दासबोध : स्वाध्यायाद्वारे अभ्यासाची संधी - २०१० साठी प्रवेश

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
5 Jan 2010 - 3:21 pm
गाभा: 

II श्रीराम समर्थ II

श्रीमद दासबोध अभ्यासक्रम

आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,अंतरीक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही.
अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे.
दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात.आत्मविश्वास वाढवतात. साधेच औषध पण अत्यंत गुणकारी असा अनेक लोकांचा अनुभव आहे.
दासबोधाच्या वाचनाचे निश्चित फळ आहे- आता श्रवण केलियाचे फळ / क्रीया पालटे तात्काळ - अशी निः संदेह ग्वाही समर्थ स्वःत देतात. दासबोधाचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून आणि अभ्यासाची गोडी लागावी म्हणून, गेल्या अनेक दशकापासून, श्रीमद दासबोध अभ्यासक्रम चालवला जातो. श्री. समर्थ सेवा मंडळाच्या 'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' या उपक्रमामुळे दासबोधाचा अभ्यास आता सहज शक्य झाला आहे.आजपर्यंत १००,०००++ लोकांनी या ज्ञानपाणपोईचा लाभ घेतला आहे.
* हा अभ्यासक्रम आहे, पारायण नाही. समर्थांना पारायण नव्हे, आचरण अपेक्षीत आहे.
*हा स्वा -ध्याय आहे,यासाठी गुरू नाही ( दासबोध ग्रंथ हाच गुरू ), पूजा-अर्चा, भजन-सत्संग अथवा प्रवचनाला जाण्याचे प्रयोजन नाही.
*तासिका नाही, चाचणी नाही, सराव अथवा पाठांतर नाही. स्वाध्याय अशासाठी की त्यामुळे अभ्यासाला शिस्त लागते.
*परीक्षा नाही, गुण/ श्रेणी नाही, आचरण आणि प्रचिती हेच गुणपत्रक! प्रवेश फी नाही. प्रवेश परीक्षा नाही.
*एक स्वाध्याय लिह्ण्यास साधारण ५० मिनिटे लागतात. ६०% प्रश्न हे 'एका वाक्यात उत्तरे ' या स्वरुपात!
*प्रवेश पात्रता- वयाची अट १८ वर्ष पूर्ण , मराठी लिहीता- वाचता येणे, आणि नवीन शिकण्याची आवड.
*दर महीन्याला एक याप्रमाणे पहील्या वर्षी 'प्रवेश' चे १२ स्वाध्याय, दुसऱ्यावर्षी 'परीचय' चे १२ स्वाध्याय आणि तिसऱ्या वर्षी 'प्रबोध’चे १२ स्वाध्याय, असे एकूण ३६ स्वाध्याय घरच्या घरी पुस्तकात बघून सोडवायचे आणि नेमून दिलेल्या 'समिक्षकांकडे' पोस्टाने पाठवायचे ! इतके सोप्पे !
*पुस्तके अत्यल्प किंमतीत उपलब्ध ( एकूण ३ वर्षांकरीता अंदाजे ७५ रुपये + ट.ख़.).अथवा पुस्तके आंतरजालावरून डाऊन लोड करता येईल.
*पुस्तकांचा, लेखन साहीत्य, आणि टपाल खर्च अभ्यासार्थीने करणे अपेक्षित. अथवा अभ्यासक्रम आता इ-मेल द्वारे देखील करता येईल.

प्रवेश प्रक्रिया सुरू - जानेवारी २०१० साठी प्रवेश चालू आहे.

पत्रव्यवहारासाठी आणि अधिक माहितीसाठी, आपल्या पत्त्याच्या पाकीटासह खालील पत्त्यावर संपर्क करावा,
'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' श्रीसमर्थ सोसायटी. धन्वंतरी सभागृहाच्या मागे, पटवर्धन बाग, पुणे -४११००४
अथवा - ई पत्र पाठ्वावे- dasbodh.abhyas@gmail.com
II जय जय रघुवीर समर्थ II

प्रतिक्रिया

मीनल's picture

5 Jan 2010 - 6:22 pm | मीनल

या पुस्तकाच नाव काय?
श्रीमद दासबोध ?
दसबोधाअरनेक पुस्तक उपलब्ध आहेत म्हणून निश्चित करायच आहे.

भारतातून मागवायचा प्रयत्न आहे.
मुंबईत कुठेह ही मिळेल अस वाटतय.

मीनल.

विटेकर's picture

6 Jan 2010 - 9:37 am | विटेकर

www. samarthramdas400.in या सन्केत स्थळावर समर्थांचे बहुतेक वाड्मय उपलब्ध आहे.... नव नविन उपलब्ध होत आहे . अर्थातच सार्थ दासबोध आहेच. पण दृक्-श्राव्य मध्यमातही अनेक प्रवचने /व्याख्याने उपलब्ध आहेत.
याशिवाय गुगलिंग केलेत तर अनेक संकेत स्थळे उपलब्ध आहेत... sanskritdocuments तर आहेच आहे.
- विटेकर

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

अमृतांजन's picture

5 Jan 2010 - 8:23 pm | अमृतांजन

प्रकाटाआ

चतुरंग's picture

5 Jan 2010 - 8:30 pm | चतुरंग

संपूर्ण दासबोध मिळेल (सुरुवातीला ज्ञानेश्वरी आहे त्यानंतर दासबोध आहे.)
तिथेच पत्रद्वारा अभ्यासक्रमाची माहिती आणी पत्ताही आहे.
श्री.विटेकरांचा ईमेल सुद्धा तिथे दिलेला आहे! :)

(दास)चतुरंग

हे रामदासांच ओवी/वाक्य आहे का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विकास's picture

5 Jan 2010 - 9:01 pm | विकास

"आधी केले मग सांगितले" हे माझ्या आठवणी प्रमाणे रामदासांचेच वाक्य आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अमोल केळकर's picture

6 Jan 2010 - 1:14 pm | अमोल केळकर

कृपया शक्य असल्यास फोन नं. कळवावा

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा