जवळचा पर्याय जो हायवे (किंवा बायपास) म्हणता येईल त्यावरून ३२ मिनिटे सकाळी आणि ४५ मिनीटे संध्याकाळी. कंपनीच्या बसने. बसचा स्टॉप घराच्या दारापासून ते कंपनीच्या दारात. मग मेट्रो कोण कशाला वापरेल? तसं इतरही अनेक मार्गाना लागू आहे.
२. मेट्रो प्रकल्प तयार करताना जे रस्त्याचे खोदकाम केले जाईल त्यामुळे सध्याच्या वाहतुकीची किती मोठी गैरसोय होईल याचा विचार कोणी केला आहे का? त्यामुळे होणारे अपघातांनी किती नुकसान होईल.
३. या वाहतुकीच्या वाढीव कोंडीत किती पैसे इंधनापाई वाया जातील?
४. तथाकथित कागदावर चांगल्या वाटणार्या सुविध प्रत्यक्षात किती विफल ठरतात ते बीआरटी बघून कळलेच आहे. एखादी सुविधा निर्माण करताना काहीतरी वेगळे करण्याच्या भरात येऊन काम केले तर त्याची बीआरटी होते. त्यामुळे बीआरटीच्या दूधाने तोंड पोळल्यामुळे मेट्रोचे ताक फूंकूनच प्यावे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
24 Jan 2010 - 7:37 pm | प्रसन्न केसकर
महत्वाचा विषय असतो तो रायडरशीप. Pimpri - Chinchwad - Swargate, via Agriculture college (16.5 km, elevated) या मार्गावर कोथरुड-हिंजवडी मार्गापेक्षा नक्कीच अधिक रायडरशीप मिळेल.
रस्त्याचे खोदकाम हा तात्पुरता प्रश्न आहे तो काहीमहिन्यात सुटेल पण ते केल्याने उपलब्ध होणारे इफ्रास्ट्रक्चर कित्येक दशके उपयोगी ठरेल.
बीआरटी या विषयावर मी आधिच अन्य प्रतिसादात लिहिले आहे. पुण्यात बीआरटी कधी झालीच नाही. बीआरटी च्या नावाखाली तयार केली ती फक्त डेडीकेटेड बस लेन आणि ती पण पुर्ण केलेली नाही. म्हणुनच तर मी म्हणतोय की नागरीकांनी प्रोजेक्ट काय होतोय, त्याचा डीपीआर आहे की नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर पीपीपी प्रोजेक्ट होणार असेल अन त्यानं प्रश्न सुटायला मदत होणार असेल तर त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहु नये.
याबाबत इंडोनेशीयातील बीआरटीचे पुर्वी ऐकलेले उदाहरण उदबोधक आहे. तिथे म्हणे सुरुवातीला बीआरटी च्या नावाखाली पुण्यासारखाच घोळ झाला. नागरीकांना त्रास व्हायला लागला तेव्हा ती बीआरटी कंडमात काढुन नवी युजर फ्रेंडली बीआरटी तयार केली अन ती आता उत्कृष्ठ बीआरटी समजली जाते.
24 Jan 2010 - 8:06 pm | अमृतांजन
हिंजेवाडी भागात जितक्या रेसिडेन्शियल सिटी येत आहेत त्याने २ ते ३ वर्षात काय परिस्थिती असेल ह्याचा विचार करणे आवश्यक आहे.
हिंजेवाडी, खराडी-विमाननगर, हडपसर, ह्या भागात आयटी कंपन्या तसेच चाकण भागात येणार्या व असणार्या ईंजि कंपन्या असा क्लस्टर तयार होत आहे. कोथरुडातूनच नव्हे तर पुर्ण पुण्यातून ह्या सगळ्या भागात बिनदिक्कत जाता आले पाहिजे असेच प्राधान्य असणे आवश्यक नाही का?
पुण्याच्या साऊथ उपनगरात सिंहगड ईन्स्टीट्युटच्या कित्येक शाखा आहेत, भारती विद्यापीठ व एम आयटी तसेच जे एस पी एम ह्यांच्या अनेक संस्था आहेत. त्यांना जाणार्या हजारो कॉलेज विद्यार्थ्यांना आज सिक्स सिटर किंवा स्वतची वाहने ह्या शिवाय पर्याय नाही. त्यांची कशी सोय होणार?
