गाभा:
जरा हलकेफुलके :
मिसळपाव या आपल्या आवडीच्या संकेतस्थळाबद्दल आपली एक आवडती आणि एक नावडती गोष्ट लिहावी.
माझ्यापासूनच सुरुवात करते.
आवडती : मिसळपाववर सर्व प्रकारचे नमुने आहेत (म्हणजे लेखक, कवि, गायक, वादक, अन्नपुर्णा, बल्लवाचार्य, विडंबक, मजेशीर, विनोदी, रागीष्ट, चिडके, खुशालचेंडू, उद्योगी, रिकामटेकडे, भांडकुदळ, प्रेमळ, चतुर, अभ्यासू, साहित्यिक, डॉक्टर, आयटीवाले, शेअरबाजारवाले, ज्योतिषी, देशस्थ, परदेशस्थ, लहान, थोर....) आणि या सर्वांना मराठीबद्दल अस्मिता आणि अभिमान आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण असे काहीतरी इथे वाचायला मिळते.
नावडती : काहीवेळा प्रतिसाद आणि प्रकाशनांचा वेग अतिशय मंदावतो.
अवांतर : आमच्या भिडे सरांनी इंग्रजीचा धडा शिकविताना एक म्हण सांगितलेली. ती आवडती-नावडती शब्द ऐकल्यावर नेहेमी आठवते -
नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें@@ गोड!
प्रतिक्रिया
28 Mar 2008 - 2:49 pm | विसोबा खेचर
नावडती : काहीवेळा प्रतिसाद आणि प्रकाशनांचा वेग अतिशय मंदावतो.
मनस्वी,
हे हे हे! कसा पचका केला तुझा! वेगात प्रतिसाद देऊन तुझं वरील वाक्य काही प्रमाणात खोटं ठरवलं की नाही? :)
आणि प्रकाशनाचं म्हणशील तर लोकांनी इथे जास्तीत जास्त वेगवेगळ्या विषयावर लिहावं असंच वाटतं!
माझ्या परिने आजच मी एक लेख प्रकाशित करतोय! वाचून कसा वाटला ते सांग! उगाच नसते वादाचे विषय घेऊन काही मंडळी मिपाचं वातावरण उगीचंच गढूळ करू पाहतात तेव्हा तात्या अभ्यंकरांना एखादा लेख लिहून मैदानात उतरावं लागतं आणि मिपाची गाडी पुन्हा लायनीवर आणावी लागते! उतना भरोसा है हमे अपने आप पर! :)
आमच्या भिडे सरांनी इंग्रजीचा धडा शिकविताना एक म्हण सांगितलेली. ती आवडती-नावडती शब्द ऐकल्यावर नेहेमी आठवते -
नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें@@ गोड!
चलो कोई बात नही! तूर्तास तरी मिपा हे तुझं आवडतं संस्थळ आहे असं धरून चालतो! एखादा मिठाचा खडा लागायचाच! चलता है.. :)
आपला,
(मिपावरचा खुशालचेंडू!) तात्या.
28 Mar 2008 - 2:50 pm | आनंदयात्री
>>नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें@@ गोड!
भारीच !!!
-(शेंबडा) आनंदयात्री
28 Mar 2008 - 3:11 pm | मनस्वी
दुसर्याच्या प्रतिसादांवर टीका-टिप्पणी कराच.... पण स्वतःची आवडती आणि नावडती गोष्ट टाकायला विसरू नका..
ही नम्र विनंती.
28 Mar 2008 - 3:31 pm | धमाल मुलगा
अरे !
तीने बिचारीने गढुळलेल॑ वातावरण जरा शा॑त होईल म्हणून काहीतरी चालू कराव॑ म्हणून हे टाकल॑ आणि त्याच॑ पर्यवसान पुन्हा वादातच झाल॑.
च्च...सावळा गो॑धळच चाललाय सगळा.
मनस्वी, मनाला लाऊन नको घेऊस!
चालायच॑च!
28 Mar 2008 - 9:55 pm | आवडाबाई
एक आवडती -व्हरायटी आणि एक नावडती - शिव्या
29 Mar 2008 - 3:24 am | प्राजु
आवडती : केशवसुमारची खुमासदार विडंबने, चतुरंग यांची मधुशाला, स्वातीचा स्वयंपाक...
नावडती : दारूवरच्या विडंबनांची आलेली लाट...
