धर्मावर टिका करायला उच्च न्यायालयाची परवानगी...

विकास's picture
विकास in काथ्याकूट
7 Jan 2010 - 1:19 am
गाभा: 

टाईम्स ऑफ इंडीयातील या बातमी प्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने धर्मावर टिका करण्यात काहीच गैर नाही मात्र याचा अर्थ द्वेष पसरवायला परवानगी आहे असा नाही अशा अर्थाचा निर्णय दिला आहे.

आर. व्हि. भसीन नामक एका वकीलाने लिहीलेल्या इस्लामवरील पुस्तकात चुकीची विधाने केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यावर (तीन-चार वर्षांनी) बंदी घातली. त्याविरुद्धच्या सुनावणीच्या वेळेस हे सांगितले गेले. कोर्टाने त्या पुस्तकावरील बंदी कायम ठेवली कारण त्यात अभ्यास न करता आणि संदर्भ न देता इस्लाम आणि मुस्लीम जनतेच्या विरोधात विधाने होती मात्र जर कोणी संदर्भासहीत अभ्यासू टिका एखाद्या धर्मावर केली तर त्यात गैर काहीच नाही असे कोर्टाचे म्हणणे आहे.

यातील एक वाक्य, जर कोर्टाचे असेल तर कोर्टाचे नाहीतर टाईम्सचे फारच विनोदी वाटले: A person may have a right to say a particular religion is "not secular", said the HC, but it cautioned against rabid contents "reeking of hatred for a particular community" and "malafide exercise to stir communal passions". असे वाटायचे कारण असे की यातून कोर्टाचे असे (अप्रत्यक्ष) म्हणणे होते की, काही रिलिजन्स हे "सेक्यूलर" असू शकतात!

हा निर्णय म्हणले तर चांगला आहे पण त्याचा वापर कोण आणि कसा करेल यावर बरेच काही घडू अथवा बिघडू शकते असे वाटते.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

7 Jan 2010 - 1:57 am | चिरोटा

सेक्युलॅरिटीची व्याख्या आहे-
Secularity (adjective form secular) is the state of being separate from religion.
धर्म सेक्युलर असणे म्हणजे काय प्रकार आहे? बहुदा हे टाईम्सचेच वाक्य असावे.
भेंडी
P = NP

टारझन's picture

7 Jan 2010 - 2:42 am | टारझन

भां*द बा*वला ह्या **** च्या !!
प्रत्येक ***** हा आतंकवादी नसला तरी आत्तापर्यंत सापडलेला प्रत्येक आतंकवादी केवळ आणि केवळ ***** होता.

आता ह्या * चा अर्थ सांगायची पाळी मी तरी आणलेली नाही. प्रत्येकाला एकंच अर्थ सुचला तर त्यात माझा काय दोष ? आणि ह्यात खास तो काय अभ्यास करावा लागला ? समोर आहे जे आहे ते . च्यायला .. अजुन बरीच किड शिल्लक आहे इथे.

निमीत्त मात्र's picture

7 Jan 2010 - 3:03 am | निमीत्त मात्र

प्रत्येक ***** हा आतंकवादी नसला तरी आत्तापर्यंत सापडलेला प्रत्येक आतंकवादी केवळ आणि केवळ ***** होता.

टेररीस्ट अ‍ॅटॅकच्या चार्जखाली खटले चालू असणार्‍या साध्वी ठाकूर आणि कर्नल पुरोहिताच्या **** चे काय?

हर्षद आनंदी's picture

7 Jan 2010 - 6:12 am | हर्षद आनंदी

कसाब, अफजल गुरु यांच्य बद्दल माहीती तुम्हाला घरबसल्या मिळेलच, कारण ते आजचे स्टार आहेत.

टेररीस्ट अ‍ॅटॅकच्या चार्जखाली खटले चालू असणार्‍या साध्वी ठाकूर आणि कर्नल पुरोहितची अवस्था काय आहे, हे जरा त्यांना नाशिक जेल मध्ये जाऊन भेटुन या.

दोघांच्यातला फरक कळल्यावर तुम्ही परत असे बोलणार नाहीत, तर हातात बंदुक घेऊन दिसेल त्याला गोळ्या घालत सुटाल!!