25 Jan 2010 - 9:27 am | llपुण्याचे पेशवेll
अमॄतांजन
हिंजेवाडी हा शब्द मूळ हिंजवडी असा आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
24 Jan 2010 - 7:42 pm | अमृतांजन
धन्यवाद. मी आता त्याच माहितीचा समाचार घेतला.
पुणे मेट्रोचे जे ३ प्रकल्प आहेत, त्यात खालील प्रमाणे मेट्रो होइल.
आधी लाल रेषा, मग जांभळ्या व तिसर्या टप्प्यात हिरव्या. तुटक रेषा अंडर्ग्राउंड मेट्रो लाईन दर्शवते.
आता हा नकाशा पाहून सांगा कोणत्या पुणेकराला हे पटेल की, मेट्रोमुळे त्यांचे प्रश्न खरच सुटणार आहेत?
पुण्यातून हडपसर ला जातांना काय अनुभव येतो?
कोथ्रुड मधून विमाननगर- खराडीला जायला काय अनुभव येतो
कोथ्र्ड मधून हिंजेवाडीला काय अनुभव येतो?
कर्वेनगरला तिसर्या टप्प्यात मेट्रो होईल. ती एलेव्हटेड असणार आहे. त्यावेळेस कर्वे रस्ता वरील वाहतूक कशी असेल?
लोकांचा जो वेळ व इंधनात पैसा जाईल तो कसा भरुन निघेल?
24 Jan 2010 - 7:44 pm | अमृतांजन
जगात ज्या-ज्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रश्न कुशलतेने व परिणामकारकतेने सोडवला गेला आहे, तेथे बस, ट्राम व मेट्रो असे तिनही वाहतूक प्रकार वापरले जातात.
-- असे तुम्हीच म्हंता तर मेट्रोला विरोध का करता?
आमचा विरोध मेट्रोला नाही! मेट्रो हवीच आहे पुण्यात. ती कुठे हवी आहे त्याबद्दल आम्हाला वेगळी मते मांडायची आहेत.
24 Jan 2010 - 7:49 pm | अमृतांजन
कदाचित मेट्रो अशी असेल तर जास्त फायदा होइल. सगळ्यांचा. आगामी विस्तारीत पुण्याआगामीबाहेरुन जो रिंग रोडचा प्रस्ताव आहे त्यावर आतापासूनच मेट्रोची रुपरेषा आखायला हवी.
मला जे वाटते ते खाली चित्रात दाखवले आहे-
24 Jan 2010 - 8:20 pm | अमृतांजन
नंतर पुन्हा पिंपरी चिंच्वड मधून चाकण पर्यंत मेट्रो टाकायला हवी म्हणजे पुण्यातून विमानतळावर लोकांना जाता येईल.
वरील चित्रात बर्याच ठिकाणी ट्रामही टाकता येऊ शकते.
22 Jan 2010 - 6:51 pm | मानस्
तुमचे मुद्दे पटले नाहीत.
मेट्रोमुळे इंधनाची बचत होईल,प्रदुषणाला आळा बसेल आणि वाहतुकीची कोंडी कमी होईल हे तर हे तर सगळ्यांना माहितच आहे.
प्रत्येक मेट्रो स्टेशनजवळ पार्किंगची सोय केली जाते आणि तिथून जवळपासच्या भागात जायला बसेस असतात,एकच पास बस आणि मेट्रोला चालतो,हे सर्वसाधरण मेट्रोची मोडेल आहे ,जे बाहेरच्या सर्व देशांमध्येपण वापरले जाते. पुढील १०-१५ वर्षात जितकी लोकसंख्या वाढणार आहे त्यासाठी मेट्रोचे जाळे वाढवत नेणे हा पर्याय आहे बस खरेदी नाही.
फक्त आता पुण्याच्या लोकप्रतीनिधिनी नुसत्या गप्पा न मारता त्या पूर्ण कश्या होतील हे पाहायला हवे.
मानस
22 Jan 2010 - 10:58 pm | अमृतांजन
>>प्रदुषणाला आळा बसेल>>
मेट्रो कशावर चालणार आहे? वीजेवर? ती वीज कोठून येणार?
बसेस ग्यासवर चालवता येऊ शकतात हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे.
5 Feb 2010 - 7:20 pm | मानस्
अमृतांजनराव
समजा एका मेट्रोमधून जर ५०० लोक प्रवास करत असतील तर २००-३०० तरी खाजगी गाड्या रस्त्यावर यायच्या थांबतील , आणि एका मेट्रो ईंजीनाचे प्रदूषण २००-३०० गाड्यांच्या प्रदूषणापेक्शा निश्चितच कमी असेल ना?
मानस
22 Jan 2010 - 8:20 pm | प्रसन्न केसकर
सहमत.
फक्त पीएमपीएमएल से उत्तर होऊ शकणार नाही. खाजगी वाहने म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम होईल. बीआरटी, लाईट रेल, मेट्रीसारखे प्रोजेक्ट नीट केले तर आणि तरच प्रश्न आवाक्यात तरी राहिल. पीएमपीएमएलचं सक्षमीकरण त्यातुन होऊ शकेलही. पण हे राजकारणी सहजी करतील असं वाटत नाही. जनतेनंच लक्ष घातलं पाहिजे. फक्त कुरकुर करुन किंवा नावं ठेऊन काही निष्पन्न होणार नाही.
23 Jan 2010 - 8:47 am | अमृतांजन
>>जनतेनंच लक्ष घातलं पाहिजे. फक्त कुरकुर करुन किंवा नावं ठेऊन काही निष्पन्न होणार नाही.>>
कुरकूर न करता मी खाली काही प्रश्न आणि उपाय सुचवले आहेत. त्यावर प्रतिसाद दिले जातील अशी अपेक्षा आहे.
22 Jan 2010 - 10:52 pm | अमृतांजन
एक प्रयोग म्हणून हे करता येईल का ते पहावे-
१. ज्या मार्गावरुन मेट्रो जाणार आहे त्यातील एकच जो आजचा सगळ्यात व्यस्त मार्ग असेल तो घ्यावा.
२. भविष्यातील (आजपासून ३ वर्षानंतरची) मेट्रो जितके प्रवासी त्यातून नेणार असेल तितकी वाहन क्षमाता होईल इतक्या बसेस मेट्रोच्या अपेक्षित वेळांना सोडाव्यात.
३. असे योग्य तेव्ह्ढा विदा होई पर्यंत करावे- रोज. कदाचित २ महिन्यात चांगला विदा मिळू शकेल. इतके वर्षे थांबलोच आहे तर आणखी २ महिने थाबायला कोणाची ना नसेल.
४. निरिक्षण करावे खरच प्रश्न सुटणार आहेत का ते.
खालील विदा गोळा केल्यास खूप चांगले होईल-
१. किती लोक कोणत्या स्टेशन वर बसून कोठे उतरतात. दिवसातील वेळांप्रमाणे त्यात कसा बदल होतो.
२. रस्त्यांवरील इतर वाहने खरंच कमी झाली का?
३. प्रदुषणात वाढ झाली का?
४. वगैरे
22 Jan 2010 - 11:25 pm | अमृतांजन
City Buses in Munich (Germany) - Part 1/2
http://www.youtube.com/watch?v=qo_4cxJRa4E
City Buses in Munich (Germany) - Part 2/2
http://www.youtube.com/watch?v=R_miml7foT8
Munich Tram: Part 1
http://www.youtube.com/watch?v=5lsL-bw3Cw4
Munich Metro- Munich
http://www.youtube.com/watch?v=g_LZJgFnYb4
23 Jan 2010 - 3:52 am | चिरोटा
पुण्याचे म्युनिक करायची घोषणा राजकिय नेत्यांनी केली की काय?. पुणे आणि म्युनिक शहरांत काही साम्य आहे का? शहर रचना? पुण्याची लोकसंख्या ३३ लाख तर म्युनिकची १३ लाख.
पाश्चिमात्य्(विशेषकरुन युरोपातली) शहरे जुनी असली(लोकसंख्येची घनता जास्त असली) तरी शहर्/रस्ते रचनेबाबत राज्यकर्त्यांनी वेळच्यावेळी पाउले उचलल्याने तेथील वाहतुक व्यवस्था आटोक्यात आहे.आपल्या सरकारची अवस्था वरातीमागून घोडे असते.
वर म्हंटल्याप्रमाणे आहे ते आधी सुधारा असे सुचवावेसे वाटते.
भेंडी
P = NP
23 Jan 2010 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे
पुण्याच्या विकास आराखड्यात याचा विचार केला नसेल काय? परंतु हे विकास आराखडे राजकीय स्वार्थापोटी कागदावरच राहतात. त्यात स्वार्थासाठी हवे तसे बदल करुन घेतले जातात.
