भरती-ओहोटी आणि चंद्र-सुर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
7 Jan 2010 - 7:25 pm
गाभा: 

भरती-ओहोटी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचा संबंध खालील चित्रांमधे दाखवला आहे. समुद्राचे पाणी त्या शक्तिमुळे अक्षरशः वर खेचले जाते व चंद्राच्या पृथ्वी प्रदक्षिणेमुळे पृथ्वीच्या अशा भागावर भरती येते जेथे चंद्र सगळ्यात जवळ असेल. रोजच भरती-ओहोटीचे चक्र त्यामुळे चालू राहते. अमावस्या आणि पोर्णिमेला येणारी भरती-ओहोटी जास्त जाणवते कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तिबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्तीही मिळते व पाणी जास्त उचलले जाते.

चित्र क्र. १

चित्र क्र. २

चित्र क्र. ३

आता मुद्दा असा आहे की, हा परिणाम फक्त समुद्राच्या पाण्यावरच होत नसणार. पृथ्वीवर जे काही द्रव स्वरुपात आहे ते सगळे असे प्रभावित होतच असणार. त्यात जमीनीतील पाणीही आलेच. व मानवाच्या शरीरातील रक्तही आले- आणि हाच ह्या छॊट्याशा लेखाचा विषय आहे.

जर मानवाच्या रक्तावर परिणाम होत असेल तर रक्त जास्त मेंदूकडे ओढले जात असेल का? आणि असे होत असल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात? मनोविकारांचा आणि अमावस्या आणि पोर्णिमेचा जो संबंध लावला जातो तो ह्यामुळे असेल का?

ह्याच माहितीचा उपयोग करुन असे म्हणता येते का, की जर शस्त्रक्रिया करायची असेल तर ज्यावेळेस चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति त्याजागेवर कमीतकमी असेल तर कमी रक्तस्राव होईल व रुग्णाला त्याचा फायदा होईल?

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

7 Jan 2010 - 8:14 pm | देवदत्त

ह्याच्यावर आधारीत एका वैद्यकीय चिकित्सेबद्दल ऐकले होते. बहुधा 'ऑरा थेरपी'. नक्की आठवत नाही.

अमृतांजन's picture

7 Jan 2010 - 8:26 pm | अमृतांजन

आंतरजालावरील ऑरा थेरपीच्या माहितीनुसार ती वरील प्रकारात येते के नाही हा माझा संभ्रम आहे.

jaypal's picture

7 Jan 2010 - 8:43 pm | jaypal

'ऑरा थेरपी' नक्की नाही.पण लेखातील मुद्यांशी सहमत आहे. गुरत्वाकर्षण शक्तीमुळे कवटीतील मेंदु भोवतालच्या पाण्यातील पातळीत फरक पडुन त्याचा देखील काहीतरी परिणाम होत असावा. ज्योतिष शास्त्राप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक मानला जातो या मागे पण काहितरी तर्क असावा. जाणकरांकडुन अजुन माहितीची आपेक्षा.
अवातंर http://www.youtube.com/watch?v=rwVFUk7X_2w माझ खुप आवडत गाण
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

देवदत्त's picture

7 Jan 2010 - 10:37 pm | देवदत्त

ह्म्म, आता जालावर शोधल्यावर वाटते की ती ही नाही. बंगळूरू मध्ये असताना एक मित्र पुस्तकाच्या दुकानात अशा चिकित्सेवरील पुस्तके शोधत होता. त्याने बहुधा हेच नाव सांगितले होते.

असो, ह्याबद्दल आणखी माहिती मिळाल्यास चांगलेच होईल :)

होय मनुष्यशरिरावरती सर्व प्रकारची गुरुत्वाकर्षणे कार्यरत आहेत.

जर कातडीची शक्ती पाण्याच्या सर्फेस-टेन्शन इतकी कमी असती, तर ज्या प्रमाणात (गुणोत्तरात) पृथ्वीची भरती ओहोटी होते, त्या प्रमाणात रक्ताची भरती ओहोटी झाली असती. सर्वाधिक भरती-ओहोटी फरक ~१-२ मीटर असतो, म्हणजे
२मीटर/१२७५६००० मीटर (पृथ्वीचा व्यास) = ०.०००००८ टक्के

कातडी नसती तर १.५ मीटर उंचीच्या व्यक्तीच्या रक्ताच्या वरखाली जाण्याने त्याची उंची साधारण ०.११ मायक्रॉन = ०.०००११ मिमि वाढली/घटली असती.
मात्र कातडी ही पाण्याच्या सर्फेस-टेन्शनपेक्षा पुष्कळ घट्ट असल्यामुळे प्रत्यक्षात रक्तात त्याहूनही कमी फरक पडेल.