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
29 Mar 2008 - 5:44 am | वरदा
आवडती : केशवसुमारची खुमासदार विडंबने, चतुरंग यांची मधुशाला, स्वातीचा स्वयंपाक आणि प्राजुच्या चारोळ्या आणि कविता, धमु, पि.डां. काका आणि टिंगी च्या प्रतिक्रिया, विजुभाऊंची बखर, तात्यांची व्यक्तीचित्र आणि रोशनी, सर्वसाक्षी आणि खूप जणांनी काढलेले सुंदर फोटो, काम सोडून टाईमपास करायला भेटणारेमित्र मैत्रीणी असं खूप काही आणि इथे असलेलं मोकळं वातावरण....
नावडती: ज्यांना इथे आवडत नाही अशांचा इथं येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न्..अरे नाही आवडत तर नका ना येऊ इतरांना कशाला पकवता?
29 Mar 2008 - 6:34 am | विसोबा खेचर
आवडती आणि नावडतीच्या बाबतीत वरदाशी सहमत...
आवडतीमध्ये वरदाने माझ्यासारख्या कडमड्या लेखकाची याद ठेवली त्या बद्दल धन्यवाद.. :)
नावडती: ज्यांना इथे आवडत नाही अशांचा इथं येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न्..अरे नाही आवडत तर नका ना येऊ इतरांना कशाला पकवता?
अगं वरदा चालायचंच! येऊ दे त्यांनाही इथे! त्यांना देखील मिपाशिवाय चैन पडत नाही असंच आपण म्हणूया! इथे येऊन पकवू देत त्यांना काय पकवायचंय ते, त्यांनी प्रेमाने आपल्याकरता पकवलेलं आपण खाऊ आणि ढेकर देऊन मोकळे होऊ! :)
तात्या.
29 Mar 2008 - 6:09 am | पिवळा डांबिस
आवडती: इथला मनमोकळेपणा, थट्टामस्करी व दिलदारी
नावडती: वरती वरदाने म्हटलंय तेच, अगदी डिट्टो!
2 Apr 2008 - 12:20 pm | धमाल मुलगा
आवडती:
मैत्रीपूर्ण वातावरण, मस्त लेख - कविता, दिलखुलास तात्या, गुरुवर्य प्रमोद्रोणाचार्य, आमचे लाडके डा॑बिसकाका, आणि इथ॑ येऊन जुळलेले सूर (काही काही॑च्या बाबतीत "धूर"..क्काय चित्तोबा?), मिळालेले समस्त जि॑दादील मित्र-मैत्रिणी, जाज्वल्य म्हराठमोळा इन्या, डॉन्या, आ॑द्या,विजुभाऊ,डॉक्टरसाहेब......
हुश्श्य....यादी स॑पणार नाही बॉ!
नावडती:
१.विघ्नस॑तोषी जमातीमधले उठवळ अमिबा (आम्ही डोकेबाज नाही आहोत त्यामुळे शाब्दीक वादात जि॑कू शकणार नाही कदाचित. पण हे विघ्नस॑तोषी प्राणी जर...जर व्यक्तिशः भेटलेच तर त्या॑ना उभ्या जन्माची अद्दल घडवण्याची जबाबदारी ह्या देशमुखा॑च्या छाव्याची!!!)
२.धमाल मुलगा ह्या तद्दन मुर्ख व्यक्तीच्या "उथळ आणि बटबटीत" प्रतिसादा॑चा पाउस! (अरे! पण वरदाताई तर म्हणतेय की तिला माझ्या प्रतिक्रिया आवडतात! नो प्रोब्लेम...म्हणजे त्या प्रतिक्रिया नक्कीच टाकाऊ नाहिय्येत :-)) )
वरदाताई, आमच्यासारख्या यत्कि॑चित माणसाच्या प्रतिक्रिया॑बद्दल आपली आवड आवर्जून नो॑दवल्याबद्दल "तहेदिलसे" आभारी आहे :-)
2 Apr 2008 - 12:43 pm | विसोबा खेचर
पण हे विघ्नस॑तोषी प्राणी जर...जर व्यक्तिशः भेटलेच तर त्या॑ना उभ्या जन्माची अद्दल घडवण्याची जबाबदारी ह्या देशमुखा॑च्या छाव्याची!!!)
वा धमाल्या, क्या ब्बात है, जियो रे मेरे शेर...!
बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :)
जय जय रघुवीर समर्थ!
सॉरी, चुकलो चुकलो,
ज्ञानेश्वर महाराज की जय! :)
तात्या.
2 Apr 2008 - 2:02 pm | धमाल मुलगा
बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :)
बिनधास्त द्या हो!
भेटूदे तर, सा॑गतो एकेकाला. शाळा-कॉलेजातले हाणामारीचे दिवस काही फार जुने नाहीत झालेले!
आणि हो, फोटोमध्ये बघून आपल्या अ॑गकाठीवर जाऊ नका. आपण हत्यारब॑द असतो.