विकास आराखडे हे नगरनियोजनाचा भाग आहेत.त्यात लोकसंख्यावाढ वाहतुक याचा विचार असतो. अडचण अंमलबजावणीची आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Jan 2010 - 4:00 pm | प्रसन्न केसकर
श्री घाटपांडे यांच्या मताशी सहमत.
मुळात हे विषय आयसोलेशन मधे विचार करण्याचे नसुन टाऊन प्लॅनिंगसाठीच्या आराखड्यात सर्वंकष विचार करुन घ्यायला हवेत. तसे होत नसल्याने बर्याचदा परिस्थिती बिकट होते.
मुळात मेट्रो अथवा बीआरटी या संकल्पनाना विरोध करण्याचे काहीच कारण दिसत नाही. अस्तित्वात असलेला रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयाचा आहे आणि त्याचा वापर स्थानिक वाहतुकीकरता किती करता येईल याचा विचार केला पाहिजे.
जरी मेट्रो किंवा बीआरटी केली तरी पीएमपीएमएल बंद होणार नाही. त्या परिस्थितीत पीएमपीएमएल फीडर सर्वीस देऊ शकते. मुंबई लीनीयर सीटी असल्याने तिथे रेल्वे सर्विस किफायतशीर ठरते परंतु लोकसंख्यावाढीमुळे तिलाही मर्यादा पडतात हे गेल्या काही वर्षात लक्षात आलेले आहे. शिवाय मुंबई व उपनगरातही रेल्वे-लोकल सेवेचा लाभ घेण्यासाठी अनेकदा लोक बस, रिक्षा, टॅक्सी वगैरे साधने वापरतातच. पुण्याच्या उपनगरांमधे असाच वापर पीएमपीएमएल बसेसचा करता येईल.
मेट्रो नक्कीच खर्चिक आहे. स्कायरेल हाही असाच प्रकल्प. त्यापेक्षा बीआरटी किफायतशीत ठरेल. परंतु पुण्यात बीआरटी च्या नावाखाली जो अर्धाकच्चा प्रयोग झाला अन केवळ डेडीकेटेड बस लेन म्हणजेच बीआरटी असे लोकांना संकल्पना माहिती नसल्याने ठसवले गेले त्यामुळे बीआरटीला कितपत पाठिंबा मिळेल ही शंकाच आहे. शिवाय पीएमपीएमएल फीडर सर्विस म्हणुन सेवा देण्यासाठी तिच्यातही अनेक बदल करणे आवष्यक आहे.
त्यामुळेच नागरीकांनी शहराच्या सध्याच्या व भविष्यकालीन गरजा स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका व त्यांच्या अनुषंगाने सर्वसमावेशक (कॉम्प्रीहेन्सीव्ह) ट्रॅफिक प्लॅन जाहीर करण्याचा आग्रह धरला पाहिजे.
23 Jan 2010 - 9:44 am | नितिन थत्ते
>>मेट्रो मूळे तेलाची बचत होणार
हम्म्म. मेट्रोला लागणारी वीज कुठेतरी निर्माण करणारच. ती तेलाऐवजी कोळशावर बनेल. मग तेलाची बचत होईल हे बरोबर. प्रदूषण मात्र वाढेल. (माझ्या गावातलं प्रदूषण कमी व्हावं म्हणून कुठच्यातरी लांबच्या गावाचे प्रदूषण वाढवण्याची आयडिया कशी काय वाटते?)
मुंबईत काही वर्षांपर्यंत मुख्यत्वे वस्ती रेलवेच्या आसपास वाढत असे. लोक घरापासून स्टेशनपर्यंत (१५ मिनिटे) चालत जाऊन नंतर ट्रेनने जात असत. पुण्यात पूर्वीपासूनच अशी पद्धत नव्हती त्यामुळे त्यांच्यात स्वतःच्या वाहनाने (पूर्वी सायकल, मग दुचाकी आणि आता गाडीने) पॉईंट टू पॉईंट प्रवास करण्याची प्रवृत्ती आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील वाहनांची संख्या मुंबईतील वाहनांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे वाचले होते (मुंबईची लोकसंख्या पुण्याच्या चौपट असूनही).
मूंबईतही आता स्टेशनांपासून दूर घरे बांढली जात आहेत. त्यामुळे ही प्रवृत्ती वाढू लागली आहे. :(
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 10:01 am | अक्षय पुर्णपात्रे
हे कसे? वाहनांची वर्दळ कमी झाल्याने कमी होणारे प्रदुषण आणि मेट्रो चालवण्यासाठी लागणार्या वीजनिर्मीतीसाठी होणारे प्रदुषण यांची तुलना केल्यास प्रदुषण वाढेलच असे नाही. तेव्हा प्रदुषण वाढेलच हे कसे ठरवले हे कृपया कळवावे.