इतक्या फरकामुळे शस्त्रक्रियांमध्ये किंवा मेंदूच्या रक्ताभिसरणात फारसा फरक पडणार नाही. अवयवांच्या रक्ताभिसरणात याच्या हजारो-लाखोपट अधिक फरक केवळ श्वासोच्छ्वासाने होतो.

अमृतांजन's picture

7 Jan 2010 - 9:34 pm | अमृतांजन

>>कातडी नसती तर १.५ मीटर उंचीच्या व्यक्तीच्या रक्ताच्या वरखाली जाण्याने त्याची उंची साधारण ०.११ मायक्रॉन = ०.०००११ मिमि वाढली/घटली असती.>>

मानवाची उंची पृथ्वीच्व्या मध्यापासून घेतली तरी १२७५६००० + १.५ मीटर व्यास झाला असता व तेच गुणोत्तर जवळजवळ लागू पडेल. त्यामुळे तुमचा मुद्दा योग्यच वाटतो.

शस्त्रक्रियेत रक्तवाहीन्या कापल्या जातात त्यामुळे रक्तावर कातडीचा प्रभाव उरत नाही; म्ह्ण्णून पुन्हा एकदा हा मुद्दा विचारत घेऊन मार्गदर्शन करावे.

कातडीचा प्रभाव नसल्याप्रमाणेच गणित केले आहे.

शस्त्रक्रिया करताना रुग्ण साधारणपणे आडवा असतो, म्हणजे १.५ मीटर नसून ०.३ मीटरच्या आसपास. बाकीची ही मजेदार गणिते तुम्ही करावीत. सोपी आहेत.

कुतूहलासाठी तुमच्या व्यवसायातील उदाहरण द्याल का? प्रत्येक वस्तूचे प्रत्येक प्रक्रियेशी काही नाते असते. (म्हणजे आजूबाजूच्या डोंगरांचेही गुरुत्वाकर्षण असते, वगैरे...) त्या हजारोंनी प्रभावांमधून तारतम्यासाठी (प्राथमिकता-यादी ठरवण्यासाठी) तुम्ही काय निकष वापरता? (तुमचा व्यवसाय मला माहीत नाही, पण त्यात तुम्ही निष्णात आहात, याविषयी शंका नाही.)

उदाहरणार्थ : तुमचा व्यवसाय संगणकांचा/इलेक्ट्रॉनिक्सचा असेल, तर सूर्यावरील वादळांचा जसा वातावरणातील ध्रुवीय गोधूलींवर [आवरोरा बोरियालिस/ऑस्ट्रॅलिस] परिणाम होतो, तसा काही थोड्या प्रमाणात घरगुती इलेक्ट्रॉनिक्सवरतीसुद्धा होतो. असेच शेकडो-हजारो परिणामक आहेत. पैकी कुठल्या-कुठल्या परिणामकांकडे किती-किती लक्ष द्यावे याची प्राथमिकता तुम्ही कशी लावता? (अर्थात तुमचा व्यवसाय/नैपुण्य वेगळे असेल, तर वेगळे उदाहरण द्याल, हे आलेच. पण जो काय व्यवसाय आहे, त्याच्या प्रत्येक कृतीवर हजारोंनी सैद्धांतिक परिणामक असणार, हे निश्चित.)

तुमची वरील चर्चा थोड्या हास्यविनोदासाठी हलकीफुलकी आहे, हे आहेच. पण अशा बाबतीत प्राथमिकतेची यादी ठरवण्यासाठी सोपी गणिते सहज करता येतात, इतकेच (तेवढ्यास हलक्याफुलक्या पद्धतीने) मला दाखवायचे होते. गणित तसे बरोबर आहे, तरी गांभीर्याचा गैरसमज नसावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jan 2010 - 12:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भरती-ओहोटीचा प्रभाव फक्त द्रवांवरच पडतो असं नाही तर घनरूप वस्तूंवरही पडतो. (नेहेमीप्रमाणेच कंटाळा आहे म्हणून शोधत नाही आहे, पण )शोधल्यास अमावस्या-पौर्णिमेला पृथ्वीचा पृष्ठभाग किती वर येतो आणि अष्टमीला किती वर येतो तेही समजेल; त्याप्रमाणेच (इच्छा असल्यास) आपल्या त्वचेबाबत गणित करता येईल. आणि मग रक्तदाबावर कसा, किती परीणाम होतो हे ही निश्चित करता येईल. धनंजय यांनी आधीच एक उदाहरण दिलं आहे.