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

कवटी's picture

7 Jan 2010 - 11:25 am | कवटी

श्री रा. रा. निमित्त मात्र यांना शांततेच नोबेल पारितोषिक तसेच धार्मिक सलोखा (हे काय असते? याचा अर्थ कोणी सांगू शकेल काय?) कायम राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल भारतरत्न जाहिर करतो.
एकदा निमित्त मात्र साठी जोरदार टाळ्या होउन जाउदेत.

कवटी

झाली म्हणून न्यायालयाला जाग आली तर?

या आधी एखाद्या दुसर्‍या धर्माबद्द्ल अशी जाग आली असती तर मराठी संस्थळावरचे बरेचसे धागेपण कायदयाच्या दृष्टीने आक्षेपार्ह ठरले असते..

अजूनही "अभ्यास" करून हिंदूधर्माला झोडायला परवानगी आहे, स्युडो-सेक्युलरांनी सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही..

धनंजय's picture

7 Jan 2010 - 4:43 am | धनंजय

असा वाक्यप्रयोग कोर्टाचाच आहे - आताच निर्णयाची पीडीएफ वाचली.

हा वाक्यप्रयोग गोंधळात पाडणारा आहे, आणि कोर्टाच्या प्रूफरीडरने हे वाक्य तपासायला हवे होते. संदर्भाने गोंधळ नाहिसा होतो.

संदर्भ असा आहे, की मूळ वादग्रस्त पुस्तकामध्ये "इस्लाम सेक्युलर नाही" असा उल्लेख आहे. आणि त्या पुस्तकातला संदर्भ-अर्थ असा की "इस्लामातील धर्माचार्यांच्या मते मुसलमान व्यक्तीने सेक्युलरिझमला विरोध केलाच पाहिजे, वगैरे."

मत मत योग्य किंवा अयोग्य (किंवा निरर्थक) काहीही असले, तरी त्या पुस्तकातल्या लेखकाला "इस्लाम सेक्युलर नाही" असे म्हणण्याचा हक्क आहे, असे कोर्टाचे म्हणणे आहे. त्यांच्या वाक्यप्रयोगात मात्र गोंधळ झाला आहे. कोर्टालाच स्वतःहून तो वाक्यप्रयोग करायचा असल्याचे भासते. काय म्हणायचे ते समजून घ्यायला पूर्ण परिच्छेद वाचावा लागतो!

अर्थात "अमुक धर्म सेक्युलर नाही" किंवा असे कुठलेही निरर्थक/अंतर्विरोधी विधान करायचा व्यक्तीला हक्क आहे, हे कोर्टाचे वाक्य तसे अंततोगत्वा ठीकच आहे. पण "या लेखकाने हे नेमके निरर्थक विधान केले, त्याला ते विधान करायचा हक्क आहे" असे कोर्टाच्या वाक्यात स्पष्ट झाले असते, तर बरे झाले असते.

प्रूफे तपासणार्‍याच्या डुलक्या - आणखी काय म्हणावे.

हर्षद आनंदी's picture

7 Jan 2010 - 6:04 am | हर्षद आनंदी

भारतीय न्यायव्यवस्था, राज्यशासन, संविधान एक असह्य विनोद बनली आहे, याचे अजुन चांगले उदाहरण अजुन कुठे मिळेल.

आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था जवळपास प्रत्येक अधिकारी पदावर बसलेल्या माणसाची झाली आहे.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

आणि त्यात त्याच्या *डीला विंचु चावला भरीत भर हातात कोलीतही पडलं.
(तेज्यामायला सम्दा बट्ट्याबोळ)

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सुनील's picture

7 Jan 2010 - 10:31 am | सुनील

मूळात कायद्याची भाषा ही लंबीचवडी. अनेक उपवाक्ये जोडून एकच एक लांब, परिच्छेदाएवढे वाक्य बनविणारी. कारण यामुळे काटेखोरपणा जपला जातो, असे सांगण्यात येते.

वर धनंजय यांनी विशद केल्याप्रमाणे, सदर प्रकरणात काटेखोरपणा दाखवला गेला नाही हे उघड आहे.

पुस्तकावरील बंदी कायम ठेवण्यामागची कोर्टाची भुमिका समजली नाही. कारण अभ्यास न करता आणि संदर्भ न देता आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तिमा's picture

10 Jan 2010 - 7:49 pm | तिमा

कोर्टाने परवानगी दिली तरी आपल्या देशांत फोफावलेली समांतर न्यायालये मुळीच परवानगी देणार नाहीत.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|