23 Jan 2010 - 10:06 am | नितिन थत्ते
जिथे वीज बनणार आहे तिथे प्रदूषण वाढणारच. म्हणजे आत्ता समजा १००० मेवॅ वीज तिथे बनत असेल तर नंतर ११०० मे वॅ बनणार. त्यासाठी जास्त कोळसा जाळणार. किंवा १०० मे वॅ चे नवे केंद्र कुठेतरी उभे करणार. तिथे नसलेले प्रदूषणा सुरू होणार.
(वरच्या उदाहरणातील आकडे महत्त्वाचे नाहीत).
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 10:13 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री थत्ते मला वाटते आकडे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. किती वीज लागेल? ती कशाचा वापर करून बनवली जाणार आहे? तिचा वापर peak period मध्ये होणार आहे किंवा नाही. वाहतुक कितपत कमी होईल? लोकांचा वेळ कितपत वाचेल असे अनेक मुद्दे आहेत. प्रदुषण या समस्येचे स्थानिकीकरण करणे शक्य आहे काय? शहरांकडे वाढत असलेले स्थलांतर शहरांमध्ये वीजेच्या वाढलेल्या मागणीस कारणीभूत असतांना या स्थलांतरासही विरोध करावा काय? आकड्यांना सोडून मेट्रो प्रकल्पाविषयी मत कसे बनवावे?
23 Jan 2010 - 11:11 am | नितिन थत्ते
आकडे महत्त्वाचे आहेतच. पण वरच्या उदाहरणासाठी नाही.
पुण्याची सध्याची गरज २५०-३०० मेवॅ आहे. येथे सांगितल्यानुसार दिल्लीची मेट्रो सुमारे ४५ मेवॅ वीज वापरते. म्हणजे मेट्रोमुळे सुमारे १५% वीजवापर (लोड) वाढेल असे दिसते.
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 11:17 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री थत्ते, ढेबळमानाने मट्रोसाठी १५% अधिक वीज लागेल असे गृहीत धरूया. परंतु ही वीजनिर्मीती पुण्यापासून दूर कुठे होणार आहे की पुण्याजवळच होणार आहे. यासाठी लागणारी वीज कोळशापासून बनवली जाणार आहे की नैसर्गिक वायूपासून? या वीजेसाठी लागणार्या कोळशातून अधिक प्रदुषण होणार आहे की वाचलेल्या वाहनांच्या वर्दळीपासून यावर आकडेवारीशिवाय भाष्य करणे कठीण आहे असे मला वाटते.
23 Jan 2010 - 6:59 pm | नितिन थत्ते
माझा मुद्दा प्रदूषण अधिक होणार हा तर आहेच पण ते पुण्यात न होता कुठेतरी दुसरीकडे होणार हा आहे. आणि पुण्यातले प्रदूषण कमी होईल ना? मग दुसरीकडे ते वाढले/ नव्याने निर्माणझाले तर काय हरकत या विचारसरणीचा आहे. (पुण्याच्या परिसरात वीज निर्मितीसाठी अनुकूल घटक आहेत असे वाटत नाही). हे पुण्याबाबतच नसून कोणत्याही शहराबाबत खरे आहे.
माझा आक्षेप प्रदूषण कमी होईल अशा सहजपणे केल्या दाव्याबाबत आणि त्यासाठी अशा प्रकल्पांना दिल्या जाणार्या पाठिंब्याबाबत आहे
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 10:27 pm | सुधीर काळे
पेट्रोल-डिझेल इंजिनांपेक्षा वीजनिर्मिती करणारी जनित्रे जास्त कार्यक्षम असतात. त्यामुळे गृहीत किलोवॅटअवर मागे प्रदूषण नक्कीच कमी होईल (Pollution for a given MW production or a given kWh consumption will surely reduce)
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
24 Jan 2010 - 9:50 am | नितिन थत्ते
>>पेट्रोल-डिझेल इंजिनांपेक्षा वीजनिर्मिती करणारी जनित्रे जास्त कार्यक्षम असतात
मुळातूनच चूक.
वीजनिर्मिती मुख्यत्वे कोळशावर होते.
