प्रतिसाद

धनश्रीदिनेश's picture
धनश्रीदिनेश in काथ्याकूट
3 Apr 2008 - 5:04 pm
गाभा: 

मराटी मुलानी डोन बोस्को म्ध्ये प्रवेश् का नाहि मिळ्त ? फक्त ख्रिच्नन्न मुलाना प्रवेश , हा मराटी आहे म्हणुन आमच्या मुलानि चान्ग्ल्या शाळेत शिकु नाही कि काय ? मुम्बइकर अस्ल्याचा हा एक तोटा कि फायदा

प्रतिक्रिया

व्यंकट's picture

3 Apr 2008 - 6:37 pm | व्यंकट

हा प्रकार घडतोय, ती शाळा चांगली कशी ? बर झालं अश्या शाळेत प्रवेश मिळत नाहिये ते.

विद्यार्थ्यांना समानतेचा धडा शिकवण्यासाठी गणवेष अनिवार्य असतो.
प्रवेश घेण्यासाठी ज्या कार्यालयात आपण जातो, तेथेही मास्तर, रजिस्ट्रार वैगेरेंना गणवेष अनिवार्य व्हावा.

व्यंकट

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Apr 2008 - 8:12 pm | llपुण्याचे पेशवेll

ज्या शाळेत असे प्रकार घडतात ती शाळा चांगली कशी ? का मुलगा २ इंग्रजी शब्द बोलला म्हणजे झाली शैक्षणिक इतिकर्तव्यता. त्यापेक्षा आमची गरवारे हायस्कूल एकदम छान. कारण आमच्या शाळेत गणवेश घालणे आणि घरचा अभ्यास रोज करून आणणे याशिवाय विद्यार्थ्यांवर इतर कोणतीही बंधने नव्हती. :)

(भावे हायस्कूल आणि गरवारे शाळेतून शिकलेला)
डॅनी.
पुण्याचे पेशवे

आमच्या सेंट भावे मधे फक्त गणवेष घालण्याचा नियम होता. गणवेष म्हणजे..पांढरा सदृश शर्ट आणि खाकी सदृश पँट..बाकी पट्टा (पँटसाठी), बूट (पायात घालून चालण्यासाठी) वापरणे, शर्ट खोचणे हे वैयक्तिक फॅशन स्टेटमेंटवर अवलंबून..

आम्ही बुटाचा वापर मधल्या सुट्टीत फुटबॉल खेळ्ण्यासाठी करायचो..बॉल म्हणून.. वेळप्रसंगी नारळाची करवंटी पण वापरली आहे. :-)

आपण हे लालुंच्या आणि अमरसिंगांच्या कानावर घालुयात. अबु आझमी ना पण घेउया..ते सांगतील की भारतात कोणालाही कोठे ही जायची खुल्ली छुट आहे.
बाय द वे तुम्हाला मुलाला ख्रिश्चन शाळेतच का घालयाचे आहे? सर्वधर्म समभाव एव्हढाच हवा असेल तर मदरसे ही चांगले असतात.
आणि मराठी मुम्बैकर ख्रिश्चन नसतात हे कोणी सांगतले?
डेक्कन एज्युकेशन च्या न्यू इंग्लिश स्कूल या शुद्ध मराठी शाळेत शिकलेला गुजराती ख्रिश्चन्.......विजुभाऊ शॉ.

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2008 - 10:01 pm | पिवळा डांबिस

डॉन बॉस्को मध्ये फक्त ख्रिश्चन लोकांनाच प्रवेश मिळतो हे खरे नाही. तिथे शिकलेले नॉन्-ख्रिश्चन मला माहिती आहेत! फार फार तर लिखिकेच्या (परिचयातील) मराठी मुलांना तिथे प्रवेश मिळाला नाही असे म्हणा! उगाच एका शिक्षणसंस्थेची बदनामी करू नका...
वाटलंच तर संस्थेशी संपर्क करून खात्री करून घ्या, नांवं ठेवण्याआधी...

आणि मराठी मुम्बैकर ख्रिश्चन नसतात हे कोणी सांगतले?
चिक्कार, अहो आमच्या सायन्/वरळी कोळीवाड्याला किंवा वसई/ अर्नाळ्याला भेट देऊन पहा!!

शुद्ध मराठी शाळेत शिकलेला गुजराती ख्रिश्चन्.......विजुभाऊ शॉ.
या हिर्‍याला पैलू आहेत तरी किती? :)))

इनोबा म्हणे's picture

3 Apr 2008 - 10:40 pm | इनोबा म्हणे

आणि मराठी मुम्बैकर ख्रिश्चन नसतात हे कोणी सांगतले?
अगदी बरोबर. वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रीटो ही स्वतःला अभिमानाने मराठी म्हणवतात.(काही वर्षांपूर्वी सकाळमध्ये त्यांची लेखमालिका प्रसिद्ध व्हायची)

शुद्ध मराठी शाळेत शिकलेला गुजराती ख्रिश्चन्.......विजुभाऊ शॉ.
या हिर्‍याला पैलू आहेत तरी किती? :)))
मी बी तेच म्हणतोय. रोज कायतरी नविनच ऐकायला मिळतंय. :)

(मराठी शाळेत,मराठी मास्तराकडून मराठी शिकलेला: इनोबा मराठे :)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

शितल's picture

12 Apr 2008 - 3:04 am | शितल

इनोबा म्हणे
(मराठी शाळेत,मराठी मास्तराकडून मराठी शिकलेला: इनोबा मराठे :)
हे छानच !

मराठी ठासुन भरलेला - इनोबा मजा आली तुमचे वाक्य वाचुन.