“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)

II विकास II's picture
II विकास II in काथ्याकूट
3 Jan 2010 - 6:04 pm
गाभा: 

“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.” भारताच्या केंद्र सरकारने श्री० सलील कुळकर्णी ह्यांच्या हस्ते ही एक नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे.

आता यापुढे महाराष्ट्रात कुठेही “हिंदी राष्ट्रभाषा आहे” या सबबीखाली मराठीची उपेक्षा, गळचेपी होत असेल तर या पुराव्याचा उपयोग करून त्याला खंबीर विरोध करायलाच पाहिजे.

स्वभाषाभिमान या मालिकेतील श्री० सलील कुळकर्णी यांचा हा पुढला लेख खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन-०_ हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा_010110

वरील लेखात उल्लेख केलेले केंद्र सरकारचे मूळ पत्र व त्याची मराठी आणि इंग्रजी भाषांतरे खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.

१. केंद्रसरकारच्या राजभाषा विभागाचे मूळ हिंदी पत्र (धारिणी उघडण्यास थोडा विलंब लागेल):
अमृतमंथन-१_हिंदी राष्ट्रभाषा नहीं_भारत सरकारको कबूल_मूल पत्र_291209

२. मूळ हिंदी पत्राचे मराठी भाषांतर: अमृतमंथन-२_हिंदी राष्ट्रभाषा नाही_केंद्र सरकारचा निर्वाळा_पत्राचे मराठी भाषांतर_291209

३. मूळ हिंदी पत्राचे इंग्रजी भाषांतर: अमृतमंथन-३_Hindi is not the National Language_Admission by Central Govt_English Translation of the Letter_291209 .

मुळ लेखः http://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/

------------------
लेख वाचून झाल्यावर त्यातील मते पटल्यास सर्व मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह ’मराठी+एकजुट’ कृतिगटात भाग घेण्यासाठी शक्यतो marathi.ekajoot@gmail.com या पत्त्यावर ई-मेल पाठवून आपले नाव नोंदवावे.

.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2010 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास माहितीबद्दल धन्यु.....! पण घटनेत राष्ट्रभाषा कोण-कोणत्या आहेत असा उल्लेख आहे. उद्या पुस्तक पाहून सांगतो.

हिंदी को राष्ट्रभाषा घोषित करने के संबंध मे भारत के संविधान मे कोई प्रावधान नही है
अनुवाद समजून घ्यावा लागेल..!

बाकी, माहितीअधिकाराचा चांगला उपयोग केला आहे. सलील कुलकर्णी यांनी.

अवांतर : आपल्या मराठी माणसाची एकजुट आहेच, कुठे जॉइन वगैरे व्हायला नका सांगू राव. लै कंटाळा येतो.

-दिलीप बिरुटे

चिरोटा's picture

3 Jan 2010 - 7:03 pm | चिरोटा

चांगली माहिती. उत्सुकतेने भारतिय घटना कशी असते ते पाहुया म्हणून शोधले.http://indiacode.nic.in/coiweb/welcome.html

PART XVII मध्ये ही माहिती आहे--
The official language of the Union shall be Hindi in Devanagari script.
Official म्हणजे कचेरीसंबंधीत.तेव्हा national आणि official मधला हा घोळ आहे.केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या संस्था सोडल्या तर दुसरीकडे हिंदी वापरलेच पाहिजे असे तरी दिसत नाही.
वर गळचेपी म्हंटले आहे ती कुठल्या संस्थांमध्ये होताना दिसते?
भेंडी
P = NP

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2010 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारताचे संविधान
भाग सतरा
प्रकरण एक
संघराज्याची भाषा

३४३. (१) संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल.संघराज्याच्या शासकीय प्रयोजनांसाठी वापरावयाच्या अंकाचे रुप हे भारतीय अंकाचे आंतरराष्ट्रीय असेल.
(२) खंड (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षाच्या कालावधीपर्यंत, संघराज्याच्या ज्या शासकीय प्रयोजनासाठी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी इंग्रजी भाषा वापरली जात होती. त्या सर्व प्रयोजनांसाठी तिचा वापर चालू राहील.

परंतु, राष्ट्रपतीला उक्त कालावधीत १ आदेशाद्वारे, संघराज्याच्या शासकीय प्रयोजनापैकी कोणत्याही प्रयोजनाकरिता इंग्रजी भाषेच्या जोडीस हिंदी भाषेचा आणि भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय रुपाच्या जोडीस देवनागरी रुपाचा वापर प्राधिकृत करता येईल.
(३) या अनुच्छेदात काहीही अंतर्भूत असले तरी, संसदेला कायद्याद्वारे उक्त पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा प्रयोजनासाठी - -
(क) इंग्रजी भाषेचा, किंवा
(ख) अंकाच्या देवनागरी रुपाचा,
वापर करण्याकरता तरतुद करता येईल.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

II विकास II, घटनेत हिंदीचा राजभाषा म्हणून उल्लेख आहे. आता हिंदी ही राजभाषा नाही. याबाबत घटनेत दुरुस्ती झाली तर कधी झाली असे विचारले पाहिजे. नसेल झाली तर ''संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल'' त्यामुळे माहिती अधिकार्‍याला पुन्हा पत्र लिहून विचारले पाहिजे. किंवा त्याबाबत अधिक खुलासा झाला पाहिजे असे वाटते. महाराष्ट्रात तर प्रादेशिक भाषा म्हणून मराठी बोलल्या जाईल यात वाद नसावा.

-दिलीप बिरुटे