कोळसा- उष्णता - वाफ - वाफेचे इंजिन- जनित्र - वीज - वीज वहन - मोटर - यांत्रिक शक्ती
एवढ्या लांबलचक मार्गापेक्षा
पेट्रोल/डिझेल - उष्णता - यांत्रिक शक्ती हा मार्ग अधिक कार्यक्षम असावा.
तसेही बाह्यज्वलन इंजिनापेक्षा अंतर्ज्वलन इंजिने जास्त कार्यक्षम असतात.
नितिन थत्ते
24 Jan 2010 - 2:46 pm | सुधीर काळे
मी मोटरगाड्यांमधल्या इंजिनांबद्दल लिहिले आहे जी वेगवेगळ्या वेळी (गरजेप्रमाणे) कमी-जास्त वेगाने चालवावी लागतात व त्यामुळे ती कमी कार्यक्षम असतात. या उलट वीजनिर्मिती करणारी उपकरणें optimum conditions मध्ये चालविली जातात त्यामुळे overall efficiency जास्त असते असे मला वाटते.
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
24 Jan 2010 - 6:55 pm | नितिन थत्ते
वीज निर्मिती करणारी उपकरणे ऑप्टिमम कंडिशनला फार कमी वेळ चालतात.
overall efficiency जास्त असते ती इंधन ते वीज निर्मिती या भागात. ती सुद्धा कोळशाच्या उपकरणाची नाही. पुढे त्याविजेचे वहन, त्यावर मोटर चालवणे यात मिळणारी efficiency अजून कमी होते.
मेट्रोसाठी तयार केलेल्या खास मार्गावरून बससेवा चालवली (एलेवेटेड - भुयारी मार्गाने बस चालवता येणार नाही) तर जास्त फायदा होईल. बससाठी वेगळी मार्गिका ठेवण्याची कल्पना यशस्वी झाली नाही पण अशा मुद्दाम बनवलेल्या मार्गांवरून बसेस चालवल्या तर ते यशस्वी होऊ शकेल.
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 10:39 pm | अक्षय पुर्णपात्रे
खरे आहे. तसेच एका ठिकाणी प्रदूषण कमी होण्याकरता इतरत्र जनतेस वेठीस धरले जावे याबाबतही सहमत आहे. पण काही आकडेवारीच्या आधारावर चर्चा व्हावी जेणेकरून मत बनवता यावे.
...............................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
23 Jan 2010 - 11:52 am | सुधीर काळे
मेट्रोचा जो मार्ग आहे तो जमीनीखालूनच असणार व तिथे पाणी नक्कीच साचणार कारण पंप चालू कारायला हवेत अशी परिस्थिती आल्यास वीज असली पाहिजे व पुण्यात त्या बाबतीत आनंदी आनंद आहे!
प्रभोंनी सांगितलेला 'मोनोरेल' हा पर्याय मलाही सर्वोत्तम वाटतो कारण तो जास्त उंचीवरून जातो व त्यामुळे पाणी साचून सर्वांची (म्हणजे प्रवासी व रेल्वे इंजिने, डबे वगैरे) वाट लागणार नाहीं.
जकार्ताही असेच वारंवार पूरग्रस्त होणारे शहर आहे व इथेही मोनोरेल हाच उत्तम पर्याय आहे असे मानले जाते!
मेट्रो किंवा मोनोरेल कशाला? तर रस्त्यावरून रेल्वे व बसेस काढून इतर रहदारी सुकर करण्यासाठी. दर दोन-तीम निनिटानी धावणार्या रेल्वेला पर्याय फारच कमी आहेत.
वीजनिर्मिती शहरापासून दूर केली जाते त्यामुळे शहरात प्रदूषण होत नाहीं. तसेच वीजनिर्मिती करणारी उपकरणे डिझेल-पेट्रोल-गॅसवर चालणार्या इंजिनांपेक्षा जास्त कार्यक्षम (efficient) असतात. थोडक्यात प्रदूषण शहरांपासून दूर नेऊन जनतेचे स्वास्थ्य सुधारणे व शहरांच्या रस्त्यांवरून जाणारी वहाने कमी करणे हे दोन उद्देश नक्कीच साध्य होतील.
मोठ्या प्रमाणावर वहातूक (Mass transit) करण्यासाठी रेल्वेला दुसरा पर्याय अद्याप तरी कुठला दिसत नाहीं.
अमृतांजन मॅडमनी विषय सुरेख निवडला आहे. अभिनंदन!