अदिती
अवांतर माहिती: गुरूचा अतिशय छोटा, पण गुरूला जवळ असणारा उपग्रह आयो (Io) याच्या पृष्ठभागाला गुरू, आणि गुरूचा दादा उपग्रह गॅनिमीड यांच्यामुळे अतिप्रचंड भरती-ओहोटी जाणवते. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड प्रमाणात ज्वालामुखी तयार झाले आहेत. या ज्वालामुखींमधून प्रचंड वेगात वस्तूमान बाहेर फेकले जाते. त्यामुळे आयोला क्षय झालेला उपग्रह असेही म्हणतात.

अतिअवांतर १: ज्या बाजूला चंद्र आहे त्या बाजूला भरती का येते हे समजलं, दुसर्‍या बाजूला का येते हे समजावून सांगितलं असेल असं लेखाच्या सुरूवातीला वाटत होतं.
अतिअवांतर २: चंद्राच्या पृष्ठभागालाही भरती-ओहोटी येते आणि ती पृथ्वीपेक्षा बरीच जास्त असते अशा अर्थाचं एखादं वाक्य पाहून कोणी साय-फाय गोष्ट लिहीली तर फार मौज वाटेल.

अमृतांजन's picture

12 Jan 2010 - 6:56 am | अमृतांजन

ज्या बाजूला चंद्र आहे त्या बाजूला भरती का येते हे समजलं, दुसर्‍या बाजूला का येते

समुद्राच्या पाण्यावर दुसर्‍या बाजूला (विरुद्ध) का भरती-ओहोटी येते ह्याची गणितं फार किचकट आहेत. पण त्याची निश्चीत कारणं मानवाला माहिती आहेत.

अतिअवांतर २

ही कल्पना सुंदर आहे. अपोलोअच्या वारीत ह्या शक्तीचा उपयोग त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरुन परत झेप घेतांना केला असावा.

घन वस्तूवर गुरुत्वाचा प्रभाव जसा साहजिकच वाटतो, तसा पाण्यावर तो दृष्यस्वरुपात दिसण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. समुद्राच्या पाण्यात मिनरल्स जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यावर सर्वाधिक (इतर द्रव पदार्थांच्या तुलनेत) परिणाम होतो का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jan 2010 - 10:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

समुद्राच्या पाण्यावर दुसर्‍या बाजूला (विरुद्ध) का भरती-ओहोटी येते ह्याची गणितं फार किचकट आहेत. पण त्याची निश्चीत कारणं मानवाला माहिती आहेत.

अगदी मान्य. फक्त चटकन हा कन्सेप्ट (गणिताशिवाय) समजायला त्रास होतो; तेव्हा सामान्य मिपाकरांसाठी यावर एखाद-दोन वाक्य असायला हरकत नव्हती.

समुद्राच्या पाण्यात मिनरल्स जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यावर सर्वाधिक (इतर द्रव पदार्थांच्या तुलनेत) परिणाम होतो का?

दोन उदाहरणं घेऊ या, समुद्राच्या पाण्याची भरती 'दिसते'; जमिनीची 'दिसत नाही'. आता यावरून लगेच उत्तर सापडेल.

अदिती

नितिन थत्ते's picture

12 Jan 2010 - 4:22 pm | नितिन थत्ते

>>तेव्हा सामान्य मिपाकरांसाठी यावर एखाद-दोन वाक्य असायला हरकत नव्हती.
(प्रतिसाद अदितीबैंना उद्देशून नाही) :)

आनंद घारे यांनी उपक्रमावर चंद्र आणि पृथ्वी यांची फुगडी या नावाचा लेख लिहिला आहे तो वाचावा.

त्याचे थोडक्यात सार देत आहे.

दोन समान आकाराची माणसे फुगडी घालतात तेव्हा त्यांच्या फिरण्याचा अक्ष साधारण दोघांच्या बरोबर मध्ये असतो. हा एक एक्सट्रीम.