जय जय रघुवीर समर्थ!
-धमालराव देशमुख-पाटील.
2 Apr 2008 - 2:12 pm | विसोबा खेचर
आपण हत्यारब॑द असतो.
नको रे बाबा! उगाच खूनबिन नको पाडूस कुणाचे! अरे विघ्नसंतोषी असले तरी शेवटी आपण सगळी आंतरजालावरची मराठी माणसं आहोत हे विसरता कामा नये!
हं, आता काही माणसं साला मिपावरच येऊन मिपाची बदनामी करतात आणि यापेक्षा अधिक चांगली संस्थळं आहेत हे सुचवतात त्यांना फार फार तर हाग्या दम दे! :)
तात्या.
2 Apr 2008 - 2:15 pm | धमाल मुलगा
ओक्के बॉस.
जशी आपली आज्ञा!
- (आज्ञाधारक, गुणी बाळ) ध मा ल.
3 Apr 2008 - 1:02 am | इनोबा म्हणे
बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :)
माझ्याकडे द्या,तिच्यायला मी बघतो एकेकाडे :)
बिनधास्त द्या हो!
भेटूदे तर, सा॑गतो एकेकाला. शाळा-कॉलेजातले हाणामारीचे दिवस काही फार जुने नाहीत झालेले!
आमचे तर अजूनही चालू आहेत. कधी हाता-पायांनी तर कधी शब्दांनी(नेटवर)
आणि हो, फोटोमध्ये बघून आपल्या अ॑गकाठीवर जाऊ नका. आपण हत्यारब॑द असतो.
हाण तिच्यायला. आपूण तर घरात बी कट्टा ठेवून असतो. पायजे तवा फोन टाक भौ. :)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
2 Apr 2008 - 1:39 pm | छोटा डॉन
"बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :)"
तात्याबा, कळवाच तुम्ही. आम्ही बघू त्यांच्याकडे ...
कब खोपचेमे लेके खर्चापानी दिया ये पता भी नही चलेगा ...
बाकी सविस्तर सवडीने , तसे बाकिच्यांनी मांडलेले मुद्दे मान्य ...
सुपारीकिंग छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
2 Apr 2008 - 1:24 pm | शरुबाबा
आवडती : मिसळपाववर सर्व प्रकारचे नमुने आहेत
काम सोडून टाईमपास करायला भेटणारेमित्र मैत्रीणी
2 Apr 2008 - 2:09 pm | विजुभाऊ
अ॑गकाठी हा शब्द ज्या कोणी मराठीत आणला त्याला धन्यवाद.
डॉन्या सुपारीचे व्यसन वाईट बर का बाबा. लो.टिळक खात होते...त्यांच्या विचारांचे अनुकरण करा..सुपारी चे नको.
फार वाटले तर आवळा सुपारी घे पोटाला बरी असते...
..........आवळासुपारी किंग्.विजुभौ
2 Apr 2008 - 2:50 pm | छोटा डॉन
आम्हाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही ....
फक्त "सिगारेट" पिल्यावर तोंडाचा वास जाण्यासाठी चिमुटभर सुगंधी सुपारी तोंडात टाकतो, सिगारेट पण नेहमी पित नाही पण जेव्हा ४ मित्रांबरोबर "प्यायला" बसतो तेव्हा लागतेच. ह्याचा अर्थ मी नेहमी पितो असा नाही, जेव्हा त्याच ४ मित्रांबरोबर "३ पत्ती" खेळायला बसतो तेव्हा कोरडे बसूने म्हणून उगीच आपली "उष्टावल्यासारखी" घेतो , ३ पत्ती पण नेहमी खेळत नाही पण जेव्हा घोड्यावर लावलेले पैसे जेव्हा घूसतात तेव्हा बॅलन्स करण्यासाठी थोडे खेळावं लागतं ....
तर थोडक्यात काय की, आम्हाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
3 Apr 2008 - 10:49 am | धमाल मुलगा
घ्या तिच्याआयला !!!!!
ह्याला म्हणतात जि॑दादिली...आणि दोस्ती. एक आवाज टाकला तर अशी आपली माणस॑ उभी राहतायत!
शाब्बास र॑ माज्या वाघा॑नो !!!
>>आपूण तर घरात बी कट्टा ठेवून असतो. पायजे तवा फोन टाक भौ. :)
बास का भाऊ! आयला, तू भेटलास लै झाल॑ आपल्यासाठी!
पाती आन् कट्टे काय आपली खेळणीच हैत की :-))
- (दोस्ता॑चा जानी दोस्त, दुश्मना॑चा जानी दुश्मन) समशेरबहाद्दर ध मा ल.