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
23 Jan 2010 - 3:35 pm | गणपा
खुप काळा नंतर एक छान चर्चा वाचनात आली.
पुपेंशी पुर्ण पणे सहमत.
सध्या मुंबईत जसे स्काय वॉकच्या फॅडचे पेव फुटले आहे तासाच हा मेट्रोचा फार्स वाटतोय.
एकंदर मेट्रो उभारणीचा खर्च, विजेचा प्रश्न वगैरे बाबी लक्षात घेता जर तोच पैसा पि एम टी / पी.एम.पी.एम.एल लडे वळवला तर ते जास्त सोइस्कर होईल असे माझे मत आहे.कारण बसेस जिथे कोपर्या कोपर्या पर्यंत पोहचु शकतात तिथे मेट्रो पोहचु शकत नाही.
23 Jan 2010 - 5:10 pm | मि.इंडिया
चर्चेचा काय उपयोग आहे ? अडाणी जनतेच्या अडचणींपासून स्वतःची उन्नती साधण्यासाठी पालकमंत्री आहेतच. जाणत्या राजाच्या मार्गदर्शनाखाली ते पुण्याची योग्य काळजी घेतील असा आम्हा पुणेकरांचा विश्वास आहेच. उगाच अशा चर्चा करून त्यांना अडचणीत आणू नये. जास्त खोलात जाणार्यानी शेट्टी लक्षात ठेवावेत.
प्रदीप
24 Jan 2010 - 12:07 am | कुंदन
>>जास्त खोलात जाणार्यानी शेट्टी लक्षात ठेवावेत.
मेट्रो / मोनो रद्द रे .
विषय बदला.
सायकल रिक्षा कशी वाटते?
23 Jan 2010 - 5:11 pm | सुधीर काळे
कोलकाता व दिल्ली येथील मेट्रोचा अनुभव काय आहे? मी स्वतः त्यांचा वापर केलेला नाहीं पण त्या सेवेबद्दल खूप स्तुती लोकांच्याकडून ऐकली आहे. आपल्या 'मिपा'समूहावर या शहरातले कुणी असल्यास जरूर त्याबद्दल कळवावे व चर्चेत प्रथमपुरुषी-एकवचनी रंगत आणावी.
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
23 Jan 2010 - 7:30 pm | नितिन थत्ते
कलकत्त्यातल्या मेट्रोतून प्रवास केला आहे.
चांगली सर्विस वाटली. कलकत्त्यात पावसाचे पाणी भरलेले असूनही मेट्रोमध्ये पाणी नसते आणि मेट्रो चालू असते.
दिल्लीतली मेट्रो वातानुकूलित आहे असे ऐकले आहे तशी कलकत्त्यातली नाही. पण ती जमिनी खालून जात असल्याने उन्हाने तापत नाही आणि तसा काही त्रास वाटला नाही.
पण एसी नसल्याने खिडक्या उघड्या असतात आणि त्यामुळे फार नॉईज असतो. बोगद्यातून गाडी जाते तेव्हा येतो तसा.
गर्दी मुंबईच्या लोकलच्या १/४ असेल. पीक अवरला ही चेंगराचेंगरी होत नाही. दरवाजे बंद होतात.
नितिन थत्ते
23 Jan 2010 - 10:18 pm | सुधीर काळे
आभारी आहे!
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
23 Jan 2010 - 7:17 pm | II विकास II
रोचक चर्चा
24 Jan 2010 - 9:50 am | आनंदयात्री
मेट्रो -- मोठ्या साहेबांनी दुरदृष्टी ठेवुन आपल्या नंतर छोट्या साहेबांची केलेली पोटापाण्याची व्यवस्था !!
27 Jan 2010 - 4:38 pm | जे.पी.मॉर्गन
दुर्दैवानी आपण काहीच करत नाही आहोत
26 Jan 2010 - 5:34 pm | अमृतांजन
http://www.parisar.org/urban-transport.html
27 Jan 2010 - 4:19 pm | जे.पी.मॉर्गन
ह्या दुव्यावर ह्या समस्येवर थोडी अधिक माहिती दिली आहे. आयाआयटी पवईनी दिलेला अहवाल ह्या दुव्यावर बघता येईल.