जर एक माणूस सुमो पहिलवान आणि एक बालक फुगडी खेळू लागले तर ती फुगडी न वाटता ते बालक पहिलवानाभोवती फिरत आहे असे वाटते. हा दुसरा एक्सट्रीम.

प्रत्यक्षात हा अक्ष दोघांची वस्तुमाने आणि त्यांच्यातले अंतर यांच्यावर अवलंबून असेल. पृथ्वी आणि चंद्र या बाबतीत तो अक्ष पृथ्वी च्या केंद्रापासून सुमारे ४६७० कि मी वर असतो. (आकृत्या तिकडेच पहा)म्हणजे या अक्षाच्या दृष्टीने पृथ्वीची Radious of rotation चंद्राच्या बाजूस सुमारे २००० किमी व दुसर्‍या बाजूस १०००० किमी पेक्षा जास्त असते. त्यामुळे दुसर्‍या बाजूच्या पाण्यावर केंद्रोत्सारी बल जास्त प्रमाणात कार्य करते म्हणून दुसर्‍या बाजूसही भरती येते.
दोन्ही बाजूची भरती सारखी असते की नाही हे माहिती नाही. असली तर तो योगा योग म्हणावा लागेल.

फक्त समुद्रालाच भरती येते याचे कारण फक्त समुद्रालाच दुसरीकडचे पाणी खेचून घेण्याची सोय उपलब्ध असते. (एखाद्या तळ्याला लांबून-८-१० हजार किमी वरून पाणी मिळण्याची सोय झाली तर तळ्यालाही भरती येईल.

नितिन थत्ते

अमृतांजन's picture

12 Jan 2010 - 7:55 pm | अमृतांजन

धन्यवाद नितीन- माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल व श्री. आनंद घारे ह्यांच्या लेखाच्या दुव्याबद्दल- त्या लेखातून खूपच महत्वाची माहिती कळाली.

पाण्याच्या एका छोट्या कारंज्यावर एक गोटी ठेवली की ती वजनाच्या बरोबर असलेल्या पाण्याच्या दाबाबरोबर असेल तर त्यापाण्यावर ती तरंगते हा एक खेळ पाहिल्याचे स्मरते. तसेच ह्या चंद्राच्या आणि पृथ्वीच्या परस्परशक्तीचे होत असावे.

अमृतांजन's picture

12 Jan 2010 - 7:03 am | अमृतांजन

>>तुमचा व्यवसाय संगणकांचा/इलेक्ट्रॉनिक्सचा असेल, तर सूर्यावरील वादळांचा जसा वातावरणातील ध्रुवीय गोधूलींवर [आवरोरा बोरियालिस/ऑस्ट्रॅलिस] परिणाम होतो, तसा काही थोड्या प्रमाणात घरगुती इलेक्ट्रॉनिक्सवरतीसुद्धा होतो. असेच शेकडो-हजारो परिणामक आहेत. पैकी कुठल्या-कुठल्या परिणामकांकडे किती-किती लक्ष द्यावे याची प्राथमिकता तुम्ही कशी लावता? >>>

आजवर आहे ती सभोवतालची नैसर्गिक परिर्थिती शून्य असे मानून जो काही रिझल्ट मिळतो आहे तो प्रमाण मानावा असे आहे. पण जेव्हा नैसर्गिक शक्तीत असे जाणवण्याइअतके बदल दिवसात ठराविक वेळेत होत असतात तेह्वा त्याचा सुक्षम का होईना परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर होत असावा हे मात्र आता पहावेसे वाटते.

जेह्वा न्यानो टेक्नॉलजीचे दिवस येतील तेव्हा त्यातील एलेमेंटस जर मायक्रो व्होल्ट भारावर चालू शकत असतील तर त्यावर अशा नैसर्गिक बदलांचा नक्की परिणाम होइल असे वाटते.

अमृतांजन's picture

7 Jan 2010 - 9:38 pm | अमृतांजन

ह्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करुन पाण्याच्या पंपांची वीज वाचवली जाऊ शकते का?

अमृतांजन's picture

7 Jan 2010 - 9:41 pm | अमृतांजन

दुर्बीणताईंचेही उत्तर वाचायला आवडेल.

चित्रा's picture

8 Jan 2010 - 3:47 am | चित्रा

हल्ली ढोकळे खाण्यात मग्न आहेत.

प्रभो's picture

8 Jan 2010 - 4:11 am | प्रभो

आणी शेती करण्यातही

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

अमृतांजन's picture

8 Jan 2010 - 6:32 am | अमृतांजन

शेतात ढोकळे खातायत??- चांगला नावीन्यपूर्ण विषय आहे- लावणीला उपेगी पडंल.

टोळभैरव's picture

8 Jan 2010 - 6:29 pm | टोळभैरव

मी टोळ. :)

विकास's picture

7 Jan 2010 - 10:10 pm | विकास

जर मानवाच्या रक्तावर परिणाम होत असेल तर रक्त जास्त मेंदूकडे ओढले जात असेल का?

मेंदूच का? हृदय का नाही?

बाकी, आज अष्टमी आहे. त्यामुळे कदाचीत अशा गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव कमी असेल. अर्थात त्यामुळे आपण म्हणता तसे असेल तर, मानवी मेंदूकडे रक्त कमी ओढले जात असेल.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अमृतांजन's picture

7 Jan 2010 - 10:43 pm | अमृतांजन

हृदयावरही अर्थातच परिणाम शक्य आहे- त्यामुळेच आणि वरील शक्यतेमुळे जास्त रक्तपुरवठा होत असेल. हृदय पंपासारखे काम करते त्यामुळे त्याला कमी शक्तीत जास्त दाबाने रक्त पाठवत असल्यामूले ते डोक्याच्या उंचीवर पोहोचत असावे.

विजुभाऊ's picture

8 Jan 2010 - 9:54 am | विजुभाऊ

मानवी रक्तप्रवाहावर सर्वात जास्त परीणाम होत असेल तर तो र्‍हदयाचा. त्या पुढे गुरुत्वाकर्षण फिक्के पडते. अन्यथा उभे राहिल्यावर सगळे रक्त पायात गोळा झाले असते आणि मेंदू रिकामा झाला असता.

कशिद's picture

8 Jan 2010 - 8:06 pm | कशिद

हा शुद्ध वेड़े पणा आहे, अस मी नाही खगोल शात्रद्न्य दा. कु सोमन एक भाषानत बोलले ,
चंद्राचा गुरुताकर्शनाचा परिणाम फक्त समुराद्रवर होता...बाकि कशावर नाही.
उदा. सांगतो जर रक्त भिसरनावर परिणाम होतो अस आपला मह्नाने असेल तर माल सांगा

तलवा मधील पाण्याला भारती काय येत नाही?

तुमचा आमह्चा पाण्याच्या टाक्या पूर्ण भरल्या आस्ताना पुर्नीमेला भरतिमुले वाहून जातात का?

चंद्राच्या गुरुत्वकर्शानाचा BP वर काही फरक पडत नाही...उगीच काही गणिते मांडू नका ....

काही शास्त्रद्नाया पृथ्वी चपटी आहे अस म्हणतात अणि गणित मांडतात पण आता ते किती खरे आहे हे साग्ल्यानाच माहित आहे !!!

बाकि असे विषय मिपा वर येतात समाधान वाटले.

अक्षय

मदनबाण's picture

8 Jan 2010 - 8:36 pm | मदनबाण

हा.हा.हा... अमृतांजन ताई / भाऊ
शस्त्रक्रियेचे काय माहित नाही पण...कोणाला जास्त त्रास होत असेल तर सरळ शिर्षासन करावे...कसे ? ;)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

अमृतांजन's picture

8 Jan 2010 - 9:42 pm | अमृतांजन

सरळ शिर्षासन म्हणजे काय?

मदनबाण's picture

8 Jan 2010 - 9:51 pm | मदनबाण


अगदी असं सरळ... ;)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

अमृतांजन's picture

8 Jan 2010 - 10:20 pm | अमृतांजन

मस्त- टरारबुंग!

चिरोटा's picture

8 Jan 2010 - 8:49 pm | चिरोटा

प्रेमात पडणे आणि ह्रुदयाला होणारा रक्तपुरवठा ह्याचा काही संबंध असेल काय? नाहीतरी प्रेम्,ह्रुदय्,चंद्र ह्यांचा तसा संबंध असतोच.
प्रेमात पडलेले वैद्यकिय तज्ञच ह्या विषयी काही सांगु शकतील.

भेंडी
P = NP