शेवटी काय आहे ना.... तुम्ही बसेस चालवा... मेट्रो बांधा... मोनोरेल करा... बी आरटी करा...जमीनी वरून - खालून कसेही काहीही करा. पण किमान वर्षाला हजारो रुपये टॅक्स म्हणून तुमच्या घशात घालतोय त्यासाठी आम्हाला किमान घरून कचेरीत नीट पोचवायची / आणायची जबाबदारी घ्याच. सालो.... इतकी वर्षं तुमच्या वाट्टेल त्या सबबी ऐकत आलोय. "चुकून" बांधलेले फ्लायओव्हर्स, भो** वाजलेले रस्ते, सीवायजीच्या वेळी २४ तासांत केलेली रस्त्याची मलमपट्टी आणि अनेक गोष्टींना रोज २ वेळा तरी फकाफका धूर नाका-तोंडात घेत शिव्या मोजतोय. च्यायला... इतकी वर्ष स्वतःच्या तुंबड्या भरल्यात.... आता जरा कामं करा की ! अंत नका पाहू. वैतागून सगळे रस्त्यावर आलो ना.... तर काही धडगत नाही तुमची. लई लई राडा केलाय भाई न दादांनी.... एक दिवस मोटार अडवून भो****ला लागणार.
(उद्विग्न)
जेपी
29 Jan 2010 - 6:13 am | सुधीर काळे
माझे एक जुने तामिळ सहकारी श्री राजू इस्पातच्या पॉवर-प्लँटचे CEO होते व त्यांनी इस्पातच्या या प्रोजेक्टसाठी कुठली प्रोसेस निवडायची याचा खूप अभ्यास केला होता. त्यांना मी या विषयावर लिहिले होते. त्यांचे आंग्लभाषेत आलेले उत्तर खाली दिले आहे. त्यातून प्रत्येकाने आपापले तात्पर्य काढावे!
मी विचारलेले प्रश्न इटॅलिक्स Italics मधे आगेत, राजूंची उत्तरें बोल्ड Bold अक्षरात आहेत.
A) KBK: What is the average efficiency of Coal fired boiler-steam-turbine-generator:
Mr. Raju: Average Coal fired Power Plant efficiency is around 35%
KBK: What is the average efficiency of Diesel genset i.e diesel engine-Generator:
Mr. Raju: Diesel engines operate at 45% fuel conversion efficiency, as opposed to gasoline units around 30%.
C) KBK: What is the average efficiency of Diesel-fired boiler--steam-turbine-generator:
Mr. Raju: There is little difference between gas and diesel fired boilers in terms of performance. The choice between gas and diesel is usually based on the comparative cost and availability of the two forms of fuel.
D) KBK: What is the average efficiency of Natural gas fired boiler-steam-turbine-generator:
Mr Raju: A typical Single-cycle gas turbine offer thermal efficiency of about 35–40%.
Combined Cycle gas turbine plants are driven by both Natural gas & Steam. They generate main power by burning Natural gas in a Gas Turbine and use residual heat from exhaust gases to produce steam & generate additional electricity from steam. These plants offer efficiencies of up to 60%.
E) KBK: What is the thermal 'average' efficiency of a 4-stroke petrol engine and a 4-stroke diesel engine that drives cars and trucks? (because a car/truck engine doesn't always run at optimum levels due to traffic conditions and traffic jams)
Mr. Raju: I am not able to answer this point.
KBK: To MiPa members: Can one of us calculate the efficiency of a car that runs 7-8 km in city traffic?
F) KBK to Mr. Raju: This info is required for a comparison of adding a railway line to reduce number of motor vehicles on the road. If the traffic doesn't increase, will the electricity generated by one of the methods mentioned above will consume less fuel than a motor vehicle?
Mr. Raju: For this end use, Diesel electric driven train is the best option, since the engine will run at optimum (Constant) speed and speed control of the vehicle can be managed electrically.
------------------------
सुधीर काळे
एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ,
कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
30 Jan 2010 - 11:17 am | अमृतांजन
"Diesel electric driven train is the best option, since the engine will run at optimum (Constant) speed and speed control of the vehicle can be managed electrically."
हा विचार मला खूप आवडला.
30 Jan 2010 - 12:28 pm | नितिन थत्ते
डीझेल इलेक्ट्रिक ट्रेन किंवा बस हा सर्वोत्तम उपाय आहे.
पण डीझेल इलेक्ट्रिक ट्रेनला पुन्हा शहरात प्रदूषण या नावाखाली विरोध होईल.
ही बस सुद्धा चांगली सेवा देईल असे वाटते.
नितिन थत्ते